मुख्य सामग्रीवर वगळा

बंगला नंबर २२ || कथा भाग १० || मुक्ती || शेवट भाग || मराठी भूत प्रेत कथा ||




कथा भाग १० || मुक्ती ||

खोलीतल्या वस्तू देशमुखच्या बाजूने भिरकावल्या जाऊ लागल्या. तो कसाबसा त्यातून वाचला. पण त्याने लगेच आपल्या पँटच्या खिशातून एक पुस्तक काढलं. मोठमोठ्याने तो तंत्रमंत्र म्हणू लागला. तशी माया कमजोर होत चालली. 
"नीच माणसा !! पुन्हा मी कैद होणार नाही ! पुन्हा तुझ्या कैदेत मी राहणार नाही !!" एक सावली देशमुखच्या बाजूने येऊ लागली. पण एक वर्तुळाच्या पुढे तिला काही येता येईना. 
"रांडेचे !! तेव्हाही अशीच विरोध करत होतीस !! आणि आजही तेच !! जा तुला आता कायमच मी या खोलीत कैद करून टाकणार !! " 
देशमुख जोरजोरात मंत्रतंत्र म्हणू लागला. बाहेर प्रिया पळतच श्रीधर जवळ गेली. त्याला मीठी मारून कित्येक वेळ रडत राहिली. श्रीधरला मात्र आत काय प्रकार घडतोय हे कळलं. तो धावतच आत आला. देशमुखला जोरात बुक्की मारत त्याने ते पुस्तक त्याच्यापासून हिसकावून घेतल.
"भाडकाव !! माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवतोस !!थांब तुला मी सोडणार नाही !! " असे म्हणत श्रीधर देशमुखला मारत राहिला.
तेवढ्यात मागून कोणीतरी क्षणात त्याच्या डोक्यात काठी हाणली. तो जगताप होता.
"शाब्बास !! दत्तू !! जा त्या प्रियाला घेऊन ये !! तोपर्यंत मी या मायाला इथे कायमचा कैद करून ठेवतो जा !!" देशमुख दरवाजा बंद करत म्हणाला.
जगताप धावत बाहेर गेला. समोर पाहतो तर सायली विचित्र नजरेने त्याला पाहत होती. ती क्षणात जगतापला फरफटत खोलीत घेऊन गेली. 
"साहेब !! मला वाचवा साहेब !! " आणि क्षणात जगतापच्या डोक्यात मार बसतो. तो बेशुद्ध होतो.
देशमुख मात्र मंत्रतंत्र करण्यात गुंग झाला. 
"उठ श्रीधर !!उठ !! आज ही संधी गमावू नकोस !! आज जर मी हरले तर हा नराधम !! तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन !! उठ !! " माया देशमुखच्या वर्तुळात अडकत चालली होती. ती श्रीधरला साद देत होती. 
"आज आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही !! तू संपलीस माया !! एकदा का तुझ काम झालं की मग त्या प्रियाला बघतो मी !! "
देशमुख मोठमोठ्याने हसू लागला. जणू त्याच्या अंगात राक्षसी आत्मा आली होती. मायाचा आवाज ऐकून सारे खोलीच्या दरवाजा जवळ आले.
अचानक त्या खोलीचे सगळे दरवाजे खिडक्या जोरजोरात आदळू लागले. 
"श्रीधर !! " माया मात्र जोरजोरात हाक मारू लागली. रडू लागली.

