अंतर...!!(कथा भाग-२)

  "त्यावेळीही असाच निघून गेलास आणि आजही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच योगेश तु का निघून गेलास? मी तुषार बरोबर का निघून गेले हे तुला विचारावं असं का वाटतं नाही. त्या वेड्या मनातल प्रेम मी ओळखल होत रे!! पण माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणारा तुषार माझ्या सोबत होता. आणि त्याच प्रेम नाकारण्याची ताकद माझ्यात न्हवती !" प्रियाच्या मनात विचाराचं काहुर माजलं होत. योगेश गेल्या नंतर ही ती कित्येक वेळ तिथेच बसून होती.
  अखेर सर्व विचाराचा गोंधळ सोडून ती coffee shop मधून घरी आली. प्रियाची आई तिची वाटच पाहत होती. प्रिया काही न बोलता थेट आपल्या रूम मध्ये निघून गेली. हातात पेन घेऊन लिहू लागली.

प्रिय तुषार,
  "माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाहीत. जणु मी पुन्हा पुन्हा जगतेय. तुझ्याचसाठी .!!

मनातल सार त्या वही वर लिहून प्रिया कित्येक वेळ आपले अश्रू ढाळत होती. "योगेश तुझ्या कित्येक प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे न्हवती पण तुझ प्रेम मी ओळखु नाही शकले असे नाहीरे!!"  प्रियाचे अश्रू जणु खूप काही बोलत होते. खूप वेळाने ती room मधून बाहेर आली. आईने सगळं काही ओळखल होत न राहवून ती बोलली
"मनातल सार मनातच राहील की खूप त्रास होतो प्रिया!! तुषार तुझ्या आयुष्यात होता!! आणि योगेश वर तुझ मनापासून प्रेम होत हे कधीच तुझ्याकडून ही लपलेलं नाही!! पण त्याला ते कधी कळलंच नाही!! तुषार ने तुझ्याकडे प्रेम मागितल फक्त,  तेही त्याच्या आयुष्याच्या अचानक झालेल्या सांजवेळी आणि तु त्याला नकार नाही दिलास. कारण त्यावेळी त्याला तुझी जास्त गरज होती!!"  आई पुढे बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणाली.
"आई आज coffee shop मध्ये योगेश भेटला होता!! आजही मला तो तसाच सोडून निघून गेला ज्यावेळी मी तुषार सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता!!"
"आणि आजही तु त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असशील?" आई प्रियाकडे पाहत म्हणाली.
"खूप प्रयत्न केला!! पण तो नाही थांबला!! प्रिया अश्रू आवरत म्हणाली.
   कित्येक वेळ प्रिया आईला मनातल सार सांगत होती. तूषारचा आठवणींत अडकून ती योगेशला शोधण्याचा प्रयत्न करत होती. तुषार तिच्या आयुष्यातलं एक सुंदर पान होत. जे अचानक गळून पडल होत. त्या पानावर खूप काही लिहिल होत. जे कधीही पुसता न येण्यासारखे होत. पण योगेश तर एक सुंदर कविता होती जी सतत ओठांवर येतं होती.
  योगेशला पुन्हा भेटण्याची ओढ प्रियाला खूप होती. पुढचे कित्येक दिवस ती रोज त्या coffee shop मध्ये जात होती. पुन्हा योगेश तिला भेटेल आणि यावेळी त्याला असाच निघून जाऊ नाही द्यायचं अस ठरवून रोज ती तिथे जात होती. आणि एक दिवस अचानक तिच्या समोर कोणीतरी येऊ बसले. तो योगेशच होता.  प्रियाला त्याला समोर पाहून खूप आनंद झाला.
"तुझी वाट पाहता पाहता रोज coffee प्यायची सवय लागली मला!!" प्रियाला मनातला आनंद लपवताच आला नाही.
"तु रोज येतेस इथे? मी भेटेन पुन्हा म्हणून?? योगेश कुतूहलाने विचारत होता.
"हो!!"
पण का?
"कारण कित्येक गोष्टीं आजही अधुऱ्याच आहेत! ज्या मनात आहेत तुझ्याही, आणि माझ्याही!! खूप काही मला सांगायचय !! खूप काही तुझ्याकडून ऐकायचं आहे !!! " प्रिया त्या जुन्या नात्यास पुन्हा बोलकं करत होती. योगेशला मनातल सगळ काही सांगत होती!!!

क्रमशः ...

