एकांत

का छळतो हा एकांत
मनातील वादळास
भितींवरती लटकलेल्या
आठवणीतल्या चित्रात
बोलतही नाही शब्द
खुप काही सांगते
ऐकतही नाही काही
सगळं मात्र बोलते
भिंतीही हसतात
छप्पर ही साथ सोडतेय
एकांतातल्या मला
घर ही नको म्हणतेय
मी जाऊ तरी कुठे
आपलस कोण म्हणतेय
मी बोलवु कोणाला
माझ कोण दिसते
का छळतो हा एकांत
एकटा मी जगतोय
भितींवरती लटकलेल्या
आठवणीतल्या चित्रात
- yogiii

मी एक शुन्य

भावनेच्या विश्वात
आपुलकीच्या जगात
सैरभैर फिरूनी
मी एक शुन्य

प्रेमाची ही गोष्ट
भरगच्च पानात
वाचुनही शेवटी
मी एक शुन्य

यशाच्या शिखरावर
हवे ते मिळवुन
शेवटी एकांती
मी एक शुन्य

कमावले अचाट
संपत्ती अफाट
अखेरचा तो श्वास
मी एक शुन्य

आलो रिकामेच
चाललो रिकामेच
लाकडावरी जळताना
अखेर मी एक शुन्य

- yogiii

ककळत नकळत

कळत नकळत कधी
प्रेम मी केल होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिल होत

चांदण्या मधील एक तु
खुप मी शोधलं होतं
चंद्रामागे शोधायचं
शेवटी मात्र राहिलं होतं

मनात तु असताना
सगळीकडे पाहिलं होतं
पाहूनही न दिसता
पापण्या मध्ये राहिलं होतं

शब्दांत तुला लिहिताना
कवितेत गायलं होतं
सुरात सूर मिसळत
भावनेत राहिलं होतं

आजही तुझंच हे मन
प्रेम फक्त राहिलं होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिलं होतं

- yogiii

"कधी मन हे बावरे
हरवून जाते तुझ्याकडे
मिटुन पापणी ओली ती
चित्रं तुझे रेखाटते
पुन्हा तुझ पहाण्यास
डोळे हे शोधते
शोधुनही न सापडता
शब्दात येऊन भेटते
आणि नकळत तेव्हा कधी
कविता ही बनते.."
- योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...