पद्म विभूषण || पद्म भूषण || पद्मश्री पुरस्कार विजेते २०२२ ||




पद्मविभूषण

१. श्रीमती प्रभा अत्रे, कला , महाराष्ट्र
२. श्री. राधेश्याम खेमका, साहित्य आणि शिक्षा, उत्तर प्रदेश
३. जनरल बिपीन रावत, सिव्हिल सर्व्हिस , उत्तराखंड (मरणोत्तर)
४. श्री. कल्याण सिंघ, पब्लिक अफेअर्स, उत्तर प्रदेश ( मरणोत्तर)


पद्मभूषण 

१. श्री. घुलाम नबी आझाद, पब्लिक अफेअर्स , जम्मू आणि काश्मीर
२. श्री. व्हिक्टर बॅनर्जी, कला , पश्चिम बंगाल
३. श्रीमती गुर्मीत बावा, कला, पंजाब (मरणोत्तर )
४. श्री. बुद्धदेब भट्टाचार्य, पब्लिक अफेअर्स, पश्चिम बंगाल
५. श्री. नटराजन चंद्रशेकरण, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
६. श्री कृष्ण एल्ला आणि श्रीमती सुचित्रा एल्ला(मिळून) , व्यापार आणि उद्योग, तेलंगणा
७. श्रीमती. मधुर जाफरी, अन्य - पाककला, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका
८. श्री. देवेंद्र झझारिया, खेळ , राजस्थान
९. श्री. राशिद खान, कला, उत्तर प्रदेश
१०. श्री. राजीव महर्षि, सिव्हिल सर्व्हिस, राजस्थान
११. श्री. सत्या नारायण नाडेला, व्यापार आणि उद्योग, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका
१२. श्री. सुंदर राजन पिचाई, व्यापार आणि उद्योग, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका
१३. श्री. सायरस पूनावाला, व्यापार आणि उद्योग, महाराष्ट्र
१४. श्री. संजय राजाराम, विज्ञान आणि अभियांत्रिकी , मेक्सिको
१५. श्रीमती प्रतिभा रे, साहित्य आणि शिक्षा, ओडिशा
१६. स्वामी सच्चिदानंद, साहित्य आणि शिक्षा, गुजरात
१७. श्री. वशिष्ठ त्रिपाठी, साहित्य आणि शिक्षा , उत्तर प्रदेश

पद्मश्री

१. श्री. प्रह्लाद राय अग्रवाल, व्यापार आणि उद्योग, पश्चिम बंगाल
२. प्रोफेसर नजमा अख्तर, साहित्य आणि शिक्षा, दिल्ली
३. श्री. सुमित अंतील, खेळ, हरयाणा
४. श्री. टी सेंका आओ,  साहित्य आणि शिक्षा , नागालँड
५. श्रीमती कमलिनी अस्थाना आणि श्रीमती नलिनी अस्थाना(मिळून) , कला , उत्तर प्रदेश
६. श्री. सुब्बांना आय्याप्पान, विज्ञान आणि अभियांत्रिकी, कर्नाटक
७. श्री. जे. के. बजाज, साहित्य आणि शिक्षा , दिल्ली
८. श्री. सिर्पी बालसुब्रह्मण्यम , साहित्य आणि शिक्षा, तामिळनाडू
९. श्रीमद् बाबा बालिया, सामाजिक कार्य , ओडिशा
१०. श्रीमती संघमित्रा बंदोपाध्याय, विज्ञान आणि अभियांत्रिकी, पश्चिम बंगाल
११. श्रीमती माधुरी बडथ्वाल, कला, उत्तराखंड
१२. श्री. अखोने असगर अली बशरत, साहित्य आणि शिक्षा, लडाख
१३. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, मेडिसिन, महाराष्ट्र
१४. श्री. हरमोहिंदर सिंघ बेदी, साहित्य आणि शिक्षा, पंजाब
१५. श्री. प्रमोद भगत, खेळ, ओडिशा
१६. श्री. एस. बल्लेश भाजंत्री, कला, तामिळनाडू
१७. श्री. खंडू वांगचुक भुटिया, कला, सिक्कीम
१८. श्री. मारिया ख्रिस्तोफर बर्स्की, साहित्य आणि शिक्षा, पोलंड
१९. आचार्य चंदनाजी, सामाजिक कार्य, बिहार
२०. श्रीमती सुलोचना चव्हाण, कला, महाराष्ट्र
२१. श्री. नीरज चोप्रा, खेळ, हरयाणा
२२. श्रीमती शकुंतला चौधरी, सामाजिक कार्य, आसाम
२३. श्री. शंकरनारायण मेनन चुंडायील, खेळ, केरळ
२४. श्री. एस. दामोदरन, सामाजिक कार्य, तामिळनाडू
२५. श्री. फैसल अली दर, खेळ, जम्मू आणि काश्मीर
२६. श्री. जगजीत सिंह दर्दी, व्यापार आणि उद्योग , चंदिगढ
२७. डॉक्टर प्रोकर दासगुप्ता, मेडिसिन, युनायटेड किंग्डम
२८. श्री. आदित्य प्रसाद दाश, विज्ञान आणि अभियांत्रिकी, ओडिशा
२९. डॉक्टर लता देसाई, मेडिसिन, गुजरात
३०. श्री. मालजीभाई देसाई, पब्लिक अफेअर्स, गुजरात
३१. श्रीमती बसंती देवी, सामाजिक कार्य, उत्तराखंड
३२. श्रीमती लुरेंबाम बिनो देवी, कला, मणिपूर
३३. श्रीमती मुक्तामणी देवी, व्यापार आणि उद्योग, मणिपूर
३४. श्रीमती श्यामामणी देवी, कला, ओडिशा
३५. श्री. खलील धंतेज्वी, साहित्य आणि शिक्षा ,गुजरात(मरणोत्तर)
३६. श्री. सावजिभाई ढोलकीया, सामाजिक कार्य, गुजरात
३७. श्री. अर्जुन सिंघ धूर्वे, कला, मध्य प्रदेश
३८. डॉक्टर विजयकुमार विनायक डोंगरे, मेडिसिन, महाराष्ट्र
३९. श्री. चंद्रप्रकाश द्विवेदी, कला, राजस्थान
४०. श्री. धनेश्वर इंगती, साहित्य आणि शिक्षा , आसाम
४१. श्री. ओमप्रकाश गांधी, सामाजिक कार्य, हरयाणा
४२. श्री. नरसिंम्हाराव गरिकापटी, साहित्य आणि शिक्षा , आंध्र प्रदेश
४३. श्री. गिरधारी राम घोंजू, साहित्य आणि शिक्षा, झारखंड (मरणोत्तर)
४४. श्री. शैबल गुप्ता, साहित्य आणि शिक्षा, बिहार(मरणोत्तर)
४५. श्री. नरसिंघा प्रसाद गुरू, साहित्य आणि शिक्षा, ओडिशा
४६. श्री. गोसावीडू शैक हसन, कला, आंध्र प्रदेश (मरणोत्तर)
४७. श्री. र्युको हिरा, व्यापार आणि उद्योग, जपान
४८. श्रीमती सोसम्मा इयपे, अन्य - पशुसंवर्धन, केरळ
४९. श्री. अवध किशोर जडिया, साहित्य आणि शिक्षा , मध्य प्रदेश
५०. श्रीमती सोवकार जानकी , कला, तामिळनाडू
५१. श्रीमती तारा जौहार, साहित्य आणि शिक्षा , दिल्ली
५२. श्रीमती वंदना कटारिया, खेळ, कर्नाटक
५३. श्री. एच. आर. केशवामुर्थी, कला, कर्नाटक
५४. श्री. रुटगर कोर्टेनहॉर्स्ट, साहित्य आणि शिक्षा , आयर्लंड
५५. श्री. पी. नारायण कूरूप, साहित्य आणि शिक्षा, केरळ
५६. श्रीमती अवनी लेखरा, खेळ, राजस्थान
५७. श्री. मोतीलाल मदान, विज्ञान आणि अभियांत्रिकी, हरयाणा
५८. श्री. शिवनाथ मिश्रा, कला, उत्तर प्रदेश
५९. डॉक्टर नरेंद्र प्रसाद मिश्रा, मेडिसिन, मध्य प्रदेश (मरणोत्तर)
६०. श्री. दर्षणाम मोगिलाह, कला, तेलंगणा
६१. श्री. गुरुप्रसाद मोहापात्रा, सिव्हिल सर्व्हिस, दिल्ली (मरणोत्तर)
६२. श्री. थाविल काँगामपट्टू ए. व्ही मुरुगैयान, कला , पुदुचेरी
६३. श्रीमती आर् मुथ्थूकंन्नम्मल, कला, तामिळनाडू
६४. श्री. अब्दुल खदेर नादकट्टीन, अन्य - ग्रासरूट इंनोवेशन, कर्नाटक
६५. श्री. अमाई महालिंगा नाईक, अन्य - शेती, कर्नाटक 
६६. श्री. ट्सेरींग नामग्याल, कला, लडाख
६७. श्री. ए. के. सी. नटराजन, कला, तामिळनाडू
६८. श्री. व्ही. एल. नघाका, साहित्य आणि शिक्षा, मिझोराम
६९. श्री. सोनू निगम, कला, महाराष्ट्र
७०. श्री. राम सहाय पाण्डेय, कला, मध्य प्रदेश
७१. श्री. चिरापत प्रपंदाविद्या, साहित्य आणि शिक्षा, थायलंड
७२. श्रीमती के. व्ही. राबिया, सामाजिक कार्य, केरळ
७३. श्री. अनिल कुमार राजवंशी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, महाराष्ट्र
७४. श्री शीश राम, कला, उत्तर प्रदेश
७५. श्री. रामाचंद्रई, कला, तेलंगणा
७६. डॉक्टर सुंकरा वेंकटा अदीनारायना राव, मेडिसिन, आंध्र प्रदेश
७७. श्रीमती गामित रमिलाबेन रायसिंगभाई, सामाजिक कार्य, गुजरात
७८. श्रीमती पद्मजा रेड्डी, कला, तेलंगणा
७९. गुरू टूल्कु रींपोचे, अन्य- अध्यात्मवाद, अरुणाचल प्रदेश
८०. श्री. ब्रह्मानंद संखवालकर, खेळ, गोवा
८१. श्री. विद्यानंद सारेक, साहित्य आणि शिक्षा, हिमाचल प्रदेश
८२. श्री. कालीपडा सारेन, साहित्य आणि शिक्षा, पश्चिम बंगाल
८३. डॉक्टर विरास्वामी सेशिह, मेडिसिन, तामिळनाडू
८४. श्रीमती प्रभाबेन शाह, सामाजिक कार्य, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव
८५. श्री. दिलीप शहाणी, साहित्य आणि शिक्षा, दिल्ली
८६. श्री. रामदयाल शर्मा, कला, राजस्थान
८७. श्री. विश्वमूर्ती शास्त्री, साहित्य आणि शिक्षा, जम्मू आणि काश्मीर
८८. श्रीमती तातियाना लवोवणा शौम्यान, साहित्य आणि शिक्षा, रशिया
८९. श्री. सिद्धलिंगैया, साहित्य आणि शिक्षा, कर्नाटक (मरणोत्तर)
९०. श्री. काजी सिंघ, कला, पश्चिम बंगाल
९१. श्री. कोन्साम इबॉम्चा सिंघ, कला, मणिपूर
९२. श्री. प्रेम सिंघ, सामाजिक कार्य, पंजाब
९३. श्री. सेठपाल सिंघ, अन्य - शेती, उत्तर प्रदेश
९४. श्रीमती विद्या विंदू सिंघ, साहित्य आणि शिक्षा, उत्तर प्रदेश
९५. बाबा इक्बाल सिंघ जी, सामाजिक कार्य, पंजाब
९६. डॉक्टर भीमसेन सिंघल, मेडिसिन, महाराष्ट्र
९७. श्री. शिवानंदा, अन्य - योग , उत्तर प्रदेश
९८. श्री. अजय कुमार सोंकार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, उत्तर प्रदेश
९९. श्रीमती अजिता श्रीवास्तव, कला, उत्तरप्रदेश
१००. सदगुरु ब्रह्मेशानंदा आचार्य स्वामी, अन्य - अध्यात्मवाद , गोवा
१०१. डॉक्टर बालाजी तांबे, मेडिसिन, महाराष्ट्र (मरणोत्तर)
१०२. श्री. रघुवेंद्रा तंन्वार , साहित्य आणि शिक्षा, हरयाणा
१०३. डॉक्टर कमलाकर त्रिपाठी, मेडिसिन, उत्तर प्रदेश
१०४. श्रीमती ललिता वकील, कला, हिमाचल प्रदेश
१०५. श्रीमती दुर्गाबाई व्याम, कला, मध्यप्रदेश
१०६. श्री. जयंतकुमार मगणलाल व्यास, विज्ञान आणि अभियांत्रिकी , गुजरात
१०७. श्रीमती बदाप्लिन वार, साहित्य आणि शिक्षा, मेघालय

