विरुद्ध..✍(कथा भाग ४)

"माझ्या आयुष्यात कधी प्रिया नव्हतीच !!  अस मनाला कितीही सांगितलं, तरी ते तिची आठवण पुन्हा करून देतं ना !! म्हणे मी मधे आलो तिच्या आणि विशालच्या प्रेमात !!  ती एकदा म्हणाली असती तरी मी त्याच्या मध्ये आलो नसतो..!! " सुहास स्वतःशीच बोलत होता. अगदी मनात भांडत होता स्वतःशीच.
तेवढ्याच दरवाजा वाजला. बाहेरून कोणी सुहासला बोलावत होत.
"सुहास !! "
"कोण आहे !! " सुहास दरवाजा उघडत म्हणाला.
"मी आहे प्रिया !! "
सुहासला हे ऐकुन आश्चर्य वाटल्या शिवाय राहील नाही. तो दरवाजा उघडतो तोच प्रिया त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिला सावरत सुहास म्हणाला.
"काय झाल प्रिया !!! "
"सुहास !! खरंचं माझं चुकलं!! मी तुला सोडून जायला नको होत !!" प्रिया रडक्या चेहऱ्याने बोलत होती.
"हो पण झाल काय ???"
"सुहास !! तो खूप वाईट आहे !! त्यानं मला कित्येक स्वप्न दाखवली !! पण सगळी खोटी ठरली!! "
" त्याने तुला काही केलं तर नाही ना ??"  सुहास म्हणाला.
"खूप त्रास दिला मला त्याने !! विशाल खरंचं खूप वाईट आहे सुहास !! आज मला त्याच खरं रूप कळलं!! ते प्रेम खोटं होत !! ते सगळं खोटं होत सुहास !! माझी खरंच खूप मोठी चूक झाली!!! " प्रिया कित्येक अश्रू वाहत बोलत होती.
"आधी तू शांत हो प्रिया !! आत ये !! शांत बस इथे, आणि काय झाल ते नीट सांग !! " सुहास तिला शांत करत म्हणाला.
प्रिया जवळच्या खुर्चीवर बसली. सुहास तिच्या जवळ बसला. तिला शेजारीच ठेवलेल्या पेल्यातल पाणी देत म्हणाला,
"जे झाल ते एक वाईट स्वप्न होत अस समजून आपण विसरून जावूयात प्रिया !! नव्याने सुरुवात करुयात आपल्या नात्याची !! तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही कधी मी अंतर देणार नाही !!प्रेम केलं आहे प्रिया मी तुझ्यावर !! तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत मी तुला साथ देईन याच वचन ही दिलं आहे तुला !! त्या सात फेऱ्यांमध्ये !! सगळं पुन्हा नव्याने सुरुवात करू !!" सुहास प्रियाकडे पाहत बोलत होता. तिला आपलंसं करत होता.
"इतकं सोपं आहे सुहास ??"
"इतकं अवघडही नाही !! " सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मला खरंच काय बोलावं ते कळत नाहीये!!" प्रिया थोडी शांत होत म्हणाली.
"माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे प्रिया !! तू करू शकते पुन्हा नव्याने !!"
   प्रिया फक्त सुहासकडे पाहून हसली. पण काही क्षणांपुरतेच. तिच्या हसण्यात कदाचित जुने सारे दुःख लपले होते. त्यानंतर प्रिया आणि सुहास कित्येक अश्रू पुसून आनंदाने राहु लागले. सुहासला सार काही हवंहवंसं वाटू लागलं. त्याच्या मनात प्रिया बद्दल अजून प्रेम वाढू लागलं.
"खरंच सार अचानक बदलून जावं !! आणि वठलेल्या झाडालाही पालवी फुटावी. अस काहीस माझ्या आयुष्यात झालंय !! जे नात संपलं म्हणून मी आसवे गाळत होतो , ते नात नव्याने फुलाव !! खरंच माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही!! सार काही आता मला सुंदर वाटतंय!! होणं !! आपल माणूस आपल्या जवळ असलं की कस सुंदर वाटत ना!! प्रिया!!! माझ जिच्यावर मनापासुन प्रेम आहे ती ,आता माझ्यावरही प्रेम करायला लागली असेल ना!! सार काही स्वप्न तर नाहीना ???" सुहास स्वतःलाच विचारू लागला.

"अलगद मग ती कळी खुलावी
नात्यास मग या गंध द्यावी
कधी उगाच हसून जावी
कधी माझ्यासवे गीत गावी

सांगून कानात या निघून जावी
अल्लड हसून मज वेड लावी
प्रेम मनातले पाकळ्यात लपवावी
हातात येताच लाजून पहावी

कधीं दिसताच उगाच रुसवी
खोट्या रागास गालावर आणावी
प्रेमात साऱ्या चिंब भिजावी
जणू कळी आयुष्य फुलवून जावी..!!"

होणं !! ही कळी किती सुंदर आहेना !! माझं हे रुक्ष आयुष्य पुन्हा फुलवल या कळीने !!" सुहास गालातल्या गालात हसत मनातच बोलत होता.
  प्रिया पुन्हा आयुष्यात आली म्हणून सुहास खूप आनंदी होता. प्रियाही आता पुन्हा पहिल्या सारखं वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला होणाऱ्या बाळाचा काहीच दोष नव्हता ना?? मग त्याला मारायचं का ?? अस सुहास म्हणाला आणि त्याने प्रियाची आणि त्या बाळाची काळजी घ्यायची ठरवल.
"प्रिया !! " सुहास तिला बोलावत होता.
"काय रे सुहास !! "प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"बाहेर येतेस माझ्या सोबत ??"
"हो चल ना !! "
प्रिया आणि सुहास दोघेही समुद्र किनारी फिरायला गेले. सार काही चांगलं चालू होत. कित्येक वेळ मजा मस्ती करून दोघेही घरी आले.
"तू बस !! अस अवघडल्या अवस्थेत जास्त त्रास करून घ्यायचा नसतो प्रिया !! "
"अरे पण आपल्या दोघांना मस्त कॉफी करते ना मी ??"
"नाही मी करतो !! तू बस !!" सुहास आग्रह करू लागला.
"अजिबात नाही !! कॉफी तर तुला माझ्याच हातची देणार मी !!" प्रिया जागेवरून उठतं म्हणाली.
"नाही !!" सुहास तिला अडवत होता. पण प्रिया काहीच न ऐकता तडक स्वयंपाक घरात गेली .

क्रमशः ..

✍©योगेश खजानदार

कोजागिरी

चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा
शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा
पसरून चोहीकडे हरवला तो बावरा
लख्ख प्रकाशाने जणू खुलला तो चांदोबा

चांदणी जणू त्यास हळूच पाहता
लाजून त्यास उगाच लपता
त्या रात्रीत जणू त्यास हळूच भेटता
चंद्रास पाहून चांदणी अल्लड हसता

ती रात्र जणु अलगद उमलता ..!!

योगेश

विरुद्ध ..✍(कथा भाग ३)

"भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली. मग हे नात आहे तरी काय ?? खरंच अशा नात्याला नाव तरी काय द्यायचं कळतच नाही. खरंच सात जन्माचे सोबती असे सात फेऱ्यात होऊ शकतात का ??  त्या मनाच काय?? त्याला खरंच त्या नात्याला सात जन्म टिकवायचं आहे का ?? "  सुहास त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता.
"सुहास !! बाहेर ये !! मला तुला बोलायचं आहे!!" बाहेरून प्रिया सुहासला बोलावू लागली.
कित्येक वेळ प्रिया त्याला बोलावत होती. पण तो आलाच नाही. अखेर कित्येक वेळाने त्याने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते.
" हा काय वेडेपणा लावलायस तू सुहास !! एवढ काही आकाश कोसळलं नाहीये !!" प्रिया उद्धांपणे सुहासला बोलत होती.
"खरंच म्हणतेयस तू !! एवढ काही झालचं नाही!!" प्रियाच्या डोळयात पाहत सुहास म्हणाला.
" मला वेगळं व्हायचं आहे सुहास !!! मला घटस्फोट हवाय !!" प्रिया शांत बोलत होती.
"ज्या नात्यात काही अर्थ राहिलाच नाही त्याला जपून तरी काय करायचं !! " सुहास प्रियाकडे न पाहताच बोलत होता.
"तेच म्हणायचं आहे मला !! पण ..!!!"
"पण काय ???" सुहास विचारू लागला.
"मी वाईट आहे, असं मनाला कधी वाटून घेऊ नकोस!! मी जे काही केलं ते फक्त माझ्या प्रेमासाठी!!" प्रिया .
"तू आताही जावू शकतेस प्रिया!!मला एक क्षणही हे नात जपणं अवघड जाईल आता !!" सुहास डोळ्यातील ओघळणाऱ्या आश्रुला आवरत म्हणाला.
प्रिया काहीच न बोलता निघून गेली. सुहास जागच्या जागी बसून राहिला. सगळं काही आवरून प्रिया घरातून बाहेर पडली, ती थेट गेली विशालकडे.
"विशाल !! विशाल !! "
"कोण आहे ??"
"मी आहे प्रिया !!" प्रिया विशालला पाहताच त्याला मिठी मारतच म्हणाली, विशालाल ती अचानक समोर आली हे पाहून आश्चर्य वाटलं.
"प्रिया !! तू इथे कस काय??"
"मी सुहासला सोडून आले विशाल !! कायमची !! "
"काय वेडेपणा आहे हा ??" विशाल थोडा चिडक्या स्वरात म्हणाला.
"पण आपलं ठरलं होत ना !! मी त्याला सोडून येणार!! आणि आपण एकत्र येणार ते !! "
"हो पण ते आता नाही !!" विशाल तिला लांब करत म्हणाला.
"मग कधी विशाल..!! मला नाही राहायचं तिकडे आता !!!" प्रिया अगदीक होऊन म्हणाली.
"आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला सुहासला सहन करावचं लागेल प्रिया !!"  विशाल मनातलं बोलला.
प्रिया एकटक विशालकडे पाहत होती.
" किंवा तू परत गेलीस तरी चालेल प्रिया !! माझ्या डोक्यात वेगळीच कल्पना आहे !! "  विशाल मनातले कित्येक विषारी विचार बोलत होता.
प्रिया आणि विशाल कित्येक वेळ बोलत बसले. पण सुहास मात्र आता एकटा पडला होता. त्याच्याकडे प्रियाच्या आठवणीं शिवाय काहीचं उरलं नव्हतं. त्या आठवणीतून तो काही गोड क्षण शोधत होता.
   "हा ऐकांत मला किती छळतो पण त्याच ते छळन मला आता हवंहवंसं वाटायला लागलं आहे !! कारण कोणीतरी असावं लागत आपलंसं म्हणणार !! खोटी नाती !!! खोटं हासू !! खोटी वचने !! सारं काही खोटं वाटायला लागलं होतं !! पण ही आठवण अशी गोष्ट आहे जी कधीच खोटी वाटतं नाही !! कारण तिचं अस्तित्व असतं ..!! अगदी कायमचं !! त्या घरात!!! त्या मनात कुठेतरी !!! होना !! प्रिया गेली !! अगदी कायमची सोडून गेली!! जिच्यावर मनापासुन प्रेम केलं ती अशी क्षणात निघून गेली, पण ठीक आहे !!माझ काय मी सहन करेन दुःख तिच्या जाण्याचं !! पण ती आनंदी असेल तिच्या जगात, हेच महत्त्वाचं !!
  तो एकांत सुहासला खूप काही बोलू लागला. त्याच्या प्रत्येक क्षणाला विचारू लागला. इतक सार मिळवूनही अखेर तू एकटाच का?? सुहास मात्र शांत बसू लागला. त्या क्षणाला काहीच बोलत नव्हता. कारण क्षण सारे निरर्थक वाटू लागले होते.
आता दिवस आणि रात्र सारे एकच वाटू लागले. सुहास आपल्या कामात व्यस्त होता. मनात काही शब्द होते .. आठवणीतले.

