कथा भाग २ आप्पा लगबगीने साहेबांच्या घरी पोहचले. आज नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला होता त्यांना. साहेबांचं घर म्हणजे जणू एक महालच होता. आप्पा मुख्य दरवाज्यातून आत गेले. समोर साहेब नुकतेच जेवण करून हात धुवायला गेले होते. आप्पांना समोर पाहून ते हातातील ताब्या बाजूला ठेवत म्हणाले. "काय आप्पा !! कधी नाही ते आज उशीर झाला यायला!!" आप्पा क्षणभर काहीच बोलले नाही. हातातील हिशोबच वही समोर करत म्हणाले. "आज थोडा वेळच झाला दुकान बंद करायला !! " "बरं बरं !!" साहेब आप्पांच्या हातातील हिशोबाची वही घेत म्हणाले. दोघांमध्ये कित्येक वेळ दुकानाच्या हिशोबा विषयी चर्चा झाली आणि मध्येच साहेबांनी आप्पांना विचारलं. "आप्पा !! दुपारी डबा कोणाच्या हातून पाठवला होता ??" "तुम्हाला डबा मिळाला ??" "हो तर !! अगदी वेळेत दिला आणून !!" "नवीनच होता माणूस !! सखा नाव आहे त्याच !!" "सखा !! बरं बरं !! पुन्हा बोलावून घ्या त्याला !!" " हो जी !! उद्या येतो म्हणाला !! अजून पाच रुपये द्यायचे राहिलेत त्याचे !!" "द्यायचे राहिलेत ?? का बरं ??...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!