आई || कथा भाग १० || Story || Marathi ||




भाग १०

कित्येक वेळ शीतल आणि समीर बोलत बसले. त्रिशाने शीतलला ओळखलं नाही याचं दुःख वाटत होत. ती पुन्हा पुन्हा त्रिशाकडे जाण्याचा हट्ट करत होती. पण समीर तिला थांबवत होता. तेवढ्यात आई त्रिशाला घेऊन आली. समोर तिला पाहून शीतल तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागली 
"मी तुझी आई आहे बाळा !! येना माझ्याकडे !! " शीतल आपले डोळे पुसत म्हणाली. 
"जा बाळा !! आपल्या आईकडे जा !! " आई त्रिशाकडे पाहून म्हणाली. 

त्रिशाने क्षणभर शीतलकडे पाहिलं ती अलगद तिच्याकडे गेली. शीतलला याचा आनंद झाला. पुन्हा कित्येक वेळ ती तिच्यासोबत खेळत राहिली. मध्येच ती तिला आपल्या मिठीत घेत होती. समीर आणि आई लांबुनच कित्येक वेळ हे पाहत होते. तेवढ्यात समीरच्या बाजूला ठेवलेला फोन वाजला. समीर फोन उचलताच समोरून कोणी स्त्री बोलत होती,

"हॅलो !! दीक्षितांचा नंबर आहे ना हा ??"
" हो !! आपण ??"
"नमस्कार , मी मेघा जोशी बोलते आहे ! शीतल मॅमच्या ऑफिस मधून !!"
"ओके !! एक मिनिट हा !! त्यांना देतो मी फोन !!"
समीरने फोन बाजूला ठेवला. समोर त्रिशा सोबत खेळत असलेल्या शीतलला त्याने हाक मारली. तिच्या ऑफिसमधून फोन आल्याचं तिला सांगितलं. शीतलने फोन घेतला.

"हॅलो !! हा मेघा बोल ना !!"
"मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??"
"अग हो हो !! मेघा ॲक्च्युली मी थोड्या वेळाने ऑफीसमध्ये फोन करणारच होते की आज मी येणारच नाही म्हणून !! माझ्या मुलीची अचानक तब्येत बिघडली म्हणून रात्रितूनच मला इकडे यावं लागलं !!"
"ओके !! मॅम मग काल रात्री तरी मला सांगायचं !! एक फोन केला असता तरी चाललं असतं !!"
"नाही ग !! खूप उशीर झाला होता म्हणून नाही केला मी फोन !! "
"बरं ठीक आहे !! तुम्ही घ्या काळजी !! तुमचा निरोप मी बॉसना कळवते !! त्याही सकाळपासून मला विचारतं होत्या अचानक कुठे गेल्या तुम्ही म्हणून !! "
" नक्की सांग त्यांना !! आणि माझ्याकडून त्यांना सॉरी पण सांग !! मी अशी न काही कळवता आले त्यांना वेगळंच काही वाटेनं पुन्हा !! "
"डोन्ट वरी मॅम !! त्या सहसा फॅमिली प्रोब्लेम असेल तर काही म्हणत नाहीत !! मी सांगते त्यांना !!"
"थॅन्क्स मेघा !! "

शीतल आणि मेघाच बोलणं झाल्यावर शीतल थोडा वेळ आपल्याच विचारात गुंग होते. हे पाहताच समीर तिच्या जवळ येतो,
"काय झालं शीतल ?? काही प्रोब्लेम तर नाही ना ??"
" नाही समीर !! प्रोब्लेम अस म्हणता येणार नाही !! पण उद्या परवा मला पुन्हा ऑफिसला जाव लागेल !! म्हणजे पुन्हा त्रिशापासून दूर जावं लागेल !! "
"तेव्हाच तेव्हा पाहुयात ना !! आतातरी मस्त वेळ घालव तिच्यासोबत !! ती बघ तुझ्याकडे कशी पाहते आहे ती !!"
समीर मिश्किल हसत म्हणाला. शीतलही गालातल्या गालात हसली. त्रिशाकडे धावत गेली. कित्येक वेळ तिच्यासोबत खेळत बसली. समीर एकटक त्या दोघींकडे पाहत राहिला,

"शीतल आणि त्रिशा या दोघी जणू माझ्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत, आई बाबां नंतर माझ्या आयुष्यात माझं अस म्हणावं जिथं हक्कान मी माझं सर्वस्व अर्पण कराव अस एक अढळ स्थान म्हणजे या दोघी. ज्यांच्यासाठी घाम गाळावा, अहोरात्र कष्ट करावे, जगातलं हवं ते सुख यांच्या पायी आणून ठेवावं असच मला वाटतं. शीतलने जेव्हा पहिल्यांदा मला ती आई होणार आहे हे सांगितलं !! तेव्हा जेव्हढा आनंद झाला होता त्याहीपेक्षा जास्त आनंद मला आज होतोय त्या दोघींना हसत खेळत पाहताना. एका सुखी संसारात अजून ते दुसर काय हवं होत.  पहिल्यांदा जेव्हा शीतल मुल नको अस म्हणाली होती तेव्हा पुढे काय?? हा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता. पण आज त्या सर्व प्रश्नांची जणू उत्तरेच मला मिळाली आहेत. " समीर शीतल आणि त्रिशाकडे पाहून हसला. त्याच्या मनात विचारांचं तेव्हा द्वंद्व सुरू होत.

