अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कारण काळाने तो बोथट करून टाकला. आणि तुझ्याही मनात आता काही नसाव असं मला वाटत!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. त्या अचानक घडलेल्या भेटीत तिला काय बोलावं तेच कळेना .कित्येक काळ लोटून गेला पण योगेश आजही तसाच आहे याचं तिला नवल वाटत होत. कॉफी शॉप मधल्या त्या भेटीत तिच्यासाठी तो एक सुंदर क्षण होता. कारण कितीही झाल तरी तो तिचा जुना मित्र होता. कदाचित त्या कॉफी मध्ये ते जुने क्षण पुन्हा आठवले जातं होते.
"नाहीरे त्यावेळीही नाही आणि आताही माझ्या मनात काही नाही आपल्या नात्याबद्दल! " प्रिया कॉफीचा कप हातात घेत म्हणाली.
"मग पुन्हा कॉन्टॅक्ट करावसाच वाटला नाही कधी?
"नाही!!"
"म्हणजे तुझ्या मनात आजही माझ्या बद्दल राग आहे तर?"
"नाहीरे!!" पण पुन्हा धिरच नाही झाला तुला बोलायचं!!"
"वेडे आपल्यातले नाते एवढं कमजोर न्हवते की ते असे संपून जावे!! योगेश प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. प्रियाला त्यावेळी योगेशकडे पाहणं अवघड चालल. कदाचित नात्यांमधले अंतर त्यावेळी नजर चोरत होते.
"पण मला आजही याचं दुःख वाटत की कोण तिरहाईक माणसाने आपले इतके सुंदर नाते मोडले. योगेश तुला आठवत तु मला रोज भेटायचास. कधी शक्य नाही झाले तरी फोन मेसेजेस करायचा. पण मला वेडीला ते कधी कळलंच नाही. तूषारच्या आधीपासून तु माझ्या आयुष्यात होतास. पण मी कधीच तुला ओळखु शकले नाही." 
"मी तरी कुठे माझ्या मनातल तुला सांगायचो सांग ना!! योगेश प्रियाकडे एकटक पाहत होता. कारण नात्यामध्ये दोघेही तितकेच हरले होते.
"त्याचवेळी मनातल सांगितलं असत तर कदाचित आपण असे नसतो भेटलो!" प्रिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती.
"सांगितलं असत तरी वेळ निघून गेली होती!!" कारण तेव्हा तु माझ्या पासुन खूप दूर गेली होतीस. नकळत तु माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस! आणि ते सहन करण्यासारखं न्हवते. जी व्यक्ती कधीच आपल्या पासुन दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमके तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाही होत. आणि मी केलही नाही. आणि जे काही त्यानंतर झाल त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन. कारण शेवटी निर्णय तुझा होता!!" योगेश भावनिक होऊन बोलत होता. कित्येक शब्दांचे भावणेचे बांध आता तुटले होते.
"माझही चुकलं होत त्यावेळी!!" कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मी तुला सांगायला हवं होत. तुला नेहमी मी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते. पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे!!" प्रिया कॉफी कडे पाहत म्हणाली.
"बघना दिवसरात्र एकमेकांशिवाय न राहणारे आपण प्रत्येक क्षणाला बोलणारे आपण कित्येक वर्षाने भेटतोय."
"होना आणि तुला कधीच आठवण नाही आली माझी!!"  प्रिया योगेशला भावनिक होऊन विचारत होती.
"आली ना!! खूप वेळा आली पण तु काही भेटली नाहीस पुन्हा!! Actually  तु दिलेला तो pen आजही माझ्यकडे आहे!! "  त्यावेळी तु म्हणाली होतीस आठवत!! की नात जर नीट नाही ना चाललं तर त्यातली refill बदलायची ,नात नाही बदलायच." योगेश अगदी सहज तिला जुन्या आठवणींत घेऊन जात होता.
"हो नात नाही बदलायच!!. मग तुझ्या मनातल मला का नाही सांगितलं तु!! माझ्यावरचं प्रेम का नाही सांगितलस मला!! या प्रश्नानं योगेश गोंधळून गेला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
"चल मी निघतो आता!! " प्रिया योगेशला थांबवत होती पण योगेशची नजर तिला पाहतच न्हवती.
"नाही योगेश माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला!!"  प्रिया पुन्हा पुन्हा त्याला बोलत होती.
नक्की देईन पण आता नाही!! योगेश जाण्यास निघाला होता. पुन्हा तिला भेटण्याचं वचन देऊन.
  पण प्रिया तिथेच होती. संपलेला कॉफीचा कप खूप काही तिला बोलत होता.  नात संपले तरी त्याची सुरवात पुन्हा करण्यास सांगत होता. कदाचित मनातलं सगळं सांगायला ते नात पुन्हा जोडत होता...

