मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Marathi Katha Kathan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kathan ||

भाग ५ विमानाच्या वेगाने शीतल सगळं काही मागे सोडून निघाली. पुण्यात आली. सगळं काही नव्याने तिला भेटलं. कंपनीने राहायला फ्लॅट ही दिला. आणि आपल्या जुन्या आठवणी ,नाती सोडून ती या नव्या फ्लॅटमध्ये आली. इथे सगळं काही तिला नव्याने भेटत होत. क्षणात ती या जगात हरवून जाऊ लागली. तिकडे त्रिशा आणि समीर आपल्या छोट्याश्या जगात राहायला लागले. पण दोन्हीकडे एक रिकामी पोकळी होती. ती शीतलला जाणवत होती, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करत होती अगदी ठरवून. "का कोणास ठाऊक !! पण राहून राहून मला त्रिशाची ओढ का लागावी हेच मला कधी कळतं नाही. मला आई व्हायचं नव्हतं तरीही मी सगळ्यांच्या आनंदासाठी आई झाले. पुढे इकडे येऊन नोकरी करण्याच्या निर्णयाला सर्वांनी मनात नसतानाही परवानगी दिली. अगदी कोणतीही अडवणूक न करता. मग सर्व काही आज मी जे ठरवलं तसच होत असताना, काहीतरी राहून गेले अस का वाटत आहे. तो त्रिशाचा स्पर्श , तीच निरागस हास्य , ते बोलके डोळे  मला का सारखी तिची आठवण करून देतात. अस वाटत सतत सोबत असावी ती , तिच्या अल्लड प्रेमाला साद घालावी अस का वाटतंय मला ?? " शीतल कित्येक वेळ एकटीच खोलीत बसून विचार करत बसली होती. ...