क्षण

मी आजही त्या क्षणाना
तुझ्याच आठवणी सांगतो
कधी शोध माझा नी
तुझ्यातच मी हरवतो

नसेल कदाचित वाट दुसरी
मी तुलाच या ह्रुदयात पाहतो
पण तुझ्या नसण्याचे
अस्तित्व लपवत मी राहतो

हो खोटीच ही दुनिया माझी
तुझ्यासवे मी त्यात असतो
जिथे तुझे नी माझे
कित्येक स्वप्न मी पाहतो

सांगु कसे या मनास
कोणते दुःख मी बोलतो
तुझ्या विरहाचे क्षण खोडण्यचे
व्यर्थ प्रयत्न मी करतो

हे असे का मनाचे
धागे मी गुंतवतो
मनाच्या खेळात आज का
स्वतःस मी शोधतो

हो आहे आजही मी तिथेच
त्या वळणावरती थांबतो
त्या वाटेवरती वाट पहात तुझी
क्षणांना तुझ्याच आठवणी सांगतो
✍ योगेश खजानदार

विचार

  "पद्मावती" फिल्मचा विरोध सध्या जोरात चालू आहे. यामध्ये राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरंतर फिल्म आणि त्यांचा विरोध ही काही पहिली वेळ नाही. जे चुकीचं दाखवलं असेन किंवा इतिहासाचं विकृतीकर झाल असेन असं वाटतं त्याचा विरोध व्हायलाच पाहिजे. पण हा विरोध फक्त विशिष्ट समाजपुरता नसावा. जर चुकीच्या गोष्टी अस्तीन तर याचा विरोध सर्व स्तरातून व्हावा असं वाटतं. आज राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून ते विरोध करतात पण याच वेळी इतर समाज जर तो फिल्म हिट करत असतील तर विरोध नक्की का झाला असा सर्व बाजूचा विचार होतो. महाराष्ट्रात "दशक्रिया" फिल्म बद्दल ही विरोध चालू आहे. त्यात ब्राह्मणाच्या भावना दुखावल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. खरंतर य दोन्ही गोष्टी हिंदू धर्मातील आहेत पण फरक खूप आहे कोणाला तरी दुखावलं तरच ते विरोध करतीन असं का? जे चुकीचं असेन त्याचा विरोध नक्की व्हावा पण ते आपल्या जातीवर नाहीत ना मग जाऊद्या किंवा हे आपल्या धर्माबद्दल नाहीना मग काय व्हायचं ते होऊ द्या ही भावना खरंतर समाजाने कमी करायला हवी.
  मध्यतरी  "बाजीराव मस्तानी " ही फिल्म आली. यामध्ये चक्क" राऊ" कादंबरीचा आधार दिला. पण त्याचा आणि या फिल्मचा कुठेच संबंध दिसला नाही. ज्या काशीबाई नी कधीही मस्तानीला पाहिलं नाही त्या दोघी एका गाण्यात नाचत होत्या. हे विकृतिकरन का ? कित्येक अशा इतिहासाचं  bollywood ने विकृतीकरण केलं. मनोरंजन म्ह्णजे काहीही दाखवणे होत नाही. आणि हे आता या bollywood नामक industry ला सांगणं गरजेचं आहे. "PK" नामक