मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

marathi lekh लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||

  आयुष्याच्या एकातरी पायरीवर आपण नकळत अडकून जातो, ना पुढे जाण्याचा मार्ग सापडतो ना मागे येण्याचा मार्ग. मागे जाण्याचा मार्ग तर पूर्णपणे बंद होतो. अशावेळी आपण हतबल होऊन बसतो अगदी निवांत , त्यावेळी काय करावं याचा विचार करत , तो क्षण असा असतो की लोकांनी दिलेला छोटासा सल्लाही आपल्याला आपला अपमान वाटायला लागतो. आपण ठरवलेले मार्ग ,आपले ध्येय याच्यामध्ये आलेल्या त्या संघर्षात आपण शांत होऊन जातो.  यामध्ये मग येते वेळ ती इतरांच्या मार्गांची, त्यांच्या सल्ल्याची. कधीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपल्या आयुष्याचे निर्णय ज्यावेळी इतर लोक घेऊ लागतात तेव्हा आपण आपल्यावर विचार करण्याची वेळ आलेली असते. पण फक्त विचार करणं पुरेस नाही त्यावर काहीतरी मार्ग काढण्याची वेळ आलेली असते. शेवटीं आपण जिथे हतबल होऊन थांबतो, तेव्हा विचार करावा की, आपण दुसऱ्याच्या विचारांवर चालण्यासाठी हा अट्टाहास केला होता का?नाही ना?? पण याचा अर्थ असा नाही की कोणाचंच ऐकायचं नाही!! योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं. कारण असे कित्येक लोक असतात जे योग्य सल्ला देतात, त्याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण रस्त्याव...

वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi lekh ||

दरवर्षी वाढदिवस येतो आणि कित्येक आठवणी देऊन जातो. त्याची सुरूवात नवे वर्ष सुरू झाले की आपल्या जन्म दिवशी कोणता वार येतो तिथून केली जाते आणि दरवर्षी हे नक्की होत. हल्ली तर लहान मुलांचे महिन्याचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात. पण पूर्वी तस काहीच नसायच, जन्म दिलेल्या आईलाही आपलं मूल केव्हा जन्मल हे नीटसं आठवत नसायचं. अगदी लांब कशाला माझ्या आईच तसच काहीस आहे. तिला तिची जन्म तारीख नक्की कधी आहे हेच माहित नाही. आज्जीला विचारलं की आज्जी एवढंच सांगायची की मोठी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुझ्या आईचा जन्म झाला, १९६७ की ६८ ते नीटसं सांगता येत नाही, पण त्यादिवशी मंगळवार होता. बस्स एवढंच ते काय माहिती आईच्या वाढदिवसाबद्दल. मग काय गेली कित्येक वर्ष आईचा वाढदिवस आम्ही द्वादशीला साजरा करू लागलो. पण नक्की तारीख ती काय जाणुन घ्यायची इच्छा मला काही शांत बसू देईना. या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुल...

lockdown आणि खुप सारा वेळ || MARATHI ARTICLE || BLOG ||

 सध्या जगामध्ये आलेल्या महामारीमुळे सर्वानाच घरी बसण्याची वेळ आलेली आहे. आणि तो नाईलाज झाला आहे. पण या परिस्थितीमुळे एक मात्र गोष्ट मागच्या वर्ष दीड वर्षात खूप मिळाली आणि ती म्हणजे मुबलक वेळ. मला ते पुस्तक वाचायला खूप आवडतं पण काय करू वेळच मिळत नाही. असे खूपदा आपण जवळ जवळ सगळ्यांच्याच तोंडून ऐकतो. ऐकलही असेल. पण गेल्या वर्षभरापासून ही सबब आता देऊन चालणार नाही हे मात्र खर. या lockdown मूळे आपल्या सगळ्यांना me Time खूप मिळाला. त्याचा कित्येकांनी योग्य वापर केला, तर काहींनी फक्त घड्याळाकडे पाहत दिवस घातले. आपल्या आवडीनिवडी काळाच्या ओघात , किंवा जबाबदाऱ्या सांभाळत कुठे राहून गेल्या कळालच नाही. अशाच आपल्या आवडी निवडी , राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा सुरू करायला काय हरकत आहे. नाही का ?? उगाच सकाळ संध्याकाळ टीव्ही समोर बसून इतके रुग्ण वाढले , अस झाल तस झालं ऐकत बसण्यात काय अर्थ आहे ?? त्यामुळे आपला फोकस थोडा स्वतःकडे आता वळवू आणि lockdown चे पालन करत स्वतःमध्ये बदल घडवू, थोड शिकू, थोड वेगळं जगू , आपल्यातल्या सकारात्मकतेला आपल्या चांगल्या गोष्टी शिकण्यास सुरुवात करायल लावू,  तर मग पाहुय...

सुरुवात || Manatle Vichar || Marathi Blog ||

 खुप दिवस असे निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत. असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायम...