ओढ जणू त्या भेटीची , मला तुझ्यात हरवून जाते !! पाहते तुला उगा आठवात, जणू चिंब भिजून जाते !! येता वाट ती वळणाची, त्या वाटेवरती थांबते !! शोधते त्या गंधात तुला, पाना फुलांना बोलते !! सोबत देते ती लेखणी , नकळत तुला सांगते !! विरहात लिहिल्या शब्दांची, जणू कविता तेंव्हा होते !! चित्र माझे ते रेखाटता, तुलाच त्यात शोधते !! रंग कितीही भरले तरी , अधुरेच का राहते ?? असे कसे हे प्रेम तुझ्यावर !! तुलाच आज न कळते !! क्षणही न रहावे तुजविण !! अबोल मज न बोलवते !! नजरेत त्या साठवून तुज मग !! आश्रुत त्या दिसते !! हळूच पुसता ती कडा मग !! स्वतःस सावरून घेते !! ओढ जणू त्या भेटीची मग, मला तुझ्यात हरवून जाते !! ✍️© योगेश ©All Rights Reserved ©
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!