फिल्म ही अशीच काही विकृत तयार करण्यात आली. पण विरोध जितका जास्त तितकी film हिट होते हे यांचं समीकरणच असावं बहुतेक. काही मुद्दे मांडण्याची एक पध्दत असते. आणि बहुदा हेच यांना जमत नाही. सहसा त्या film मधल्या एखाद्या बड्या star ची image जपण्याच्या नादात हे सारं होत. आणि हे खरं आहे एखादा बडा star जर फिल्म मध्ये असेन तर त्याची image जपण्यासाठी हे काहीही करतात. मोडून तोडून कथानक वापरतात. "बाजीराव पेशव्यां सारखे महान योद्धा यांच्या film मध्ये ते विचित्र नाचताना दाखवतात. मग प्रश्न पडतो की हे आजचे star फिल्म स्टार इतिहासातल्या महान योद्धा पेक्षा मोठे आहेत?? कधीच नाही . मग हा कोणता विचार??
  बरं हे झाल फिल्म आणि त्यांच्या मांडणी बद्दल पण यांची बाहेरील वक्तव्ह्य ही काय ? काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर नामक एका जुन्या कलाकाराने twitter वरून स्वतःचे POK बद्दल मत कळवले! याची गरजच काय हे कळत नाही. बरं यांना कोणी विचारलं होत का? मग कशाला नसती उठाठेव !! आणि खरंच या bollywood ला वेड लागलंय अस म्हणाव लागेन. वेळोवेळी यांचं पाकिस्तान बद्दलच प्रेम हे का दाखवतात तेच कळतं नाही. अस असेन तर यांनी तिकडेच जाऊन राहावं. मध्यतरी एका राजकीय नेत्यांनी म्हटले ते अगदी बरोबर आहे की यांनी ज्या गोष्टी बद्दल माहीत नसेल तिथे बोलूच नये. आणि ते खरं ही आहे. याचा अर्थ असा नाही की मी कोणत्या राजकीय पक्षांच समर्थन करतोय. पण त्यांचं हे मत पटण्या सारखं आहे.  आणि आजची पिढी या film star ना वाजवी पेक्षा जास्त महत्त्व देते आहे हे बाकी खर.
   आजचे bollywood film इतिहासाचे विकृतीकरण करतेय, माफिया , गुंड लोक यांवर फिल्म काढून यांना star करतेय,  आजचा तरुणाईला मायाभाई आवडतो , सुलतान मिर्झा आवडतो तुम्ही म्हणाल यात यांचा काय दोष, पण महत्त्व यांनीच वाढवलं ना? मग film ही फक्त मनोरंजन म्हणून कशी पहायची ? "Shootout at lokhandwala " पहिल्या नंतर मुलांच्या डोक्यात आजही मायाभाई तसाच आहे. मग हे इतिहास विषयक फिल्म फक्त मनोरंजन म्हणून कसे पाहायचे? बहुदा याच उत्तर bollywood वाले देतील असे वाटत नाही. त्यामुळे bollywood वाल्यांनी नक्कीच विचार करावा की आपलं खरंच काही चुकत तर नाहीना..!! आणि कळलच तर सुधारणा करावी...!!
-योगेश खजानदार
  