क्रमशः ...

*********************

  "त्यावेळीही असाच निघून गेलास आणि आजही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच योगेश तु का निघून गेलास? मी तुषार बरोबर का निघून गेले हे तुला विचारावं असं का वाटतं नाही. त्या वेड्या मनातल प्रेम मी ओळखल होत रे!! पण माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणारा तुषार माझ्या सोबत होता. आणि त्याच प्रेम नाकारण्याची ताकद माझ्यात न्हवती !" प्रियाच्या मनात विचाराचं काहुर माजलं होत. योगेश गेल्या नंतर ही ती कित्येक वेळ तिथेच बसून होती.
  अखेर सर्व विचाराचा गोंधळ सोडून ती coffee shop मधून घरी आली. प्रियाची आई तिची वाटच पाहत होती. प्रिया काही न बोलता थेट आपल्या रूम मध्ये निघून गेली. हातात पेन घेऊन लिहू लागली.

प्रिय तुषार,
  "माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाहीत. जणु मी पुन्हा पुन्हा जगतेय. तुझ्याचसाठी .!!

मनातल सार त्या वही वर लिहून प्रिया कित्येक वेळ आपले अश्रू ढाळत होती. "योगेश तुझ्या कित्येक प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे न्हवती पण तुझ प्रेम मी ओळखु नाही शकले असे नाहीरे!!"  प्रियाचे अश्रू जणु खूप काही बोलत होते. खूप वेळाने ती room मधून बाहेर आली. आईने सगळं काही ओळखल होत न राहवून ती बोलली
"मनातल सार मनातच राहील की खूप त्रास होतो प्रिया!! तुषार तुझ्या आयुष्यात होता!! आणि योगेश वर तुझ मनापासून प्रेम होत हे कधीच तुझ्याकडून ही लपलेलं नाही!! पण त्याला ते कधी कळलंच नाही!! तुषार ने तुझ्याकडे प्रेम मागितल फक्त,  तेही त्याच्या आयुष्याच्या अचानक झालेल्या सांजवेळी आणि तु त्याला नकार नाही दिलास. कारण त्यावेळी त्याला तुझी जास्त गरज होती!!"  आई पुढे बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणाली.
"आई आज coffee shop मध्ये योगेश भेटला होता!! आजही मला तो तसाच सोडून निघून गेला ज्यावेळी मी तुषार सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता!!"
"आणि आजही तु त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असशील?" आई प्रियाकडे पाहत म्हणाली.
"खूप प्रयत्न केला!! पण तो नाही थांबला!! प्रिया अश्रू आवरत म्हणाली.
   कित्येक वेळ प्रिया आईला मनातल सार सांगत होती. तूषारचा आठवणींत अडकून ती योगेशला शोधण्याचा प्रयत्न करत होती. तुषार तिच्या आयुष्यातलं एक सुंदर पान होत. जे अचानक गळून पडल होत. त्या पानावर खूप काही लिहिल होत. जे कधीही पुसता न येण्यासारखे होत. पण योगेश तर एक सुंदर कविता होती जी सतत ओठांवर येतं होती.
  योगेशला पुन्हा भेटण्याची ओढ प्रियाला खूप होती. पुढचे कित्येक दिवस ती रोज त्या coffee shop मध्ये जात होती. पुन्हा योगेश तिला भेटेल आणि यावेळी त्याला असाच निघून जाऊ नाही द्यायचं अस ठरवून रोज ती तिथे जात होती. आणि एक दिवस अचानक तिच्या समोर कोणीतरी येऊ बसले. तो योगेशच होता.  प्रियाला त्याला समोर पाहून खूप आनंद झाला.
"तुझी वाट पाहता पाहता रोज coffee प्यायची सवय लागली मला!!" प्रियाला मनातला आनंद लपवताच आला नाही.
"तु रोज येतेस इथे? मी भेटेन पुन्हा म्हणून?? योगेश कुतूहलाने विचारत होता.
"हो!!"
पण का?
"कारण कित्येक गोष्टीं आजही अधुऱ्याच आहेत! ज्या मनात आहेत तुझ्याही, आणि माझ्याही!! खूप काही मला सांगायचय !! खूप काही तुझ्याकडून ऐकायचं आहे !!! " प्रिया त्या जुन्या नात्यास पुन्हा बोलकं करत होती. योगेशला मनातल सगळ काही सांगत होती!!!

