मित्र, दोस्त, यार, सखा असे
मैत्रीची कित्येक नाव असतात
कधी उन्हात आपल्या जवळ येऊन
आपली सावली ते होतात
हिरमुसलेला चेहरा पहाताच
एक हसु ते ओठांवर आणतात
कधी दिसताच अश्रू डोळ्यात
स्वतःच्या हाताने ते पुसतात
मैत्री म्हणजे निस्वार्थ नातं
प्रत्येक क्षणात ते जपतात
कधी हसु असतं, कधी रुसु असतं
पण हे नातं ना कधी विसरतात
दोस्त म्हणतं आपल्या जीवनात
ते सहज दाखल होतात
रक्ताच्याही नात्या पलिकडे जाऊन
हे नातं ते जपत राहतात
मनाच्या या प्रत्येक कोपर्यात
अतुट हे नाती दिसत राहतात
कधी विसरता हे मन त्यास
एकाकी सारे वाटु लागतात
म्हणुनच तर जीवनात या
ही नाती हवी असतात
ज्याला मित्र, दोस्त, यार, सखा असे
कित्येक नाव असतात
-योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply