आई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||



भाग ४ 

शीतल आणि बाळाची वाट पाहत समीर बाहेरच फेऱ्या मारू लागला. त्याला कधी एकदा बाळाला पाहतो आहे असे झाले होते. आणि क्षणात त्याची ओढ संपली शीतल आणि बाळ दोघेही येताना त्याला दिसले. त्यांना पाहून तो धावत त्याच्या जवळ गेला. त्याच्या सोबत तो पुन्हा खोलीत आला. हलकेच बाळाला हातात घेत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलू लागले.  बाळ आईकडे देत तो शीतलच्या जवळ आला. शीतल फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आणि मागून आई समीरला बोलू लागली.
"समीर जन्माला आला होता त्यावेळी असाच दिसत होता..!! तेच ते डोळे , ते नाक !! " 
तेवढ्यात मागून बाबा लगेच म्हणाले.
"नाक मात्र आईवर गेलंय !! " 
शीतल हळुच हसली ती काहीच बोलत नव्हतं पण मनातून खूप काही बोलत होती.

"मला कधीच आई व्हायचं नव्हतं पण तरीही मी आई झाले. नकळत म्हणा किंवा संसाराच्या गाडीत बसल्यावर पुढे येणारा हा थांबा म्हणा !! पण नकळत मी तिथे आलेच !! या नऊ महिन्यात माझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळाबद्दल मला अचानक ओढ का निर्माण झाली माझं मलाच कळलं नाही !! पण मला आता यात जास्त अडकूनही चालणार नाही !! मी माझं कर्तव्य पूर्ण केलं !!एक स्त्री म्हणून ,एक बायको म्हणून , एक सून म्हणून !! पण आता मला माझ्या मार्गावर पुढे जावच लागणार आहे !! मला थांबून नाही चालणार !! " 

तेवढ्यात तिला आईने हाक मारली, शीतल भानावर येत आईकडे पाहू लागली. तिला आई बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. ती पुन्हा बाळाला आपल्या जवळ घेत आईला बोलू लागली.

"आई इथून कधी घरी जायचं ??" 
"डॉक्टर पाठक निघा म्हणाले की निघायचं !!" आई मिश्किल हसत म्हणाली.
बाबा तेवढ्यात म्हणाले.
"शीतल काळजी घे आता स्वतःची आणि बाळाचीपण !!"

शीतल फक्त होकारार्थी मान हलवून बाबांकडे पाहत राहिली. तिला बाबांच्या बोलण्यातला रोख कळल्यावाचून राहिला नाही. बाळाचीपण काळजी घे !!यामध्ये त्यांना नक्की शीतलला काय म्हणायचे आहे हे समजताच तिच्या मनातील कित्येक संभ्रम दूर झाले. 

बाळाच्या त्या येण्याने दोन तीन दिवस असेच निघून गेले. डॉक्टर पाठक यांनी परवानगी देताच शीतल घरी आली. तिच्या मनात त्या बाळाचे जणू एक घर बनू लागले. ज्या घरात ती आणि ते बाळ दोघेच होते. ते बाळ कधी हसत होते ते बाळ अचानक रडत होते . मध्येच ते शीतलकडे एकटक पाहत होते तर मध्येच ते तिला जणू बोलण्याचा प्रयत्न करत होते. असं म्हणतात ना की लहान बाळाला आई कोण ते सांगावं लागत नाही. म्हणुच की काय शीतलच्या मांडीवर ते निर्धास्त झोपी गेले होते. 

बाळाच्या आयुष्यात येण्याने शीतलला दुसरे काही सुचतच नव्हते. जणू ती तिच्यातच हरवून गेली होती. पण मध्येच एक मन तिला पुन्हा आपल्या मार्गाची आठवण करून देत होते. या सगळ्यात दिवस अगदी धावत सुटले होते. बाळही आता मोठे झाले होते , चालू बोलू लागले होते, शीतल आणि समीरने तिचे नाव त्रिशा ठेवले होते,  आणि एके दिवशी पोस्टाने एक पत्र घरी येऊन पडले. आईने ते पत्र घेतले. शीतलचे पत्र आहे हे कळल्यावर त्यांनी ते शीतलला आणून दिले. त्या पत्रातील मजकूर वाचताना शीतल आनंदून गेली. 