क्रमशः ...

*********************
"नाती अबोल राहिली की अंतर वाढत जात, योगेश तु नेहमीच असा अबोल होऊन निघून गेलास आणि आपल नात नेहमीच अपूर्ण राहिल. माझ्या निर्णया नंतरही तु खूप उदास झालास. माझ्याशी बोलाच नाहीस." प्रिया मनापासून योगेशला बोलत होती.
"त्यावेळी काय बोलावं तेच कळेना. तुझ्या माझ्या मध्ये तुषार कधी आला तेच मला कळले नाही." योगेश मनातल सांगत होता.
"एकदा बोलायचं होतेस माझ्याशी!!"
"त्यावेळी मला राग आला होता,काय बोलावं तेच कळेना!! बरं ,  तुषार कसा आहे आता?" योगेश एकदम बोलला.
"तुषार आता नाहीये!! पुन्हा कधीच न भेटण्यासाठी तो निघून गेला!! प्रियाला पुढचे बोलवेना.
  योगेशला काय बोलावे तेच कळेना. तो थोडा अडखळला कित्येक शब्द ओठांवरच विरले.
"आयुष्याच्या संध्याकाळी फक्त साथ मागितली त्याने मला!! आणि मला नाही म्हणता नाही आले रे योगेश!!
प्रिया स्वतःला सावरत म्हणाली.
"पण, पण हे कधी आणि कसे झाले?"
"तुषारच माझ्यावर पहिल्यापासून प्रेम होते हे मला माहीत होते!! तो मित्र होताच पण आपल्या दोघांच्या नात्यात तिरहाईत म्हणूनच होता. हे मीही मान्य करते !! जेव्हा त्याला कळले की आपल्या आयुष्याची काहीच दिवस राहिले आहेत तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे साथ मागितली!! पण या काळात त्याने फक्त माझ्यावर प्रेमच केलं!" प्रिया आता सगळं काही बोलत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रू मध्ये तुषार.
"पण मी स्वताला हरवून गेलो प्रिया!! तुझ्या आणि तुषारच्या मध्ये मी येऊ नये म्हणून मी निघून गेलो!! पण तुषारच्या बद्दल जे झाले ते खरंच मला माहित न्हवते."
"म्हणूनच म्हटलं होत योगेश तुला मी!! की नात नीट नाहीना चाललं की refill बदलायची नात नाही बदलायच!!"
"पण नात राहिलाच नाहीतर काय करायच?"
"त्या नात्याला आयुष्यभर आपल्या मनात जपत राहायचं!! "
"आणि म्हणूनच तूषारच आणि तुझ नात आजही तु जपते आहेस तर!!"
"हो!!कारण ते नात खूप सुंदर होत. तुषार माझ्या आयुष्यात आला पण जितक्या दिवस होता ते माझे सगळ्यात सुंदर दिवस होते.!!"
"पण यामध्ये मला मी कुठेच दिसत नाही आता प्रिया!!!" योगेश अगदिक होऊन म्हणाला.
"नात्यात अंतर वाढलं की माणूस फक्त स्वत:लाचं शोधतो योगेश तेही स्वतःहच्या मनात नाही. समोरच्या वक्तीच्या मनात!"
कित्येक वेळ योगेश आणि प्रिया मनातल सगळं सांगत होते. आपण अबोल राहिलो म्हणून योगेशला वाईट वाटत होत. आणि आपल्या नात्यात पडलेलं हे अंतर मिटवण्याचे प्रियाचे प्रयत्न. यात coffee नक्कीच गोड झाली होती.
"आईने तुला भेटायला पण बोलावलं आहे!! प्रिया अगदी सहज म्हणाली.
"नक्की येईन!! कित्येक वर्ष झाली काकूंना भेटलोच नाही!!
"मग या रविवारी येशील??"
"प्रयत्न करेन!!"
"प्रयत्न नाही,यायलाच पाहिजेस!! मी वाट पाहीन तुझी.
"ठीक आहे !! नक्की येतो.
त्या भेटीत खूप काही मनाचा भार कमी झाला होता. प्रिया कित्येक दिवसनंतर मनमोकळेपणाने बोलली होती. काही नाती सहज तुटत नसतात. तर काही नाती अगदी सहज जोडली जात असतात. प्रिया आणि योगेशच हे अधुर नात पुन्हा एकदा बोलत होत. त्या रविवारची वाट पाहत होत.
ती ओढ मनात प्रियाच्या आता वेड लावत होती. त्या दिवसापासून ती फक्त रविवारची वाट पाहत होती. योगेशला ही आता प्रियाला भेटायचं होत. आपण नक्कीच चुकलो अस त्याच मन बोलत होत. कुठेतरी त्याच्या मनातही एक तिच्यासाठी लिहिलेल्या ओळी आठवत होत्या, त्या जुन्या वहीच्या पानातून जणु तो सतत त्या गुणगुणत होता..
"सखे असे हे वेड मन का
सैरावैरा फिरते
तुझ्याचसाठी  तुलाच पाहण्या
अधीर होऊन बसते
कधी मनाच्या फांदिवराती
उगाच जाऊन बसते
कधी आठवणीच्या गावाला त्या
उगाच फिरून येते

