बंगला नंबर २२ || कथा भाग १० || मुक्ती || शेवट भाग || मराठी भूत प्रेत कथा ||




कथा भाग १० || मुक्ती ||

खोलीतल्या वस्तू देशमुखच्या बाजूने भिरकावल्या जाऊ लागल्या. तो कसाबसा त्यातून वाचला. पण त्याने लगेच आपल्या पँटच्या खिशातून एक पुस्तक काढलं. मोठमोठ्याने तो तंत्रमंत्र म्हणू लागला. तशी माया कमजोर होत चालली. 
"नीच माणसा !! पुन्हा मी कैद होणार नाही ! पुन्हा तुझ्या कैदेत मी राहणार नाही !!" एक सावली देशमुखच्या बाजूने येऊ लागली. पण एक वर्तुळाच्या पुढे तिला काही येता येईना. 
"रांडेचे !! तेव्हाही अशीच विरोध करत होतीस !! आणि आजही तेच !! जा तुला आता कायमच मी या खोलीत कैद करून टाकणार !! " 
देशमुख जोरजोरात मंत्रतंत्र म्हणू लागला. बाहेर प्रिया पळतच श्रीधर जवळ गेली. त्याला मीठी मारून कित्येक वेळ रडत राहिली. श्रीधरला मात्र आत काय प्रकार घडतोय हे कळलं. तो धावतच आत आला. देशमुखला जोरात बुक्की मारत त्याने ते पुस्तक त्याच्यापासून हिसकावून घेतल.
"भाडकाव !! माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवतोस !!थांब तुला मी सोडणार नाही !! " असे म्हणत श्रीधर देशमुखला मारत राहिला.
तेवढ्यात मागून कोणीतरी क्षणात त्याच्या डोक्यात काठी हाणली. तो जगताप होता.
"शाब्बास !! दत्तू !! जा त्या प्रियाला घेऊन ये !! तोपर्यंत मी या मायाला इथे कायमचा कैद करून ठेवतो जा !!" देशमुख दरवाजा बंद करत म्हणाला.
जगताप धावत बाहेर गेला. समोर पाहतो तर सायली विचित्र नजरेने त्याला पाहत होती. ती क्षणात जगतापला फरफटत खोलीत घेऊन गेली. 
"साहेब !! मला वाचवा साहेब !! " आणि क्षणात जगतापच्या डोक्यात मार बसतो. तो बेशुद्ध होतो.
देशमुख मात्र मंत्रतंत्र करण्यात गुंग झाला. 
"उठ श्रीधर !!उठ !! आज ही संधी गमावू नकोस !! आज जर मी हरले तर हा नराधम !! तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन !! उठ !! " माया देशमुखच्या वर्तुळात अडकत चालली होती. ती श्रीधरला साद देत होती. 
"आज आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही !! तू संपलीस माया !! एकदा का तुझ काम झालं की मग त्या प्रियाला बघतो मी !! "
देशमुख मोठमोठ्याने हसू लागला. जणू त्याच्या अंगात राक्षसी आत्मा आली होती. मायाचा आवाज ऐकून सारे खोलीच्या दरवाजा जवळ आले.
अचानक त्या खोलीचे सगळे दरवाजे खिडक्या जोरजोरात आदळू लागले. 
"श्रीधर !! " माया मात्र जोरजोरात हाक मारू लागली. रडू लागली.

श्रीधर आवाजाने भानावर आला. समोर उभ्या देशमुखला पाहताच सावरला. उठला आणि त्याच्या हातातले पुस्तक त्याने फाडून टाकले. देशमुख रागावला. श्रीधरच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात श्रीधरने त्याच्या डोक्यात जोरात काठी मारली. शुध्द हरपून देशमुख खाली पडला. क्षणात सगळं शांत झालं. श्रीधर धावत बाहेर गेला. पाहतो तर समोर सगळे उभे होते. 
"श्रीधर !! माझी माया कुठे आहे ??"
मंदार मध्येच म्हणताच रांगत रांगत खोलीत गेला. सगळीकडे मायाला शोधू लागला. 
"माया !! माया !! "
अचानक मायाची सावली समोर आली.  
"माया !! " मंदार जवळ जाण्याचा प्रयत्न करत म्हणाला. 
"जवळ येऊ नकोस !! नकोस येऊ माझ्या जवळ !! "
"पण का ??"
"कारण थोडया पैश्यासाठी आपल्या बायकोला नीच गिधाडाच्या तोंडी देणाऱ्या नवऱ्याची सावली सुद्धा मला नको आहे !!"
"काय बोलतेय माया तू !!मी दिलं तुला त्या देशमुखच्या तावडीत !! आणि पैश्यासाठी??"
"हो !! म्हणून तर इतके वर्ष तुला माझी आठवण आली नाही !! विसरून गेलास मला !!"
"माया !! गेली कित्येक वर्ष मी एका खोलीत बंद होतो !! त्या श्रीधरने मला सोडवलं !!म्हणून तर मी बाहेर पडलो !! इतक्या वर्षात या नीच माणसाने माझे हाल हाल केले!! त्यातून मला तुझी काळजी होती !! तू कुठे असशील !! कशी असशील !! काहीच माहीत नव्हतं मला !! " मंदार देशमुखकडे रागाने बघत बोलला. 
"कुठे असेन !! गेली कित्येक वर्ष मी कैद होते त्या झोपाळ्यात!! आपला प्रतीक आपल्या दोघांच्या प्रेमात !! तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत !! गेली कित्येक वर्ष मी मरते आहे !! पुन्हा पुन्हा मरते आहे !! या देशमुखने मला एकदा मारल !! पण तू जे वागलास त्या कृत्याने मी क्षण न क्षण मरत राहिले. !!
"कोणतं कृत्य !! "
"हेच की तू मला सोडून गेलास !! पैश्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !!"
"मी सोडून गेलो ! ! नाही माया !! त्या रात्री मी तुझ्यावर अतिप्रसंग केला म्हणून त्याचा जाब विचारायला या नीच माणसाच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे याने घात केला. मला खूप मारल. बेशुद्ध पाडलं. आणि त्यानंतर मी कित्येक वर्ष एका छोट्याश्या खोलीत अडकून पडलो. कोणीतरी माणूस यायचा !! जेवायला द्यायचा आणि निघून जायचा !! दिवसातून दोनदा फक्त हेच व्हायचं !! बघ !! माझी अवस्था बघ माया !! मी तुझ्या प्रेमाचा सौदा करेल का ?"
"मग ते सगळं ??"
"खोटं आहे !!" मंदार मायाला सांगू लागला.
"पण त्यानंतर काय घडलं माहितेय तुला ?? या माणसाने माझ्यावर बलात्कार केले!! मला छळ छळ करून मारल !! आपला प्रतीक त्याला तर जिवंत जाळलं. या हराम्याने !!" माया रागात बोलू लागली. 
तेवढ्यात देशमुख भानावर आला. समोरची वस्तू घेत तो मंदारवर धावून गेला. तेवढ्यात जोरात त्याला फेकल गेलं. पुन्हा देशमुख उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण काठी घेऊन मंदार रांगत त्याच्या जवळ आला. त्याच्या पायावर जोरात त्याने काठी मारली.
"ये मंदार !! हे खूप महागात पडेल बर तुला ! "
"काय करशील रे तू !! "
"तुझा मुडदा पाडील !!" 
अस देशमुख म्हणताच पुन्हा मंदारने त्याच्या पायावर जोरात काठी मारली. देशमुख उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला उठताच येईना. 

श्रीधर, सुहास आणि श्याम धावत दुसऱ्या खोलीत गेले. तिथं सायली जगतापच्या समोरच बसली होती. सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला. 
"श्रीधर !! चंद्रग्रहण सुरू झालंय !! आपल्याला लवकरात लवकर इथून सायलीला घेऊन जायला हवं ! नाहीतर सगळं काही जळून नष्ट होईल !! "
"म्हणजे !! म्हणजे तू नीट बघ !! त्याच खोलीत तिथे देशमुख आलाय !! ज्याचा बदला मायाला घ्यायचा आहे !! आणि इथे जगताप !! ज्याचा बदला प्रतिकला घ्यायचा आहे !! पण यात सगळ्यात सायली कुठेतरी हरवून गेली आहे !! जर आज प्रतिकने आपला बदला पूर्ण केला आणि तो सायली सोबत निघून गेला तर आपल्याला सायलीच्या प्राणाला मुकाव लागेल !!"
"नाही रे !! अस होऊन चालणार नाही !! काय करावं आपण सांग तरी !! " 
क्षणभर सुहास विचार करतो आणि बोलतो,
"मंदार !! मंदार केळकर आपल्याला मदत करेल !! "
सुहास धावत पुन्हा मंदारकडे जातो. आणि त्याला सगळं काही सांगतो. मंदार जोरजोरात प्रतीकला हाक देऊ लागतो. 
मंदारच्या आवाजाने सायली चारी बाजूंना पाहू लागते.  धावत धावत ती खोलीच्या बाहेर जाऊन पुन्हा खोलीत येते. तेवढ्यात पुन्हा तिला हाक ऐकू येते. ती आवाजाच्या दिशेने जाते. मंदारला पाहताच त्याला मीठी मारते. हे पाहून सुहास थोडा विचारात पडतो. 
"नाही नाही !! हे अस नको आहे !! " आणि पळत तो बंगल्याच्या खिडकीत जाऊन वर पाहतो.
"मंदार हे नकोय !! प्रतीक आणि सायली एक नको आहेत मला !! " 
"म्हणजे?? "
"म्हणजे प्रतीक सायलीवर पूर्णपणे ताबा मिळवतो आहे !! आणि तीही त्याला विरोध करत नाहीये !! "
प्रिया बाजूला उभी राहून हे ऐकत होती. ती म्हणते,
"मग आता काय करायच सुहास !!" प्रियाचा आवाज ऐकताच क्षणभर सायली तिच्याकडे पाहते. 
"आपल्याकडे फक्त आता अर्धा तास आहे !! लवकरात लवकर आपल्याला सायलीला यातून मुक्त करावं लागेल आणि त्यासाठी एकच करावं लागेल. "
"काय ?? " प्रिया विचारते.
"तुझ प्रेम !! सायलीला मनापासून तुझ्याकडे येण्यासाठी हाक दे प्रिया !! "
"बरं !! देते हाक !!"
"सायली !! ये बाळा !! सायली !! ये इकडे !! चल !! " 
प्रियाचा आवाज ऐकताच सायली जोरजोरात हसू लागली. सगळ्या बंगल्यात धावू लागली.  
"ये बाळा !!ये ना इकडे !! हे बघ मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलेत !!" 
प्रिया कित्येक वेळ सायलीला हाक मारू लागली पण काही केल्या सायली तिच्या जवळ येत नव्हती. 