श्रीधर आवाजाने भानावर आला. समोर उभ्या देशमुखला पाहताच सावरला. उठला आणि त्याच्या हातातले पुस्तक त्याने फाडून टाकले. देशमुख रागावला. श्रीधरच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात श्रीधरने त्याच्या डोक्यात जोरात काठी मारली. शुध्द हरपून देशमुख खाली पडला. क्षणात सगळं शांत झालं. श्रीधर धावत बाहेर गेला. पाहतो तर समोर सगळे उभे होते. 
"श्रीधर !! माझी माया कुठे आहे ??"
मंदार मध्येच म्हणताच रांगत रांगत खोलीत गेला. सगळीकडे मायाला शोधू लागला. 
"माया !! माया !! "
अचानक मायाची सावली समोर आली.  
"माया !! " मंदार जवळ जाण्याचा प्रयत्न करत म्हणाला. 
"जवळ येऊ नकोस !! नकोस येऊ माझ्या जवळ !! "
"पण का ??"
"कारण थोडया पैश्यासाठी आपल्या बायकोला नीच गिधाडाच्या तोंडी देणाऱ्या नवऱ्याची सावली सुद्धा मला नको आहे !!"
"काय बोलतेय माया तू !!मी दिलं तुला त्या देशमुखच्या तावडीत !! आणि पैश्यासाठी??"
"हो !! म्हणून तर इतके वर्ष तुला माझी आठवण आली नाही !! विसरून गेलास मला !!"
"माया !! गेली कित्येक वर्ष मी एका खोलीत बंद होतो !! त्या श्रीधरने मला सोडवलं !!म्हणून तर मी बाहेर पडलो !! इतक्या वर्षात या नीच माणसाने माझे हाल हाल केले!! त्यातून मला तुझी काळजी होती !! तू कुठे असशील !! कशी असशील !! काहीच माहीत नव्हतं मला !! " मंदार देशमुखकडे रागाने बघत बोलला. 
"कुठे असेन !! गेली कित्येक वर्ष मी कैद होते त्या झोपाळ्यात!! आपला प्रतीक आपल्या दोघांच्या प्रेमात !! तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत !! गेली कित्येक वर्ष मी मरते आहे !! पुन्हा पुन्हा मरते आहे !! या देशमुखने मला एकदा मारल !! पण तू जे वागलास त्या कृत्याने मी क्षण न क्षण मरत राहिले. !!
"कोणतं कृत्य !! "
"हेच की तू मला सोडून गेलास !! पैश्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !!"
"मी सोडून गेलो ! ! नाही माया !! त्या रात्री मी तुझ्यावर अतिप्रसंग केला म्हणून त्याचा जाब विचारायला या नीच माणसाच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे याने घात केला. मला खूप मारल. बेशुद्ध पाडलं. आणि त्यानंतर मी कित्येक वर्ष एका छोट्याश्या खोलीत अडकून पडलो. कोणीतरी माणूस यायचा !! जेवायला द्यायचा आणि निघून जायचा !! दिवसातून दोनदा फक्त हेच व्हायचं !! बघ !! माझी अवस्था बघ माया !! मी तुझ्या प्रेमाचा सौदा करेल का ?"
"मग ते सगळं ??"
"खोटं आहे !!" मंदार मायाला सांगू लागला.
"पण त्यानंतर काय घडलं माहितेय तुला ?? या माणसाने माझ्यावर बलात्कार केले!! मला छळ छळ करून मारल !! आपला प्रतीक त्याला तर जिवंत जाळलं. या हराम्याने !!" माया रागात बोलू लागली. 
तेवढ्यात देशमुख भानावर आला. समोरची वस्तू घेत तो मंदारवर धावून गेला. तेवढ्यात जोरात त्याला फेकल गेलं. पुन्हा देशमुख उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण काठी घेऊन मंदार रांगत त्याच्या जवळ आला. त्याच्या पायावर जोरात त्याने काठी मारली.
"ये मंदार !! हे खूप महागात पडेल बर तुला ! "
"काय करशील रे तू !! "
"तुझा मुडदा पाडील !!" 
अस देशमुख म्हणताच पुन्हा मंदारने त्याच्या पायावर जोरात काठी मारली. देशमुख उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला उठताच येईना. 