सखे असे हे वेडे मन का
सैरावैरा फिरते !!!

क्रमशः ...

****************

"कवितेत लिहिल कित्येक वेळा तुला पण क्षणात लिहायचं राहूनच गेलं.  या चार ओळी गुणगुणत नाही मी तर माझ मन तस बोलतेय. तुझ्या प्रेमाची सावलीही मी का ओळखु शकलो नाही हेच मला सांगता येत नाही. प्रेम म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणे नाही तर प्रेम म्हणजे साथ असते, प्रेम म्हणजे आपल्या माणसाच्या हाकेला दिलेली साद असते!!" योगेश त्या रविवारच्या सकाळी फक्त प्रियाचा विचार करत होता. मनातल्या विचारांशी नुसता भांडत होता. प्रियाच्या घरी जाण्यासाठी तोही तितकाच आतुर होता.
प्रिया कित्येक दिवसांनी स्वताला सावरत होती. योगेश कधीही येईल म्हणून सगळं काही व्यवस्थित करत होती. प्रियाची आई तिला मदत करत होती. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रियाने आतुरतेने दरवाजा उघडला आणि समोर योगेशला पाहून तिला खूप आनंद झाला. कित्येक वेळ दोघे दरवाज्यात घुटमळत होते.
"येणा!! "प्रियाने योगेशला घरात येत म्हटले.
"किती दिवसांनी भेटतोय योगेश!! मला वाटलं विसरूनच गेलास आम्हाला!! प्रियची आई योगेशकडे पाहत म्हणाली.
"कसा विसरेन काकू !! आयुष्यात काही नाती विसरावे म्हटलं तरी नाही विसरता येतं!!" योगेश प्रियाकडे बघत म्हणाला.
तेवढ्यात प्रिया किचन मधेन निघून गेली. योगेश कित्येक दिवसाने घरी आला आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला आवडते ती कॉफी करायला.
"तुझ्या अस रागावू जाण्याने खूप मनातून कोसळली होती प्रिया!!" आई टेबलावर ठेवलेल्या तुषरच्या फोटो कडे पाहत म्हणाली.
"रागाला घर नसतं ते कुठेही सैरावैरा धावत जात!!" आणि मध्ये येणाऱ्या आपल्या लोकांनाही उध्वस्त करून जात!! मला हे सगळं कळलं पण वेळ तेव्हा निघून गेली होती!!" योगेश प्रियाच्या आईला मनापासुन बोलत होता.
"तूषारच्या आठवणींत प्रिया पुरती कोलमडून गेली होती. एखादी व्यक्ती आपल्यावर जीवापाड किती प्रेम करू शकते याची सतत आठवण करून देत होती. पण तुला पुन्हा भेटण्यासाठीची ओढ काही वेगळीच होती. प्रियाची ती आजची ओढ तिला त्या आठवणीतून दूर घेऊन जात होती!! प्रियाची आई योगेशला पुन्हा प्रियाला सावरायला सांगत होती.
"पण एखादी व्यक्ती आपल्यावर इतकं प्रेम कसकाय करू शकते हेच मला कळेना. एखादया व्यक्तीला कवितेत किवा वहीत लिहन सोप असत पण त्याच्या आयुष्यात येऊन गोड आठवणी देणं खरंच खूप सुंदर असत!!" योगेश कित्येक शब्दाच्या गुंत्याना सोडवायचा प्रयत्न करत होता पण नात्यात ते पुन्हा गुंतत होते.
"श्र्वासांच्या अखेरच्या क्षणात सुधा तुषार फक्त प्रियावर प्रेमच करत होता!!मी गेलो तरी माझ्या आठवणीत रडायचं नाही म्हणून वचन मागत होता!!" प्रियाची आई अश्रू आवरत म्हणाली.
योगेश कित्येक वेळ फक्त निशब्द होता. एखाद्यावर रागावून रुसून जाणं किती सोप असत अस त्याला वाटू लागलं पण एखाद्यावर कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करण किती अवघड असत हे कळू लागलं. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती किती अवघड असते मिळणे अस मन सतत बोलू लागल.
"तुझ्या आवडती coffee!!!" प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली.
"थॅन्क्स!!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. आणि कित्येक वेळ प्रिया कडे पाहतच राहिला. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले तिला आपण साथ द्यायला हवी होती. तिचा निर्णय चुकला नाही तर बरोबरच होता.  आपण कोणावर प्रेम करतो याहीपेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा आपल्यावर पहिला हक्क असतो अस मनात योगेशला वाटू लागलं.
"कित्येक दिवसाने तुझ्या हातची कॉफी पितोय!!"
"आजही याची चव तशीच आहेना ??" प्रिया योगेशला म्हणाली.
"हो !! चव आहे तशीच आहे !! काही फरक नाही!
  कदाचित प्रियाला आपल्या नात्यातली चव तशीच आहे का विचारायचं असेन.अंतर पडतात नात्यात पण त्याची चव बेचव झाली की नाती चागली वाटत नाहीत.उरतात ती फक्त आठवणीची घर. तीपण रिकामी.
कित्येक वेळ योगेश प्रियाच्या घरी थांबला. प्रियाशी तिच्या आईशी मनमोकळेपणाने गप्पा मारत होता. जुन्या कित्येक आठवणी आठवत होता.
"बरं मी निघू आता!!" योगेश प्रियाला विचारत होता.
"वेळ किती आणि कसा गेला कळलच नाही!" प्रिया घड्याळाकडे पाहून म्हणाली.
"होना आपली माणसं जवळ आसले की वेळ कशी जाते कळतच नाहीना !!"
"होना!! उद्या तुला न्हायला येईन मी ..!! मला तुला काही बोलायच आहे प्रिया !!! भेटशील ना??
"नक्की भेटेन !!" प्रिया मनापासुन हो म्हणत होती.
योगेश आता प्रियाच्या घरातून बाहेर पडला होता. प्रिया योगेश नजरेआड होईपर्यंत दरवाज्यात उभीच होती .

