शेवटचं एकदा बोलायचं होतं

शेवटचं एकदा मला
बोलायचं होत
प्रेम माझ तुला
सांगायच होत

सोडुन जाताना मला
एकदा पहायच होत
डोळ्यातली आसवांना
बोलायचं होत

का कसे कोण जाणे
नात हे तुटत होत
चुक तुझी की माझी
मन हे रडत होत

शेवटचं एकदा मला
बोलायचं होत...
-योगेश खजानदार

मझ विश्वची अनुरूप

शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप

मझ घडविले तु
हे संसार दाखविले
तुझ सम जगात
दुसरे न प्रतिरूप

निस्वार्थ तुझे प्रेम
आई देवाची प्रतिमा
तुझ चरणी मस्तक
मझ विश्वची अनुरुप

शब्द व्हावे बोलके

ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे
तु आहेस जवळ पण,
शब्द व्हावे बोलके

हे प्रेम नी भावना
नकळत जे घडते
अबोल त्या बंधनात
शब्द व्हावे बोलके

होकार तुझा मझ
नजरेतूनी दिसते
इशारे हे आपुले
शब्दा विना बोलके

ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे

प्रेम

दिवस माझे नी तुझे
गोड त्या स्वप्नातले
चांदण्या रात्रीचे क्षण
परतुन आज यावे

सखे सोबत तुझी
अंधारल्या त्या रात्री
लागी मनाला ओढ
आज मिठीत यावे

हे प्रेम की वेदना
मना काही समजेना
तुझ्या त्या ओढीने
वाट कीती पहावे

लगबग ही मनाची
वाट त्या येण्याची
दुरून हा इशारा
प्रेम करूनी पहावे. ..

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...