"काय झालं काय शीतल !!" आईनी आनंदाने नाचणाऱ्या शीतलला विचारलं.
"आई !! खूप मोठं काम झालंय !! माझी पुण्याची नोकरी फिक्स झालिये !! त्याचंच हे पत्र आहे !! त्यांनी पत्र मिळताच एक आठवड्यात जॉईन व्हायला सांगितलंय!! खूप मोठी बातमी आहेही !! आज खऱ्या अर्थाने आनंद झालाय मला !! " 
आई काहीच म्हणाली नाही. ती फक्त पाहत राहिली. संध्याकाळी बाबा , समीर आल्यानंतर त्यांनाही ही बातमी कळाली !! सर्वांनी तीच मनापासून कौतुक केलं. पण समीरच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. शीतल आपल्या खोलीत आल्यावर तिला त्याने मनात कित्येक गोष्टी ठरवून विषय काढला.

"शीतल काही विचारायचं होत !! "
"विचार ना !!"
"पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??"
"तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! "
"पण ती राहील तुझ्याशिवाय !!"
"तिला राहावं लागेल !!" शीतल नकळत बोलून गेली. 
समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. 
"समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!"
"पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! "
"समीर प्लिज !! नको ना उगाच इमोशनल करुस !! ज्यांना आई वडील नाहीत ती मुल जगत नाहीत का ??? आता उगाच मला यात अडकवून नकोस ठेवू !!"

समीर शांत झाला. त्याला पुढे काय बोलावं काहीच कळलं नाही. शीतल आपल्या कामात गुंग झाली. इकडे त्रिशा शांत झोपी गेली कारण तिला माहित होत आपल्या सोबत आपली आई आहे ते.

"जीवनाच्या प्रवाहात प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रयत्न करत असतो पोहण्याचा. कोणी सहज तो प्रवाह ओलांडून जातो तर काही मध्येच बुडून जातात, पण हे झाले सामान्य लोक पण जे लोक त्या प्रवाहात नकळत आपल्या सर्व बंधनाना तोडून, आपल्या मर्यादा विसरून फक्त तो प्रवाह ओलांडायचा आहे, जिद्द नव्हे तर तो जगण्याचा हेतू बनतो त्यांच्याबद्दल काय करावं खरंच काही कळत नाही. बरं असे लोक इतिहासही घडवतात पण नात्याच्या पाऊलखुणा कुठेतरी मागे राहून जातात हे त्यांना कळतच नाही. याला अपवाद असेल यात काही दुमत नाही. पण याच अट्टाहासाचा त्रास आपल्या आजूबाजूच्या लोकांना नकळतपणे होत नाहीना याचा विचार खूप कमी लोक करतात." समीर जणू आपल्या मनाशी आपल्या नात्यांशी द्वंद्व करत होता. 

"समीर !! तू मला miss करशील ना ??" शीतल समीरला विचारत होती. तिला पुण्याला जायची वेळ जवळच आली होती. ती आपल्या आवरा आवरीत बिझी होऊन गेली होती. 
"नाही !!" समीरचा आवाज थोडा कठोर झाला होता. शीतलने असे एकटे पुण्याला जाणे त्याला पटले नव्हते हेच जणू त्यातून जाणवतं होते. 
"समीर !! हा असा चेहरा करून मला ड्रॉप करायला येणार आहेस का ??" जवळचं बसलेल्या त्रिशाकडे पाहत शीतल म्हणाली. 
समीर काहीच बोलला नाही. 
"चल !! संध्याकाळी पाच वाजता फ्लाईट आहे माझी !! आता जास्त विचार करू नकोस !! सगळं नीट होईल !! थोडे दिवस थांब मग आपण सगळेच तिकडे जाऊ !! तूपण पुण्याला ट्रान्स्फर करून घे !! तिकडे ऑफीस आहेच ना तुझं !! "
"बघुयात !! " समीर त्रिशाला जवळ घेत म्हणाला. 

शीतल जायला निघाली. समीर तिला एअरपोर्टवर सोडायला चालला. आज मात्र त्रिशा काही केल्या शीतलला सोडायला तयार होत नव्हती. अडखळत अडखळत जणू ती शीतलला बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्रिशाला जणू आपण आज आईपासून लांब जाणार हे कळून चुकलं होत. 