-योगेश खजानदार

 

 

अंतर‌...!!(कथा भाग १)

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कारण काळाने तो बोथट करून टाकला. आणि तुझ्याही मनात आता काही नसाव असं मला वाटत!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. त्या अचानक घडलेल्या भेटीत तिला काय बोलावं तेच कळेना .कित्येक काळ लोटून गेला पण योगेश आजही तसाच आहे याचं तिला नवल वाटत होत. कॉफी शॉप मधल्या त्या भेटीत तिच्यासाठी तो एक सुंदर क्षण होता. कारण कितीही झाल तरी तो तिचा जुना मित्र होता. कदाचित त्या कॉफी मध्ये ते जुने क्षण पुन्हा आठवले जातं होते.
"नाहीरे त्यावेळीही नाही आणि आताही माझ्या मनात काही नाही आपल्या नात्याबद्दल! " प्रिया कॉफीचा कप हातात घेत म्हणाली.
"मग पुन्हा कॉन्टॅक्ट करावसाच वाटला नाही कधी?
"नाही!!"
"म्हणजे तुझ्या मनात आजही माझ्या बद्दल राग आहे तर?"
"नाहीरे!!" पण पुन्हा धिरच नाही झाला तुला बोलायचं!!"
"वेडे आपल्यातले नाते एवढं कमजोर न्हवते की ते असे संपून जावे!! योगेश प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. प्रियाला त्यावेळी योगेशकडे पाहणं अवघड चालल. कदाचित नात्यांमधले अंतर त्यावेळी नजर चोरत होते.
"पण मला आजही याचं दुःख वाटत की कोण तिरहाईक माणसाने आपले इतके सुंदर नाते मोडले. योगेश तुला आठवत तु मला रोज भेटायचास. कधी शक्य नाही झाले तरी फोन मेसेजेस करायचा. पण मला वेडीला ते कधी कळलंच नाही. तूषारच्या आधीपासून तु माझ्या आयुष्यात होतास. पण मी कधीच तुला ओळखु शकले नाही." 
"मी तरी कुठे माझ्या मनातल तुला सांगायचो सांग ना!! योगेश प्रियाकडे एकटक पाहत होता. कारण नात्यामध्ये दोघेही तितकेच हरले होते.
"त्याचवेळी मनातल सांगितलं असत तर कदाचित आपण असे नसतो भेटलो!" प्रिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती.
"सांगितलं असत तरी वेळ निघून गेली होती!!" कारण तेव्हा तु माझ्या पासुन खूप दूर गेली होतीस. नकळत तु माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस! आणि ते सहन करण्यासारखं न्हवते. जी व्यक्ती कधीच आपल्या पासुन दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमके तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाही होत. आणि मी केलही नाही. आणि जे काही त्यानंतर झाल त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन. कारण शेवटी निर्णय तुझा होता!!" योगेश भावनिक होऊन बोलत होता. कित्येक शब्दांचे भावणेचे बांध आता तुटले होते.
"माझही चुकलं होत त्यावेळी!!" कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मी तुला सांगायला हवं होत. तुला नेहमी मी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते. पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे!!" प्रिया कॉफी कडे पाहत म्हणाली.
"बघना दिवसरात्र एकमेकांशिवाय न राहणारे आपण प्रत्येक क्षणाला बोलणारे आपण कित्येक वर्षाने भेटतोय."
"होना आणि तुला कधीच आठवण नाही आली माझी!!"  प्रिया योगेशला भावनिक होऊन विचारत होती.
"आली ना!! खूप वेळा आली पण तु काही भेटली नाहीस पुन्हा!! Actually  तु दिलेला तो pen आजही माझ्यकडे आहे!! "  त्यावेळी तु म्हणाली होतीस आठवत!! की नात जर नीट नाही ना चाललं तर त्यातली refill बदलायची ,नात नाही बदलायच." योगेश अगदी सहज तिला जुन्या आठवणींत घेऊन जात होता.
"हो नात नाही बदलायच!!. मग तुझ्या मनातल मला का नाही सांगितलं तु!! माझ्यावरचं प्रेम का नाही सांगितलस मला!! या प्रश्नानं योगेश गोंधळून गेला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
"चल मी निघतो आता!! " प्रिया योगेशला थांबवत होती पण योगेशची नजर तिला पाहतच न्हवती.
"नाही योगेश माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला!!"  प्रिया पुन्हा पुन्हा त्याला बोलत होती.
नक्की देईन पण आता नाही!! योगेश जाण्यास निघाला होता. पुन्हा तिला भेटण्याचं वचन देऊन.
  पण प्रिया तिथेच होती. संपलेला कॉफीचा कप खूप काही तिला बोलत होता.  नात संपले तरी त्याची सुरवात पुन्हा करण्यास सांगत होता. कदाचित मनातलं सगळं सांगायला ते नात पुन्हा जोडत होता...

क्रमशः ...

