भाग १६ खरं प्रेम आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले. कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला. "आक्या !! दोन दिवस झाले बघतोय !! तुझं वागणं जरा बदललंय बर का ??" "म्हणजे ??" आकाश प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला. "म्हणजे ?? काल कुठे होतास दिवसभर तू ??" "काल !! अरे मित्रांकडे गेलो होतो !! " "कोणत्या मित्रांकडे ?? आमच्या शिवाय अजून कोण आहेत मित्र तुला ??" "अरे बार्शीहून आले होते !! " "हा मग भेटायला घेऊन यायचं की आम्हाला पण !!" सदानंद बोलत असताना मध्येच आकाशचा फोन वाजतो. आकाश बोलता बोलता फोन उचलतो, "हॅलो !! कोण ??" "हाय !! अरे निशा बोलते आहे !! चल येणार आहेस ना आजच्या ट्रीपला !! मी तुझ्या कॉलेज समोर आले आहे !! तीन वाजलेत" "हो आलोच !! आलोच मी !!" आकाश सदानंद सोबत बोलणं अर्धवट ...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!