सुहास पुन्हा विचारात पडला. त्याला काही केल्या कळत नव्हतं की प्रतीक सायलीला का सोडत नव्हता. तेव्हा श्रीधर तिथे समोर येत सायलीला म्हणाला.
"प्रतीक !! जा आई तुझी वाट पाहतेय !!" 
आणि क्षणात सायलीच्या शरीरातून प्रतीक बाहेर पडला. समोर धावत तो आईच्या जवळ जावू लागला. त्या खोलीत मंदारला पाहताच त्याला आनंद झाला. 
"बाबा आले !! बाबा आले !! " त्या खोलीत आवाज घुमू लागला. 
मंदारला काहीच कळत नव्हतं. त्याच्या बाजूने फक्त सावली धावत होती. 

"श्रीधर , प्रिया ,श्याम ,नंदा ,मंदार चला सगळे !! आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही !! " असे म्हणत असतानाच समोरचे दरवाजे जोरजोरात बंद होऊ लागले.
सगळ्या खिडक्या जोरजोरात बंद होऊ लागल्या. सगळे धावत बाहेर जाऊ लागले. 
"पण सुहास माया आणि प्रतीकच्या मुक्तीच काय ??"
"ती मिळणार ना !! "
"कशी ?? त्यांना जिथं पुरलय तिथे त्यांचे उरलेले हाड तरी आपल्याला जाळून टाकावी लागणार ना!!"
"नाही श्रीधर त्याची आपल्याला गरज नाही !! आठव मी काय म्हणालो होतो.!! या ग्रहणाच्या रात्री त्या प्रेतआत्मा तिथेच जातात जिथे त्या शेवटी उरलेल्या असतात !! म्हणजे माया त्या खोलीत आणि प्रतीक वरच्या खोलीत या देशमुखने गाडले ! "
"काय ??"
"होय !! हे खरंय !!"

सगळे बाहेर येत असताना मंदार मागेच थांबला. आणि क्षणात त्याने मुख्य दरवाजा बंद करून घेतला. सगळ्यांनी जोरजोरात तो वाजवला.
"मंदार !मंदार!! " श्रीधर त्याला आवाज देऊ लागला. 
"सगळे तुम्ही या बंगल्याच्या बाहेर जा श्रीधर !! "
"तुला घेतल्या शिवाय नाही जाणार आम्ही !! चल तू !!"
"नाही श्रीधर !! मी तर केव्हाच मेलोय !! कित्येक वर्षांपूर्वी !! आता फक्त हे शरीर उरलं आहे !! "
"नाही मंदार !! नाही !!" 

श्याम ओढत श्रीधरला बंगल्याच्या गेटपासून लांब घेऊन गेला. बंगल्यात मंदार रांगत रांगत किचन मध्ये आला. गॅसचे बटण चालू ठेवून तो पुन्हा खोलीत गेला. 
समोर पाहतो तर देशमुख शुध्दीवर आला होता. अचानक त्याच्या पाठीवर सपासप फटके पडू लागले. तसा देशमुख मोठ्याने ओरडू लागला. जगताप पण असाच ओरडत होता. पुढच्या काही क्षणात बंगला नंबर २२ मध्ये जोरात गॅसचा स्फोट झाला. पाहता पाहता सगळं काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल. देशमुख आणि जगताप जिवाच्या आकांताने ओरडू लागले. ती आग त्यांना होरपळून काढत होती. त्या आगीत शांत मंदार जळत होता. माया मुक्त होण्यासाठी आपल्या मंदारला भेटण्यासाठी आतुर झाली होती. आगीच्या ज्वाळांनी जगताप जळून खाक झाला. तसे प्रतीक हसतहसत कोपऱ्यात जाऊ उभा राहिला. त्या आगीने रौद्ररूप घेताच समोर कपाटाच्या मागे उरलेल्या त्याच्या शरीराने पेट घेतला.

देशमुख आगीच्या धुराने गुदमरून मेला आणि माया मुक्त झाली. समोर पाहते तर मंदार तिची वाट पाहत उभा होता.
"माझ्यासाठी तू जिवंतपणी या आगीच्या लोटात स्वतःला झोकून दिलस ?? मला माफ कर मंदार कित्येक वर्ष मी तुझा फक्त तिरस्कारच करत आले !!"
मंदराने तिला मीठी मारली आणि म्हणाला.
"गेली कित्येक वर्ष तुझ्या भेटीसाठी आतुर झालो होतो. तुला मिठीत घ्यायला. तुझ्याशी बोलायला मी असे कित्येक आगीचे लोट सहन करेन !!" 
"मंदार !!"  मायाने मंदारला मीठी मारली. 
"आई ?" प्रतीक धावत आला. 
"बाळा !!"  मायाने त्याला कडकडून मिठी मारली. 

तिघेही क्षणात सावली होऊन मुक्त झाले. पुढच्या प्रवासाला गेले. 

"बघ ना प्रिया !! एक वासना माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते !!" श्रीधर जळून खाक झालेल्या बंगल्याकडे पाहत म्हणाला.
"होना !! प्रेम आणि वासना यातला फरकच अश्या लोकांना कळत नाही !!"

सगळे कित्येक वेळ त्या बंगल्याच्या दिशेने पाहत बसले. आजूबाजूला आता गर्दी जमू लागली होती.
तेवढ्यात बंगल्यातून श्रीधरला आवाज आला,

"श्रीधर मी तुला सोडणार नाही !! मी सोडणार नाही तुला!! श्रीधर !!"

*समाप्त*

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||



कथा भाग ९ || सुटका ||

श्रीधर कित्येक वेळ त्या अपंग झालेल्या मंदार केळकरकडे पाहत राहिला. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर गाड्यांचा आवाज येऊ लागला.श्रीधर धावत खिडकी जवळ गेला, तर समोर दहा ते पंधरा लोक हातात काठ्या, चाकू, बंदूक घेऊन आले होते. श्रीधर पुन्हा धावत मंदार केळकरकडे आला आणि म्हणाला. 
"चला इथून !! आपल्या मागावर लोक आलेत !! नक्की त्या देशमुखला सगळं खर खर कळलं असणार !!"
"तू कोण पण !!" मंदार श्रीधरकडे बोट करत म्हणाला.
"मी श्रीधर जोशी !! तुम्हाला इथून सोडवायला आलोय !!"
"श्रीधर जोशी ?? पण मला का ??" मंदार केळकर कुतूहलाने विचारतात. 
"सगळ तुम्हाला सांगतो नंतर !! पण आता प्लीज इथून चला !! आपल्या जिवाला धोकाय !! "
"हो पण मी नाही हलू शकत जागेवरून !! जास्तीत जास्त हाताने जवळपास जाऊ शकतो !! तेही फरपटत!! " मंदार पायांकडे पाहत म्हणाला.
"मी घेतो ना तुम्हाला माझ्या पाठीवर !! पण श्याम तू लक्ष ठेव त्यांच्यावर !! ते कुठे आलेत ते बघ !!" 
"हो !! "
 श्याम धावत पुन्हा खिडकीजवळ गेला. हळूच वाकून पाहू लागला. कोणीतरी एक इसम फोनवर बोलत होता.
"तुम्ही काही काळजी करू नका साहेब !! आज इथच त्या श्रीधर आणि मंदारचा मुडदा पाडतो !! त्याच्या सात पिढ्या सुद्धा शोधू शकणार नाहीत !! "
फोन ठेवत तो कंपनीच्या मुख्य दरवाजातून आत येतो. त्याच्या मागे उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहू लागले. 
"गण्या !! तुम्ही चौघ वरच्या मजल्यावर जावा !! भाणू तू तुझ्या पोरांना घेऊन मागच्या बाजूला जा !! आणि जिथं दिसतील तिथं डोक्यात कोयता घाला !! कळल का ? कळल ना ??"
"होय दादा !!"
"निघा निघा कामाला लागा!! "

श्याम श्रीधरला पळत येऊन लपायला सांगतो. श्रीधर धावतच समोरच्या खोलीत मंदार केळकरला घेऊन जातो. तिघेही शांत बसतात. गण्या आणि त्याचे मित्र शोधत शोधत मंदार केळकरच्या खोली जवळ येतात. पाहतात तर खोलीचा दरवाजा उघडा होता. गण्या जोरात ओरडतो,
"दादा !! म्हातारा नाही खोलीत !!" 
"काय ?? साला घेऊन पसार झाला का काय ??" दादा मोठ्याने म्हणतो.
"माहीत नाही दादा !!पण वर कोणच नाही !!"
"शोधा शोधून काढा त्याला !! नाहीतर त्यो देशमुख जीव घेईल माझा !! "

सगळी पोरं त्या कंपनीत फिरू लागली. कोपऱ्या कोपऱ्यात श्रीधर आणि मंदारला शोधू लागली. 
"इथ बसून काही होणार नाही !! आपल्याला वेळेत बंगल्यावर पोहचलं पाहिजे !! नाहीतर काही खर नाही !!"
"पण करायचं काय ??"श्याम हळूच विचारतो. 
क्षणभर श्रीधर विचार करतो आणि म्हणतो. 
"चला !! लपत लपत चला!!" हळू हळू लपत श्रीधर त्यांना बोलतो. 

श्याम आणि श्रीधर सगळ्यापासून लपत मार्ग काढू लागतात. श्रीधर मंदारला पाठीवर घेऊन चालत राहतो. तेवढ्यात दादाचा फोन वाजतो. सगळे शांत होतात. 
"नाही इथ श्रीधर !! पळाला तो देशमुख साहेब !!" 
असे दादा म्हणताच श्रीधर श्यामला आणि मंदारला घेऊन कंपनीच्या मेन डोअर जवळ येतो. धावत धावत तो समोरची गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो. क्षणात ती गाडी चालू होते. त्या आवाजाने सगळे बाहेर पळत येतात. श्रीधर गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी होतो. दादाला हे लक्षात येताच त्याने देशमुखला फोन लावला. 
"श्रीधर पळाला साहेब !! आत्ताच पळाला !! त्याच्या सोबत तो मंदार केळकर सुद्धा आहे !!"
"काय !!अरे भाडकावानो तुम्ही काय करत होतात तिथं !!"
"आम्ही शोधतच होतो पण तेवढ्यात आम्हाला चुकवून केव्हा पळाला कळलं नाही !!"
"बरं !! ते जाऊ दे आता पाठलाग कर त्याचा !! बंगल्यावर गेला तर तिथं हान भाड्याला !! ठेव फोन चल !"

