बावरे मन || Marathi Love Poem ||


"कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस
सांगितले तरी त्या वेड्या मनास
ते खरं केव्हाच वाटणार नाही

तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळ
ते उगाच बसून राहील
चाहूल कोणती होताच त्यास
लगबगीने ते धावत जाईल

तुझ्याच आठवणी सांगत ते
कित्येक वेळ बोलत राहील
अश्रुसवे उगाच मग तेव्हा
रात्रभर चांदणे पाहिलं

कधी हळूवार वाऱ्याची झुळूक
तुलाच शोधून येईल
तुझा गंध हरवला असा की
हा श्वासही त्यास विसरून जाईल

एक चित्र तुझे मनात असे की
त्यात आठवांचे रंग भरून घेईल
पहावेसे वाटलेच तुला कधी तर
अलगद ते डोळे मिटून राहील

अधीर झाले उगाच जेव्हा
त्यास मी समजून घेईल
पण ऐकलेच नाही त्या मनाने
तर ती आस मनात राहील

कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस..!!"

✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

विठु माऊली || विठ्ठल विठ्ठल || पांडुरंग कविता ||


"विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी !!
साद एक होता, भरली ती पंढरी !!
एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी !!
विठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरी !!

उभा तो विठू सावळा, एका त्या विठेवरी !!
तहान भूक , उन्ह नी वारा , विसरले ते वारकरी !!
भेटीस त्या विठ्ठलाच्या, आले ज्ञानोबा माउली !!
टाळ मृदंग वाजत आज, हरवली ती पंढरी !!

एक भाव , एक मन ,गाते ती पंढरी !!
तुकोबांचे अभंग सारे , बोलते ही पंढरी !!
व्यापून सारे आकाश, आपुली ही पंढरी !!
नाव घेता विठू रायाचे , नजरेत एक पंढरी !!

विठ्ठल विठ्ठल नामात सारी ,तल्लीन ही पंढरी ..!!!"

✍️©योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...