समीर आणि त्रिशाने शीतलला एअरपोर्टवर सोडले. दोघेही तिला जाताना पाहात राहिले. त्रिशा शांत होऊन समीरच्या कडेवर बसून राहिली. शीतल पुण्याला निघाली. तिला मनसोक्त जगण्यासाठी, पंख पसरून आभाळात झेप घेण्यासाठी.

क्रमशः 

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kathan ||

आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||




भाग ३

शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही. 
" थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!"
शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली.
"बोला ना बाबा !!
"डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं."
"बाबा ते ! मी .. मी!! "
"काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !!  अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक  माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! "
"पण बाबा मला त्यावेळी काहीच सुचलं नाही !! माझ्या आयुष्यात हा असा अचानक कोणता खड्डा येईल असं मला कधी वाटलं ही नव्हतं !! "
"खड्डा ?? आयुष्यातल्या एवढ्या सुंदर गोष्टीला तू खड्डा म्हणतेय!!! त्यांना विचार शीतल दुःख म्हणजे काय असतं जे वर्षानुवर्षे आपल्याला मुल व्हावं !! तिन आई व्हावं, त्याने बाबा व्हावं म्हणून वाट पाहतात !! खूप सुंदर गोष्ट आहे ही बाळा !! "
"बाबा !! पण माझ्या करिअरच काय ?? "
" कित्येक स्त्रिया आज आपला संसार सांभाळून करतातच ना करिअर !!"
शीतल गप्प राहिली तिला पुढे काय बोलावं काहीच कळलं नाही. बाबा मात्र तिला बोलत राहिले.
"डॉ पाठक माझे चांगले मित्र आहेत म्हणून मला हे कळलं !! "
"चुकले बाबा !!"
"तू माझी माफी मागावी यासाठी मी बोलत नाहीये हे !! तू आपली जबाबदारी ओळखावी यासाठी बोलतोय मी !! तू एकुलती एक मुलगी आमची , तुझं चांगलं व्हावं एवढच मला वाटत !! बरं चल आता सगळ्यांना बोल तिथे जाऊन !!"

शीतल आणि तिचे बाबा पुन्हा सर्वात येऊन बसले. शीतल हळुच समीर जवळ येऊन बसली. तिच्यातील बदल समीरला लगेच कळाला. ते छोटे कुटुंब कित्येक वेळ गप्पा मारत बसले. शीतल आता आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेऊ लागली. समीर ,सासूबाई ,सासरे सारे तिला पाहिजे ते हवं ते देऊ लागले. त्या सुखी संसारात कोणीतरी नवीन येणार या आनंदाने ते सारे खूष होऊ लागले. आज्जी आजोबा आपल्या नातवासाठी नाव शोधू लागले. समीर आता पहिल्यापेक्षा शीतलची जास्त काळजी घेऊ लागला. समीरला आता दुसरे जग जणू दिसेनासे झाले. 

सहा महिन्या नंतर,

पाहता पाहता दिवसा मागून दिवस जाऊ लागले. पोटातले बाळ आता हळूहळू आकार घेऊ लागले.आणि अखेर या जगात येण्यासाठी जणू तेही आतुर झाले. शीतल बाळंतपणासाठी डॉक्टर पाठक यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. 

"समीर ,पाहता पाहता दिवस कसे गेले कळल नाही !!"
"होना !!" समीर शीतलच्या जवळ बसून बोलत होता. 
"डॉक्टर पाठकानी तारीख उद्याची दिली आहे !! उद्या तुझ्या आणि माझ्यामध्ये अजून कोणीतरी असेल !! आपलं " समीर बोलत राहिला.
" सगळं कसं भरून जाईल हे घर !! होना !! आणि मग आपण दोघं मिळून त्याला मोठ करू , त्याच्यावर संस्कार करू , त्याला बोलायला शिकवू !!"
"आपण ??"शीतल मध्येच बोलली.
"हो मग !! अजून कोण ??"
"तू !! मी फक्त जन्म देणार बाळाला !! बाकी सांभाळायचं वैगेरे तुझ्याकडे !!"
" बरं बरं !! करिअर ना !! " 
"हो !!" 