आठवत तुला...!!

आठवत तुला?
तू एकदा भेटायचं म्हटली होतीस
मनातल काही सांगायचं म्हटली होतीस
पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस
आणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस

आठवत तुला
त्या वळणावर एकदा मला अचानक भेटली होतीस
नजरेने पाहुन मला खूप काही बोलली होतीस
पुन्हा भेटण्याचं वचन देऊन गेली होतीस
आणि कित्येक आठवणीत मला अडकवून गेली होतीस

कधी आठवेन ना तुला
मी समोर नसताना तू हरवून गेली होतीस
मला भेटण्याच्या ओढीने अश्रूशी खूप बोलली होतीस
त्या वेड्या मनाला समजावून सांगत होतीस
आणि माझ्यात उगाच स्वतःला शोधत राहतं होतीस

आठवतन ना तुला
माझ्या कित्येक जुन्या पानात फक्त तूच होतीस
कधी शांत सांज तर कधी दुपारचं ऊन होतीस
माझ्या मनातले भाव माझे शब्द होतीस
आणि माझ्या मनातील एक सुंदर कविता होतीस

आठवत तुला..??
-योगेश खजानदार

दुर्बीण ( कथा भाग ४) अंतिम भाग.

  संध्याकाळची वेळ झाली. बाबा एकटेच चालत सदाच्या शाळेकडे येत होते. त्यांना सदाला सायकल बद्दल काय सांगावं तेच कळत नव्हतं. विचाराचं नुसतं वादळ उठलं होत. तसेच ते शाळे जवळ आले. सदा लांबूनच चालत येताना त्यांना दिसला. आल्या बरोबर त्याने विचारलं,
"बाबा सायकल कुठे आहे?"
"अरे ती राजू कडे आहे!! खराब झाली ना म्हणून नीट करायला दिली!!"
  पण हे असं किती दिवस सांगत रहायचं. बाबांच्या मनानेच त्यांना विचारलं. पण सदाच्या चेहऱ्यावर आज त्यांना वेगळाच आनंद दिसत होता. तो अगदी खुश होता.
"काय रे सदा, काय झाले एवढे खुश व्हायला?"
"बाबा घरी गेल्यावर तुम्हाला सांगू , आई तुम्हीं दोघेही समोर असताना सांगेन!!"
"पण झाल तरी काय एवढं!!?" बाबा कुतूहलाने विचारत राहिले.
चालत चालत दोघेही घरी आले. सदा आत मध्ये गेला आणि हातपाय धुऊन दफ्तर आवरत बसला. बाबा स्वयंपाक घरात आईला बोलत होते.
"लता आज राजुला सायकल विकली मी!!" पहिले तर घेईचं ना विकत, मग म्हणाला विनायक शेठ ही सायकल मी पुन्हा तुम्हाला देणार जेव्हा पैसे परत देताल तेव्हा घेऊन जा !! बाबा आईला हातातले पैसे दाखवत म्हणाले.
पण तेवढ्यात सदाने आई आणि बाबांना हाक मारली. दोघेही लगबगीने बाहेर आले. आणि सदा बोलत म्हणाला.
"आई बाबा तुम्हाला माहितेय गेली ३ ४ दिवस मी कशाचा अभ्यास करत होतो??" सदा दोघांकडे बघत प्रश्न विचारत होता.
आई बाबा एकमेकांकडे पाहत नाही म्हणत होते.
"आई , त्या ताऱ्यांचा अभ्यास करत होतो ना मी !! त्याच चांदण्यांनी मला त्याचं घर शोधायचीं संधी दिलीये मला !!  आई बाबा मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो !! आणि मला बक्षिस मिळाले !!ती म्हणजे माझी आवडती "दुर्बीण"!!"
बाबाना काय बोलावं तेच कळेना . त्यांच्या डोळ्यात कित्येक आनंदाचे अश्रूं दाटले.
"सदा!!!!" म्हणत बाबांनी त्याला आपल्या मिठीत घेतले.
आईला काय बोलावे तेच कळत न्हवते.
"आता तरी आणताल ना सायकल ??" आई बाबांकडे पाहत म्हणाली.
"सायकल??" सदा बाबांना विचारतं म्हणाला.
"तुला दुर्बीण हवी म्हणून तुझ्या बाबांनी सायकल विकली!! पण तू तुज स्वप्न स्वतःच पूर्ण केला सदा!" आई सदाला जवळ घेत म्हणाली.
"बाबा मी म्हणालो होतो की दुर्बीण हवी आहे पण मला ती मिळवायची होती. या आकाशाला जिंकायचं होत बाबा मला.!!" चला बाबा आधी आपण तुमची सायकल आणु!!
सदा आणि बाबा चालत राजू कडे आले आपली सायकल घेऊन जाताना त्या दुर्बिणी साठी घेतलेले पैसे परत देऊन गेले.
जाताना एकच सुख होत दोघांमध्ये , सदा ने आकाशाला गवसणी घालण्याचा आणीं त्याला त्या आकाशा एवढं स्वप्न दाखवण्याचं समाधान मिळालं याच त्याच्या बाबांचं.
दोघेही घरी आले. रात्रीच्या समयी दुर्बिणीतून त्या चांदण्या पाहू लागले. चांदण्या पाहताना सदा एकदम म्हणाला.
"बाबा कविता म्हणा ना ..!! "
"कोणती रे सदा!!"
"स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये !! " सदा बाबांकडे पाहत म्हणाला. बाबाही आकाशाकडे पाहत कविता म्हणू लागले ...
" स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घेतले..!!