देशमुख साहेब रागात फोन जमिनीवर आदळतो. आणि म्हणतो,
"दत्तू !! बंगल्यावर जायचं !! आत्ताच्या आत्ता बंगल्यावर जायचं आपल्याला !! तो श्रीधर तिथं पोहचायच्या आता त्याच्या पोरीचा आणि त्याच्या बायकोचा गेम करायचा !! त्या श्रीधरची पण समाधी आता त्याच बंगल्यात पुरायची !! चल !! चल !! त्याच्या बायकोला हिसका दाखवू !!"

देशमुख आणि जगताप दोघेही गाडी घेऊन बंगल्यावर जायला निघाले. रक्ताने भरलेले हात तसेच घेऊन जगताप बंगल्याजवळ आला. आणि देशमुखकडे पाहत म्हणाला.
"साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??"
"नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!" 
"मला पण !!" जगताप मिश्किल हसत म्हणाला. 
"चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!"

देशमुखने सांगताच सगळे पोर बंगल्यात घुसले. सुहासला आणि नंदाला त्यांनी एका खुर्चीला बांधलं. मात्र सायलीला काही त्यांना बांधता येईना. 
"साहेब !! या पोरीला दोरीन बांधून ठेवणं लई अवघड आहे !!"
"काय पाहिजे तुम्हाला !! का आमचा तुम्ही असा छळ करताय !! " प्रिया मध्येच बोलते.
"मला तू पाहिजे !! म्हटलं होत ना मी तुला !!" देशमुख असे म्हणताच अंगणातला पाळणा जोरजोरात हलू लागला. त्या जवळून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. 
ते आवाज ऐकताच देशमुख मोठ्याने ओरडला. 
"ये माया ! आजुन जोर गेला नाही का तुझा ?? एकदा मेलीस अजून किती वेळा मरायचं आहे तुला ?? ये दत्ता फोन लाव त्या भाडकाव श्रीधरला फोन लाव !! ये म्हणावं आता तुझ्या बायकोला वाचवायला !! जास्त हुषार व्हायचा प्रयत्न करत होता ना !! ये म्हणावं आता !!"

देशमुखने बंगल्याच्या चारी बाजूने आपली माणसं उभी केली. त्याच्या मर्जी शिवाय कोणी तिथं फिरकू ही शकत नव्हतं. 
"हे घ्या साहेब !! लावला फोन !!"दत्तू फोन देशमुखकडे देत म्हणाला. 
श्रीधर मात्र जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर फास्ट गाडी चालवत होता. थोड्या पुढे जाताच त्याच्या लक्षात येत की आपल्या मागे गुंड लागलेत. त्यांना गुंगारा देत श्रीधर बंगल्याच्या दिशेने गाडी पळवत होता. फोन वाजताच त्याने फोनकडे पाहिलं. देशमुखचा फोन पाहताच त्याला आश्चर्य वाटलं, त्याने फोन उचलताच देशमुख म्हणाला,
"काय श्रीधर !! मंदार केळकरला घेऊन चालला वाटत !!"
"भाडकाव तू किती नीच आणि खालच्या थराचा आहेस हे कळलय मला !! तुझ्या सगळ्या पापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल."
"खर का ?! आणि कोण देणार शिक्षा मला ?? तू ?? का तो लंगडा केळकर ?? कोण देणार मला शिक्षा ?? "
"जास्त माज नको करू देशमुख !!"
"ये गप्प !!आवाज नको करू !! एवढाच जोर आहेना तर ये वाचव तुझ्या बायकोला !! "
"प्रिया?? !! ये भाडकाव !! तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला सोडणार नाही मी !! "
"अस ?? मग तर लावून बघावाच लागेल !!"
एवढं बोलून देशमुख फोन कट करतो. 

"देशमुख बंगल्यात शिरलाय ! आपल्याला लवकरात लवकर जाव लागेल !! "
"तिथे सुहास ??माझी बायको नंदा आहे !! "श्याम.
"बहुतेक त्यानं सगळ्यांना बंदी बनवलय !!" 
"हा देशमुख सुधारणार नाही !! असच त्यानं माझ्या मायावर पण प्रयत्न केला होता !! नीच माणूस आहे तो !! " मंदार मध्येच म्हणाला.

श्रीधर वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवू लागला. इकडे देशमुखने प्रियाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न चालू केला.
"ये प्रिया !! आजिबात घाबरु नकोस !! हे बघ माझी हो मी तुला काही कमी पडू देणार नाही. !! ये जवळ !! "
"नीच माणसा !! तुला थोडी तरी लाज आहे का रे ??"
"नाही ना !! लाज काय त्यात !! तू मला हवी आहेस !! "देशमुख जवळ येत म्हणाला. 

अंगणात झोका जोरजोरात हलू लागला. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. सायली खोलीत मोठमोठ्याने वस्तू आदळू लागली. दरवाजा वाजवू लागली. तिच्या आत असलेला प्रतीक मोठमोठ्याने आईला बोलावू लागला.
"ये ! गप्प बसते का नाही तू ?? साली रांड !! त्या झोक्यात बस की गप्प !!" देशमुख मोठ्याने ओरडला. 
तेवढ्यात झोका शांत झाला. सुहास मात्र सगळं समजला. आपली आणि नंदाची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला. श्रीधर,श्याम आणि मंदार केळकर येईपर्यंत आपण त्याचा प्रतिकार करावा अस त्याला वाटत होत. पण बांधलेल्या रस्सितून त्याला काही केल्या सुटता येत नव्हतं. 

श्रीधर बघता बघता बंगल्या जवळ आला. गाडी त्याने थेट बंगल्याच्या गेटवर आदळली. सगळे चकित झाले. देशमुख सुद्धा आवाजाने सावध झाला आणि म्हणाला, 
"काय झालं रे ??"
"साहेब !! श्रीधर आलाय !! त्या मंदार केळकरला घेऊन !!" दत्तू म्हणाला. 
"हरामखोरला त्या तिथंच मारा !! जिवंत सापडला नाही पाहिजे !! पळा !!" देशमुख आवेशात म्हणाला. 

देशमुख प्रियाला फरफटत त्याच खोलीत घेऊन जाऊ लागला. 
"आता तुझं आणि तुझ्या नवऱ्याच काही खर नाही !! " 
"सोड मला !! सोड !! अरे तू माणूस आहेस का सैतान आहेस !! " प्रिया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली. 
"आता तुझी सुटका नाही !! ते बघ !! !"
खाली अंगणात श्रीधर ,श्याम आणि मंदारला देशमुखच्या गुंडांनी घेरल होत. 
"तुला वाटतं आता तुझा नवरा जिवंत राहील??"
"श्रीधर !! श्रीधर !!" प्रिया मोठ्याने ओरडली.
"चल !! " देशमुख तिला खेचत घेऊन चालला. 

खाली अंगणात सगळे श्रीधर आणि श्यामवर तुटून पडले. झटपट करत त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागले. काहींना श्यामने एका फटक्यात लोळवल. तर काहींनी त्यांना बेदम मारल. कशीबशी त्यांच्यापासून सुटका करत श्याम आणि श्रीधर मंदारला घेऊन सुहास जवळ आले. सुहासला त्या दोरीतून मुक्त करत त्याला म्हणाले.
"कुठ गेलाय तो ??"
"त्या खोलीत ??पण श्रीधर तो झोपाळा पहिले नष्ट कर !! जाळून टाक !! त्या मायाला मुक्त कर त्यातून !! त्या नीच माणसाने तिला त्यात कैद करून ठेवलंय !! "
श्रीधर धावतच किचन मध्ये गेला. रॉकेलची बाटली झोपाळ्यावर ओतून त्याने त्याला आग लावली. 

"मायाची सुटका म्हणजे ??" मंदार मध्येच म्हणाला. सुहास त्याला सावरू लागला. श्रीधर धावत खोली जवळ पळाला. दरवाजा जोरजोरात ढकलू लागला. 
"ये हराम्या देशमुख !! दरवाजा उघड नाहीतर तुझं काही खर नाही !!"
"अरे निघ रे !! नाही उघडत !! " 
श्रीधर धावत खिडकी जवळ गेला. जोरात हिसका देऊन त्याने खिडकी उघडली. समोर देशमुख प्रियाकडे पुढे पुढे चालून जात होता. तेवढ्यात खोलीतला पलंग अचानक हवेत फेकला गेला. अचानक सगळ्या वस्तू जागेवरून उधळल्या जाऊ लागल्या. क्षणात दरवाजा उघडला गेला. प्रिया धावतच बाहेर गेली. प्रिया बाहेर जाताच दरवाजा बंद झाला. 

"ये !! ये !! माया !! तुला सोडणार नाही बरका मी !! गप निघून जा इथून !! निघून जा !!" देशमुख सगळीकडे पाहत म्हणाला. 
"निघून जाऊ !! तू मेल्याशिवाय माझी सुटका कशी होणार ??"
"कोण मारणार मला !! तू ??"
असे म्हणताच देशमुख जोरजोरात हसू लागला. 
"आठवत ना !! गेली कित्येक वर्ष त्या झोपाळ्यात अडकवून ठेवणारा मीच होतो ते !! "
"नीच माणसा !! तुला मी सोडणार नाही !! तुला मी सोडणार नाही !!"

खोलीतल्या सगळ्या वस्तू जागेवरून उधळल्या जाऊ लागल्या. त्या खोलीत जणू वादळ आल होत.