क्रमशः

******************

मनातल सगळ सांगायचं म्हणून योगेश प्रियाला दुसऱ्या दिवशी भेटायला निघाला. आज योगेश येईन तिला घेऊन जायला म्हणून प्रिया ही सकाळपासून आवरत होती.  क्षणाची गती थोडी कमी झाली होती अस तिला वाटत होत. दुपारच्या वेळी अचानक योगेश प्रियाच्या घरी आला.
"सकाळ पासुन वाट पाहतेय तुझी मी!!" प्रियाला मनातली ओढ लपवताच आली नाही.
"सॉरी यायला थोडा उशीरच झाला!"योगेश ही गमतीने म्हणाला.
"आई मी येते!!"
"योगेशला घरात तरी येऊ दे!!"प्रियाशी आई एकदम म्हणाली.
"नको काकू!! असही बाहेरच जायचं होत आम्हाला!!"
दोघे आज कित्येक वर्षांनी एकत्र होते. प्रियाचा तो योगेश पासुन झालेला दुरावा आज स्पष्ट दिसत होता. कित्येक वर्षांच अंतर हळूहळू कमी होत होते. योगेश प्रियाला एका सुंदर समुद्र किनारी घेऊन गेला. त्या लाटांचा आवाज दोघान मधील शांतता भंग करत होती.
"तुझ्या मनातली ओढ, मला भेटण्याची का बरं जाणवते!! योगेशने प्रियाला विचारलं.
तो आता बोलायला होता मनातल सगळ सांगायला होता.
"तुषारने एवढ मनापासुन प्रेम करूनही माझ्यासाठी तुझ्या मनात जागा का आहे ?" योगेश भावनेच्या भरात बोलत होता.
"कारण तुझ्या अबोल मनानेही तेवढच प्रेम केलं आहे माझ्यावर!! तुला आठवत तु मला एकदा तुझी काविता ऐकवली होतीस!!
अबोल मनातले माझ्या
शब्द किती बोलके
सांगू कसे तुला मी
ओठांवर का विरते !!!
तेव्हाच तुझ माझ्यावरचं प्रेम मला कळलं होत!!
"पण तूही कधी मला तुझ प्रेम नाही सांगितलस !!" योगेश प्रियाला म्हणाला.
"कारण माझेही शब्द ओठांवरच विरून जायचे!!" प्रिया योगेशच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
"तूषारला कधी विसरून जाशील??"
"कधीच नाही!! त्यानेच तर प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितले मला!!"एखाद्यावर जीवापाड प्रेम करायचं, इतकं की आपला शेवटचा श्वास त्याला द्यायचा!!" प्रिया अश्रू पुसत बोलत होती.
"खरंच मी तुषारला ओळखूच शकलो नाही!! माझ्या मनाची ती अवस्था मला सांगता ही येत नाही! तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत असतानाही तु तुषार सोबत का गेलीस याने मी पुरता हरवून गेलो!! तुझा तिरस्कार करावा म्हटल तर तेही जमल नाही! त्या दिवशी तु अचानक coffee shop मध्ये मला विचारलस आणि मी गोंधळून गेलो!! त्या लाटांचा आवाज आता विरून गेला होता योगेश प्रियाला बोलत होता. तिही आता सगळं मनापासुन ऐक होती.