समीर ,शीतल ,आई आणि बाबा चौघेही रात्री एकत्र जेवायला बसतात. तेव्हा शीतल आपल्या ऑफिसमधील कित्येक गप्पा गोष्टी सांगते. सगळं घर आनंदाने बहरून जात. त्यात त्रिशाचा किलबिलाट वेगळच वातावरण निर्माण करत होते.
तेवढ्यात बाबा शीतलला बोलतात,
"शीतल ,पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू ?? तुलाही ऑफिस आहेच ना उद्या !! मग कधी निघणार आहेस ??"
"बाबा !! मला वाटतं मी नाही जात ऑफिसला !! "
"काय ??" समीर अचानक बोलतो. 
"हो !! "
"पण का ??" मध्येच आई बोलते.
"कारण मला नाही राहता येणारं तुमच्या सगळ्यांपासून लांब !!"
"हो पण !! ऑफिस सोडण हा पर्याय नाही शीतल !!" बाबा शीतलकडे पाहत बोलतात.
शीतल क्षणभर शांत बसते. तिच्या मनातले बाबा ओळखतात आणि पुन्हा बोलतात.
"मला सांग शीतल !! तुला तुझं करिअर पुढे करायचं आहे ना ??"
"हो बाबा !! "
"पण घर, संसार, आपली माणसं सोडवत नाहीत तुला !! बरोबर ना ??"
शीतल होकारार्थी मान हलवते.
"मग आपण त्यावर पर्याय शोधुयात !! असंही तो मी शोधला आहेच !! यापूर्वीही मी हे तुझ्या सासूबाईंशी बोललो आहे त्यांचा होकारही आहे !! "
"कोणता उपाय बाबा ??" समीर मध्येच बोलतो.
"समीरची आई , त्रिशा आणि शीतल यापुढे पुण्यात राहतील. मी आणि समीर इथेच राहू, समीरलाही अगदीच एकटं वाटू नये म्हणून मी त्याच्या सोबत असेल. सुट्ट्यात कधी ते इकडे येतील ,कधी आम्ही तिकडे येऊ !! बोला आहे मंजूर ??"
समीर ,शीतल क्षणभर एकमेकांकडे पाहू लागतात. आणि समीर बोलतो
"हो बाबा !! आहे मंजूर !! "
"शीतल ??"
"पण बाबा , माझ्यामुळे तुम्ही आणि आई वेगळे का रहाल ??"
"जसं तू आणि समीर त्रिशासाठी राहणार तसच !!"
"हे बघ शीतल , समीर लहान होता तेव्हा माझीही ट्रान्स्फर वेगळवेगळ्या गावी व्हायची !! इथे माझे आई बाबा आणि ही तिघेच राहायचे !! समीरच्या शिक्षणासाठी प्रत्येक वेळी शहर बदलून पुन्हा नव्याने संसार थाटण्याचा पर्याय योग्य नव्हता. मग मीच महिन्यातून एकदा दोनदा ये जा करायचो !! पण त्यामुळे माझ्यात आणि हीच्यात कधी दुरावा नाही आला. उलट अजून प्रेम घट्ट होत गेलं !! "
"बाबा खरंच तुमचं हे सगळं ऐकून मला आता मी किती चूक केली हे कळून येत आहे !!"
"चूक नाही म्हणता येणार शीतल !! पण बोलण्याने मार्ग भेटतात !! तू कधी माझ्याशी याविषयी चर्चाच केली नाहीस !! आणि तुमच्या दोघांच्या मध्ये बोलणं मला योग्य वाटलं नाही !!"
"बाबा पण तुम्ही हक्काने सांगायचं होत आम्हाला !!आम्ही आपल्या शब्दाच्या बाहेर आहोत का ?" समीर मध्येच बोलला.
" हो बाबा !! तुम्ही म्हणाल तसेच होईल !! " शीतल म्हणाली.
" मग आता मी म्हणतो तसेच करा !! यामध्ये मला काय वाटतं !! तुझ्या आईला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये !! तुमच्या दोघांच करिअर महत्त्वाचं आहे !! आणि प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी आईने आपला जॉब , करिअर का सोडावं ?? मीही याच्या विरोधात आहे !! स्त्रीलाही तितकाच अधिकार आहे आपलं आयुष्य घडवण्याचा !! "
शीतलला बाबांचं बोलणं ऐकून काय बोलावं हेच कळत नव्हतं. लग्न, मुल ,संसार यामध्ये गुरफटून गेल की आयुष्यात स्त्रीने काहीतरी करावं हा विचारच सहसा ती विसरून जाते. पण स्वतः बाबा तिला भरारी घेण्यासाठी प्रेरित करत होते. 
"उद्या सर्व आवरा आवर करा आणि पर्वा पुण्याला निघा !! "
"ठीक आहे बाबा !!"

बाबांच्या या निर्णयाने शीतल खूप खुश झाली. तिने मेघाला लगेच फोन करून परवा येत असल्याचे कळवले, समीरही बाबांच्या विचारांनी प्रभावित झाला. जेवण केल्या नंतर शीतल आणि समीर दोघेही खोलीत आले. कित्येक वेळ एकमेकांच्या मिठीत राहिले. 

समीर आणि शीतल एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले.

क्रमशः 

आई || कथा भाग ९ || Mother Daughter Story ||



भाग ९

शीतल घाईघाईत एअरपोर्टवर येते , लवकरात लवकर कोणती फ्लाईट आहे का यासाठी विचारणा करते.
"सॉरी मॅम , पण फ्लाईटला अजून दोन तास तरी लागतील. "
"या आधी एकही फ्लाईट नाही का ??"
"नाही !!"

पुढे काय करावं या विचारात असताना ती बसने प्रवास करण्याचा विचार करते. थोडा जास्त वेळ लागेल पणं हळूहळू मी घराच्या दिशेने पुढे तरी जात राहील या विचाराने शीतल बसने जाण्यासाठी निघते. 

" हे सगळं माझ्यामुळे होत आहे. त्रिशाच्या अशा परिस्थितीला मीच जबाबदार आहे , मला पुढे जायचं होत , पंख पसरून आभाळात झेप घ्यायची होती. पण हे सारं काही एकटी मी करू शकते या वेड्या गैरसमजातून मला आज इथे आणून ठेवलं आहे. कशासाठी केला मी हा अट्टाहास , चांगलं घरी राहिले असते , त्रिशाची काळजी घेतली असती , पण नाही !! मला मात्र वेगळंच राहायचं होत. पण मला कधी कळलच नाही की मी अपूर्ण आहे , त्रिशा शिवाय, मी अधुरी आहे समीर शिवाय !! हो मी अधुरी आहे !! समीरला मी नकळत म्हणाले होते की अनाथ मुले सुद्धा जगतात, वाढतात आयुष्य घालवतात, पण आईशिवाय तेही तितकंच अपूर्ण आहे. सगळं काही माझ्यासाठी मी पाहिलं !! पण नशिबाने  माझ्या आयुष्यात आलेल्या त्रिशाला मी एकट सोडलं !! हो मी एक सोडलं !! मी खरंच खूप वाईट आहे !! मी जन्म देऊन तिची आई झाले पणं आईची कर्तव्य पूर्ण करण्यात मी कमी पडले !! खरंच माझं खूप चुकलं !! "
भरधाव वेगाने निघालेल्या बसमध्ये शीतल शांत बसून होती तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालु झाला होता. तिचं मन केव्हाच त्रिशा जवळ आले होते. 

समीर शीतल येणार म्हणून तिची वाट पाहत बसला होता. आईला हे सांगताच तीही शीतलची काळजी करत होती. 
"समीर अरे मध्यरात्र उलटून गेली. शीतल अजून कशी आली नाहीये !! एवढी काय घाई केली तिने यायची !! सकाळी निघाली असती तर बरं झालं असतं!!"
"आई बसने येतेय ती !! फ्लाईट मिळाली नाही तिला !! वेळ तर लागणारच ना !! "
"एवढ्या रात्री बसने यायची काही गरज होती का ?? शीतल ऐकत म्हणून नाही कोणाचं !! आल्यावर तिला चांगली रागावणार आहे मी !! "
"हो आई रागावच तू तिला !! पण आधी येऊ तरी दे तिला !! "
"हो !! बरं अरे जेवण तरी करुन घे तू आता !! का आज उपाशीच राहायचा विचार आहे तुझा ??"
"आई मला ना भूकच नाहीये आता !! शीतल येईपर्यंत मला काही दुसर सुधरणार नाही बघ !!"