श्रीधर, सुहास आणि श्याम धावत दुसऱ्या खोलीत गेले. तिथं सायली जगतापच्या समोरच बसली होती. सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला. 
"श्रीधर !! चंद्रग्रहण सुरू झालंय !! आपल्याला लवकरात लवकर इथून सायलीला घेऊन जायला हवं ! नाहीतर सगळं काही जळून नष्ट होईल !! "
"म्हणजे !! म्हणजे तू नीट बघ !! त्याच खोलीत तिथे देशमुख आलाय !! ज्याचा बदला मायाला घ्यायचा आहे !! आणि इथे जगताप !! ज्याचा बदला प्रतिकला घ्यायचा आहे !! पण यात सगळ्यात सायली कुठेतरी हरवून गेली आहे !! जर आज प्रतिकने आपला बदला पूर्ण केला आणि तो सायली सोबत निघून गेला तर आपल्याला सायलीच्या प्राणाला मुकाव लागेल !!"
"नाही रे !! अस होऊन चालणार नाही !! काय करावं आपण सांग तरी !! " 
क्षणभर सुहास विचार करतो आणि बोलतो,
"मंदार !! मंदार केळकर आपल्याला मदत करेल !! "
सुहास धावत पुन्हा मंदारकडे जातो. आणि त्याला सगळं काही सांगतो. मंदार जोरजोरात प्रतीकला हाक देऊ लागतो. 
मंदारच्या आवाजाने सायली चारी बाजूंना पाहू लागते.  धावत धावत ती खोलीच्या बाहेर जाऊन पुन्हा खोलीत येते. तेवढ्यात पुन्हा तिला हाक ऐकू येते. ती आवाजाच्या दिशेने जाते. मंदारला पाहताच त्याला मीठी मारते. हे पाहून सुहास थोडा विचारात पडतो. 
"नाही नाही !! हे अस नको आहे !! " आणि पळत तो बंगल्याच्या खिडकीत जाऊन वर पाहतो.
"मंदार हे नकोय !! प्रतीक आणि सायली एक नको आहेत मला !! " 
"म्हणजे?? "
"म्हणजे प्रतीक सायलीवर पूर्णपणे ताबा मिळवतो आहे !! आणि तीही त्याला विरोध करत नाहीये !! "
प्रिया बाजूला उभी राहून हे ऐकत होती. ती म्हणते,
"मग आता काय करायच सुहास !!" प्रियाचा आवाज ऐकताच क्षणभर सायली तिच्याकडे पाहते. 
"आपल्याकडे फक्त आता अर्धा तास आहे !! लवकरात लवकर आपल्याला सायलीला यातून मुक्त करावं लागेल आणि त्यासाठी एकच करावं लागेल. "
"काय ?? " प्रिया विचारते.
"तुझ प्रेम !! सायलीला मनापासून तुझ्याकडे येण्यासाठी हाक दे प्रिया !! "
"बरं !! देते हाक !!"
"सायली !! ये बाळा !! सायली !! ये इकडे !! चल !! " 
प्रियाचा आवाज ऐकताच सायली जोरजोरात हसू लागली. सगळ्या बंगल्यात धावू लागली.  
"ये बाळा !!ये ना इकडे !! हे बघ मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलेत !!" 
प्रिया कित्येक वेळ सायलीला हाक मारू लागली पण काही केल्या सायली तिच्या जवळ येत नव्हती. 

सुहास पुन्हा विचारात पडला. त्याला काही केल्या कळत नव्हतं की प्रतीक सायलीला का सोडत नव्हता. तेव्हा श्रीधर तिथे समोर येत सायलीला म्हणाला.
"प्रतीक !! जा आई तुझी वाट पाहतेय !!" 
आणि क्षणात सायलीच्या शरीरातून प्रतीक बाहेर पडला. समोर धावत तो आईच्या जवळ जावू लागला. त्या खोलीत मंदारला पाहताच त्याला आनंद झाला. 
"बाबा आले !! बाबा आले !! " त्या खोलीत आवाज घुमू लागला. 
मंदारला काहीच कळत नव्हतं. त्याच्या बाजूने फक्त सावली धावत होती. 

"श्रीधर , प्रिया ,श्याम ,नंदा ,मंदार चला सगळे !! आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही !! " असे म्हणत असतानाच समोरचे दरवाजे जोरजोरात बंद होऊ लागले.
सगळ्या खिडक्या जोरजोरात बंद होऊ लागल्या. सगळे धावत बाहेर जाऊ लागले. 
"पण सुहास माया आणि प्रतीकच्या मुक्तीच काय ??"
"ती मिळणार ना !! "
"कशी ?? त्यांना जिथं पुरलय तिथे त्यांचे उरलेले हाड तरी आपल्याला जाळून टाकावी लागणार ना!!"
"नाही श्रीधर त्याची आपल्याला गरज नाही !! आठव मी काय म्हणालो होतो.!! या ग्रहणाच्या रात्री त्या प्रेतआत्मा तिथेच जातात जिथे त्या शेवटी उरलेल्या असतात !! म्हणजे माया त्या खोलीत आणि प्रतीक वरच्या खोलीत या देशमुखने गाडले ! "
"काय ??"
"होय !! हे खरंय !!"

