"श्वास तो पहिलाच होता' पहिलीच होती भेट माझी !! रडत होतो मी तेव्हा आणि, रडत होती माय माझी !! पहिला स्पर्श माथ्यावरती, नकळत देत होती माय माझी !!! अश्रुंच्या त्या कडा तेव्हा, पुसत होती माय माझी !! मिठीत मला सामावून घेत , आपलंसं करत होती माय माझी!! कळत नव्हते काहीच मला, पण कळत होती माय माझी !! कित्येक वेदना क्षणात विसरून, हसत होती माय माझी !! माझ्या आयुष्याची सुरुवात होऊन, स्वतः स विसरत होती माय माझी !! पाहून तिला मी पाहतच राहिलो, प्रेमरूपी सागर माय माझी !! जगात येताच घडले दर्शन, त्या विधात्याचे रूप माय माझी !! श्वास तो पहिलाच होता, पहिलीच होती भेट माझी ..!!!" ✍️©योगेश खजानदार
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!