क्रमशः

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||




कथा भाग ८ || शोध ||

श्रीधर केबिनमध्ये येताच आपलं काम करत बसतो. थोड्या वेळाने आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून तो लॅपटॉप मध्ये ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा चेक करू लागतो. दोन तीन वेळा त्याने मंदार केळकर नावाने जुना डेटा काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अश्या नावाचा कोणी कर्मचारी नव्हताच हे दिसून येत होत. पुन्हा पुन्हा तो चेक करत होता पण उत्तर काही बदलत नव्हतं. शेवटी न राहून तो ऑफिसमधील जुन्या एका कर्मचाऱ्याला विचारतो.
"पंडित , आपल्या ऑफिसचा कर्मचाऱ्याचा डेटा कुठे आहे ??"
"तो आहे की लॅपटॉप मध्ये!!"
"तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!"
"ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!"
"ठीक आहे पाहतो मी !! "
श्रीधर हळू हळू देशमुख साहेबाच्या केबिनमध्ये जाऊ लागतो. पण त्याला समोर बघून तो क्षणभर थांबतो. दुसरीकडे पाहू लागतो. थोड्या वेळाने साहेब केबिन मधुन बाहेर जातो. श्रीधर सर्वांची नजर चुकवून आत जातो. सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पण काही केल्या त्याला चावी भेटत नाही. शेवटी टेबलच्या खाली एका कोपऱ्यात त्याला चावीच बंडल भेटत. 
"बहुतेक यातच असणार ती चावी !! "
हळूच खिशात बंडल ठेवत तो बाहेर येत असतो. तेवढ्यात त्याला समोर देशमुख साहेब भेटतो. 
"श्रीधर ?? माझ्या केबिनमध्ये ??"
"ते !! ते !! काही फाईल्स ठेवल्या होत्या इथे त्याच घ्यायला आलो होतो.!! "
"मग कुठे आहेत फाईल्स??" श्रीधरच्या रिकाम्या हाताकडे बघत देशमुख म्हणाला.
"जी पाहिजे होती ती नाही मिळाली !! बहुतेक जगतापांकडे असेल !!"
"बरं बर !! भेटले का मग जगताप ??"
"नाही ना !! सकाळपासून त्याची भेटच नाही !! आणि फोनही लागत नाहीये !! "
"मला भेटले की सांगतो मी त्यांना तुम्हाला भेटायला !!"
"ठीक आहे साहेब !!"

श्रीधर चावी घेऊन खाली खोलीत येतो. समोर त्याला दहा बारा खोल्या बंद असलेल्या दिसल्या. त्यातली प्रत्येक खोली तो अथक प्रयत्न करून उघडतो. त्यातील पाच सहा खोल्या तर रिकाम्याच होत्या. शेवटी एका खोलीत त्याला भरपूर रद्दी झालेले कागद दिसू लागतात. हळूच त्या खोलीत तो जातो.एक एक डाटा चेक करतो. खूप वेळ प्रयत्न केल्यावर त्याला जुन्या कर्मचाऱ्याचा डेटा मिळतो. जुने रजिस्टर बुक पाहतो. त्यात मंदार केळकरच नाव शोधतो. 
"असणार यात नक्की असणार !! त्याच नाव !! मंदार !! मंदार !! मंदार केळकर!! हे सापडलं !!" श्रीधर रजिस्टर मध्ये बघत म्हणतो.
थोडा वेळ वाचतो. 
"यात १७३ सोहम सुभेदार आहे !! आणि १७४ मंदार केळकर !" मंदार तिथे लावलेला मंदारचा! फोटो क्षणभर पाहत राहतो . आणि म्हणतो,
 "पण या पुढच्या महिन्याच्या बुकमध्ये त्याच नावच नाहीये !! मंदार केळकरच नाव एका महिन्यात या बुक मधुन गायब झालं. पण या दुसऱ्या बुक मध्ये कर्मचारी कोणत्या कामा निमित्त बाहेर गेलेत ते लिहिलं आहे !! यात मंदार केळकर १८ जुलैला मात्रो कंपनीला विजीट द्यायला गेले ते शेवटचं !! त्यानंतर या पुढच्या कुठल्याच रजिस्टर बुक मध्ये केळकरच नाव नाही. म्हणजे त्या मात्रो कंपनी मध्येच काहितरी गुड आहे!! शोधायला हवं !! "
श्रीधर खोलीतून बाहेर पडतो. चाविच बंडल तिथेच फेकून देतो.  धावत धावत आपल्या केबिनमध्ये येतो. सुहासला फोन करून सगळं सांगतो. तिथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतो. 
"मला वाटतं तू याबद्दल श्यामला विचार त्याला नक्की याबद्दल माहीत असणार !! "सुहास फोनवर श्रीधरला सांगतो. 
"आहे तो तिथे ??"
"हो माझ्या जवळच थांबलाय ! बोल त्याला!! "
सुहास फोन श्यामकडे देत म्हणतो. 
"हा साहेब ??"
"श्याम !! तुला मात्रो कंपनी विषयी काही माहीत आहे का रे ??"
"हो साहेब !! आपल्या साहेबांची आहे ती कंपनी !! पण खूप वर्षांपूर्वी म्हणजे वडील असतानाच बंद पडली ती !! "
"मला दाखवशील कुठे आहे ती ??"
"हो !! "
"मी आलो लगेच मग !! आपल्याकडे वेळ खूप कमी आहे !!"
"ठीक आहे साहेब !!"

श्याम असे म्हणताच मागे दरवाजा जोरात आदळला जातो. जगताप पूर्ण ताकदीनिशी खोलितून बाहेर पळत जातो. श्याम आणि सुहास त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण दोघेही अपयशी ठरतात. जगताप धावत धावत बंगल्यातून पळत बाहेर पडतो. दोन्ही हात रक्तबंबाळ झालेले तो तशेच घेऊन जिवाच्या आकांताने पळत सुटतो. 

इकडे मात्र श्रीधर फोन ठेवून विचार करत बसतो. थोडा वेळ विचार झाल्यावर तो साहेबांकडे जातो. आणि घरी जाण्याची परवानगी मागतो. 
"का रे ?? असे अचानक ??"
"सायलीला बर वाटत नाहीये !!"
"काय झालं तिला ??"
"माहीत नाही !! पण प्रिया म्हणाली तिला हॉस्पिटल मध्ये न्ह्यावं लागेल. "
"ठीक आहे!! जा तू !!"

श्रीधर लगबगीने बाहेर पडतो. मात्रो कंपनीकडे निघून जातो. श्रीधर जाताच , मागून जगताप धावत पळत येतो. ऑफिसमध्ये मोठ्यामोठ्याने रडत येतो. त्याला तसे पाहून सगळे अचंबित होतात. पाहू लागतात. देशमुख साहेब पळतच बाहेर येतो.
"साहेब !! " जगताप रडत म्हणतो. 
"काय झालंय दत्तू ?? कोणी केली तुझी अवस्था ही ??"
"तिने केली !! जीव घेतला असता माझा आज तिने !!"
जगताप असे बोलताच. देशमुख त्याला गप्प बसायला सांगतो.  जमलेल्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना पाहून आपापल्या कामावर जायला सांगतो. जगतापला केबिनमध्ये घेऊन येत म्हणतो.
"कोणी केली अवस्था तुझी ??"
"माया ने !! तिच्या पोराने !! "
"साली रांड !! मेल्यावर सुद्धा हीचा जोर जात नाही तर !!" देशमुख रागाने म्हणतो. 
"त्या श्रीधरला सगळं कळलय साहेब ! त्या मंदार केळकर बद्दल सुद्धा कळलय !!"
"कोणी सांगितलं ?? "
"त्या श्याम आणि त्याच्या बायकोने !! "
"भाडकाव!! साला बापा सारखाच दगाबाज निघाला हा पण !!"
"त्या श्रीधरच्या पोरीच्या अंगात जाऊन बसलय ते पोर त्या मायाच !! " 
"एक मिनिट एक मिनिट !!" देशमुख साहेब लॅपटॉप जवळ जात म्हणाला. त्याला श्रीधरचा संशय येतो. 

लॅपटॉप मध्ये त्याने थोडया वेळा पूर्वीचे सीडीटीव्ही फुटेज पाहिले. आणि ते पाहताच तो धावतच खाली अडगळीच्या खोलीकडे गेला. समोर अस्थाव्यस्थ पडलेल्या फाईल्स आणि त्यात मंदार केळकर यांच्या नावाची फाईल समोर पाहून देशमुख रागाने लाल झाला. पुन्हा धावत तो जगताप जवळ आला. जगताप तेव्हा आपल्या झालेल्या जखमामुळे विव्हळत होता. 
"दत्ता !! ये दत्तू ?? आपल्या मात्रो कंपनीत आता कोण आहे का रे ??"
"नाही !! संध्याकाळी तेवढा किसण्या जातो तिथं !! "
"आत्ता जा म्हणावं!! फोन कर किसण्याला फोन कर !! म्हणावं आपली माणसं घेऊन कंपनीत जा !! "
"हा !! "जगताप फोन घेण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याचा हात उचलत नाही. त्याला पाहून देशमुख म्हणातो.
"सोड जाऊदे !! मीच लावतो फोन !!" 
खिशातला फोन काढत म्हणाला. 

श्रीधर या पुढच्या येणाऱ्या संकटाला अनभिज्ञ होता. श्यामला घेऊन तो त्या कंपनीत जातो. पाहतो तर त्या कंपनीत खोल्याच खोल्या होत्या. 
"आता कुठ रे शोधायचं ??"
"तुम्ही खालच्या मजल्यांवर शोधा !! मी वरती पाहतो!! " श्याम वर जात म्हणाला.

चारही बाजूने घनदाट झाडी असल्याने त्या कंपनीत दिवसाही अंधार पडला होता. आजूबाजूला म्हणावं अस कोणच नव्हतं. अगदी निर्मनुष्य अश्या जागेवर ती बंद पडकी कंपनी जणू एखादा भुत बंगला वाटत होती.

"या मंदार केळकर विषयी काहीतरी पुरावा मला इथे मिळेल अस वाटतंय खर पण !!" समोर असलेली खोली उघडत श्रीधर म्हणाला. खोली उघडताच पाच सहा वटवाघळे त्याच्या डोक्यावर उडू लागतात. त्यांना तो हाकलून देण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात श्याम मोठ्याने ओरडतो. श्रीधर त्या दिशेने धावत जातो. पाहतो तर समोर हाडांचा सांगाडा खोलीत पडला होता. 
"श्याम !! मंदार केळकरला मारून तर टाकलेलं नसेल ना ??"
"काय सांगत येत नाही याच !! मला पण हेच वाटायला लागलंय !! नक्की त्या मंदार केळकरचाच असणार ह्यो सांगाडा !! "
"आता ??"
"इथच शोधू अजून काय भेटत का ते !! "
"हो चालेल !!शोध !! "

श्रीधर आणि श्याम कित्येक वेळ त्या खोलीच्या आजूबाजूला शोधत राहतात. पण त्यांना तिथे काहीच मिळत नाही. शेवटी दोघेही हतबल होऊन घरी जायला निघतात. तेवढ्यात त्यांना त्या सूनसान जागेत कोणी पुरुष गाणे म्हणत असल्याचा आवाज येतो,
"तुला आवाज येतोय श्याम ??"
"होय साहेब !!"
"या एवढ्या मोठ्या कंपनीत हा कोण असेल बर ??"
"जाऊद्या साहेब !! चला आपण !! नको जायला कुठ !! आपलं घरी जाऊ !! नक्की भुताटकी असणार !! "
"नाही रे !! बघ ना त्याच्या आवाजात किती दुःख जाणवत आहे !! अस वाटत कोणी प्रियकर आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर झाला आहे !! चल ना बघुयात कोण आहे तो ??"
"साहेब !! नको !! नको !! भुताटकी असणार !! उगा माग लागलं आपल्या !! "
"काही होत नाही चल !!"

