क्षणांत

आयुष्यात जगताना आपण विसरुन जातो आपल्याच लोकांना.. पण जेव्हा आयुष्याची संध्याकाळ होते तेव्हा त्याच लोकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  एक कविता ..

'क्षणांत .!'

"आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
आयुष्यभर डावलेल्या नात्यात का
हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला
मी आणि माझे आयुष्य म्हणताना
का विसरलो आपुलकीच्या मित्रांना
पुन्हा नव्याने ओळख करण्यास का
दिसली आठवण ती सावल्यांना
हळुवार निघुन जाताना हे जीवन
विसरलोच मी स्वतःला ओळखायला
कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी
सुर्यास्त झाला का या जीवनाचा
पण मनात होती एक आस पुन्हा
सुंदर असावा क्षण अखेरचा
जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास..!"
-योगेश खजानदार

क्षणात...!!!

आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
आयुष्यभर डावलेल्या नात्यात का
हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला
मी आणि माझे आयुष्य म्हणताना
का विसरलो आपुलकीच्या मित्रांना
पुन्हा नव्याने ओळख करण्यास का
दिसली आठवण ती सावल्यांना
हळुवार निघुन जाताना हे जीवन
विसरलोच मी स्वतःला ओळखायला
कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी
सुर्यास्त झाला का या जीवनाचा
पण मनात होती एक आस पुन्हा
सुंदर असावा क्षण अखेरचा
जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास
साथ हवी होती ती सावल्यांना
-योगेश खजानदार

खड्ड्याचा रस्ता ..

कोणीच काही बोलत नाही
मनके गेले झिजून
खड्ड्यातून चालतो आम्ही आता
सवय झाली सोसून

कधी इकडुन खड्डा दिसतो
जातो त्याला चुकवून
कळतच नाही तेव्हा आम्हाला
दुसरा खड्डा पाहून

रस्ते दुरुस्ती केली पाहिजे
सगळेच थकले बोलुन
गेले कित्येक जीव तरी
गप्प सगळे बघून

आले कित्येक नेते आणि
बोले सगळं भरभरून
खड्डेमुक्त महाराष्ट्र करतो
बोले फक्त तोंडभरून

कित्येक निधी याचे मंजुर
खड्डे न हाले जागेवरुन
रोजच सोसतो उद्याही सोसु
इलाजच नाही त्यावाचून

बुजलेच जर खड्डे सारे
बोलायच तरी कशावरून
गेले कित्येक जीव तरी
गप्प सगळे बघून
-योगेश खजानदार



मित्र(Friendship Day)

मित्र, दोस्त, यार, सखा असे
मैत्रीची कित्येक नाव असतात
कधी उन्हात आपल्या जवळ येऊन
आपली सावली ते होतात

हिरमुसलेला चेहरा पहाताच
एक हसु ते ओठांवर आणतात
कधी दिसताच अश्रू डोळ्यात
स्वतःच्या हाताने ते पुसतात

मैत्री म्हणजे निस्वार्थ नातं
प्रत्येक क्षणात ते जपतात
कधी हसु असतं, कधी रुसु असतं
पण हे नातं ना कधी विसरतात

दोस्त म्हणतं आपल्या जीवनात
ते सहज दाखल होतात
रक्ताच्याही नात्या पलिकडे जाऊन
हे नातं ते जपत राहतात

मनाच्या या प्रत्येक कोपर्‍यात
अतुट हे नाती दिसत राहतात
कधी विसरता हे मन त्यास
एकाकी सारे वाटु लागतात

म्हणुनच तर जीवनात या
ही नाती हवी असतात
ज्याला मित्र, दोस्त, यार, सखा असे
कित्येक नाव असतात
-योगेश खजानदार



सुर्यास्त...!!!

"अस्तास चालला सूर्य
जणु परका मज का भासे
रोज भेटतो मज यावेळी
तरी अनोळखी मज का वाटे

ती किरणांची लांब रेष
मज एकटीच आज का भासे
झाडा खालचे मंद दिवे मज
आपुलकीचे आज का वाटे

परतीस चालली पाखरे
घराची ओढ मनात का दाटे
कोण पाहतो वाट त्याची
सुर्यासही विचारावेसे वाटे

कधी नारंगी कधी गुलाबी
रंगाची उधळण करत जाते
काळ्याभोर अंधाराची नभात
सुरुवात होतं अशीच जाते

कोणाची सुंदर संध्याकाळ
कोणास ऐकटेपणा का भासे
लांबलेल्या सावल्यात का कोण
स्वतःस हरवतं यातं का जाते

अस्तास चालला सुर्य
जणु परका मज का भासे..!!"
-योगेश खजानदार





गीत..

सांग ना एकदा तु मला
सुर हे तुझे मनातले
ऐकना एकदा तु जरा
शब्द हे माझे असे

कधी पाहुनी तुज मी
हरवले हे शब्द असे
बघ ना एकदा तु जरा
सुर हे विरले कसे

कधी फुलांसवे दिसली पाखरे
तुझेच गोडवे गाते असे
कधी तुझ्याचसाठी मन हे वेडे
तुझ्याच भोवती फिरते जसे

तु हसली तर वेलीवरची
फुले ही का हसते असे
तु लाजलीस तर वेडावुन ती
तुझ्याच प्रेमात पडते कसे

शोधुन थकलो सुरांस आज त्या
तुझ्याचसाठी वेडे असे
कधी वेलीवरती कधी फुलांवरती
शब्दही मज भेटते जसे

विसरले शब्दही, विरले ते सुरही
प्रेमाचे हे गाणे कसे
तुझेच सुर ते, माझेच शब्द ते
हरवले तरी का गीत असे
-योगेश खजानदार







Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...