सगळे बाहेर येत असताना मंदार मागेच थांबला. आणि क्षणात त्याने मुख्य दरवाजा बंद करून घेतला. सगळ्यांनी जोरजोरात तो वाजवला.
"मंदार !मंदार!! " श्रीधर त्याला आवाज देऊ लागला. 
"सगळे तुम्ही या बंगल्याच्या बाहेर जा श्रीधर !! "
"तुला घेतल्या शिवाय नाही जाणार आम्ही !! चल तू !!"
"नाही श्रीधर !! मी तर केव्हाच मेलोय !! कित्येक वर्षांपूर्वी !! आता फक्त हे शरीर उरलं आहे !! "
"नाही मंदार !! नाही !!" 

श्याम ओढत श्रीधरला बंगल्याच्या गेटपासून लांब घेऊन गेला. बंगल्यात मंदार रांगत रांगत किचन मध्ये आला. गॅसचे बटण चालू ठेवून तो पुन्हा खोलीत गेला. 
समोर पाहतो तर देशमुख शुध्दीवर आला होता. अचानक त्याच्या पाठीवर सपासप फटके पडू लागले. तसा देशमुख मोठ्याने ओरडू लागला. जगताप पण असाच ओरडत होता. पुढच्या काही क्षणात बंगला नंबर २२ मध्ये जोरात गॅसचा स्फोट झाला. पाहता पाहता सगळं काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल. देशमुख आणि जगताप जिवाच्या आकांताने ओरडू लागले. ती आग त्यांना होरपळून काढत होती. त्या आगीत शांत मंदार जळत होता. माया मुक्त होण्यासाठी आपल्या मंदारला भेटण्यासाठी आतुर झाली होती. आगीच्या ज्वाळांनी जगताप जळून खाक झाला. तसे प्रतीक हसतहसत कोपऱ्यात जाऊ उभा राहिला. त्या आगीने रौद्ररूप घेताच समोर कपाटाच्या मागे उरलेल्या त्याच्या शरीराने पेट घेतला.

देशमुख आगीच्या धुराने गुदमरून मेला आणि माया मुक्त झाली. समोर पाहते तर मंदार तिची वाट पाहत उभा होता.
"माझ्यासाठी तू जिवंतपणी या आगीच्या लोटात स्वतःला झोकून दिलस ?? मला माफ कर मंदार कित्येक वर्ष मी तुझा फक्त तिरस्कारच करत आले !!"
मंदराने तिला मीठी मारली आणि म्हणाला.
"गेली कित्येक वर्ष तुझ्या भेटीसाठी आतुर झालो होतो. तुला मिठीत घ्यायला. तुझ्याशी बोलायला मी असे कित्येक आगीचे लोट सहन करेन !!" 
"मंदार !!"  मायाने मंदारला मीठी मारली. 
"आई ?" प्रतीक धावत आला. 
"बाळा !!"  मायाने त्याला कडकडून मिठी मारली. 

तिघेही क्षणात सावली होऊन मुक्त झाले. पुढच्या प्रवासाला गेले. 

"बघ ना प्रिया !! एक वासना माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते !!" श्रीधर जळून खाक झालेल्या बंगल्याकडे पाहत म्हणाला.
"होना !! प्रेम आणि वासना यातला फरकच अश्या लोकांना कळत नाही !!"

सगळे कित्येक वेळ त्या बंगल्याच्या दिशेने पाहत बसले. आजूबाजूला आता गर्दी जमू लागली होती.
तेवढ्यात बंगल्यातून श्रीधरला आवाज आला,

"श्रीधर मी तुला सोडणार नाही !! मी सोडणार नाही तुला!! श्रीधर !!"

*समाप्त*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...