"नात्यास नाही म्हणालो तरी
आठवणी कश्या पुसल्या जाणारा
नाही म्हणून ती वाट टाळली जरी
त्या मनास कोण आवर घालणार

होतील किती रुसवे नी फुगवे
किती काळ मग दूर राहणार
आज नी उद्या पुन्हा त्या घरात
भेट अशी मग त्यासवे होणार

हो !! चिडले ते क्षण काही आज
उद्यास मग ते विसरून जाणार
नको त्या कटू आठवणीं सोबत
गोड हासू तेव्हा त्यात शोधणार

असेच हे नाते जपायचे
अखेर काय हाती उरणार
संपतील हे श्वास जगायचे तेव्हा
सारे काही  इथेच राहणार ..!! "

" अगदी खरं आहे !!! सार काही इथेच राहणार !! " सुहास स्वतः ला पुटपुटला..

क्रमशः

✍©योगेश खजानदार
 

विरुद्ध.. ✍(कथा भाग २)

"मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! " सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.
"ती शोधत तरी काय होती बरं ?? " सुहासला त्या कागदाची आठवण झाली. तो पटकन स्वयंपाक घरात गेला. समोरच तो कागद होता. त्याकडे पाहून सुहास विचार करू लागला.
"प्रियाला नक्की हाच कागद हवा आहे का !! हा कागद मला प्रिया काल जिथे पडली तिथेच मिळाला होता !! बघुयात तरी !!" सुहास कागद उचलून तो वाचू लागला.
"प्रिया .. मला माहितेय तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे !! तुझ्या वडिलांच्या हट्टामुळे तुला त्या सुहास सोबत लग्न करावं लागलं ते !! पण तू आजही परत येऊ शकतेस !! तुला माहितेय मी तुझ्या नवऱ्या इतका श्रीमंत नाहीये!!पण तरीही मी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन !! तुझ्या पोटात वाढणार बाळ आपलंच आहे !! आणि त्याबद्दल तू तुझ्या नवऱ्याला काहीच बोलू नकोस !! फक्त अजून काही दिवस, आपलं काम झाल की तू माझ्याकडे निघून ये !!! .... तुझाच .. विशाल ..." सुहास पत्र वाचून सुन्न झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना. एकटक त्या पत्राकडे तो पाहत बसला.
  "वेडी आशा लावून बसलो होतो मी !! आज नाहीतर उद्या कधीतरी प्रिया माझी होईल!! ती जुनं सार विसरून मला आपलंसं करेल !! पण नाही !! सार काही संपलय आता!! ज्या व्यक्तीला आपलं कधी व्हायचं नाही !! ज्याला आपल्या अश्रूंची साधी कवडी किंमत ही नाही अशा व्यक्तीला का माफ करायचं मी!!! नाही!!! आता उठतो नी माझ्या आयुष्यातून हाकलून देतो तिला..!! पण तिला पहिल्यांदा पाहिलं होत तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो ना!! त्याच काय !! नाही नाही !!!!! नाही!! बस्स्.!!! " डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रुला खूप काही बोलायच होत.पण तरीही सुहास शांत होता..
"सुहास !! " बाहेरून प्रिया सुहासला बोलावत होती.सुहास स्वतः ला सावरत बाहेर गेला.
"काय ??" सुहास प्रिया जवळ जात म्हणाला.
"माझा एक महत्त्वाचा कागद मिळत नाहीये !! तू पाहिलास का??"
सुहास त्याला काहीच माहीत नसल्याचे भाव करत.
"नाही पाहिला!! काय एवढं महत्त्वाचं होत !!"
