सुख

चुकलेले मत
हताश बळ
लाचार जीवन
पुन्हा ती वाट नाही

शब्दाची कटुता
तिरस्कार असता
मनातील भावना
प्रेम दिसत नाही

नजरेने बघत
आपलेच लोक
वाईट चिंतन
प्रगती होत नाही

माझेच सर्व
माझेच मीपण
गर्व हा कसला
मीपण सुटत नाही

सांगने हेच एवढे
हे सर्व असता
जीवन हे चालता
सुख मिळत नाही
- योगेश खजानदार

जीवन प्रवास

जीवन एक प्रवास
जणु फुल गुलाबाचे
काट्यात उमलुन
टवटवीत राहायचे

हळुवार उमलुन
क्षणीक जगायचे
तोच आनंद खरा
मनी मानायचे

काट्यावर उभारुन
दुःख विसरायचे
दुसर्‍याच्या सुखासाठी
स्वतः तुटायचे

तुटुनही सर्वत्र
सुगंध पसरवायचे
जाता जाता एकदा
मनसोक्त जगायचे
- योगेश खजानदार

अबोल प्रेम

वहीचं मागच पान
तुझ्या नावानेच भरलं
कधी ह्रदय कधी क्षण
कुठे कुठे कोरलं

मन मात्र हरवुन
सांगायलाच विसरलं
डोळ्यातलं ते प्रेम
तुलाच नाही कळलं

कधी साद ह्दयाची
सांग हे सगळं
ओठांवरचे शब्द जे
मनातच विरलं

हे अबोल प्रेम अखेर
वहीतच राहिलं
नावाने भरलं तुझ्या
पण अधुरचं राहिलं
- योगेश खजानदार

दुर्गा

जब जहा दुनिया बेबस
ताकद बनकर तु खडी
दुर्गा तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी

माता तु जननी है तु
प्यार की मुरत खडी
प्रेम का सागर है तु
दुनिया में ना दुजा कोई

दुनिया अधुरी जहाँ
संपुर्ण बनके तु वही
प्यार तु जहाँ भी तु
दुनिया की ताकद तुही

दुर्गा है तु
तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी
- योगेश खजानदार

नात

कधी मनात एकदा
डोकावून पहावे
नात्या मधले धागे
जुळवून बघावे
असतील रुसवे फुगवे
बोलुन तरी पहावे
घुसमटून गेलंय मन
मोकळे करु बघावे
वाईट आठवणींना
पुसुन एकदा पहावे
तानल्याने तुटते नाते
सैल सोडून बघावे
नको तो गैरसमज
एकदा समजून बघावे
वाईट नसतं कोणी
आपलंस करुन पहावे
नात्या मधले धागे
जुळवून बघावे
कधी मनात एकदा
डोकावून पहावे

- योगेश खजानदार

आठवणी

खरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात
वाळुवरच्या रेषां सारख्या
सहज पुसता येतात

विसरुन जाव म्हटलं
तरी लाटां सारख्या येतात
दुर्लक्ष करावे म्हटलं
तरी मन ओले करतात

सतत सोबत यांची
गर्दीत ही असतात
एकांतात साथ असते
खुप सुंदर वाटतात

कधी हळुच लहर येते
मन सुखावून जातात
कधी तडाखा लाटेचा
अश्रू देवुन जातात

मनाच्या या समुद्रात
आठवणीच असतात
भरती आणि ओहोटी
सतत चालू असतात

कधी वारे सुखाचे
मनसोक्त आनंद लुटतात
दुःखाच्या या वादळात
कित्येक जहाज बुडतात
- योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...