शीतल आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. शीतल नकळत येणाऱ्या बाळासाठी आपल्या मनाची समजूत काढत होती. एका बाजूने तिला मुक्त फिरायच होत, जिथे तिला आपल्या शिवाय दुसरं कोणी नको होत पण आता दुसर मन तिच्यातील आईपण जागे करत होत. पण नकळत ती त्याला गप्प करत होती. त्या आईपणाला नाकारत होती. 

"समीर !!" मध्यरात्री शीतल जोरात ओरडली. तिला असह्य होणाऱ्या कळा सुरू झाल्या होत्या. 
शीतलच्या आवाजाने समीर जागा झाला. त्याला शीतलला काय होतंय हे कळायला वेळ लागला नाही. तो पटकन जागेवरून उठला बाहेर आई बाबा , शीतलचे आई बाबा यांना शीतलला त्रास सुरू झाल्याचे सांगत तो थेट नर्सकडे गेला. हॉस्पिटल स्टाफ लगेच धावत शीतलला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. सारे बाहेर बसून शीतल आणि मुलाच्या सुखरूप असण्याची प्रार्थना करू लागली. 

कित्येक वेळ शीतल त्या असह्य वेदना सहन करत होती. आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार आहे यासाठी सार काही सहन करत होती. त्या असह्य वेदना आणि बाजूला तिला धीर देण्यासाठी थांबलेला समीर तिला क्षणभर खूप काही सांगत होते. शीतल तू एकटी नाहीयेस , ते येणारं बाळही तुला नकळत बोलत असेल ना !!, शीतलला जणू सगळं जग आपल्या जवळ थांबलं आहे असेच वाटू लागले होते. 


आणि अचानक त्या लहान बाळाचे रडू ऐकू आले. शीतलने त्या बाळाकडे पाहीले आणि शांत झाली. त्या बाळाला पाहताच ती जणू त्या वेदना विसरून गेली. समीर तिच्याकडे हसून पाहू लागला. शीतलही समीरकडे पाहून हसली. त्या साऱ्या वेदना विसरू ती हसली. समीरने बाळाकडे पाहिले. तो धावत बाहेर आला आणि सर्वांना सांगू लागला. आई बाबा मुलगी झाली !! मी बाबा झाली.!! समीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई बाबा एकमेकांना आनंदाने सांगू लागले. शीतलचे आई बाबा समीरच्या या आनंदाला पाहून अजून आनंदून जाऊ लागले. 

"समीर !! " डॉक्टर पाठकानी समीरला बोलावले. 
"बोला डॉक्टर !!" 
"थोड्याच वेळात शीतलला तिच्या रूममध्ये घेऊन येतील तुम्ही तिथेच वाट पाहिली तरी चालेल !!"
"ओके डॉक्टर !!"

समीर , आई बाबा , शीतलच आई बाबा शीतल आणि बाळ दोघांचीही आतुरतेने वाट पाहू लागले. 

क्रमशः 

आई || कथा भाग २ || Marathi Katha ||




भाग २

दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली.
"काय हे वागणं समीर ??"
समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला.  तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं. 
"दारू पिऊन आलायस समीर ??"
"हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला. 
"बस एवढंच राहील होत आता !! "
"मग काय करू मी आता ?? तू सांग मी काय करू ??" समीर मोठ्या आवाजात बोलला.
समीर चा आवाज ऐकून आई बाबा आपल्या खोलीतून बाहेर आले. बाबांना काय घडतंय हे कळायला वेळ लागला नाही. ते लगेच समीरकडे जात म्हणाले,
"समीर दारू पिऊन आलायस !! लाज कशी वाटत नाही तुला !!  "
"कसली लाज बाबा ?? लाज तर या तुमच्या सुनेला वाटायला हवी ना ?? "
"काय बोलतोयस समीर ?? शुद्धीवर आहेस का तू ?" मध्येच आई समीरला म्हणाली. 
"कशाला राहू शुद्धीवर मी ?? सांग ना ?? मी बाप होणार आहे हे कळूनही मला त्याचा आनंद न होता दुःख होत असेल तर काय करू मी ??"
"काय ?? म्हणजे शीतल ?"
"हो आई मला दिवस गेलेत !!"
" पण मला मुल नकोय !! मला अबोर्शन करायचं आहे !! हे पण सांग !!" 
"समीर !!" शीतल समीरकडे पाहत म्हणाली. 
"सूनबाई काय ऐकतोय मी !! " मध्येच बाबा बोलले. 
"हो बाबा !! मला मुल नकोय !! "
"पण का ??"
"कारण मला यात पडायचं नाहीये !! चूल आणि मूल एवढच करायचं नाहीये मला!! मला मोठं व्हायचं !! काहीतरी करून दाखवायचं आहे !!"
"हो पण तुझं आईपण  यामध्ये येथच कुठे ??" बाबा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले. 
"पण मी यामध्ये गुरफटून जाईल !!"
"आम्ही आहोतच ना शीतल !! तुझ्या बाळाची सगळी काळजी आम्ही घेऊ !! आमच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्याला आम्ही सांभाळू !! मग तर झालं सगळं !!"
शीतल शांत झाली. समीर बाजूला खुर्चीवर बसून होता त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. 
"मी विचार करेन आई बाबा !!" शीतल एवढं बोलून आपल्या खोलीत समीरला सावरत घेवून गेली. 