समीर आणि आई दोघेही शीतलची वाट पाहत बसले. आता समीरला शीतलची काळजी वाटू लागली होती. पहाट व्हायला लागली होती तरीही शीतल अजून आली नव्हती. समीर सारखा दरवाजाजवळ जाऊन बाहेर डोकावून पाहत होता. तेवढ्यात मागून शीतल आल्याचा आवाज झाला. समीरने मागे वळून पाहीले ती शीतल होती. शीतलने क्षणाचाही विचार न करता समीरला मिठी मारली. तिच्या डोळ्यात क्षणात पाणी आले, समीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. बाजूला उभ्या आईलाही क्षणभर भरून आलं. समीर पासून लांब होताच शीतलने आईला मिठी मारली. 
"पोरी !! किती दिवसांनी पाहिलं मी तुला !!" 
शीतलने सासूबाईंना घट्ट मिठी मारली.
"आई !! "

समीर सगळं बाजूला उभा राहून पाहत होता. शीतल क्षणभर शांत राहिली स्वतःला सावरत ती घरात आली. घरात येताच तिने समीरला विचारलं ,
"त्रिशा ??"
"आईच्या बेडरूममध्ये आहे !!"
 हातातलं सामान बाजूला ठेवत ती धावत खोलीत गेली. समीरही तिच्या मागे आला.  समोर पाहते तर त्रिशा शांत झोपली होती. शीतल तिच्या जवळ गेली. तिला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला, त्रिशाला पाहून तिला खूप आनंद झाला , तिच्या गालाचे चुंबन घेत तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. समीरकडे पाहत ती बोलू लागली,
"त्रिशा! समीर आपली त्रिशा!!! " 
समीरने होकारार्थी मान हलवली. तिच्या जवळ जाताच पुन्हा शीतलने समीरला मिठी मारली. 
"मी चुकले समीर !! मी अस तुम्हाला सोडून जायला नव्हतं पाहिजे !! "
"शीतल !! काही झालेलं नाहीये एवढं !! तू पहिले शांत हो बर !! बस बर इथे !!" 
समीर शीतलला बाजूच्या खुर्चीवर बसवत म्हणतो.
"मी गेले तेव्हा किती लहान होती ना !! आता बघ ना मोठी झाली आहे त्रिशा !!" 
"हो ना !! अगदी तुझ्यासारखी दिसत आहे आता !!" समीर शीतलकडे पाहत म्हणाला. 
"नाही रे !! तुझ्यासारखी दिसते आहे !! " शीतल त्रिशाकडे पाहत म्हणाली.
"शूऽऽऽऽऽ !!उठेन ती झोपेतून !! " आई खोलीत आली, आई शीतलच्या हातात पाण्याचा पेला देत बोलू लागली.
"समीर शीतल !! आता जाऊन झोपा बर दोघे !! सकाळ व्हायला जेमतेम तास उरलाय आता !! "
"आई कधी एकदा त्रिशाला मिठीत घेतेय अस झालंय मला !! त्याशिवाय मला झोप लागणारच नाही !!"
" हो शीतल !! पण तरीही आता थोड सासूबाईंचही ऐकलं पाहिजे ना ?? बॉसच ऐकतस तस !!"
आई मिश्किल हसत म्हणाली. शीतलच्याही ओठांवर हसू आले. 

समीर आणि शीतल दोघेही आपल्या खोलीत आले. शीतल कित्येक वेळ समीरच्या मिठीत राहिली. 
"अरे हो हो !! शीतल ! आहे मी इथेच !! "
"गप रे !! " शीतल समीरला अजून घट्ट मिठी मारत म्हणाली.
"शीतल !! माझी आठवण येतं होती की नाही तिकडे ??"
"अजिबात नाही !! " शीतल हसत म्हणाली.
"हो का ?? !!मलापण तुझी आठवण अजिबात आली नाही बरं !!"
"माहितेय मला !! तू आहेसच दगडाचा !! तुला काही फरक पडत नाही !! "
"दगड म्हणालीस तू मला ??दगड ??"
"हो !! मला एकदा सुद्धा भेटायला आला नाहीस तू पुण्यात !! मी एकटी कशी राहते !! काय खाते !! कुठे राहते !! काही काही पाहिलं नाहीस तू !! "
"माझी बायको आहेच ना तशी !! माहितेय मला !!एकदम स्मार्ट ,हुशार , निर्भिड  त्यामुळे नाही विचारलं मी !!"
"हो का ?? "
"हो तर !! बरं आता झोप बर !! तासभर तरी झोप घे !! प्रवासातून आली आहेस !! थकली आहेस तू !! "
"नाही समीर !! मला नाही झोप येणार !! त्रिशाला जोपर्यंत मी माझ्या मिठीत घेत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही !!"
" हो पण !! तरीही !!"
"नाही समीर !! तू झोप हवं तर !! "
"शीतल !! मला तरी कशी झोप येईल !! "

समीर आणि शीतल कित्येक वेळ गप्पा मारत बसले. पण शीतलचे मन त्रिशाला भेटण्यासाठी आतुर झाले होते,  त्रिशा झोपेतून उठण्याची ती वाट पाहू लागली. समीरही तिच्या सोबत कित्येक वेळ बसून राहिला. शीतलने समीरला ऑफिसबद्दल सांगितलं,  समीरनेही आपल्या मनातल्या कित्येक गोष्टी शीतलला सांगितल्या.या गप्पा गोष्टी चालु असतानाच शीतल आणि समीरला आईच्या खोलीतून त्रिशाचा दंगा करतानाचा आवाज आला,
"समीर !! त्रिशा उठली बहुतेक !! हो समीर !!"
शीतलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. ती पटकन जागेवरून उठली, धावतच ती आईच्या खोलीत गेली. समोर त्रिशा बेडवर झोपेतून उठून खेळत होती. क्षणभर तिने शीतलकडे पाहिले , शीतलही क्षणभर त्रिशाकडे पाहत राहिली. शीतलच्या डोळ्यात पाणी आले, ती धावतच त्रिशा जवळ गेली. तिला मिठीत घेतले, तिच्या चेहऱ्यावर तिने कित्येक वेळा चुंबन केले. हे सगळं होताना त्रिशा एकटक शीतलकडे पाहू लागली. तिच्या बाल मनाला काहीच कळतं नव्हते. 
"त्रिशा !! मी तुझी आई !! ओळखलस मला !! "
समीर आणि आई मागे उभा राहुन हे सगळं पाहत होते. 
अचानक शीतल जवळून त्रिशा रांगत रांगत आज्जीकडे गेली. आज्ज्जीच्या जवळ जाऊन ती शीतलकडे अनोळखी असल्या सारखे पाहू लागली. 
"ये बाळा !! ओळखलं नाहीस ना मला तू !! मी तुझी आई आहे ग !!"
शीतल जणू आपलं भान हरपून बोलत होती. समीर शीतल जवळ जाऊन तिला सावरू लागला.
"शीतल !! शीतल !! ओळखेल ती थांब जरा !! खूप दिवसांनी तू समोर आलीस म्हणून बावरली आहे ती !! "
"नाही समीर !! रागावली आहे ती माझ्यावर !!! मी अस तिला एकटं सोडून गेले ना म्हणून !! "
"त्रिशा ऐक ना !! आता नाही हा मी तुला सोडून जाणार कुठं !! ये ना !! जवळ ये आईच्या !! "
शीतल त्रिशाकडे हात पुढे करून बोलते. त्रिशा मात्र अनोळखी असल्या सारखे शीतलला फक्त पाहत राहते. 

समीर शीतलला कसेबसे मनवून आपल्या खोलीत घेऊन येतो, शीतलला समजवण्याचा प्रयत्न करतो.
"शीतल !! शांत हो !! हे बघ !! खूप दिवसांनी तुला पाहिलं ना !! त्यामुळे तशी करते आहे ती !! बघ थोड्या वेळाने रांगत रांगत तुझ्याकडे येते की नाही  ते !! "
" नाही  समीर !! त्रिशा विसरून गेली रे मला !! आपल्या आईला विसरून गेली ती !! ज्यावेळी मी तिच्या सोबत होते तेंव्हा तिला काहीच समजत नव्हतं !! आता ती माणसं ओळखायला लागली आणि तेव्हाच मी तिच्या जवळ नव्हते !! "
"अस काही नाहीये !! "

समीर कित्येक वेळ शीतलची समजूत काढत राहिला. 

क्रमशः

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग १० || Story || Marathi ||

आई || कथा भाग ८ || Mother|| Daughter || Story ||



भाग ८ 

शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती.
"समीर !!" 
आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला.
"आई ??"
"हो !! मीच बोलते आहे !! कुठे आहेस तू ? अरे लवकर घरी ये !!"
" काय झाल आई ?? आणि एवढी घाबरल्या सारखी बोलतेस तू !! काय झालंय ??"
"अरे त्रिशा !!" 
" काय झालं त्रिशाला आई !!"
" अरे ती बेशुद्ध पडली आहे !!  खेळता खेळता अचानक जागेवर पडली !! मी आणि बाबा शेजारच्या दवाखान्यात जातोय तू तिकडेच ये पटकन !!"
"काय ?? कस काय पडली ती बेशुद्ध !!! काय झालंय आई ??"
" हे बघ जास्त विचारत बसू नकोस तू ये पटकन !!" आई घाबरल्या स्वरात समीरला बोलत होती.