ब्रह्मांडा सम ध्येय माझे
स्वतःस मग मी शोधून पाहिले
अनंत स्वप्नात कुठे दिसता
माझेच मी मला न दिसले

का असे होते मला आज
ध्येय कोणते मनास लागले
दूरवरच्या त्या घरात का
उगीच मग मी स्वतःस पाहिले..!! "

"बाबा हि पृथ्वी आपल घर ना??" सदा मिश्कीलपणे म्हणाला
"हो रे !!" बाबाही त्याच्याकडे पाहत म्हणाले.
"मग हे घर कोणाचं??"

असे म्हणताच सदा आणि बाबा एकमेकांकडे पाहून मनसोक्त हसले...

समाप्त....

✍योगेश खजानदार

कोऱ्या कागदावर..!!

तासनतास कोऱ्या कागदावर
तुझ्याचसाठी मी लिहावे
कधी नकळत ते शब्दही तेव्हा
तुझ्याच प्रेमात पडावे

मी विसरून शोधतो तुला
स्वप्नांच्या या जगात रहावे
आणि सुराच्या सवे मी तेव्हा
गीत तुझेच गावे

कसे हे वेड लागले मझला
स्वतःस मग विसरून जावें
तुलाच पाहण्या या वेड्या नजरेने
पापण्यास विसरून जावे

कधी अकारण बोलण्याचे बहाणे
तुलाही कळून मग यावे
कधी कारण भेटण्याचे तुला नी
मनातले जणु ओठांवर न यावे

सखे असे का मन हे बावरे
तुलाच न कळावे
प्रेम हे माझे किती तुझ्यावर
तुलाच का न सांगवे?

ओठांवरील शब्दही तेव्हा
ओठांवरच का राहावे?
कधी नकळत तेही तेव्हा
तुझ्याच प्रेमात पडावे

आणि तासनतास कोऱ्या कागदावर
तुझ्याचसाठी मी लिहावे!!!
✍ योगेश खजानदार

दुर्बीण (कथा भाग ३)