रात्रभर तिच्या डोक्यात फक्त तोच विषय होता. मुलाला जन्म देणं एवढंच तर मला करायचं आहे. नंतर त्याची काळजी घ्यायला आई बाबा , समीर आहेतच .पण मला मात्र ते जवळही नको. मी आणि माझं करिअर यामध्ये त्याची लुडबुड मी काही खपवून घेणार नाही. उद्या काही वाटलच तर समीरकडे सोपवून मी मोकळी होईल. मग समीर जाणो आणि ते आई बाबा. आणि जास्तच बोलले मला तर सरळ म्हणेन मी मुलाचा हट्ट तुमचा होता त्यामुळे त्याला सांभाळायची जबाबदारी तुमची. ठरलं तर मग , आणि असंही आता abortion हा विषय डोक्यातून काढून टाकावा लागेल कारण उद्या सकाळी माझ्या आईला माझ्या pregnancy बद्दल सासूबाई सांगतीलच. आणि असलं काही बोलले तर आई आणि बाबा एक गोष्ट माझी ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे आता या सर्वांचं ऐकेन मी आणि ऐकदा का मुल झालं की मग यांना माझं ऐकावं लागेल. 

पाहता पाहता सकाळ झाली. समीर आणि शीतलच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात वाजवत होत. त्या आवाजाने शीतल जागी झाली. दरवाजा उघडताच समोर सासूबाईंना पाहून चकित झाली. 
"आई !! तुम्ही ??"
"घे !! तुझ्यासाठी नाष्टा घेऊन आली आहे मी !! आता तू एकटी नाहियेस !! त्या बाळाची काळजी सुद्धा घ्यावी लागेल ना आता !! आता फक्त तू नाहीस !! तुम्ही आहात !! कळलं का ??"
शीतल काहीच न बोलता नाष्टा करू लागली. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली.
" एवढ्या सकाळी कोण आल आता ??" शीतल सासुबाईंकडे पाहत म्हणाली. 
"थांब बघते मी !!"
दरवाजा उघडताच शीतलला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचे आई बाबा समोर दिसताच ती पटकन जागेवरून उठली. 
"आई !! " शीतलने आईला पाहून मिठीच मारली. 
"तुम्ही दोघे एवढ्या सकाळी इथे ??"
"अग तुझ्या सासूबाईंनी सकाळीच फोन करून आम्हाला आनंदाची बातमी सांगितली. मग म्हटलं कशाला फोन करा , तासाभराचा रस्ता आहे भेटायला यावं !! "
शीतल सासूबाईकडे पाहू लागली.
"मीच बोलावलं आहे त्यांना !!" 
शीतल त्या तिघांकडे पाहत राहिली. लांबुनच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत मनातच विचार करत होती.
"काय एवढं आनंदून जायचं काय कळतं नाहीये मला !! या समीरने सगळा घोळ घालून ठेवलाय नाहीतर आज abortion करून मोकळी झाली असते मी!!! पण आता हा विचार जरी केला तर हे सगळे मला काय रागावतील !! विचारच करवत नाही !!! शीतल बाई व्हा तयार पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी !! "

"शीतल !!  शीतल !! "
शीतल भानावर येत समोर पाहू लागली. समोर सासूबाई तिला हाक मारत होती.
"हो आई !! जा समीरला बाहेर ये म्हणावं !! "
शीतल खोलीत गेली. समीर अजूनही झोपलेला असतो. त्याला जोरजोरात आवाज देत ती उठवू लागली. 