आईचा फोन ठेवताच समीर लगेच आपल्या जागेवरून उठला . त्याला काहीच सुचत नव्हतं. समोर कोणी आहे याचं भानही त्याला राहील नाही. 
" अरे समीर !! व्हॉट हॅपन ?? " 
समीरचा बॉस अचानक धावत निघालेल्या समीरला विचारतो.
"सॉरी बॉस !! मुलगी आजारी आहे !! आय हॅव टू गो !!" 
" अरे हो पण !! झालंय तरी काय !!"
" मलाही नीटसं अस माहीत नाही !! मी उद्या आल्यावर सांगेन ना !!"
"ओके !! जा !! तुझी तिकडे जास्त गरज आहे !!"
"थॅन्क्स !! "

समीर ऑफिस मधून धावत पळत निघाला. त्याला आजूबाजूला काय चाललंय याचही भान राहिलं नाही. रस्त्यात त्याची गाडी सुसाट निघाली. त्याला त्यावेळी आपल्यापेक्षा आपल्या मुलीची जास्त काळजी वाटू लागली. इकडे शीतलला याची काही माहिती नव्हती.

"माझी लाडकी लेक त्रिशा !! काय झालं असेल तिला?? ती अशी कशी बेशुद्ध पडली !! काहीच कळत नाहीये !! तिला काही झालं तर मी काय करायचं !! आई बाबा यांना काय म्हणून मी समजवायच !! देव करो आणि सगळं काही ठीक असो !! माझ्या त्रिशावर देवाची कृपा आहे आणि ती राहिलंच !! तिला काही होणार नाही !! " 
समीर दवाखान्यात आला. समोर आई बाबा आणि त्यांच्या खांद्यावर असलेली त्रिशा पाहून त्याला काय बोलावं काहीच सुचलं नाही. 

"बाबा !! काय म्हणाले डॉक्टर ??"
"काही नाही समीर आता काळजी करण्यासारखं काही नाही एवढच म्हणाले..!! तरीही एकदा तू त्यांना भेटून ये !!"
"ठीक आहे बाबा !!"
समीर समोरच असलेल्या डॉक्टरांच्या केबीनकडे  गेला,
"डॉक्टर !!"
"या !! बसा ना !! "
"थँक्यू डॉक्टर ! मी समीर दिक्षित !! त्रिशाचा वडील !!"
"ओके !! "
"डॉक्टर काय झालंय त्रिशाला !! म्हणजे ती अशी अचानक बेशुद्ध का पडली !!??"
" समीर त्रिशाला आजार असा काही नाही झाला !! पण तिला म्हणावा असा पोषक आहार होत नाहीये !! त्यामुळे तिला अशक्तपणा आलाय !! तिची आई वेळेवर दूध पाजते ना तिला ??"
"डॉक्टर !! अक्च्युल्ली तिची आई नसते इथे !! कामानिमित्त बाहेर गावी असते !! त्यामुळे आईच दूध तिला मिळतच नाही !!"
"ओके !! ठीक आहे !! मग दुसरे कोणतेही दूध दिले तरी चालेल !! आणि तिला काही गोळ्या लिहून देतोय त्या सकाळ संध्याकाळ देत राहा !! म्हणजे ती एकदम ठणठणीत बरी होईल !! "
"ठीक आहे डॉक्टर !! "

समीर डॉक्टरांना भेटून बाहेर आला. डॉक्टर काय म्हणाले हे आई बाबांना सांगितल्या नंतर ते त्रिशाला घेऊन घरी गेले. समीर तिच्या जवळच बसून होता. त्रिशा घरी येताच शांत झोपी गेली. समीर कित्येक वेळ तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या जवळ येत बाबा म्हणाले,
"काही नाही झालं त्रिशाला समीर !! " 
"चल उठ आता !! आणि फ्रेश हो!!"
"हो बाबा !! "

समीर फ्रेश व्हायला गेला. इकडे शीतल तिचे प्रेझेंटेशन अगदी सुंदर मांडत होती. तिच्या या प्रेझेंटेशनने समोरचे सगळे अगदी खुश झाले.

"अप्रतिम शीतल !! माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान केलंस तू प्रेझेंटेशन !!" शीतलची बॉस शीतलला म्हणाली.
"थँक्यू मॅम !!"

शीतलला ऑफिसच्या कामात केव्हा संध्याकाळ झाली हे कळाल सुद्धा नाही. ती घड्याळाकडे पाहत शेजारीच बसलेल्या मेघाल म्हणाली.
"आज दिवस कसा गेला कळाल नाही !! मी निघते आहे मेघा !! तेवढं तू बाकीचं सगळं करून घेशील ना !! "
"नो प्रोब्लेम मॅम !! तुम्ही निघा !! मी करते हे सगळं !!"
"थॅन्क्स !!"

शीतल सगळं आवरून फ्लॅटवर यायला निघाली. तिला आज जे घडलं ते सगळं कधी एकदा समीरला सांगेन अस झाल होत. ती अगदी धावत पळत घरी आली. हातातली बॅग बाजूला ठेवून ती समीरला फोन लावते, 

एक दोन वेळा फोन वाजून बंद झाला,
"हा समीर फोन का उचलत नाहीये ??"
पुन्हा ती फोन लावते, आणि समीर फोन उचलतो,
"समीर !! अरे कुठे होतास तू !! कितीवेळा फोन लावत होते मी !! उचलत का नव्हतास ??"
"मी फ्रेश व्हायला गेलो होतो !! "
"इतक्या लवकर !! तू घरी आहेस ??"
"हो !! "
" बरं ऐक ना !! आज माझं प्रेझेंटेशन एवढं आवडलं त्यांना !! आज माझा दिवस खूप मस्त गेला!! सगळ्यांनी माझं नुसतं तोंडभरून कौतुक केलं !!"
"अरे व्हा !! गुड !! " 
"हो ना !! आज एवढं भारी वाटतंय ना !! इकडे आल्यापासून मला माझ्या मनासारखं अस काही वाटतच नव्हतं !! पण आज वाटतंय !! "
"छान !!"  समीर थोड तुटक बोलला.
कित्येक वेळ शीतल समीरला आज काय झालं हे सांगत राहिली. समीर फक्त ऐकत राहिला.
"बरं तू ऑफिसमधून लवकर का आलास घरी ??"
शीतलने असे विचारताच समीर क्षणभर शांत राहिला, 
"काही नाही असच !! " 
समीरच्या बोलण्यातला रुक्षपणा शीतलला जाणवल्यावाचून राहिला नाही, काहीतरी झालंय हे तिला लक्षात आलं, 
" काय झालंय समीर ?? सांगशील का ??"
" आज तुझा मूड खूप चांगला आहे शीतल !! आज राहूदे ना !! उद्या बोलू आपण !!" 
" समीर !! काय झालंय ?? आणि त्रिशा कुठे आहे ??"
" झोपली आहे त्रिशा !! औषध दिलं आईने तिला आल्यावर आणि ती झोपली !!"
"औषध ?? कसलं ??"
" आज त्रिशा खेळता खेळता अचानक बेशुद्ध होऊन पडली होती!!" 
"काय ?? काय झालं त्रिशाला समीर !! मला आत्ताच्या आत्ता तिचा आवाज ऐकायचा आहे !! "
"शीतल !! शीतल !! शांत हो !! "
"काय शांत होऊ मी समीर !! आणि तुला साधा एक फोनही करावासा वाटला नाही मला !! मी तिची आई आहे समीर !!"
शीतलच्या डोळ्यात पाणी आले, ती काय बोलत आहे हेही तिला कळत नव्हतं, क्षणात तिच्या डोळ्यांसमोरून त्रिशाच्या कित्येक आठवणी येऊन गेल्या,
" डॉक्टर म्हणाले अशक्तपणा आहे !! होईल ती नीट !! शीतल तू तुझ्या कामात लक्ष दे !! आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला !! "
"समीर मी येतेय तिकडे !! "
"शीतल !! ऐक माझं !! एवढं काही झालं नाहीये !!"
" नाही समीर !! मी येतेय तिकडे !! "
" ऑफिस काम , अस सोडून नाही येता येणार शीतल तुला !! "
"ते काही मला माहित नाही !! मी येतेय समीर , मला नाही चैन पडणार इकडे !! "

शीतल फोन ठेवते तिला क्षणभर सगळं जागेवर थांबून गेल्यासारखं वाटतं होत, त्या घाईगडबडीत ती आपली बॅग भरायला घेते, त्यावेळी तिच्या मनात दुसर काहीच येतं नव्हतं. कधी एकदा तिला त्रिशाला भेटेन अस झाल होत. 