" अरे होरे सदा !! त्या तिथे सायकलच वाटते!!"
सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या आईला बोलू लागले.
"लता सदाच्या दुर्बिणीच प्रश्न सुटला! मी ही माझी सायकल विकून त्याला दुर्बीण घेऊन देणार आता!!
"आहो पण ती सायकल तुम्हाला तुमच्या शाळेत असताना बक्षीस म्हणून मिळाली आहे!!" सदाची आई एकदम म्हणाली.
"मुलाच्या स्वप्नासमोर मला हे बक्षीस काही नाही लता !! आणि या बक्षिसांने दिली की साथ तब्बल २५ वर्ष !! आता या सायकलने ते चंद्र नी तारे सदासाठी जवळ येतील!!" बाबा सायकलकडे पाहत म्हणाले.
"पुन्हा एकदा विचार करा!! तुम्हाला ही सायकल किती प्रिय आहे माहितेय मला !! ""
"आता फक्त दुर्बीण आपल्या सदासाठी!!"
सायकल !! सदाच्या स्वप्नांचा रस्ता सोपा करण्यासाठी विकायची, पण हे करावं लागणारच ना !! नाहीतर मग सदाला ते चंद्र जवळून कसे पाहता येतीन. सायकल !! कामावर जाताना रोज पुसायचो मी तिला !! खूप साथ दिली मला तिने!! लता आणि मी पहिले याचं सायकल वर गेलो होतोत फिरायला!!  कशी डौलाने दिसतेय पाहा ती माझी सोबतीन सायकल...!! बाबांच्या मनात विचारांचा काहूर होता. रात्रभर नुसता विचार मनाला भंडावून सोडत होता. अशाच विचारात सकाळचं उन सरवत्र पसरलं. घरात लगबग सुरू झाली.
"लता आज जाऊन येतो त्या राजू सायकलवाल्याकडे पाहतो किती म्हणतोय ते!! पण काय ग लता हा सदा काय अभ्यास करतोय मोठमोठ्याने !! आज जागही त्याच्या आवाजानेच आली!! "
"काही कळत नाही आहो!! फक्त चंद्र नी तारे एवढंच काय ते कळलं मला !! " सदाची आई मिश्किल हसत म्हणाली.
बाबा सदाला हाक मारत म्हणाले.
"सदा आज शाळेत नाही कारे जायचं??"
सदा शेजारच्या खोलीतून बाहेर येत म्हणाला,
"जायचय तर आज तर विशेष जायचं आहे!!"
"बरं बरं आटोप पटकन आता निघायचं आहे !! मला उशीर होतोय !!" बाबा घड्याळाकडे पाहत म्हणाले.
दोघेही आवरून निघाले. आज बाबांची सायकल नेहमी पेक्षा जरा हळूच चालली होती. कदाचित पुन्हा कधीच न परतून येण्यासाठी ती चालली होती. बाबा आज सदाला काही बोलतही न्हवंते. कित्येक वर्षांची सोबतीन आज सोडून जातानाही कायम सोबत रहायचं वचन देऊन जात तर नसेन ना , बाबांच्या डोळ्यात एक टिपूस आला होता. पण तो सदाला दिसायच्या आत बाबांनी पुसला.
"बाबा आज जातानाही आपण दोघे बरोबर जायचं?" तुम्ही येतान ना मला न्ह्यायला ??" सदा बाबांना विचारत होता.
"बाबा!!! बाबा !! काय झाल ???"
"काही नाहीरे सदा ?? " येईन मी !! "
सदा सायकल वरून उतरत होता . बाबा कडे कित्येक वेळ पाहत होता. बाबा आता राजू सायकल वाल्याकडे आले.
"राजु , अरे कसा आहेस ??"
"काय विनायक शेठ, कसं काय येणं केलं आमच्याकडे आज ?? सायकल काय त्रास देते की काय " अस म्हणून राजु दात सर्व दिसतील इतका मोठा हसला.
"विकायची आहे सायकल !!" बाबा जड शब्दाने बोलले.
"विनायक शेठ आहो , काय म्हणताय हे ?? पण का ??"
"पैशाचही गरज आहे थोडी!!" बाबा एकदम म्हणाले.
"विनायक शेठ या सायकलला तुम्ही किती जपता !! अशी एकदम विकून टाकायची म्हणजे ??"
"पर्याय नाहीरे दुसरा!!"
"हे बघा विनायक शेठ, हा व्यवहार आहे म्हणून, तुम्हाला मी पैसे देईल पण ही सायकल मी कोणाला विकू नाही शकणार!! तुमचं मन मी जाणतो!! तुम्ही पुन्हा मला माझे पैसे द्या आणि ही सायकल घेऊन जा !!! "
  बाबा सायकल राजूकडे ठेवून पायीच कामावर गेले. मुलाच्या स्वप्नासाठी आपल मन तिथे ठेवून गेले.
आज दिवस तसा त्यांना जाता जात न्हवता. आज संध्याकाळी सदाला घेऊन जाताना सायकल नाही दिसली तर त्याला काय सांगावं हा प्रश्न त्यांना पडला. पण खिशातील पैश्याकडे पाहून त्यांना त्याच्या दुर्बिणी शिवाय दुसरे काही दिसलेच नाही ...