श्रीधर आणि श्याम हळू हळू चालत चालत त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागतात. तसा तसा तो आवाज अजून मोठा येऊ लागतो. अगदी जवळ येताच श्यामच्या पायाचा आवाज होतो.  आवाजाने ते गान बंद होत. आणि पलीकडे खोलीतून आवाज येतो,
"ये !! ये ! कोणय ?? ये सांग की आज वार कोणता ते तरी सांग !! ये ये !! तू कोण आहेस ??"

आतून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. श्रीधर धाडसाने त्याच्या समोरचा दरवाजा तोडू लागतो.श्याम मात्र भिऊन मागे थांबतो,

"नको साहेब !! आहो कोणी भुतं असलं हो इथे !! बघा ना किती सुनसान आहे !!" श्याम भीत म्हणाला.
"श्याम !! मलाही आता त्या भुताला भेटायचं आहे !! " श्रीधर जोरात एक दगड त्या दरवाज्यावर घालतो.
"ये !! मला घेऊन जायला आला तू ?? मला घेऊन जाणार ?? मला ???" आतून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. 

श्रीधर आणि नंतर श्यामने मिळून दरवाजा तोडला. समोरच चित्र पाहून दोघेही स्तब्ध झाले. काय बोलावं त्यांना काहीच कला नाही,

" मला !! मला मला घेऊन जाणार तुम्ही ??"
समोर कोणी एक दाढी वाढलेला, केस पांढरे झालेला, म्हातारा पडून होता,. या दोघांना पाहून तो हाताच्या बळावर पुढे येण्याचा प्रयत्न करू लागला, दोघेही मागे मागे सरकू लागले. 
श्रीधर शांत होता. तो पुसटस बोलला
"मंदार केळकर ??"
"हो हो !! मीच मंदार केळकर !! मीच मंदार केळकर !!"

क्रमशः 

बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||



कथा भाग ७ || दोन दिवस 

"सकाळ उजाडली तरी हा दत्त्या कसा आला नाही अजून ?? त्या श्रीधरन याला धरला तर नसलं ना?? जाऊन बघू का तिथं ?? नको नको !! उगाच काहीतरी वेगळाच कांड होईल!! त्यापेक्षा हळूच जाऊन बघतो नेमक चाललंय तरी काय ??" देशमुख साहेब ऑफिसमध्ये बसून विचार करत बसला होता. 
विचार करता करता गाडी घेऊन तो हळूच बंगल्या जवळ आला. बाहेरूनच सगळं पाहू लागला. नेमक आत काय चालू आहे याचा अंदाज काही केल्या त्याला येतं नव्हता. शेवटी त्याने न राहून जगतापला फोन केला. पण काही केल्या तो फोन उचलत नव्हता. तस तस् त्याच इकडे टेन्शन वाढायला लागलं होत. तेवढ्यात त्याने श्याम आणि श्रीधर दोघांना बाहेर पडताना पाहिलं. ते दोघे लगबगीने बाहेर निघाले होते. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांच्यासोबत अजून कोणीतरी असल्याचं देशमुख साहेबान पाहिलं. देशमुख साहेब तिथेच लपून बसला.

"आता सायली कशी आहे ??" सुहास घरात जात जात विचारतं होता. 
"खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये !! पण ती खूप विचित्र वागते आहे !! " श्रीधर काळजीने बोलू लागला.
"डोन्ट वरी !! सगळं ठीक होईल !! "

तिघेही पटापट चालत सायलीच्या खोली जवळ आले. श्रीधरने खोलीचा दरवाजा वाजवला पण कोणच उत्तर देत नव्हतं. प्रिया खिडकीतून लक्ष ठेवून होती. ती लगेच म्हणाली. 
"श्रीधर सायलीकडे बघणारे एकदा !!" प्रिया रडू लागली. 
सुहास पळत खिडकी जवळ आला. त्याने आतलं चित्र पहातच तो चकित झाला. एक पन्नास साठ वयाचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या समोर सायली एकटक त्याच्याकडे डोळे वटारून बघत होती. 

"सायली !! सायली नाव ना तुझं??" सुहासने विचारलं. 
"नाही !! "
"मग कोण आहेस तु?? सायली अस नाही करायचं !! उठ पटकन !! हे बघ कोण आलंय  !! बाबा आलेत ना !! उठ बर !!" 

सायली रागाने सुहासकडे पाहू लागली. ती वाऱ्याच्या वेगाने धावत आली आणि पहाता पहाता खिडकीचा दरवाजा जोरात आदळून पुन्हा तिथे जाऊन बसली. सुहासला हाताला जोरात मार बसला. त्यामध्ये तो मागे फेकला गेला.

"सुहास !! सांभाळून !!" श्रीधर धावतच त्याला सावरायला आला.

सुहासने स्वतःला सावरलं. तो पुन्हा पळत दरवाजा जवळ गेला. आणि मोठ्याने म्हणाला.
"श्रीधर ,श्याम ! जोरात ढकला तो दरवाजा !!"

असे म्हणताच श्रीधर आणि श्याम दोघेही पळत दरवाजाला जाऊन आदळले. दरवाजा जोरात उघडला गेला. पण सुहास तेवढ्यात म्हणाला. 
"श्रीधर !! आत नको जाऊस !! "

समोर सर्वांना बघून सायली मोठमोठ्याने रडायला लागली. जगताप तेवढ्यात शुध्दीवर आला. सायलीच रडणं ऐकून प्रिया धावत तिच्याकडे जाऊ लागली. पण सुहासने श्रीधरला तिला आत जाऊ देऊ नकोस म्हणून सांगितलं. 

"कोण आहेस तू ??" सुहासने दरवाजा समोर एक धागा बांधला. 
सायली तेवढ्यात मोठ्याने ओरडू लागते. श्रीधरला सुद्धा आता तिची ही अवस्था बघवत नाही. 
"कोण आहेस तू सांग !! नाहीतर बघ !! तुझ काही खर नाही !! तुला बांधून विहिरीत टाकून देईन !!"
सुहास असे म्हणताच सायलीच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. 
"मला वाचवा !! मला वाचवा !!" मध्येच जगताप अंगात अवसान आणून बोलू लागला.
"मला चटके देतो ना !! आता मी नाही तुला सोडणार !! आई हा माणूस खूप वाईट आहे ग !! " अचानक सायली मुलाच्या आवाजात बोलू लागली. 
"कोणी त्रास दिला तुला ?? कोणी त्रास दिला सांग !! नाहीतर आम्ही तुला पकडून ठेवू !!" 

सुहासच्या या वाक्याने सायली चवताळून त्याच्या बाजूने धावली. पण त्या धाग्या जवळ येताच जोरात मागे फेकली गेली. 

"श्रीधर !! पटकन इकडे ये !! मला सांग तू येताना म्हणालास की यापूर्वी तुला खूप वेळा एक मुल या बंगल्यात फिरताना दिसत होत. एक गोष्ट कोणती तरी अशी असेल की त्याने तो उदास होत असेल, इथून पळून जात असेल किंवा कोणाचं नाव घेतल्याने सगळं ऐकत असेल !! आठव ती कोणती गोष्ट !! कदाचित त्यामुळे तो सायलीला सोडून जाईल !! "

श्रीधर आल्यापासून सगळं काही आठवू लागला. त्याची आणि त्या मुलाची पहिली भेट. मायाची आणि त्याची भेट त्यांच्यातील बोलणं सगळं काही तो आठवू लागला. कित्येक वेळ तो विचार करू लागला. आणि अचानक मोठ्याने ओरडला.
"हो ! त्याच्या आईबद्दल बोललो की तो निघून जायचा !!" 
"गुड !! गुड ! !" सुहास पुन्हा दरवाजात आला. आणि मोठ्याने म्हणाला.
"आई कुठे आहे रे तुझी ?? हे बघ पाळण्यावर बसली आहे  !!"

सुहासच्या बोलण्याने सायली अचानक उदास झाली आणि पहाता पहाता बेशुद्ध पडली. प्रतीक तिथून निघून गेला. सगळे धागा ओलांडून आत आले. प्रियाने सायलीला उचलून कित्येक मुके घेतले. सगळे तिला बाहेर घेऊन आले. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्या वेळाने नंतर सायली शुध्दीवर आली. 

"आई !! काय झालं आई ??"
"काही नाही बाळा !! " प्रिया रडत म्हणाली. नंदा प्रियाला सावरू लागली.
"आई , प्रतीक कुठ आहे ??"
सायलीच्या या प्रश्नाने सगळे चकित झाले. 
"तुला कोणी सांगितलं प्रतीकबद्दल ??" श्याम मध्येच बोलला. 
"तो येतो माझ्यासोबत खेळायला ! !! काल रात्री पण आला होता. थोडा वेळ खेळला मग मला झोप लागली आणि मी झोपी गेले तेव्हा कुठे गेला माहीत नाही !!"
सुहासला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. 
"तो ना !! आईला भेटायला गेलाय ! येईल हा थोडया वेळात !! सुहास तिला म्हणाला. 
"म्हणजे येईल लगेच !! मलापण नेहमी म्हणतो !! थांब आलोच आईला भेटून लगेच !! हे बघ आलाच !!" 

सायलीच्या या वाक्याने सगळे चकित झाले. सुहास लगेच बोलला.
"सगळे मागे व्हा !!सगळे मागे व्हा !! " 

सायली दरवाजाकडे पाहून मोठ्याने हसू लागली. हसता हसता अचानक तिचा चेहऱ्यावरचा रंग बदलला. अचानक तिचं वागणं बदललं. मोठ्याने ओरडत ती वरच्या खोलीत धावत जाऊ लागली. 
"बाबा येणारं आहेत !! बाबा येणार आहेत आई !! " 
खोलीचा दरवाजा जोरात आदळला. सगळे धावत पुन्हा वर गेले. पाहतात तर सायली पुन्हा त्याच कोपऱ्यात जाऊन उभा राहीली होती. तिला अस पाहून नंदा , प्रिया सगळेच रडू लागले. सुहास मात्र भानावर येत श्रीधरला खाली घेऊन जात म्हणू लागला. 