शीतल सगळं क्षणात सोडून आपल्या घराकडे निघाली होती आपल्या बाळासाठी, आपल्या त्रिशासाठी,

क्रमशः 

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग ९ || Mother Daughter Story ||


आई || कथा भाग ७ || मराठी कथा || Story ||



भाग ७

दिवसभराच्या कामानंतर शीतलला कधी एकदा फ्लॅटवर येते आहे अस झालं होत. ती ऑफिसमधून लगबगीने येते. सगळी कामे आवरून पुन्हा उद्याच्या प्रेझेंटेशनची तयार करू लागते. रात्रीच जेवण करण्याची सुद्धा आठवण तिला येत नाही. कामात व्यस्त असतानाच समीरचा फोन येतो, शीतल फोन उचलताच समीर तिला दिवसभर काय झाले ते सांगू लागतो. 

"आज दिवस नुसता कामात गेला. घरी येऊन पाहतो तर त्रिशा जणू माझी वाटच पाहत बसली होती. तिला पाहिलं आणि सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला मला कळलं सुद्धा नाही!!" समीर शीतलला अगदी आनंदाने सगळं सांगत होता. 
"होका..!! पण माझं सगळं उलटच झालं!! "
"का काय झालं ?? काही प्रोब्लेम झाले का ??"
"प्रोब्लेम असे काही नाही !! पण आज बॉसनी एक फाईल दिली होती त्यात चुकाच चुका निघाल्या !!! मग थोडा मूड ऑफ झाला !!"
"एवढ्याशा कारणाने कोणी मूड ऑफ करून घेत का ?? इट्स ओके !! बॉसच बोलणं एवढं मनाला लावून नाही घ्यायचं !!"
" मनाला अस नाहीरे !! पण माझं काम अस कधी चुकत नाही !! सगळी कामे कशी १००% सक्सेसफुल व्हावी असं मला वाटतं !! "
" हो पण नेहमीच ते १००% होईल असं थोडीच असतं !! कधी कधी इकडे तिकडे होणारच ना !!"
" ते ही आहेच म्हणा !! आणि त्यातून उद्या मला प्रेझेंटेशन पण करायला सांगितलं आहे !! काय करावं काहीं सुचत नाहीये !! "
"अरे व्हा !! चांगलं आहे ना मग !! खूप मेहनत कर आणि मस्त प्रेझेंटेशन कर !! "
"हो !! त्रिशा झोपली ??"
"नाही !! हे बघ !! नुसती दंगा करते आहे नुसती !! बोलता येत नाही पण तिच्या भाषेत नुसता गोंधळ चालु आहे घरात !! " 
शीतलला त्रिशाचा आवाज ऐकू येतो. तिच्या मनात तिचा तो आवाज जणू अगदी तिला सगळं काही विसरायला लावतो.  ती क्षणभर तिचा आवाज ऐकत राहते.
"शीतल ?? शीतल !! आवाज ऐकू येत नाहीये का ??" 
शीतल गप्प राहिली. क्षणात ती भानावर आली आणि समीरला बोलू लागली.
"येतोय !! अरे थोड काम करत होते !!"
"ओके !! मग मी ठेवू का फोन ? तू कर उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी !!"
"हो !!"

शीतल फोन ठेवते. तिच्या मनात त्रिशाचा तो आवाज जणू तिला साद घालत होता. तिला जणू आपल्याकडे ओढत होता. ती मनात पुन्हा पुन्हा तोच विचार करत होती. ती आई आपल्या बाळाला अलगद जवळ करू पाहत होती. 

"आईपण किती सुंदर असतं ना ?? अस म्हणतात की या जगात आई सारखी दुसरी कोणी नाही !! ना तिची जागा दुसरे कोणी घेऊ शकते !! नाही ना !! ती फक्त आई असते !! माझ्यासारख्या दगडाच्या काळजाला सुद्धा आईपण आहे हे आज मल कळून चुकलं ! !! मी स्त्री, मी आई , मी बायको ,मी बहीण !!  किती रुपात मी आहे !! आणि मला वेडीला ती कधी दिसलीच नाहीत !! मी एक स्त्री म्हणून घडताना , मला घडवणारे माझे वडील , मला सांभाळून घेणारा माझा नवरा यांचही माझ्या आयुष्यात तितकंच महत्व आहे जितकं माझं त्यांच्या आयुष्यात !! त्यांनी माझ्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली. आजही देत आहेत !! मग मी एक आई म्हणून , एक मुलगी म्हणून , एक सून म्हणून कुठे कमी तर पडत नाहीये ना ??". शीतल आपल्या विचारांच्या समुद्रात स्वतःला जणू हरवून गेली होती. 

"आपण जेव्हा हरवून जातो तेव्हा आपल्याला आठवण येते ती आपल्या आईची !!  किती आनंद झाला होता त्या सकाळी जेव्हा माझ्या आईला मी माझ्या समोर पाहिलं होत!!"

शीतल आपल्या विचारातून बाहेर येत आईला फोन करते, 

"शीतल !! किती दिवसांनी फोन करतेस ?? बरी आहेस ना बाळा !! मला किती काळजी वाटत होती तुझी !! एकटीच आहेस !! कुठे अनोळखी शहरात !! कोण शहर !! कुठली माणसं !! " शीतलची आई कित्येक प्रश्न शीतलला विचारते.
" आई !! "
"बोल ना बाळा !! काय झालं ??"
कित्येक दिवस मनामध्ये साठलेलं ते सार काही शीतलच्या ओठांवर येतं , आईचा आवाज ऐकताच नकळत तिला रडू येतं. शीतलच्या आईला हे कळायला वेळ लागला नाही.
" काय झालं शीतल ?? रडतेयस का ??" 
" तुझी खूप आठवण येत होती !! "
"आणि त्रिशाची पण ना ??" शीतलची आई लगेच बोलते.
" तुला कसं कळलं ??"
"मीही एका लेकराची आई शीतल !!" 
"आई पण हे असं का ?? सगळं काही माझ्या मनासारखं होऊनही मी पुन्हा तिथेच का ओढली जाते आहे ??" 
" कारण तू सत्य नाकारते आहेस म्हणून तुला त्रास होतोय !! तू एका बाळाची आई आहेस हे विसरण्याचा केविलवाणा प्रयत्न तू करते आहेस !! मला सांग तुझ्या आयुष्यात काहीही प्रोब्लेम झालाच तर तू कोणाला सांगतेस !! आईलाच ना !! "
"हो आई !! पण आता अस वाटतंय की मी चांगली आई नाहीये !! त्या बाळाला मी ऐकट सोडून आले !! समीर तिला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तिला तो काही कमी पडू नाही देणार !! पण एक आई म्हणून मला तिथे असावं  नेहमी वाटतं राहत !"
" तू वाईट नाहीस ग शीतल !! पण नात नाकारण्याची चूक तू करतेस इथ सगळं थांबत !! आपण कितीही नाही म्हटलं तरी नात नाकारू शकत नाहीत आपण !!"
" हे आता कळून चुकलं मला आई !! शेवटी नुसतं तोंडाने बोलणं सोपं असतं पण जेव्हा सत्य येत तेव्हा काहीच सुचत नाही !!"
"आता जास्त विचार करू नकोस !! मला सांग तुझ्यासारख्या कित्येक स्त्रिया या जगात आहेतच ना !! ज्या कामा निमित्त , आपलं घर , आपली मूलबाळ सोडून लांब कामाला जातात !! फरक फक्त एवढाच होता की ते नात्याला जोडून राहतात !! "
" खरंय आई !! आजपर्यंत त्रिशाच आणि माझं नात मी नाकारतच आले आहे !! पण यापुढे तस होणार नाही !! बघ तू आई मी तिला जगातलं सगळं सुख देणार !! वर्ल्ड्स बेस्ट ममा होऊन दाखवणार !!"
"नक्की होशील बर !!" शीतलची आई थोड्या हसऱ्या आवाजात बोलते.
"आई खर सांगू !! आज तुला बोलून मल खूप हलकं वाटतंय !! मला अगदी मोकळं वाटतंय !! माझ्या आणि त्रिशाच्या नात्याला जणू नव्याने ओळख मिळाल्या सारखं वाटतंय !! " शीतल मनातलं सगळं काही आपल्या आईला सांगत होती.
" नव्याने सुरुवात कर !! तू एक सुंदर स्त्री आहेस !! एक यशस्वी स्त्री आहेस !! "
"हो आई !! "

शीतल आणि तिच्या आईच बोलणं झाल्यावर शीतल पुन्हा जोमाने कामाला लागते. आईला बोलल्यानंतर जणू नवी ऊर्जा तिच्या मनात येते. सगळी कामं ती पटापट पूर्ण करते. उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी छान तयारी करते. त्रिशाच्या आठवणीत तिला कधी झोप लागते तिलाही कळत नाही. 