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

दुर्बीण (कथा भाग २)

   कामावर जाताना बाबांच्या डोक्यात सदाला दुर्बीण कशी घेऊन द्यावी हाच विचार होता.  आपली परिस्थिती जेमतेमच पण मुलाची स्वप्न मात्र खूप श्रीमंत असे त्यांना वाटत होते.
  दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात.
"काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?"  बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे.
"नाही शेठ विशेष काही नाही!!"
"आल्यापासून पाहतोय कुठेतरी गुंग आहेस?"
"सदाशिवने काल दुर्बीण हवी आहे अशी मागणी केली, पण शेठ दुर्बीण घ्यायची म्हणजे ती महाग असणारच , त्याला त्यातून आकाशातले तारे पहायचे जवळून!!"
"पोराचं बोलणं एवढं काय मनावर घ्यायचं, आज दुर्बीण म्हणेन उद्या अजुन काही ,सगळेच असे पुरे करणार आहेस का लाड ?"
" नाही शेठ त्याला मला दुर्बीण घेऊन द्यायचीये!! हे एवढस स्वप्न मला पुर करायचं आहे!!"
"नक्की करशील रे विनायका !! पण कामाचा तान नको जास्त घेऊस !! "
"नाही !!"
    बाबा संध्याकाळी घरी आले दिवसभर विचार करून त्यांना काय करावे तेच कळेना.
"आई , बाबा आले आहेत !!" सदा घरात येणाऱ्या बाबांकडे बघत म्हणाला.
"काय रे सदा , आज अभ्यास नाही वाटत?"
" अंगणात बसतोय आता अभ्यासाला बाबा!!" सदा बाबांकडे पाहत म्हणाला आणि अंगणात निघून गेला.
"आज त्या कुळकर्ण्या सावकाराला ५००₹ मागून बघितले! तर म्हणे आदीचेच दिले नाहीत अजुन आणि आजून कर्ज कस देणार !!" बाबा आईकडे पाहत म्हणाले.
" आता पुन्हा कर्ज कशाला काढायचं?"
"लता सगळी चौकशी केली, त्या दुर्बिणीच्या बद्दल सगळी माहिती काढली मी म्हणून त्याला पैसे मागितले!!" बाबा उत्साहात बोलत होते.
" त्या दुर्बिणीच खुळ तुमच्या डोक्यातून गेलच नाही का आजुन?" आई एकदम रागात म्हणाली.
"खुळ काय म्हणतेयस लता , आपल्या मुलाचं स्वप्न म्हण हवं तर!"
"आहो पण आपल्याला जमणार का ते ??"
"प्रयत्न तर करूयात!!" बाबा अंगणातल्या सदा कडे पाहत म्हणाले.
बाहेर सदा आकाशातील चांदण्या मोजण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. एखादा निखळणारा तर पाहून त्याकडे कुतूहलाने पाहत होता. बहुदा आपल्या स्वप्नांना जवळ करण्याचा प्रयत्न करत होता.
  बाबांना काही केल्या दुर्बिणी शिवाय काही दिसत नव्हत. सावकार कर्जही देत नाही म्हटल्यावर बाबांना दुसरा मार्गही सुचत नव्हता. खूप विचार झाल्यावर शेठना पैसे मागून पहायचं अस त्यानं ठरवल. अशाच विचारत आकाशात सूर्यकिरणांचा प्रकाश पडू लागला. रोजच्या प्रमाणे सगळ आवरून बाबा कामावर गेले.
शेठला पैश्याची मागणी कशी करावी हेच त्यांना कळेना. शेवटी त्यांनी विचारलेच.
"शेठजी , थोड विचारायचं होत तुम्हाला!!"
"अरे विनायका , बोल काय काम आहे ??" शेठजी कुतूहलाने विचारू लागले.
"शेठ मला ५००₹ मिळतील का ?" बाबा शेजारी ठेवलेल पुस्तकं पाहत म्हणाले.
"विनायका, कशाला रे हवे एवढे पैसे ??"
"सदाला दुर्बीण घ्यायची आहे!!"
"विनायका, असते तर नक्की दिले असते रे पैसे , पण सध्या तुझा शेठ थोडा अडचणीत आहे !!"
"ठीक आहे शेठ!!" बाबा बोलत बोलत सर्व काम करत होते. शेठ कढून ही पैसे नाहीत म्हटल्यावर त्यांना आता पैसे मागावें तेच कळेना.
  स्वप्न पाहताना कदाचित मी कमी पडलो असेन पण माझ्या मुलाला प्रत्येक स्वप्न मिळावं असं बाबांना वाटत . दिवस सरला आणि बाबा आणीं सदा जेवण आटोपून निवांत आंगणात पडून चांदण्या पाहत होते .
"बाबा , ते पहा त्या चांदण्या एकत्र केल्या की एक चित्र तयार होते !!"सदा उत्साहाने म्हणत होता.
"कोणत रे सदा ??"
" आपल्या सायकलच!!"