"श्रीधर, प्रतीकचे बाबा म्हणजे , मंदार केळकरला आपल्याला शोधायला हवं!! "
मंदारच नाव घेताच अंगणातला झोपाळा जोरजोरात हलू लागला. श्रीधर आणि सुहास धावत तिकडे गेले. समोर पाहतात तर कोणीच नव्हतं. 
"तुला माया इथेच दिसली होती ना ??"
"हो इथेच !! म्हणजे माया आजही इथेच आहे !! कदाचित तिची डेड बॉडी इथेच कुठेतरी असायला हवी !! "
"म्हणजे ??"
"म्हणजे त्या देशमुखाने त्यांना इथेच कुठेतरी पुरून टाकलंय !! आणि आपल्याला ते शोधायला हवं !! पण तरीही मला हे सगळं अधुर अधूर वाटतंय !!" सुहास एवढं बोलून क्षणभर शांत राहिला. आणि पुन्हा बोलू लागला,
"माया आणि प्रतीक यांना जोडणार कारण म्हणजे आई- मुलाच प्रेम !! आणि म्हणून आईला जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत प्रतीक इथेच राहणार !! " 
"एकदा बोलता बोलता ती म्हणाली होती, मी आहे म्हणून तो इथे आहे , नाहीतर केव्हाच निघून गेला असता तो !! याचा अर्थ आईच्या सुखात मुलाचं सुख आहे म्हणून आईला झालेला त्रास त्यालाही होतोय !!" श्रीधर बोलतं बोलतं शांत झाला. 
"देशमुखला आपल्याला इथ आणायला हवं !! " सुहास मध्येच बोलला. 
"काहीतरी काय !! आणि असही तो भाडकाव एवढा डोक्यात बसलाय की समोर आला तर मीच त्याला कुत्र्यासारखा मारेल !!" श्रीधर रागाने म्हणाला. 
"नाही श्रीधर !! त्याला शिक्षा तू किंवा मी नाही !! तर माया आणि प्रिया दोघी मिळून देतील !! पण त्या आधी आपल्याला मंदार केळकरला शोधावं लागेल !!" 
"पण कसं ??"श्रीधर प्रश्नार्थक मुद्रेने सुहासकडे पाहत म्हणाला. 
"तेच तर आपल्याला शोधायचं आहे !!"

श्रीधर आणि सुहास बोलतं असताना धावत श्याम येतो आणि भीत भीत म्हणतो.
"साहेब !! सायली !!"
"काय झालं सायलीला ?? काय झालं ??" श्रीधर पुढे धावत जात म्हणाला. 

तिघेही खिडकी जवळ आले. पाहतात तर सायली जगतापच्या दुसऱ्या हातावर हातोडा जोरजोरात मारत होती. जगताप मोठमोठ्याने ओरडत होता. सुहास पुन्हा खोलीच्या दरवाजा जवळ आला. त्याने एक धागा बांधला आणि श्रीधर आणि श्यामला दरवाजा तोडायला लावला. 
"ये प्रतीक !! सोड !! सोड त्याला !! त्याने काय केलंय तुला ??"
"चटके दिली मला ! चटके!! " सायली विचित्र हसली. 
"हे बघ आई चालली तुझी निघून, पाळण्यावर रुसून बसली! ! " असे म्हणताच सायली धावतच सुहासच्या अंगावर आली. धाग्या जवळ अडखळली. आणि विचित्र बोलू लागली. 
"खोटं बोलतो तू ! माझी आई नाही माझ्यावर रुसत !! "
"अस !! मग जा बघून तरी ये !! तोपर्यंत सायली थांबेन इथेच !!" 

सायली शांत झाली. सुहास हळूच सायलीला उचलून बाहेर आला. सायली पुन्हा बेशुद्ध पडली. प्रियाने तिला पुन्हा शुध्दीवर आणलं. 
"आई !! प्रतीक कुठ आहे ??" सायली सतत प्रतीकच नाव घेत होती.
"येईल तो !! तूं शांत बस !!"
"कसं शांत बसू आई ! माझा बेस्ट फ्रेंड आहे तो !! मला म्हणाला दोन दिवसांनी आपण त्या मागच्या बागेत खेळायला जाऊ !! आणि तिथं खेळतच बसू !! खेळतच बसू !! खेळतच बसू !!" सायली विचित्र हसत म्हणाली. 
सुहासचे कान लगेच टवकारले. त्याने लगेच मोबाईलमध्ये कॅलेंडर पाहिलं. 
"ओ नो !! ओ नो !! श्रीधर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ! वेळ खूप कमी आहे !! चला माझ्या सोबत चला !! मला आता सगळं कळलय की नेमक इथे काय घडतंय !! "

सगळे हॉलमध्ये जमा झाले. नंदा ,श्याम , सुहास ,प्रिया आणि श्रीधर सगळे आले. सायली रात्रभर जागल्यामुळे प्रियाच्या खांद्यावर तेव्हा झोपी गेली होती. 

"श्रीधर ! इथ जे घडलं त्या इतिहासामध्ये आज आहे अस समज !! मायावर झालेल्या अत्याचारामुळे तिची आत्मा आजही त्याचा बदला घेण्यासाठी या बंगल्यात वावरते हे आता नाकारून चालणार नाही  , आणि त्या सोबतच आपल्याला मंदार केळकरचा शोध घ्यावा लागणार आहे !! कारण प्रतीकचा जीव त्या बापात आहे आणि मायाला वाटत की मंदारने तिला विकली स्वतःच्या करिअरसाठी, त्यामुळे एकीकडे आईचा बापाबद्दल राग ! आणि दुसरीकडे मुलाचं बापावर असलेलं प्रेम !!हे सगळं एकमेकांना गुंतून ठेवतेय,पण या सगळ्यात एक माणूस असा येतो जे हे सगळं उध्वस्त करतो आणि आपल्याला काहीही करून त्या माणसाला म्हणजे देशमुखला इथे या बंगल्यात आणावं लागणार हे खर आहे !! आणि तेही दोन दिवसाच्या आत! कारण तुला माहितेय दोन दिवसांनी काय आहे ??"
"काय ??" श्रीधर कुतूहलाने विचारू लागला.
"चंद्रग्रहण !! आणि त्याच रात्री या दोन्ही प्रेतात्मा पुन्हा तिथेच जातील जिथे शेवटी त्या जाऊन थांबल्या!! आणि जाण्यापूर्वी आपला बदला पूर्ण करूनच त्या जातील आणि जर अस नाही झालं तर पुन्हा कित्येक लोकांचे बळी जातील या मायलेकराच्या क्रोधात, अशावेळी जर सायलीच्या अंगात प्रतीकच भूत राहील तर कदाचित त्यावेळी ते सायलीवर पूर्ण ताबा घेईल !! आणि सायलीला वाचवणं अवघड होईल !! "
"म्हणजे ?? तुला म्हणायचं काय आहे सुहास ??" श्रीधर प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला. 
"म्हणजे !सायलीचा जीव धोक्यात आहे श्रीधर !!" 
"काय ??" हे ऐकतच प्रिया रडू लागली. सायली झोपेतुन उठेल म्हणून आपला हुंदका रोखु लागली. 
"काहीही काय सुहास !! मी नाही मानत असलं काही !!"
"मग तुझ्या समोर जे घडतंय ते सगळं खोटं आहे अस तुला म्हणायचं आहे !!"
"हो !! कदाचित सायलीला ह्या असल्या भाकड कथा कोणीतरी सांगितल्या असतील आणि म्हणूनच सायली असलं ऐकून वेड्यासारखं करायली आहे. मी तीला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. मोठ्या सायकायट्रिष्टकडे घेऊन जाईल !! काही नाही होणार माझ्या सायलीला !!"
सुहास पुढे झाला. श्रीधरला सावरत म्हणाला. 
"दुसरा कोणताच पर्याय नाहीये श्रीधर ! डॉक्टर, वैगेरे वैगेरे याच्या पलीकडे गेलं आहे हे सगळं आता !!"
"मग मी काय करू आता !! काय करू !!" श्रीधर हतबल होऊन खाली बसला. 

श्याम आणि सुहास श्रीधरच्या जवळ बसले. नंदा आणि प्रिया सायलीला घेऊन किचन मध्ये गेल्या. खूप वेळ विचार केल्यावर श्रीधर उठला. आणि म्हणाला. "बसून चालणार नाही. आपल्याकडे फक्त दोन दिवस आहेत. आपल्याला आता सर्वात पहिले मंदार केळकरच काय झालं याचा शोध लावायला हवा !! त्याने खरंच मायाला त्या नीच माणसाच्या हवाली केलंय का तेही पहावं लागेल, आणि त्यासाठी आधी मला ऑफिसमध्ये जाव लागेल. ऑफिस फाईल मधुन मला त्याची माहिती काढायला हवी. शेवटी त्याच काय झालं ते शोधावं लागेल !!" 
"पण नक्की तू करणार तरी काय आहेस ??" 
"आपल्याला जाळ टाकावं लागणार !! त्या नीच माणसासाठी !!" 
"नक्की काय करायचं ते तरी सांगा साहेब ??"श्याम मध्येच बोलला. 
"आधी आपण सगळे !! काही घडलच नाही अस वागुयात !! मी आता नेहमी प्रमाणे ऑफीसला जातो!! तोपर्यंत इथली काळजी तुम्हां दोघांना घ्यावी लागेल !! " 
"ठीक आहे !! मीही या बंगल्याच्या आवारात नेमक मायाचं प्रेत कुठे पुरल असेल याचा अंदाज घेतो!! कारण त्याच रात्री आपल्याला ते उरलेले प्रेताचे अवशेष जाळावे लागतील. त्याशिवाय त्यांना संपूर्ण मुक्ति मिळणार नाही. "
"ठीक !! आणि श्याम तू घरात काळजी घेशील ना ??"
"होय साहेब !! नक्की !! "
"चला मग !! लागुयात कामाला !!"