सकाळच्या सातला उठताच , सगळं काही आवरू लागते. ऑफिसला जाण्यासाठी ती तयारी करते. समीरशी बोलून झाल्यावर ती पुन्हा आपल्या रूटीन मध्ये व्यस्त होते. कालच्या आईच्या बोलण्यातले कित्येक शब्द ती पुन्ह पुन्हा आठवू लागते.

" आज प्रेझेंटेशन नीट व्हावं !! बाकी काही नाही !! म्हणजे उद्या बॉसला विचारून दोन दिवसांची का होईना पण सुट्टी घेऊन घरी जाते !! मग दोन दिवस मनसोक्त त्रिशा सोबत राहते !! पण बॉस सुट्टी देईन की नाही काही सांगता येत नाही !! आधीच कालच्या प्रकाराने तिच्या मनात माझी इमेज खराब झाली नसावी म्हणजे मिळवलं !! नाहीतर आहे पुन्हा !! नुसतं फोनवर बोलणं !!  " शीतल ऑफिसमध्ये जाताना मनात नुसता विचारांचा गोंधळ करू लागली.

"पण सगळं काही आजच्या प्रेझेंटेशन वर अवलंबून आहे !! आज जर काही चूक झाली तर काही खर नाही !! त्यासाठी मला आधी शांत राहायला हवं !! शीतल शांत हो !! शांत हो!! " 

शीतल ऑफिसमध्ये आल्यावर तडक पहिल्यांदा ऑफीसमध्ये बॉसकडे गेली. आजच्या प्रेझेंटेशन विषयी चर्चा करू लागली. 

"गुड !! तयारी तू खूप छान केली आहेस !! पण थोडी इम्प्रूमेंट केलीस तर अजून छान होईल !! "
"ओके मॅम !! आणि ही फाईल कालच पुन्हा नीट केली. "
"गुड !! वेरी फास्ट हा !!"
"थॅन्क्स मॅम !!" 
एवढ बोलून शीतल केबिनमधून बाहेर येऊ लागली. तेवढ्यात बॉस तिला मागून बोलते, 
"शीतल !! "
"येस मॅम !!"
"गुड वर्क ! कीप ईट अप !!"

शीतल आनंदाने बाहेर येते. प्रेझेंटेशन नीट करण्यासाठी तयारीला लागते. 

क्रमशः 

आई || कथा भाग ६ || मराठी कथा || Mother ||




भाग ६

"ज्या बाळाला या जगात येण्याआधीच मी मारण्याचा प्रयत्न केला त्या बाळाची एवढी ओढ मला का वाटावी. माझ्या छातीला बिलगून ते दूध पिताना माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळत होत. ते मी कधीच कोणाला कळू दिल नाही कदाचित माझ्यातील तो अहंकार तिथे आड येत होता. पण माझ्याच हडामासाने तयार झालेल्या माझ्या त्रिशाला मी अस एकट सोडून यायला नव्हतं पाहिजे असं मला आता राहून राहून वाटतंय. कदाचित यालाच आई म्हणतात हे मला आता कळून चुकलं. पण मग मी आता करू काय ?? सकाळीच उठून पुन्हा घरी जाऊ की समीरलाच इकडे बोलावून घेऊ. काहीच कळत नाही. "

शीतल रात्रभर एकटीच विचार करत बसली होती. सकाळ झाली तेव्हा तिला कधी एकदा समीरला फोन लावते अस झाल होत. ती पटकन जागेवरून उठते. सगळं घर आवरू लागते. आणि पटकन समीरला फोन लावते. एवढ्या सकाळी शीतलचा फोन पाहून समीरलाही नवल वाटत. तिचा फोन उचलत तो तिला विचारतो.

"शीतल !! एवढ्या सकाळी कॉल केलास !! सगळं ठीक आहेना ??"
"हो समीर !! सगळं ठीक आहे !! त्रिशा उठली नाही का झोपेतून अजून ??"
"नाही !! नाही उठली अजून !! अक्च्युली ती रात्रभर झोपलीच नाही!! जागीच होती!! थोडा वेळ झोप लागलीच तर लगेच दचकून उठायची आणि रडायला लागायची !! पहाटे ४ला आईने तिला तिच्याकडे घेऊन गेली तेव्हा कुठे शांत झोपली. " 
" रात्रभर जागी होती !!" शीतल शांत आवाजात विचारतं होती. 
"हो!! पण आता काही टेन्शन नाहीये !! झोपली आहे आता शांत !! मी आता थोड्या वेळाने ऑफिसला निघतोय !! आई घेईन काळजी तिची !! खरतर माझ्यापेक्षा आईकडेच जास्त राहते ती. सतत आईच्या मागे रांगत रांगत फिरत असते ती !! काल तुझ्याशी बोललो ते मग इथेच माझ्याजवळ राहिली !! "
शीतल शांत राहिली. तिला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त समीर सांगेन ते ऐकत होती. तिलाही समीरला सांगायचं होत की तीही रात्रभर त्रिशाच्या आठवणीत झोपली नाही.

"शीतल !! तुलाही ऑफिसला जायचं असेलच ना??"
"हो निघते आहे मी आता !! "
"ठीक आहे !!! मी निघतोय ऑफिसला !!आल्यावर कॉल करेन मी !! तूही तुझी काळजी घे !! ठेवू आता फोन ??"
"ठीक आहे !!" 

शीतल जड मनाने फोन ठेवते. त्रिशाही रात्रभर झोपली नाही या विचाराने तिला काहीच सुचत नव्हतं. ती रात्रभर दचकून जागी होत होती. पण का ?? या प्रश्नाने तिच्या मनात काहूर माजल होत. माझ्या मिठीत असताना ती कधीच अशी दचकून जागी झाली नाही. किती शांत झोपी जात होती ना ती ?? मला वाटतं मी तिला भेटायला जाव. तिला मिठीत घ्यावं, माझ्यातील आईपण माझ्या लेकीच्या प्रेमाला किती आसुसले आहे हे तिला सांगावं.

शीतल सगळं आवरून ऑफिसमध्ये येथे. आपल्या कामात ती व्यस्त होते. पण मनाने मात्र ती त्रिशासोबत असते. 

"मॅम !! ही फाईल आज पूर्ण करायची आहे !! बॉस आज खूप रागावतील नाहीतर !!" मेघा शीतलकडे फाईल देत म्हणते.
"ठीक आहे !! " शीतल तुटक बोलते. मेघाच्या हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. 
"मॅम !! सगळं ठीक आहे ना ?? काही प्रोब्लेम ??"
" नाही ग !! काही नाही झालं !! " 
"खरंच ??" मेघा शीतल समोर बसतं विचारते. 
"हो खरंच !! " शीतल तिच्याकडे न पाहताच बोलते. 
"आठवण येतेय ??"
"कोणाची ??" 
"मिस्टरांची !!"
"नाही ग !! आणि आठवण यायला विसरते आहे कुठ मी !!! ऑफिस टाईम संपला की त्याच्याशीच बोलणं चालू असतं सारखं !! अगदी रात्री झोपेपर्यंत !!" 
"मग प्रोब्लेम काय आहे ??" मेघा शीतलला आपल्याकडे पाहायचा हाताने इशारा करते. 
"त्रिशा !! माझी लेक !! तिची खूप आठवण येतेय मला!! इकडे येताना मला सगळं सहज सोप वाटत होत. मला वाटलं त्यात काय एवढं !! सासू सासरे नवरा !! सांभाळतील माझ्या लेकीला मी आपलं माझ आयुष्य , माझं करिअर घडवायला मोकळी होईल !! पण नाही ग !! हे नातं इतकं सहज सोप नाहीये हे आता मला कळून चुकलय !! माझ्या मुलीला सोडून मी क्षणभरही राहू शकत नाहीये!! "
"मग जा तिला भेटायला ! !"
"पण बॉस जाऊ देतील मला !! मी अशी न्यू जोईनिंग लगेच कशी मागू त्यांना सुट्टी ??"
"विचारून तर पहा !! " मेघा शीतल समोरून उठत म्हणते.

"खरंच एकदा विचारायला काय हरकत आहे ?? एक दोन दिवस थांबते आणि मग विचारते!! अजून थोडा विचार करायला हवा !! अस लगेच निर्णय घेणं बरोबर नाही"
शीतल बॉसला विचारायचं ठरवून आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाली. दिवसभर तिचं मन कामात नीटसं लागलंच नाही. संध्याकाळी सगळं काम पूर्ण करून ती बॉसकडे गेली.

