राग..

तिने रुसुन बसावे
मी किती मनवावे
नाकावरच्या रागाला
किती आता घालवावे

उसण्या रागाचे बघा
किती नखरे पाहावे
जवळ जाताच मी
तिने दुर निघुन जावे

बोलतात ते डोळे
मनास कोणी सांगावे
मी रुसली आहे बरं
तिने मला का सांगावे

तरी सुटेना हा प्रश्न
तिला कसे बोलावे
कुठे असेन ते हास्य
पुन्हा ओठांवर आणावे

हास्य शोधताना मला
तिने उगाच का पहावे
आणि नाकावरच्या रागाने
हळुच मग हसावे

उसण्या रागाचे बघा
किती नखरे पाहावे...
- योगेश खजानदार







मला शोधताना ...

"मला माझ्यात पाहताना
तु स्वतःत एकदा शोधुन बघ
डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये
मला एकदा सहज बघ
मी तिथेच असेन तुझी वाट पहात
मला एकदा भेटुन बघ
मनातल्या भावनांना
ओठांवरती आणुन बघ

मला माझ्यात पहाताना
स्वतः एकदा ह्रदयात तु बघ
लपवते ते काय तुझ्याशी
एकदा तु ऐकुन बघ
छेडली ती तार कोणती
सुर तु जुळवून बघ
भेटेल ते गीत तुला
शब्द माझे तु बनुन बघ

मला माझ्यात पहाताना
स्वतः एकदा आठवणीत बघ
तुझ्या गोष्टीतील मला एकदा
चित्रांन मध्ये रंगवुन बघ
अधुरे असेल चित्र तेही
स्वतःसही तु रंगवुन बघ
आठवणीतील मी भेटेल तुला
डोळे एकदा मिटुन बघ

मला माझ्यात पाहताना
तु स्वतःत एकदा शोधुन बघ... !!"
- योगेश खजानदार

आवाज. .

आवाज आता दबुन गेला
शक्ती आता संपुन गेली
वाईटाच्या मार्गावर अखेर
माणुसकी ही मरुन गेली

कोणी कोणाला बोलायचं नाही
अत्याचाराशी लढायचं नाही
निर्दोष लोकं फुकट मेली
गुन्हेगार इथे सुटुन गेली

पराक्रमाची गोष्ट खरी
पुस्तकात ती लिहुन गेली
थोर पुरुषांचे पुतळे बांधुन
जात इथे वाटुन गेली

पैशाची ही दुनिया खरी
जगास सार्‍या विकुन गेली
विश्वास जणु मोती मनाचा
कवडी मोल लुटून गेली

राहिले शेवटी काय इथे
वाट ती भरकटून गेली
वाईटाच्या मार्गावर अखेर
माणुसकी ही मरुन गेली
- योगेश खजानदार














हवंय मला ते मन. ..

हवंय मला ते मन
प्रत्येक वेळी मला शोधणार
माझ्या गोड शब्दांनी
लगेच माझं होणारं
मी शोधुनही न सापडता
बैचेन होणारं
आणि एकांतात बसून
माझ्यासाठी रडणारं

हवंय मला ते मन
मला समजुन घेणारं
माझ्या मनाशी
खुप काही बोलणारं
आयुष्यभर साथ देत
आनंदाने नाचणारं
आणि सुख दुःखात
माझ्या सोबत असणारं

हवंय मला ते मन
स्वतःस विसरणारं
माझ्या धुंद आठवणीत
स्वतःच रमणार
हळुवार स्पर्शाने
अलगद लाजणार
आणि माझ्या नकळत
खुप प्रेम करणारं

हवंय मला ते मनं
प्रत्येक वेळी मला शोधणार...

प्रेम ....