क्रमशः

-योगेश खजानदार

सत्य

हसून घे वेड्या
आज तुझा जयजयकार आहे
तुझ्या नीच मनाचे कवाड
आज पूर्ण उघडे आहे

मी बंदिस्त आणि शांत जरी
माझ्या मनाची शांती अटळ आहे
या बंधांचे आज जणु
खूप तुझ्यावर उपकार आहे
हसून घे वेड्या
आज तुझा जयजयकार आहे

खोट्या महालात तुझ्या
तूच स्वतःस फसवतो आहेस
तुझ्या कित्येक पापांचे मी आत
हिशोब करतो आहे
कधी कित्येक नात्यांचे बंध तोडले
कोणा आपल्यास तू दूर केलं आहेस
तुझ्या कृत्याचे विचार इथे
आज होत आहेत
हसून घे वेड्या
आज तुझा जयजयकार आहे

तू अहंकारी जरी
मी नम्र भाव आहे
तुझ्या कित्येक क्रुरतेची इथे जाणं आहे
मी हरलो जरी तूही हरला आहेस
तुझ्या नीच मनाचे
सर्व भाव कळले आहेत
हे बंध हळू हळू आता सैल होत आहेत
हसून घे वेड्या
आज तुझा जयजयकार आहे

बंध तुटतील जेव्हा हे
तुझे राज्य मी उधळणार आहे
मनाची ही ढाल आता
अशांत होत आहे
न डगमगत हे आता पाऊल उचलत आहे
तुझ्या नीच मनास संपवण्या
मी सज्ज होतआहे
हसून घे वेड्या
मी सत्य येत आहे ...!!
-योगेश खजानदार