"अरे विशेष काही नाही !!"  एवढ बोलून प्रिया निघून गेली.
  प्रियाने सगळी खोली शोधली पण तिला विशालने लिहिलेले पत्र कुठेच मिळाले नाही. ती हताश होऊन मनात कित्येक विचार करू लागली. तिला ती चिठ्ठी सुहास वाचेल याची भीती वाटू लागली.
" विशाल माझ्यावर किती प्रेम करतो !! आजही त्याला भेटल्यावर सार जग कुशीत घेतल्या सारखं वाटतं!! पण हा सुहास आमच्या मध्ये कधी आला कळलंच नाही!! हा माझा आयुष्याचा जोडीदार फक्त समाजाला दाखवण्या पुरताच आहे !! पण खर माझं प्रेम माझा विशालचं आहे !! एकदा का काम झाल की मी, विशाल आणि आमचं बाळ !! एवढचं जग असेल आमचं !! या सुहासची सावलीही नको मला पुन्हा!! " तेवढ्यात दरवाजा वाजला आणि प्रिया सावध झाली.
"प्रिया !! तुला कोणीतरी भेटायला आले आहेत !!" सुहास दरवाजातून म्हणाला.
"आता यावेळी कोण आल आहे अजून !!" प्रिया सुहासला पाहत म्हणाली.
"विशाल !!!" सुहास प्रियाच्या बदलत्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.
विशालच नाव सुहासने घेताच प्रिया थोडी गोंधळली. तिला पुढे काय बोलावं तेच कळेना. ती तडक बाहेर धावतच गेली.
खोलीच्या बाहेर येताच प्रिया सगळीकडे पाहू लागली.
"इथे तर कोणाचं नाहीये !! "
"आहे ना !! विशाल आहे ना !" सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
"ही काय थट्टा लावली आहेस सुहास तू ??" प्रिया रागात विचारू लागली.
"थट्टा कुठे !! खरंच आलाय विशाल भेटायला तुला!! " सुहास प्रियाच्या पोटावर कान ठेवून म्हणू लागला.
" हा काय विशाल !! हा बघ तुला भेटायला आला आहे !!! "
"बरं !! म्हणजे तू पत्र वाचल आहेस तर !!"
"हो !!! " दुःख वाटलं की एवढ प्रेम करूनही तुला माझ प्रेम कधी कळलं नाही !! त्याच उत्तरही मिळालं !! हा विशाल !!  समाजाच्या लाजे खातर इथे माझी बायको असल्याचं फक्त एक नाटक करते आहेस तू !! " विशाल मनातलं बोलत होता.
"हो आहेच माझ त्याच्यावर प्रेम !! तू माझ्या आयुष्यात येण्या आधीपासून!! खरतर तूच आमच्या प्रेमाच्या मध्ये आलास !! " प्रियाच्या डोळयात राग दिसत होता.
"हो मग तू जाऊ शकतेस !! त्या विशालकडे !! मी तुला कधीच अडवत नाहीये !!"
"नाही !! मला ते करायचं नाहीये !!"
"पण का ??" सुहास अनावर होऊन म्हणाला.
"माहीत नाही !!" प्रिया एवढचं बोलून निघून गेली.
  सुहासच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा खूप आघात झाला. तो अबोल झाला, त्याने स्वतःला अंधाऱ्या खोलीत बंद करून घेतले. तो अंधार त्याला काही सांगत होता..
"सुहास !! या अंधाराची सोबत खूप वाईट रे !! जेव्हा आपले दुरावतात तेव्हाच याची आठवण येते !! याला सुखही माहिती नी दुःखही..सुख त्या एकत्रीत क्षणाचे !! आणि दुःख त्या एकटेपणाचे!!  जी कधी तुझी झालीच नाही तिच्याबद्दल अश्रुंते काय वाहू द्यायचे !! जे नात कधी सुरूच झाल नाही त्याच दुःख तरी काय करायचं ..!! ती तुझी फक्त पत्नी झाली!!! सहचारिणी झालीच नाही !!