म्हणतात तरी अस
प्रेम हे खुप छान असत
छोट्या छोट्या गोष्टीत
ते सतत हव असत
कधी आईच्या मायेत
लपलेल ते असत
कधी प्रेयसीच्या रागात
दडलेल ते असत
पिलांवरच्या मायेनं
घरट्यात ते मिळत असतं
गाईच्या दूधाने तेव्हा
वासरास मिळत असतं

असं म्हणतात तरी कसं
प्रेम हे अबोल असतं
न बोलताही सतत ते
कुठेतरी दिसत असतं
कधी प्रेयसीच्या नजरेतुन
खुप काही बोलत असतं
कधी माथ्यावर कुरवाळत
आईशी बोलत असतं
आणि कधी फांदीवर निवांत
दोन क्षण घालवत असतं

असं म्हणतात तरी कसं
प्रेम हे एकदाच होत असतं
प्रत्येक क्षणात जगताना
ते का नवीन वाटत असतं
कधी प्रेयसीच्या मिठीत
सतत का दिसत असतं
कधी आईच्या कुशीत
पुन्हा पुन्हा का जातं असतं
आणि फांदीवरच्या घरट्यात
नकळत ते ओढ घेतं असतं

खरंच.. म्हणतात तरी अस
प्रेम हे खुप छान असतं... !!
- योगेश खजानदार

एक तु..

कसे सांगु तुला
माझ्या मनातील तु
या शब्दा सवे सखे
गीत गातेस तु

मी पाहता तुला
अबोल होतेस तु
मी बोलता तुला
गोड हसतेस तु

त्या सांज वेळी
जवळ असतेस तु
त्या चांदण्या मध्ये
मला भेटतेस तु

एकांतात माझ्या
सोबत असतेस तु
आठवणीच्या गर्दी मध्ये
हरवुन मज जातेस तु

मनात सतत माझ्या
गुणगुणते एक तु
या शब्दांन सवे सखे
गीत गातेस तु
- योगेश खजानदार

मनातील कविता

फुलांच्या पाकळ्या मधील
सुगंध तुच आहेस ना
ही झुळुक वार्‍याची जणु
जाणीव तुझीच आहे ना

तु स्पर्श ह्या मनाचा
भावनेत तुच आहेस ना
प्रेम हे माझे असे की
मन तुझेच आहे ना

हे सांगते मला का
तु भास तर नाही ना
हे बोलते असे का
तु स्वप्न तर नाही ना

सांग या वेड्या मनाला
तु माझ्या ओठांवर आहेस ना
बोल तु त्या नभाला
तु माझ्या मिठीत आहेस ना

चांदणे पाहते का असे
ते तुलाच हसत नाही ना
प्रेम हे तुझ्या मनातील
मला तर सांगत नाही ना
- योगेश खजानदार

तुझी साथ

तुझी साथ हवी होती मला
सोबत चालताना
वार्‍या सारख पळताना
पावसात भिजताना
आणि ऊन्हात सावली पहाताना

तुझी साथ हवी होती मला
दुःखात रडताना
आनंदाने हसताना
हरवलेल्या मला शोधताना
आणि पुन्हा हरवुन जाताना

तुझी साथ हवी होती मला
तुझ्यावर खुप प्रेम करताना
जीवनभर हात मागताना
आयुष्याचे स्वप्न पहाताना
आणि तुला माझी करताना

तुझी साथ हवी होती मला
खुप काही बोलताना
न बोलता ही समजुन घेताना
तुला सुरात गातांना
आणि ते सुर आपलेसे करताना

तुझी साथ हवी होती मला
तुला मी पहाताना
माझी तु होताना
मला ती साथ देताना
आणि ह्रदयास बोलताना

तुझी साथ हवी होती मला !! "
- योगेश खजानदार

सफर

हर रास्ता कुछ कहता है
तु बस सुनता जा
ये मंजिल तो आएगी एक दिन
सफर तो यह करता जा

कभी एकेले चल रहा
कभी भीड में खो न जा
हर बस्तियों पे जश्न होगा
कही तु उनमें बैठ न जा

वो मंजिल अभी दुर है
समय को भुल न जा
ये सफर पुरा करना है
तु बस चलता जा

हर कोई सुन रहा है
तु बस कह ता जा
ये मंजिल तो आएगी एक दिन
सफर तो यह करता जा

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...