मुख्य सामग्रीवर वगळा

बार्शी at 0 किलोमीटर

  बार्शी ...!! खरंतर या नावातच आपुलकी आहे.  तुम्ही इथे आलात की इथल्या लोकांशी आपसूकच एक नात होऊन जात. इथे प्रेम आहे, आपलेपणा आहे.इथल्या मातीचा रंगच जरा वेगळा आहे. कोणी याला आमची बार्शी म्हणत तर कोणी आपली बार्शी म्हणत. आपली आणि आमची, पण बार्शी आहे आपल्या सर्वांची हे बाकी खर !! मराठवाड्याच प्रवेशद्वार बार्शीला म्हटलं जातं. भगवंताची बार्शी म्हणूनही याला ओळखल जात. किती आणि काय सांगावं असही या बार्शी बद्दल वाटतं. इथल्या भाषेची गोडी खरंच खूप छान आहे , मराठवाड्याच प्रवेशद्वार असले तरी मराठवाडी बोली इथे सापडतच नाही, सोलापुरी  ही कुठे दिसत नाही पण भाषा मात्र अस्सल बार्शीची ओळख करू देते हे बाकी खर. म्हणजे जरा आक्रमक वाटेल पण मनातला गोडवा बार्शी शिवाय कुठे सापडत नाही. भगवंताच्या बार्शीची हीच खरी ओळख आहे. अगदी तुम्ही कुठेही गेलात तरी बार्शीची भाषा लोक ओळखल्या शिवाय राहत नाहीत.
  याला भगवंताची बार्शी असही म्हटल जात कारण बार्शी मधे श्रीविष्णूचे एकमेव मंदिर आहे. याची बांधणी इ.स. पुर्व १२४५ च्या दरम्यान झाली असे म्हणतात. मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. मोठ्या एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्या नंतर भाविक द्वादशीला बार्शीत भगवंताच्या दर्शनाला येतात आणि मगच उपवास सोडतात. भगवंतांची मूर्तीही आकर्षक आहे . आषाढी एकादशीला संपूर्ण शहरातून भगवंताची रथातून मिरवणूक काढली जाते. तो एक उत्सवच बार्शीत पाहायला मिळतो. तसेच भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची  बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही बार्शीची खरी ओळख.
  बार्शीची जयशंकर मिल ही सूतगिरणी आजही चालू आहे हेही वैशिष्ट बार्शी बद्दल सांगता येईन. शैक्षणिक दृष्ट्या बार्शी सर्वच बाजूने प्रगत आहे इथे शिवाजी कॉलेज , बार्शी कॉलेज, सुलाखे हायस्कूल हे नामांकित शिक्षण संस्था आहेत. बार्शीच्या शिक्षण परंपरेत मोलाचा वाटा कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा, आजही त्याच्या शिक्षण संस्था मधे कित्येक विद्यार्थी घडतात. दर वर्षी मामांच्या जयंती निम्मित भव्य मिरवणूक काढली जाते त्यात कित्येक सस्थेतील विद्यार्थ्याचा सहभाग असतो.
  अशी ही बार्शी खरंच खूप सुंदर आहे. व्यापार व्यवसायासाठी बार्शी ओळखली जाते. अशा कित्येक रंगांनी बार्शी रंगलेली.  तरुण पिढी इथली आजही कित्येक सामाजिक , राजकीय कार्यात सहभागी झालेली पाहायला मिळते. शिवजयंती म्हणजे बार्शीच्या तरुणाचा उत्सवच असतो. अशा कित्येक गोष्टी इथे सांगाव्या तेवढे कमीच .. कलाकार,  तसेच रसिक यांचा मेळ म्हणजे बार्शी. कित्येक कलाकार ,साहित्यिक, कवी , लेखक  बार्शीत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सामाजिक कार्यात सहभाग असतानाच स्वतच्या कला जपणं त्यांना उत्तम जमत. शॉर्टफिल्मच्या माध्यमातून , स्वतच्या लेखनाच्या माध्यमातून इथला तरुण सर्वांशी जोडला आणि  बार्शीचे नाव सर्वदूर केले याचा अभिमान नक्कीच बार्शीतल्या लोकांना आहे  हे मात्र नक्की.
असो असे कित्येक पानं उलटली तरी बार्शी बद्दल लिहाव आसच वाटत. जुन्या काही वर्षांपूर्वीची बार्शी आणि आताची बार्शी यात खूप फरक आहे हेही मात्र खर , रेल्वे narrow गेज वरून broad गेज झाली. आणि जुन्या रेल्वेच्या आठवणी देऊन गेली. नवीन रस्ते झाले पण जुन्या रस्ताची मज्जा आजही ताजी ठेवून गेली. कित्येक परिसर बदलून गेले , जुन्या रस्तांचे दिवे आता आठवणीत राहून गेले पण या बार्शीत आजही सर्व तसेच आहे . बदल झाले पण बार्शीच्या मनात ते जुने आठवणीतले सर्व तसेच ठेवून गेले. अशी ही बार्शी आजही गुलाबी थंडीत आहे !!! तशीच राहून आहे .. !!

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...