-योगेश खजानदार

Online

या online आणि offline चा जगात
नातीच आता सापडत नाही
कधी like आणि share मध्ये
कोणालाच मन कळत नाही

Accept केली तर मैत्री होते
पण मैत्रीचा अर्थच खरा कळत नाही
Favourite list मध्ये आता
आपलीच माणसं दिसत नाही

कधी तुटतात नाती एका message मध्ये
इथे बोलायचीच गरज रहात नाही
कित्येक मित्र झालेत या जगात की
मैत्रीची किंमतच खरी कळतं नाही

कधी अनोळखी व्यक्तीशी बोलताना
शब्दच आता पुरत नाही
कट्ट्यावर बसून मित्रांना
बोलायलाच आता वेळ नाहीं

खरंच जग छोट झालंय
जिथे आपलेच लोक सापडत नाही
अनोळखी जगात या आता
मित्राची list ही जणु संपत नाही

Emoticons म्ह्णजे भावना असतात
पण मनातलं काहीच कळत नाही
Mobile कितीही smart झाला तरी
खऱ्या भावना ओळखु शकत नाही

कितीही स्वस्त झाले बोलणें तरी
कोणाला बोलायचं हेच कळतं नाही
कारण online आणि offline चा जगात
आपलेच लोक आता सापडत नाही
-योगेश खजानदार


जीवन... !!

कभी पंछियों से पूछना
गिरना क्या होता है
तेज हवाओं में कभी
उड़ना क्या होता है
हवा भी रोक सके ना उसे
ऐसा होसला क्या होता है

कभी पेड़ से पूछना
अचल रेहाना क्या होता है
तूफान से लड़कर भी
जीना क्या होता है
तेज धूप में जलकर भी
छाव देना क्या होता है

कभी नदी से पूछना
बेहना क्या होता है
हर एक को अपने दिल मै
समाना क्या होता है
कितनी भी आए मुश्किलें
समंदर से मिलना क्या होता है

कभी सूरज से पूछना
जीवन क्या होता है
दूसरों के लिए सदा ही
जीना क्या होता है
अपनों के ख़ुशी के लिए
खुद्को जलाना क्या होता है

कभी पूछना तुम अपने आप से
सांसों का मतलब क्या होता है!!
-योगेश खजानदार

चाहूल

चाहूल कोणती ती आज मनास
माझ्या आठवणीतल्या त्या घरास
ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा
कोण आले हे दारात

ओळखीचा वाटे का आवाज
साद मझ का बोलावण्यास
मी पाहिले पुन्हा वळून जेव्हा
कोणीच नव्हते का दारात

हा भास होई का मनास
आठवणींच्या सावल्यास
जणु अंधारल्या त्या रात्रीत का
हरवुन जातात त्या स्वतःत

ही कोणती चाहूल लागली मनात
कोणीच नाही तिथे दारात
तरी धावती ही नजर कुठे
शोधते हरवलेल्या चेहऱ्यास

का चाहूल ती मनात
साद घालते त्या आठवणीस
आरश्यात बघून मलाच मी
शोधले ना कधी स्वतःस

ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा
स्वतःच सापडलो मी स्वतःस...!!!
-योगेश खजानदार



मन गुंतणे...

गुंतण म्हणजे काय असतं
स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं
अतुट अश्या बंधनात कधी
उगाच स्वतःला अडकवायच असतं

कोणाच्या प्रेमात पडायचं असतं
सुंदर आठवणीत झुरायच असतं
येताच येऊ नये बाहेर अश्या
नात्यांमध्ये रहायचं असतं

प्रत्येक क्षणात जगायचं असतं
मायेच्या कुशीत रमायचं असतं
ओढ अशी व्हावी या मनाची की
पुन्हा नात्यास भेटायचं असतं

धागा धागा विनायचं असतं
नजरेत भरुन वहायचं असतं
मनामध्ये मन मिसळून तेव्हा
आपलंस कोणी करायच असतं

वाटेवरती घुटमळायच असतं
वाट कोणाची तरी पहायच असतं
कळत नकळत तेव्हा उगाच
काळजी कोणाची तरी करायचं असतं

कारण,

गुंतण म्हणजे काय असतं तर
स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं
-योगेश खजानदार




किताब

आखरी पन्ने पर वही
तुमसे मिलना जो था
इसी लिए तो सारी
किताब मैंने पढ़ी है

कहीं अकेला में था
कभीं यादों में तुम मेरे थे
रास्तों की बाते ही कुछ ऐसी के
मंज़िले तुम्हिसे मिली है

कुछ कहता यू था
कहीं गुमसुम रेहता मै था
दिल की बाते यू मेने
तुमसे कभी ना कहीं है

कहीं मुस्कुराया मै ऐसे
वजह तुम ही हो जैसे
कहीं आसु जो आये तो
रात यादों में खोई है

इंतेजार यू था की
तुमसे मिलना जो था
इसी लिए तोह सारी
किताब मैंने पढ़ी है
-योगेश खजानदार

नयन ते

मी रोज ज्या वाटेवरून जातो तिथे एक सुंदर प्राजक्त आहे.. जणू रोज जाता येता मला काही तरी बोलते.. रोज अनोळखी ते फुल ओळखीचे होते आणि माझ्यासवे तिची वाट पहाते .. ती वाट तिचं.. त्या फुलांचा सुगंध ही तोच  आणि वाट पाहत सुकुन जाते.. एक कविता ...