उगाच टिपूस गाळून
कालचे दुःख भिजायचे
आजच्या क्षणात थोडे
जगायचे राहून जायचे

भेटलेच नाहीं असे
नाते तरी काय जपायचे
दूर त्या क्षणात कोणी
अनोळखी वाट पाहायचे

बघ एकदा वाट बदलून
नव्या आकाशात फिरायचे
भेट त्या एका वळणावर
खूप काही सांगून जायचे

उगाच टिपूस गाळून
कालचे दुःख भिजायचे ..!!"  होणं !! सुहास त्या अंधारात हरवून गेला होता.

क्रमशः ..

✍© योगेश खजानदार

विरुद्ध..(कथा भाग १)

   "माझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्रेम करणारे आपली माणसं..!! होना !! मग सार मिळुनही एका क्षणात उधळून का जावं ??..काहीच कळतं नाही!! ही कथा माझी आहे !! माझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे !! हो विश्वासाला तडा जाणारी आहे !! सांगू की नको या निर्णयावर मी होतो !! पण अखेर सांगतोच आहे !! मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं ..!!"
या कथेची सुरुवात होते ती माझ्या लग्नानंतरच्या काही दिवसापासून ..
"प्रिया ..!! आज आपण थोड बाहेर जायचं का?? " मी म्हणजे सुहास तिला विचारत होता.
"कुठे जायचं आहे !!" प्रिया सुहासकडे पाहत म्हणाली.
"विसरलीस ??"
"काय ??"
"आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे !!!" सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
"अरे !! हे बघ सुहास !! असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये !!"प्रिया रागात बोलली आणि निघून गेली.
"मला तुझं हे उत्तर माहीत होत प्रिया !! आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते !! पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस !! हे कधी तरी जाणून घे तू !!!" पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रियाकडे सुहास बघून बोलत होता. तिने सगळे ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं.
"मन..!! खरतर याच काही कळतचं नाही मला. त्याच्या सारखं वागल तरी ते वाहवत घेऊन जात आणि त्याच्या विरुध्द वागल तरी ते नाराज होतं.. मग वागावं तरी कसं?? आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया..!! कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं..!! " सुहास शांत बसून कित्येक वेळ आपल्या मनातल्या विचारांशी भांडत होता. तसाच कित्येक वेळ बसून होता.
  "प्रियाशिवाय तरी कोण आहे माझ्या आयुष्यात, ही करोडोंची  संपत्ती , हा बंगला , या गाड्या मला एकट्या का वाटाव्या ..!! .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवलंही होत ..!!पण झाल भलतचं काही..!! उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला..!!"
    खिडकीच्या जवळ बसून सुहास स्वतः ला हरवून जात होता, पण तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. सुहास धावत खोलीच्या बाहेर गेला. पाहतो तर प्रिया जमिनीवर कोसळली होती.
"प्रिया ...!! काय झाल हे !! "सुहास तिला उठवू लागला.
"आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहेना ..!! तो साजरा करत होते ..!! " प्रिया दारूच्या नशेत बोलत होती.
"हा असा !! प्रिया तू दारू पिऊन आली आहेस ??"
"हो..!! तुला आवडणार नाही माहितेय मला..!! पण तरी मी दारू पिऊन आले!! " धडपड करत प्रिया उठून उभा राहिली. हसत हसत खोलीत निघून गेली.
"happy anniversary !!" सुहास स्वतःकडे बाजूच्या आरशात पाहतच म्हणाला. डोळ्यातून येणारा एक अश्रू हसतच जमिनीला मिळाला. कोणाला काहीही न सांगता.