"पण आता नाही!! प्रिया मला तुझी साथ हवी आहे!! अगदी कायमची!!  हे अंतर आपल्यातलं मला संपवून टाकायचं !!! तु ही अबोल नसाविस आणि मीही अबोल न रहावा !! तुझ्या प्रत्येक क्षणावर मला प्रेम करायचं आहे !! तुषारने तुला प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितलं आणि मला तू !! योगेश प्रियाचा हात हातात घेऊन म्हणत होता. प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते.
"माझ्या डोळ्यातली ओढ तुला कधीच कळली नाही! तरीही मी तुझी वाट पहायचे!! ती या क्षणासाठीच !!की कधीतरी तू येशील आणि मला माझी साथ मागशील!! पण आज तूषारच्या आठवणीच घरचं आता मला छान वाटतेय ! " प्रिया योगेशकडे पाहतच न्हवती.
"तुषारला विसरून जा अस मी कधीचं म्हणार नाही तुला  !! "
"पण पुन्हा अबोल होऊन निघून गेलास तर मी क्षणभर ही जगू नाही शकणार!!"
"आता अबोल रहावस वाटत नाही प्रिया !! एक एक क्षण तुझ्याचसाठी द्यावा अस मन बोलतेय !! देशील माझी साथ कायमची ??? योगेश अगदी शांत विचारत होता.
कित्येक वेळ प्रिया काहीच बोली नाही. तो समुद्र किनारा आता सांजवेळी गुलाबी किरणांनी नाहून निघाला होता!! मंद वारा जणु पुन्हा पुन्हा घिरट्या घालत होता जणु दोघांचं बोलणं चोरून ऐकत होता.
"मला कधीच सोडून नाहीस ना जाणार योगेश?? मी अबोल झाले तर माझी समजूत काढशील ना?? तुझ्या आणि माझ्या मधील या अंतराचा शेवट त्या सूर्यास्तात जणु होतोय अस मला वाटतं आहे!!  प्रिया मंद हसत योगेशकडे पाहत होती आयुष्यभराची साथ द्यायचं वचन जणु देत होती.
"या प्रत्येक क्षणावर तुझाच नाव असेन आता प्रिया!!  तुझा हात कधीच मी सोडणार नाही !! योगेश तिच्याकडे पाहत म्हणाला.
कित्येक वेळ प्रिया योगेशच्या मिठीत तशीच बसून राहिली. तिकडे तो सूर्यास्त झाला , जणु दोन जीवांच मनाच अंतर अस्तास गेलं. अगदी कायमचं. जणु तो समुद्र किनारा त्याच्याकडे पाहून म्हणत होता..

"ओढ मनाची या
खूप काही बोलते
कधी डोळ्यातून दिसते
तर कधी शब्दातून बोलते

वाट पाहून त्या क्षणाची
खूप काही सांगते
कधी अश्रून मधुन वाहते
तर कधी ओठांवर विरून जाते

न राहवून कधी
बेभान जेव्हा होते
मनातले जणु तेव्हाच
अंतर ही ते मिटते!!

ओढ मनाची या
दोन जीवास बोलते !!! "

ती सांजवेळ ही जणु दोघांसाठी क्षणभर थांबली होती.....

*समाप्त*

-योगेश खजानदार









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...