'नयन ते... !!!'

"आठवताच तुझा चेहरा सखे
शब्दांसवे सुर गीत गाते
पाहताच तुझ नयन ते
मन ही मझ का उगा बोलते

मागे जावी ती ओढ तुझ्या नी
प्राजक्ताचे गंध का येते
वाट ती तुझी परतून येण्या
हुरहुर जीवास का लावते

हरवुन गेले प्राजक्त ही जेव्हा
शोधुन पाहीले ह्रदयात ते
वाटेवरच्या फुलासही मी
पुसले क्षण तुझ्या परतीचे

घुटमळते का तिथेच आता
वेडे मन का काही न बोलते
प्राजक्ताच्या फुलांसवे का
तुझीच वाट पहात बसते

सांग सखे येशील का परतुनी
प्राजक्त मनाचे सुकुन जाते
वेड्या गंधाची ती जाणीव का
मनात सतत आता दरवळते

अखेर पुन्हा नव्याने फुलावी
प्राजक्त वाटे जे अनोळखी ते
गंध ओळखुन पुन्हा सांगती त्यास
वाट तुझी पाहते नयन ते...!"
-योगेश खजानदार

ओंजळ. .!!

"ओंजळीत घट्ट धरून ठेवताच
फुलं चुरगळुन जेव्हा जातं
मनातल्या आठवणींना तेव्हा
सुगंध देऊन जातं

पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून
सुगंध घ्यावस का वाटत रहातं
मनातल्या सुगंधात तेव्हा का
आपलंसं कोण भेटतं रहातं

का त्रास त्या फुलांस ओंजळीचा
सुगंधाची चुक ना कोण पहातं
आठवणींच ओज तेव्हा का
सतत मनास बोल लावतं रहातं

चुरगाळून गेले ते फुल कितीही
ओंजळीस तरी सुगंध देत रहातं
आठवणींच्या वेदना किती तरीही
मनास का ते सुखावून जातं

झाली ओंजळ रिकामी तरी
सुगंध अखेर तसाच राहतो
कितीही विसरु पाहता आठवणी
मनात सुगंध नेहमीच दरवळत रहातो

ओंजळीत घट्ट धरून ठेवताच
फुलं चुरगळून जेव्हा जातं ..!!!"
-योगेश खजानदार





न कळावे...!!!

"न कळावे सखे तुला का
भाव ते कवितेतले
तुझ्याचसाठी चंद्र नी तारे
वेचले मी जणु सुर जसे

कधी बोलुनी लाटांस या
आठवते ती सांज सखे
कधी शोधती क्षण हे आपुले
विरुन जाता पाहते कसे

का असे बोलती पाखरे
फुलांस आज ते पाहता जसे
किती गुंफली माळ मनाची
तरी तुला न कळते कसे

वार्‍यासही शोधून सापडेना
सुर जे हरवले असे
बेधुंद शब्दाच्या वादळात जणु
कित्येक भाव विरले कसे

सांग काय राहिले मनाचे
भाव जे अव्यक्त असे
सुर ही हरवले शब्द ही थकले
तरी मन हे अबोल कसे

न कळावे भाव तुला का
सखे माझ्या कवितेतले ...!!!"
-योगेश खजानदार




जुने मित्र

जुने मित्र आता हरवलेत
कोणी खुप busy झाले
तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

वेळ पाहुन आता भेटु लागले
भेटुनही काही मित्र आता
घड्याळात पाहु लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

कोणी मोजकेच बोलु लागलेत
तर कोणी काय बोलावं ते म्हणु लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

कोणी success बद्दल बोलु लागलेत
तर कोणी स्वतःचच गुणगान गाऊ लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

कोणी माझ तुझ करु लागलेत
तर कोणी उगाच तिरस्कार करु लागलेत
कधी जुन्या भांडणाचे आता
उगाच राग धरू लागलेत
खरंच जुने मित्र आता हरवलेत

सगळं share करणारे मित्र आता
उगाच खोट बोलु लागलेत
मित्रा सोबत दुखः वाटणारे
उगाच खोटी प्रतिष्ठा जपु लागलेत

खरंच जुने मित्र आता पुन्हा
आठवणीत येऊ लागलेत
एक कप चहासाठी
पुन्हा कट्टयावर भेटु लागलेत
वेळ न पहाता अवेळी येऊ लागलेत
मनातल्या जुन्या आठवणी
पुन्हा share करु लागलेत
-योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...