मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||


कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !!
चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!
बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !!
बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !!

घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !!
बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !!
धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !!
तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !!

होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !!
कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !!
गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !!
माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !!

बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !!
प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !!
अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !!
अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !!

काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !!
कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !!
होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !!
दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !!

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !!
चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...