बार्शी at 0 किलोमीटर

  बार्शी ...!! खरंतर या नावातच आपुलकी आहे.  तुम्ही इथे आलात की इथल्या लोकांशी आपसूकच एक नात होऊन जात. इथे प्रेम आहे, आपलेपणा आहे.इथल्या मातीचा रंगच जरा वेगळा आहे. कोणी याला आमची बार्शी म्हणत तर कोणी आपली बार्शी म्हणत. आपली आणि आमची, पण बार्शी आहे आपल्या सर्वांची हे बाकी खर !! मराठवाड्याच प्रवेशद्वार बार्शीला म्हटलं जातं. भगवंताची बार्शी म्हणूनही याला ओळखल जात. किती आणि काय सांगावं असही या बार्शी बद्दल वाटतं. इथल्या भाषेची गोडी खरंच खूप छान आहे , मराठवाड्याच प्रवेशद्वार असले तरी मराठवाडी बोली इथे सापडतच नाही, सोलापुरी  ही कुठे दिसत नाही पण भाषा मात्र अस्सल बार्शीची ओळख करू देते हे बाकी खर. म्हणजे जरा आक्रमक वाटेल पण मनातला गोडवा बार्शी शिवाय कुठे सापडत नाही. भगवंताच्या बार्शीची हीच खरी ओळख आहे. अगदी तुम्ही कुठेही गेलात तरी बार्शीची भाषा लोक ओळखल्या शिवाय राहत नाहीत.
  याला भगवंताची बार्शी असही म्हटल जात कारण बार्शी मधे श्रीविष्णूचे एकमेव मंदिर आहे. याची बांधणी इ.स. पुर्व १२४५ च्या दरम्यान झाली असे म्हणतात. मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. मोठ्या एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्या नंतर भाविक द्वादशीला बार्शीत भगवंताच्या दर्शनाला येतात आणि मगच उपवास सोडतात. भगवंतांची मूर्तीही आकर्षक आहे . आषाढी एकादशीला संपूर्ण शहरातून भगवंताची रथातून मिरवणूक काढली जाते. तो एक उत्सवच बार्शीत पाहायला मिळतो. तसेच भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची  बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही बार्शीची खरी ओळख.
  बार्शीची जयशंकर मिल ही सूतगिरणी आजही चालू आहे हेही वैशिष्ट बार्शी बद्दल सांगता येईन. शैक्षणिक दृष्ट्या बार्शी सर्वच बाजूने प्रगत आहे इथे शिवाजी कॉलेज , बार्शी कॉलेज, सुलाखे हायस्कूल हे नामांकित शिक्षण संस्था आहेत. बार्शीच्या शिक्षण परंपरेत मोलाचा वाटा कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा, आजही त्याच्या शिक्षण संस्था मधे कित्येक विद्यार्थी घडतात. दर वर्षी मामांच्या जयंती निम्मित भव्य मिरवणूक काढली जाते त्यात कित्येक सस्थेतील विद्यार्थ्याचा सहभाग असतो.
  अशी ही बार्शी खरंच खूप सुंदर आहे. व्यापार व्यवसायासाठी बार्शी ओळखली जाते. अशा कित्येक रंगांनी बार्शी रंगलेली.  तरुण पिढी इथली आजही कित्येक सामाजिक , राजकीय कार्यात सहभागी झालेली पाहायला मिळते. शिवजयंती म्हणजे बार्शीच्या तरुणाचा उत्सवच असतो. अशा कित्येक गोष्टी इथे सांगाव्या तेवढे कमीच .. कलाकार,  तसेच रसिक यांचा मेळ म्हणजे बार्शी. कित्येक कलाकार ,साहित्यिक, कवी , लेखक  बार्शीत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सामाजिक कार्यात सहभाग असतानाच स्वतच्या कला जपणं त्यांना उत्तम जमत. शॉर्टफिल्मच्या माध्यमातून , स्वतच्या लेखनाच्या माध्यमातून इथला तरुण सर्वांशी जोडला आणि  बार्शीचे नाव सर्वदूर केले याचा अभिमान नक्कीच बार्शीतल्या लोकांना आहे  हे मात्र नक्की.
असो असे कित्येक पानं उलटली तरी बार्शी बद्दल लिहाव आसच वाटत. जुन्या काही वर्षांपूर्वीची बार्शी आणि आताची बार्शी यात खूप फरक आहे हेही मात्र खर , रेल्वे narrow गेज वरून broad गेज झाली. आणि जुन्या रेल्वेच्या आठवणी देऊन गेली. नवीन रस्ते झाले पण जुन्या रस्ताची मज्जा आजही ताजी ठेवून गेली. कित्येक परिसर बदलून गेले , जुन्या रस्तांचे दिवे आता आठवणीत राहून गेले पण या बार्शीत आजही सर्व तसेच आहे . बदल झाले पण बार्शीच्या मनात ते जुने आठवणीतले सर्व तसेच ठेवून गेले. अशी ही बार्शी आजही गुलाबी थंडीत आहे !!! तशीच राहून आहे .. !!

-योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...