तिघेही आपल्या कामाला लागले. प्रिया आणि नंदाला विश्वासात घेऊन सांगितलं. नंतर श्रीधर टापटीप आवरून बंगल्याच्या बाहेर पडला. त्याला बाहेर तेव्हा लपून बसलेल्या देशमुख साहेबान पाहिलं. त्याच्या मनात विचार आले,
"हा एवढा आवरून निघतोय म्हणजे !! इथे तर काही नाही झालं !! म्हणजे दत्तू नक्की कुठतरी दारू ढोसून पडला असणार!! आता घरी जाऊ का ?? पण नको !! तो कोणीतरी एक माणूस आलाय की घरी !! ती प्रिया थोडीच एकटी असणार !!  त्यापेक्षा ऑफिस मध्ये जातो म्हणजे या बावळट श्रीधरला माझा संशय येणार नाही !! " 
लांबून बंगल्यात डोकावून बघण्याचा प्रयत्न करणारा देशमुख गाडी फिरवून पुन्हा ऑफिस मध्ये जातो. काहीच नाही घडलं या आविर्भावात वागतो. थोड्या वेळाने श्रीधर येताना त्याला दिसला. आपलं त्याच्याकडे लक्ष नाही असे तो पाहू लागला. 
"गुड मोर्निग साहेब!!" 
"गुड मॉर्निंग !! " देशमुख तुटक बोलला. 
"आज सकाळपासून जगतापांचा फोन लावतोय लागत नाहीये !! "
देशमुख चपापला आणि सावरत म्हणाला.
"मीही लावतोय पण कुठे गेलाय कोणास माहीत !! काही काम होत का ??"
"ऑफिसबद्दलच काम होत !"
"मला तरी काही भेटला नाही ! भेटला किंवा कॉल आला तर नक्की सांगतो तुला कॉल करायला !!" 
"धन्यवाद साहेब ! नक्की सांगा !!"

श्रीधर आपल्या केबिनमध्ये जाऊ लागला. त्याला जाताना पाहून देशमुख मनातल्या मनात हसला. कित्येक विचार करत बसला.

"म्हणजे त्या प्रियाने याला काहीच सांगितलं नाही तर!! मला वाटलं होत येतंय मला मारायला !! पण नाही आल!! असुदे मला बरंच झालं !! म्हणजे आता मला रान मोकळं झालं !! आज नाही तर उद्या ती प्रिया येईलच माझ्या मिठीत !! सोडतो का काय तिला !!!" देशमुख गालातल्या गालात हसला.

क्रमशः

बंगला नंबर २२ || कथा भाग ६ || सत्य || Marathi Horror Story ||



कथा भाग ६ || सत्य ||

श्रीधर एकटाच त्यानंतर हॉलमध्ये शांत बसून होता. त्याच्या मनात कित्येक विचाराचं काहूर माजलं होत. 
"आजपर्यंत सर्वांशी चांगलं वागुनही शेवटी ती माया मला वाईट का म्हणाली असेल !! तिलाही माझ्यात ती वासनेची नजर दिसली असेल तर यात माझी काय चूक !! मी आजपर्यंत कधीही माझ्या प्रिया शिवाय कोणत्याच स्त्रीकडे नजर वरही करून पाहिलं नाही !! पण ती काही म्हणो !! आता प्रश्न आहे माझ्या पत्नीचा !! जिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तो त्या नीच देशमुखला धडा शिकवायला हवा !! त्याला धडा शिकवायला हवाच !! माझ्या तावडी सापडला तर सोडणार नाही मी त्याला !! पण मी एक गोष्ट विसरतो आहे !! माया !!" अचानक श्रीधर भानावर आला तो थेट किचन मध्ये गेला. तिथे नंदा आणि प्रिया बोलतं बसल्या होत्या. 

"नंदा !! ही माया कोण आहे ??"
अचानक श्रीधरने प्रश्न केल्याने नंदा गोंधळून गेली. तेवढ्यात मागून श्याम आला. 
"साहेब ! मी सांगतो माया कोण ते !!" 
श्रीधर मागे वळून पाहू लागला. 
"तू !! "
"होय साहेब मी !! कारण मी तेव्हा इथेच बंगल्यात असायचो !!"
"इथेच ?? काय घडलं होत श्याम !! सांग लवकर !! "
"साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी तुमच्या सारखेच एक साहेब होते, मंदार केळकर नाव होत त्यांचं. असेच ते इथे मुंबईवरून बदली होऊन आले होते. त्यावेळी माझा बाप इथे नोकर होता. पहिले काही दिवस केळकर साहेब एकटेच होते. पुन्हा त्यांची बायको आणि एक मुलगा दोघेही इथे राहायला आले. पुढे त्या मुलाशी म्हणजे प्रतीकशी माझी चांगली मैत्री जमली. आम्ही नेहमी एकत्र असायचो. त्याच त्याच्या आई बाबांवर खूप प्रेम होत. पण एक दिवस नजर लागली या कुटुंबाला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं साहेब. त्या रात्री जे घडलं त्यानंतर माझा बाप पुन्हा कधी हसलाच नाही. पण मरताना त्याच मन कोणती गोष्ट खात होत ते सांगून गेला. या बंगला नंबर २२च खर रूप सांगून गेला साहेब. "
"काय घडलं होत त्या रात्री !! सांग श्याम ! काय घडलं होत !!"
"त्या रात्री मंदार केळकर यांची बायको माया आणि त्यांचा मुलगा प्रतीक दोघे एकटेच घरी होते. हा देशमुख साहेब त्या दिवशी सुद्धा असाच लांडग्या सारखा आला होता. मायाने त्याचा खूप विरोध. तेव्हाही माझी आई मध्ये आली आणि तीने मायाला याच्यापासून वाचवलं. मंदार केळकरांना हे कळलं आणि तेही अशेच रागात निघून गेले देशमुखला जाब विचारण्यासाठी. ते निघून गेले ते आजपर्यंत पुन्हा आलेच नाहीत. त्यांचं काय झालं ते कुठे आहेत ?? जिवंत आहेत की नाही कोणाला काही माहीत नाही. "
"कोणीच त्यांचा शोध घेतला नाही ?? मायाने सुद्धा नाही ??"
"शोध घ्यायला ती या जगात तर राहायला हवी ना ? "
"म्हणजे पुन्हा भूत ??"
"साहेब माहितेय मला तुम्ही भुताला नाहीत मानत !! पण आता तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा साहेब !! कारण !! तुम्हाला अडवून मायाने कदाचित तुमचा प्राण वाचवला आहे साहेब !! तुमचं अख्ख कुटूब" उध्वस्त होण्यापासून वाचवल आहे तिने.
"म्हणजे ??"
"म्हणजे साहेब जेव्हा केळकर साहेब रागाने निघून गेले त्यानंतर देशमुख साहेब पुन्हा थोडया वेळाने आला. त्याच्या सोबत तेव्हा जगताप पण होता. यावेळी मात्र मायाला वाचवणार कोणीच नव्हतं. माझी आई थोडया वेळासाठी घरी गेली. तेंव्हा बंगल्यात माया एकटीच आहे हे पाहून. देशमुख पुन्हा घरी आला. यावेळी मात्र मायाने दरवाजा उघडला नाही विरोध केला. पण यावेळी देशमुख सोबत जगताप ही होता. दोघांनी ताकदीने दरवाजा तोडला. आत आले. माया समोरच उभी होती. ती खोलीत गेली. दरवाजा लाऊन घेतला. पण त्यांनी हाही दरवाजा तोडला. दोघे आत गेले. तेव्हा प्रतीक धावत धावत आईकडे गेला. पण जगताप त्याला फरपटत वरच्या खोलीत घेऊन गेला. खोलीचा दरवाजा बंद करून त्याने खोलीला आग लावली. प्रतीक त्या आगीत होरपळून निघत होता. मोठ्यामोठ्याने आई बाबांना आवाज देत होता. माया देशमुखच्या तावडीतून सुटून वर पळाली. पण जगतापने तिला पुन्हा ओढत ओढत खाली खेचून आणलं. कित्येक वेळ प्रतीक ओरडत राहिला. जीवाच्या आकांताने ओरडू लागला. शेवटी त्याचा आवाज बंद झाला. ती खोली पूर्ण पेटून उठली होती. आगीचे तांडव माजले होते. " श्याम मनातलं सगळ सांगत होता. 
"पुढे काय झालं !! काय झालं सांग श्याम !!" श्रीधर त्याला विचारू लागला.
"
"पुढे काय होणार होत साहेब !! त्या नराधमांनी मायावर बलात्कार केला. ती खूप विरोध करत होती साहेब विनवण्या करत होती. 
"देशमुख साहेब तुमच्या मी पाया पडते पण मला जाऊ द्या !! " ती ओरडत होती.
"कसा जाऊ देऊ तुला !! तुझ्या नवऱ्याकडून खरेदी केलय तुला मी !! पैसा फेकला त्याच्या तोंडावर गेला तो निघून " देशमुख मोठ्याने ओरडला. पुन्हा तिच्या शरीराचा उपभोग त्या दोघांनी घेतला. आपली वासना पूर्ण केली. जाताना तिच्या शरीरावर कित्येक वार केले. तिला जखमी केलं. आणि निघून गेले. पण आईची माया वेडीच असते ना साहेब !!  माया लगेच वर प्रतीक जवळ धावत गेली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही साहेब प्रतीक तेव्हा आगीत जळून राख झाला होता. माया त्याच्या जळालेल्या शरीराला कित्येक वेळ बघत बसली. " 
"पुन्हा काय झालं श्याम !! माया कुठे गेली ??" मध्येच प्रिया त्याला विचारते. 
"माया रागारागात उठली !! समोरच्या खोलीत गेली. पंख्याला दोरी बांधून ती कित्येक वेळ उभा राहिली. मरणाच्या आधी मोठमोठ्याने ओरडत होती. सगळे पुरुष शेवटी सारखेच !! त्या माझ्या नवऱ्याने मला विकली!! एवढ्याश्या पैशासाठी विकली !! अरे थू रे !! तुला नवरा म्हणून तरी कशी घेऊ !! त्या लांडग्यांनी लचके तोडले रे माझे !! तुझ्या बायकोची इज्जत लुटली त्यांनी !! पण नाही !! मी सोडणार नाही !! मी तुम्हाला सोडणार नाही !! मी बदला घेणार !! काहीही झालं तरी मी बदला घेणार !! मी कोणाला सोडणार नाही !! " श्याम समोर खोलीकडे हात करत म्हणाला. 
"मग ??" श्रीधर मध्येच बोलला.
"याच खोलीत तीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं !!"
क्षणभर श्याम शांत बसला आणि पुन्हा बोलला,
"आणि हे सगळं घडत असताना माझा बाप इथेच या किचन मध्ये होता. ज्याची कल्पना त्या दोघांना ही नव्हती. आपण एका स्त्रीची इज्जत ,तिचे प्राण वाचवू शकलो नाही, आपण विरोध करू शकलो नाही , या विचारानी माझा बाप मनातून रोज मरत होता. " 

पुन्हा कित्येक वेळ सगळेच शांत बसले. कोणी काहीच बोललं नाही. नंदा आणि श्याम एकमेकांकडे पाहत होते. थोड्या वेळाने नंदा प्रियाला म्हणाली.
"ताईसाहेब तुम्ही नका राहू इथ !! लवकरात लवकर मुंबईला जा !! काही झालंच नाही अस समजून विसरून जा !!"
"विसरून जाऊ ?? कोणीतरी माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी गप्प बसू ?? मग माझ्यात आणि मंदार केळकर मध्ये फरक काय ??" श्रीधर रागात म्हणाला. 
"मग काय करायचं ठरवलंय तूम्ही साहेब ?? " श्याम म्हणाला. 
"माहीत नाही !! पण आता खरच वाटतंय की मायाला न्याय मिळायला हवा. " श्रीधर आपल्या जागेवरून उठून उभा राहिला.
त्याच्या मनात विचाराचं काहूर माजलं. 
 
