प्रेम मला कधी कळलचं नाही! !

     प्रेम मला कधी कळलचं नाही.  असं होत ना कधी कधी प्रेम अगदी जवळ असत आपल्या पण ते लक्षातचं येत नाही.  त्या मनाचा त्या नाजुक भावनेचा कधी शोधच लागत नाही . असं होत ना कधी कधी जणु वाटते .. 

"प्रेम मला कधी कळलचं नाही
बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही
मनातल्या कोपर्‍यात कधी कोण दिसलच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .

तिचं हसणं कधी पाहिलंच नाही
त्याच रहस्य कधी जाणलंच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही

तिचा सहवास कधी जाणलाच नाही
तिच बोलणं कधी ऐकलच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .

तिच लाजणं कधी उमगलंच नाही
माझी काळजी करणं समजलंच नाही
म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही

तिच्या अश्रूचा अर्थ समजलोच नाही
व्यक्त केलेलं प्रेम विसरु शकत नाही
मनातुन तिचा चेहरा हटतच नाही

म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही !!!!!!

-योगेश खजानदार

प्रेम

प्रेम म्हणजे एक नाजुक स्पर्श , एक गोड भावना , एक सुंदरस अस नातं, ज्याच्याविना राहन जणू निरर्थकच .. वाटते जणू ...

"तिला कळावे
मला कळावे
शब्द मनातील असे

शब्द तयाचे
शब्द न राहिले
हासु उमटे जिथे

हसु पाहिले
शब्दांची मैफिल
गोड बोलणे जिथे

मनाची दारे
अलगद उघडे
प्रेमभावना जिथे ..... !!!!"

-योगेश खजानदार

सांजवेळी

चहाची मजा घेत मावळतीचा सुर्य पहाणे माझे सर्वात आनंदाचे क्षण . पण हे क्षणही इतके लगबग जातात जणु मावळत्या सुर्यास विचारावेसे वाटते की .. 

"थंड ही मावळती
आठवणीतल्या कुणाची,
सुर्यालाही लगबग ही
वाट पाहते का कोण त्याची !!!"

विचारावसं रोज वाटतं पण का कुणास ठाऊक पण शब्द ही थोडे अबोल होतात .. आणि वाटतं ....

"जीवनातल्या या क्षणी
आज वाटते मनी
हरवले गंध हे
हरवी ती सांजही

क्षण न मला जपले
ना जपली ती नाती
दुर त्या माळावरी
होत आहे मावळती

भरकटली वाटही
ना दिसली ती परतही
वाटले या मनतरी
ना भेटली ती परतही

सुर्य झाला लालबुंद
आज या माझ्या मनी
वाटते हवेहवेसे
पण कोणच नाही या क्षणी

जीवनातल्या या क्षणी
आज वाटते मनी... !!!!"

-योगेश खजानदार. ..

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...