"मॅम !! "
 शीतलची बॉस शीतलकडे पाहत बोलते.
"येना !! शीतल ये बस !! !!"
शीतल केबिन मध्ये बॉस समोर येऊन बसते. 
" झाली ती फाईल ??"
"हो!!" 
" बघू !! "
शीतल बॉसकडे फाईल देते. बॉस फाईल वाचते. थोडावेळ फाईल वाचून झाल्यावर,
"काय हे शीतल !! किती चुका ?? कामात लक्ष लागत नाहीये का ?? असला हलगर्जीपणा मला चालायचा नाही बघ !! तू एवढी हुशार एम्प्लॉइ आहेस !! तुझ्याकडून अशा चुकांची अपेक्षा नाहीये मला !!  "
" सॉरी मॅम !! "
"ठीक आहे !! जिथे जिथे चूक झाली आहे ते हायलाईट केलंय मी !! पुन्हा एकदा फाईल बघ आणि दुरुस्त करून घेऊन ये !! उद्या संध्याकाळी फाईल क्लायंटला द्यायची आहे त्यादृष्टीने तयारी कर !!  आणि त्यांना प्रेझेंटेशन पण तुलाच करायचं आहे!! "
"नक्की मॅम !! मी सगळं काही नीट करते !! " 
"गुड !!" 

शीतल दिवसभराच्या कामानंतर घरी येते. उद्या प्रेझेंटेशन करायचं आहे हे लक्षात ठेवून कामाला लागते. 


क्रमशः

आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kathan ||




भाग ५

विमानाच्या वेगाने शीतल सगळं काही मागे सोडून निघाली. पुण्यात आली. सगळं काही नव्याने तिला भेटलं. कंपनीने राहायला फ्लॅट ही दिला.
आणि आपल्या जुन्या आठवणी ,नाती सोडून ती या नव्या फ्लॅटमध्ये आली. इथे सगळं काही तिला नव्याने भेटत होत. क्षणात ती या जगात हरवून जाऊ लागली. तिकडे त्रिशा आणि समीर आपल्या छोट्याश्या जगात राहायला लागले. पण दोन्हीकडे एक रिकामी पोकळी होती. ती शीतलला जाणवत होती, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करत होती अगदी ठरवून.

"का कोणास ठाऊक !! पण राहून राहून मला त्रिशाची ओढ का लागावी हेच मला कधी कळतं नाही. मला आई व्हायचं नव्हतं तरीही मी सगळ्यांच्या आनंदासाठी आई झाले. पुढे इकडे येऊन नोकरी करण्याच्या निर्णयाला सर्वांनी मनात नसतानाही परवानगी दिली. अगदी कोणतीही अडवणूक न करता. मग सर्व काही आज मी जे ठरवलं तसच होत असताना, काहीतरी राहून गेले अस का वाटत आहे. तो त्रिशाचा स्पर्श , तीच निरागस हास्य , ते बोलके डोळे  मला का सारखी तिची आठवण करून देतात. अस वाटत सतत सोबत असावी ती , तिच्या अल्लड प्रेमाला साद घालावी अस का वाटतंय मला ?? " शीतल कित्येक वेळ एकटीच खोलीत बसून विचार करत बसली होती.  तेवढ्यात तिच्या समोर ठेवलेला फोन वाजला. शीतलने फोन उचलला.

"हॅलो !!कोण बोलतंय ??"
"नमस्कार मॅडम, मी मेघा जोशी बोलतेय ! आपल्या ऑफिसमधून !!"
"हो बोला ! "
"मॅडम , आपल्याला जो राहायला फ्लॅट दिला आहे तिथे काही अडचण तर नाही ना ??"
"नाही काही अडचण नाही !! सर्व ठीक आहे !"
"ठीक आहे !! मग भेटुयात ऑफीस मध्ये !!"
"हो नक्की "

शीतलने फोन ठेवला आणि आपल्या कामात व्यस्त झाली. आणि तेवढ्यात पुन्हा फोन वाजला.

"हॅलो !!"
"हॅलो !! समीर बोलतोय !!"
"समीर !! बोल ना !! कसा आहेस ?? आई कश्या आहेत आणि त्रिशा कशी आहे !! रडतीये कारे ती ?? सांग ना ?? बोल ना !!"
"त्रिशा खूप खुश आहे शीतल आत्ताच झोपी गेली !! सारखं माझ्या आणि तुझ्या फोटोकडे पाहून नकळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती!! " 
शीतल काहीच बोलली नाही. पण नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू जणू खूप काही बोलून गेला. 
"आणि माहितेय !! आई तर सारखं मला म्हणत होती की शीतल कशी असेन ,कुठे असेन !! बघ एकदा फोन करून !!पण म्हटलं नको !! तुला उगाच त्रास होईल !!शीतल !! शीतल !! ऐकते आहेस ना??"
शीतलचे मन हे सर्व ऐकून भरून आले. ती समीरला म्हणाली,
"मी नंतर बोलते समीर तुझ्याशी !!"

शीतलने फोन ठेवताच तिच्या डोळ्यातील आलेले पाणी तिने लगेच पुसले. क्षणभर ती हरवून गेली पण पुढच्या क्षणात मनाचा निर्धार करून ती स्वतःला समजावू लागली. नात्यांच्या या जगात अशीच जर मी गुरफटून राहिले तर पुढे कधीच जाऊ शकणार नाही. समीर मला असाच भावनिक साद देईल आणि मला तिकडे बोलावून घेईन पण मी आता या सगळ्या गोष्टींना भुलनार नाही.

शीतल पुण्यात आता रमु लागली. सगळं काही आवरून ती रोज ऑफिसला जाऊ लागली. तिच्या आयुष्याला जणू एक गती मिळाली होती. ती ,तीच ऑफीस आणि त्या ऑफिसमधील तिचे सहकारी जणू एक नवं जग दिला मिळालं होत. हळूहळू ती या सगळ्या बदलाला स्वीकारू लागली होती. पण एक मन कुठेतरी तिला नकळत काहीतरी राहून जातंय याची आठवण करून देत होते. त्या ऑफिसच्या जगात ते ती नकळत शोधण्याचा प्रयत्न करत होती. 

"हॅलो मॅडम !! " 
"मेघा!! बोल काय म्हणतेय ??"
"मॅम !! उद्या आपल्या ऑफीस मध्ये छोटा कार्यक्रम आहे !!"
"कार्यक्रम ?? कसला ??"
" यामध्ये ना सगळ्या ऑफीस स्टाफने आपल्या फॅमिली सोबत यायचं !! मग इथे मस्त एन्जॉय केला जातो !! सगळ्यांच्या ओळखी होतात !! खूप धम्माल येते !!"
"नाइस !! " शीतल तुटक बोलली.तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव क्षणाक्षणाला बदलत गेले. 
" मॅम येणार ना नक्की ??" 
शीतलने फक्त होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिला तेव्हा कळाल की जी मनातली रुखरुख आहे ती कशासाठी होती. आपण इथे आहोत पण आपली फॅमिली कुठे आहे ??  ती पोकळी तिला क्षणात जाणवून आली. 

फ्लॅटवर  संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला.
"समीर !! "
"शीतल !! आलीस ऑफिसमधून ?"
"हो आत्ताच आले. !!" 
शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला. 
" शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??"
शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली.
" नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता."
"बरं बरं !! " 
"समीर त्रिशा कुठे आहे रे ?? मला बोलायचं आहे तिच्याशी !!" शीतल अगदिक होऊन म्हणाली.
"आहे ना माझ्या जवळच !! आज नुसता गोंधळ घातलाय तिने घरात!! रांगत रांगत सगळं घर फिरायच ठरवलंय तिने !"
"रांगते ती ?? "
"हो म्हणजे काय !! सगळ्या घरात फिरते !! आईला तर पाच मिनिट सुद्धा सोडत नाही. सारखं आज्जी आजोबा पाहिजेत तिला. "
" मोबाईल स्पीकरवर कर ना !! ती आहे ना तिथे ??"
" हो आहे ना !! बोल तू ती ऐकतेय सगळं !!"
"त्रिशा , ये बाळा !! कोण बोलतेय बघ तरी !! मी तुझी आई बोलतेय !! " 
त्रिशा शीतलचा आवाज ऐकताच फोनकडे कुतूहलाने पाहू लागली. तिला आपल्या आईचा आवाज ओळखायला एक क्षणही लागला नाही.
"मला मिस करतेस ना बाळा !! " 
त्रिशा आता शीतलला बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या त्या बारीक ओठातून जणू शब्द बाहेरच येत नव्हते. ती सतत त्या फोनमध्ये पाहत होती आपल्या आईला शोधत होती.
"समीर !! ती ऐकतेय ना रे ??"
"हो शीतल !!! ती तुला ऐकतेय !! तिच्या मनाची तुला पाहण्याची ओढही मला जाणवते आहे !! तुला माहितेय शीतल तिला बोलता येत नाही अजून पण तीच मन मला लगेच कळतं. तुला ती खूप मिस करते पण कधी तुझ्याकडे येण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत नाही. खूप हुशार आहे त्रिशा आपली. " समीर शीतलला सगळं मनमोकळे पणाने सांगू लागला.
शीतलला अश्रू अनावर झाले.तिने फोन कट केला. 

शीतल कित्येक वेळ त्रिशाच्या आठवणीत हरवून गेली. तिच्या मनाला त्रिशाला पाहण्याची जणू ओढ लागली.

क्रमशः

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...