  माझ्या आणि प्रिया मध्ये कधी प्रेम झालचं नाही. मी केलं तिच्यावर पण तिने कधी केलंच नाही. आणि मनमोकळेपणाने कधी मला ती बोललीच नाही.काय सलते आहे मनात ते तरी सांगावं ना मला एकदा .. पण तेही नाही ..!!  नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती ?? समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून..!! तिच्या मनात काय चालले आहे काही कळत नाही.!!
  पण रात्रीच्या त्या अंधारात माझ्यातील पुरुष जागा होतो. आणि मला म्हणतो की काय ऐकून घेतोस तीच तू !! तू पुरुष आहेस ना !! मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला !!  या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. !! नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे !! उठ सुहास !! " पण मन वाईट आहे ..!! कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी..? काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना.!!. आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे !! अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही...!! ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले !! नाही ना !! मग तरीही तिला माझ प्रेम कळालं नाही..! खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही ?? " सुहास विचारांच्या तंद्रीत होता आणि तिकडे रात्रीच्या अंधारावर किरणांनी विजय मिळवला होता.
  रात्रीच्या त्या प्रसंगात आपण खरंच चुकीचं वागलो असं बहुतेक प्रियालही वाटत होतं. ती पलंगावरून उठली आणि थेट सुहास बाहेरच्या खुर्चीत बसला होता त्याच्याकडे गेली.
"माझ जरा काल चुकलंच ..!! "पाठमोऱ्या सूहासकडे पाहून प्रिया म्हणाली.
सुहास खुर्चीवरून उठला तिच्याकडे बघत तो फक्त हसला आणि म्हणाला.
"ठीक आहे ..!! जाऊ दे !! होत असं !! बस मी तुला चहा देतो करून !!"
"नाही नको !! " प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"घे थोडा चहा !! आणि मलाही घ्यायचाच आहे थोडा !! "
"बरं !!" प्रिया होकारार्थी मान डोलवत म्हणाली.
  सुहास स्वयंपाक घरात जाऊ लागला. अचानक त्याची नजर खाली पडलेल्या एका कागदावर जाते. कुतूहलाने तो कागद सुहास उचलून घेतो आणि स्वयंपाकघरात जातो. प्रियाला आणि त्याला दोन कप चहा तो करू लागतो. चहा करण्याच्या नादात तो कागद तसाच बाजूला ठेवला जातो.
  बाहेर दोन कप चहा घेऊन येत सुहास प्रियाच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहू लागला. तिच्या जवळ येत तिला चहाचा कप देत तो म्हणाला.
"तुला हवं असेल तर तू आई बाबांकडे जाऊ शकतेस तुझ्या !!"
सुहासच्या या बोलण्याकडे आश्चर्य चकित होऊन प्रिया पाहू लागली आणि म्हणाली.
"नाही ..!! त्याची काही गरज नाहीये ..!! " एवढंच बोलून प्रिया चहाचा कप घेऊन खोलीत गेली.
   खोलीत येताच आपल्या पर्स मध्ये ती पाहू लागली. कित्येक वेळ शोध घेऊनही तिला हवं ते मिळत नव्हतं. ती खोलीतून बाहेर आली. बाहेर पाहू लागली. आणि समोर आलेल्या सुहासला पाहून शांत झाली.
सुहास ती काहीतरी शोधते आहे हे पाहून विचारू लागला.
"काही शोधते आहेस का?? "
" काही नाही!! " एवढंच म्हणून प्रिया पुन्हा खोलीत निघून गेली.
खोलीत येताच पुन्हा शोधू लागली.
"इथेच असायला हवी ती चिठ्ठी !! सापडत  नाहीये !!" शोधून शोधून थकलेली प्रिया स्वत:ला म्हणू लागली. तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढू लागली.

क्रमशः

✍© योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...