एवढं सगळं घडूनही. देशमुख साहेब मात्र अजूनही बैचेन होता. आपल्या ऑफिस मध्ये त्या रात्री एकटाच बसून होता. सारखं तो जगतापला विचारत होता. 
"काय रे जगताप ?? आला का तो श्रीधर ??"
"नाही ना अजून !! मीपण केव्हाची वाट पाहतोय !!"
"बायको सोबत एवढं सगळं घडलं आणि हे अजून गप्प कसकाय जगताप ??मर्द आहे ना तो ??"
"आता आहे का नाही ते आपण गेल्यावर त्याच्या बायकोला विचारू!! काय ??"
जगताप असं बोलताच दोघेही मोठमोठ्याने हसू लागले. 
"अरे पण ते नाही आल तर सगळी मेहनत फुकट जाईल ना !!"
"साहेब बाहेरून बघून येऊ का ??"
"हा जा जा !!" देशमुख साहेब मध्येच म्हणाला. 

जगताप गाडी घेऊन बंगल्याकडे निघाला. थोड्या वेळाने बंगला समोर येऊन त्याने गाडी लावली. समोर पाहतो तर बंगला एकदम शांत होता. बंगल्यात पूर्ण अंधार पसरला होता. कुतूहलाने त्याने बंगल्यात प्रवेश केला. दबक्या पावलांनी तो आत जाऊ लागला. तेवढ्यात झोपाळा जोरजोरात हळू लागला. 
"जगताप !! " कोणीतरी मोठ्याने त्याला हाक मारली. 
 आवाजाच्या दिशेने तो चालत चालत पुढे जाऊ लागला. पुन्हा त्याला हॉलमधून हाक मारल्याचा आवाज आला. 
"ये !! कोण आहे रे ?? लई माज आलाय का ?? समोर ये भाडकाव !" जगताप असे म्हणताच झोपाळ्यावर त्याला माया दिसली. 
"ये जगताप !! आज मात्र तुला मी सोडणार नाही !! " 
मायाला पाहून जगताप मोठमोठ्याने हसू लागला.
"कोण मारणार तू ?? अठरा वर्ष झाली !! किती अठरा !! काय बिघडवलस आमचं ??"
माया त्याच्याकडे फक्त रागाने बघू लागली. 
"तू साली रांड आमचं काय वाकडं करणार !! " असे जगताप म्हणताच वरच्या खोलीतून सायली धावतच खाली आली. जणू तिच्या अंगात शंभर हत्तीच बळ आल होत. जगतापला ती फरफटत वरच्या खोलीत घेऊन जाऊ लागली. तीच हे रूप पाहून लपून बसलेले सगळे बाहेर आले. श्रीधर तर आवाक होऊन पाहू लागला. 
"सोडणार नाही मी तुला !मला चटके दिले ना तू ! सोडणार नाही मी तुला आता !! थांब माझे बाबा येऊ दे मग बघ काय करतो ते !! " सायली विचित्र आवाज काढत बोलू लागली. 
"साहेब !! सायलीमध्ये प्रतीकच भूत आहे साहेब !!" श्याम सगळ्यांना मागे करत म्हणाला. 
"काहीही काय बोलतो श्याम !! " प्रिया रडत म्हणाली. 
"होय ताईसाहेब !! ती काय म्हणाली ऐकलं नाही का तुम्ही ??" 
"मला चटके दिले ना तू !! सोडणार नाही मी तुला !!" अस म्हणाली ती !! " नंदा बोलली.
"उगाच आपण या जगतापला आपल्या प्लॅन मध्ये फसवल !! " प्रिया रडत म्हणाली. 
"थांब प्रिया आता रडून नाही तर हुशारीने काम करावं लागेल !! "
"काय करायचं आपण बोल ना !! " प्रिया काळजीने बोलू लागली. 

श्रीधर बंगल्यातून बाहेर पडला. त्याने आपल्या जवळच्या दोन चार मित्रांना फोन लावला. त्यानंतर त्याने विकासला फोन लावला. घडत असलेले सगळे प्रकार त्याने त्याला सांगितले. 
"हे बघ श्रीधर !! माझं मेडिकल फील्ड भूत प्रेत किंवा तत्सम गोष्टींना मान्यताच देत नाही. पण तू म्हणतोय ते जर खर असेल तर माझा एक मित्र आहे. सुहास जाधव. पॅरानॉर्मल इन्वेस्टीगॆटर आहे. हे अश्या भूत प्रेत गोष्टींवर त्याच संशोधन चालू असतं. लकीली सध्या तो पण पुण्यातच आहे ! मी नंबर पाठवतो तुला !! काय म्हणतोय ते बघ मग !!"
"हो चालेल ना ! पाठव ना ! मी करतो फोन त्याला !! हवं तर बंगल्यावर बोलूनच घेतो !!"
"हे सगळं ऐकल्यावर धावत येईल तो !!" विकास हसत म्हणाला. 
"ओके !! चालेल!! "
"आणि काळजी घे श्रीधर !! हे सगळं सांगितल्या पासून काळजी वाटायली तुझी रे !! " 
"काळजी नको करू !! मी करतो सगळं ठीक " श्रीधर फोन ठेवत म्हणाला. 

फोन ठेवताच त्याला बंगल्यातून मोठा आवाज झाला. तो धावतच आत गेला. पाहतो तर जगतापला घेऊन सायली खोलीत गेली होती. जगताप समोर उभा होता. नकळत तो भिंतीवर आदळला गेला. सायलीला रागाने मारायला पुढे येणार तेवढ्यात सायलीने त्याचा हात मुरगळला. जगताप मोठ्याने ओरडू लागला. पाहता पाहता सायलीने हात मोडला. 
"मला चटके देतो तू !! थांब बाबा येऊ दे मग दाखवतो तुला !!" 
अचानक सायली भानावर आली. जगतापला समोर बघून रडू लागली. खोलीच्या खिडकीतून प्रिया ,नंदा ,श्याम पाहत होते. 
"आई !! " सायली प्रियाला पाहून तिच्याकडे धावली. 
जगतापने जोरात धावत जाऊन तिला एका हाताने पकडलं. खेचत तिला दरवाज्याकडे घेऊन जाऊ लागला.
"खबरदार मला कोणी काही केलं तर !! सगळ्यांनी मिळून मला मारायचा प्लॅन केलाय ना ?? आता मी सोडत नाही !! गेली ही पोरगी आता.!! लई माज आलाय ना तुला  !! मालकाला नाही म्हणाली ना !! थांब आता तू !!" जगताप रागात प्रियाकडे पाहत म्हणाला. 

जवळच असलेला हातोडा घेऊन सायलीच्या जवळ जाऊ लागला. त्याला सायली जवळ जाताना पाहून प्रिया जोरजोरात ओरडू लागली. श्रीधर धावत आला. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागला. पण काही केल्या दरवाजा उघडला जात नव्हता. 

"हे घे तुझ्या पोरीला मारलं !! " जगताप हातोडा सायलीच्या डोक्यावर फिरवत म्हणाला. 

अचानक सायलीच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. क्षणात जागेवर उभी राहिली. जगताप हातोडा मारणार तोच तीने तो हातात घट्ट पकडला. जगताप हातोडा सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण एवढ्याश्या पोरीच्या हातून त्याला तो काढणं शक्य होत नव्हतं. दुसऱ्या क्षणाला सायलीने तो हातोडा सपासप जगतापच्या दुसऱ्या हातावर मारला. हातातून रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या . जगताप मोठ्याने ओरडू लागला. 
"ये !! कोण आहेस तू ?? " 
"काका !! मला ओळखलं नाही तुम्ही !! मी तुमचा लाडका प्रतीक ??" विचित्र आवाजात सायली बोलतं होती. 
"प्रतीक ?? म्हणजे म्हणजे त्या रांडेचा पोरगा तू ??"
"कोण कोण ! माझी आई !ती माझ्यापासुन रुसलिये ना ! तिथे खाली बसली हॉलमध्ये !! नाहीतर मग त्या झोपाळ्यावर असेल ती ! !! किती बोलवलं मी पण येतच नाही ती वर!!" 
"ये लांब हो माझ्यापासून ! ये लांब हो !!" जगताप मागे सरकत सरकत बोलू लागला. दोन्ही हात मोडल्याने त्याला काहीच करता येईना. 

इकडे बाहेर श्यामने आणि श्रीधरने शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना दरवाजा काही केल्या उघडता येईना. तेवढ्यात श्रीधरचा फोन वाजतो. विकासने त्याला सुहास जाधवचा नंबर मेसेज केला होता. श्रीधर पटकन फोन लावतो.

"हे हाय श्रीधर !! " सुहास फोन उचलताच म्हणाला. 
"तुम्ही मला ओळखता??"
"आता जस्ट विकासच आणि माझं बोलणं झालं!! मी उद्या सकाळपर्यंत येतोय तिथे !! तोपर्यंत तुम्ही असं काहीही करू नका ज्याने तुमच्या कोणाच्या जीवावर येईल !! प्लिज श्रीधर !! तुमची केस खूप नाजूक आहे !! "
"हो नक्की !! प्लिज तुम्ही सकाळी जेवढ्या लवकरात लवकर येता येईल तेवढं लवकर या !! माझी मुलगी खूप विचित्र वागते आहे !! तिच्या जिवावर बेतू नये म्हणजे झालं!! तिला काही झालं तर मी जगू नाही शकणार !! "
"काही होणार नाही तिला !! डोन्ट वरी !!  "

सुहास सकाळी लवकर पोहचण्यासाठी निघाला. पण बंगल्यातून रात्रभर जगतापच्या ओरडण्याचा आवाज येत होता.

"ये !! कोणीतरी वाचवा की रे मला !! ये !! वाचवा की !!" 

क्रमशः 


Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...