"समीर !! ये समीर !! उठ !! उठ ना!! उठ बघ तुझ्या प्रताप बाहेर जाऊन !! "
समीर हळू हळू जागा झाला. डोळे चोळत तो विचारू लागला.
"काय झालं आता ??"
"काय झालं !!! सांगते ना !! तू जो काल दारू पिऊन गोंधळ घातलाय ना !! त्याचे परिणाम मला आता पुढचे किती दिवस सहन करावे लागतील माहितेय तुला??"
"काय म्हणतेय तू !! कसला गोंधळ ??"
"काल दारू पिऊन का आलास ते सांग मला पहिले ??"
"का म्हणजे माझी मर्जी !!"
"हो ना !! मग माझ्या मर्जी विरूध्द आई बाबांना माझ्या pregnancy बद्दल कशाला बोललास तू ??"
"मला काही आठवत नाही !! "
"जा बाहेर !! बघ बाहेर पार्टी करतायत माझ्या pregnancy ची !! त्यात माझे आई बाबा सुद्धा सामील झाले!! जा !!"
"क्या बात है !! आता तर मला त्या पार्टीत सहभागी झालच पाहिजे !! क्या बात है !!"
समीर मिश्किल हास्य हरकत शीतलकडे पाहत खोलीच्या बाहेर आला. पाहतो तर त्याचे आई बाबा सासू सासरे सगळे मजेत होते. शीतलला मुल होणार हे ऐकून शीतल सोडून बाकी सारे खुश होते. पाहता पाहता तोही त्यांच्यात सामील झाला.

शीतल लांबून हे सारं फक्त पाहत होती.

क्रमशः 

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||

तुझ्यात हरवून जाते || मराठी प्रेम कविता || लव || Poem ||




ओढ जणू त्या भेटीची , मला तुझ्यात हरवून जाते !!
पाहते तुला उगा आठवात, जणू चिंब भिजून जाते !!

येता वाट ती वळणाची, त्या वाटेवरती थांबते !!
शोधते त्या गंधात तुला, पाना फुलांना बोलते !!

सोबत देते ती लेखणी , नकळत तुला सांगते !!
विरहात लिहिल्या शब्दांची, जणू कविता तेंव्हा होते !!

चित्र माझे ते रेखाटता, तुलाच त्यात शोधते !!
रंग कितीही भरले तरी , अधुरेच का राहते ??

असे कसे हे प्रेम तुझ्यावर !! तुलाच आज न कळते !!
क्षणही न रहावे तुजविण !! अबोल मज न बोलवते !!

नजरेत त्या साठवून तुज मग !! आश्रुत त्या दिसते !!
हळूच पुसता ती कडा मग !! स्वतःस सावरून घेते !!

ओढ जणू त्या भेटीची मग, मला तुझ्यात हरवून जाते !!

✍️© योगेश

©All Rights Reserved ©

नकळत जेव्हा तू पहावे || कविता || Marathi Kavita Sangrah ||




नकळत जेव्हा मज तु पहावे !! क्षणही ते तिथे रहावे !!
हरवून जावे सारे काही !! माझ्यात तेव्हा तूच उरावे !!

शब्दही ते जणू मिळावे !! अलगद त्या कवितेत लिहावे !!
कोरून ते नाव असे की!! प्रेम मनातले तुझं ते कळावे !!

कधी एकांती उगा हसावे !!  आठवणीत त्या रमून जावे !!
पाहिले ज्या वाटेवरी तुला !! तिथेच मी चालत रहावे !!

पाना फुलांना उगा सांगावे !! तुझ्या येण्याने बहरून जावे
गंध ते मनातले असे की तेव्हा !! दाही दिशा जणू ते पसरावे !!

शब्द जणु असे का बरसावे !! माझ्या मना ओले ते करावे !!
चिंब भिजून मी जाता आज !! नकळत तेव्हा समोर असावे !!

ओठांवर यावे नी अबोल व्हावे !! मनात तुझ्याही जणु ते बोलावे!!
हलकेच तू हसता हसता !! नकळत ते प्रेम मझं का सांगावे??

✍️© योगेश

*All Rights Reserved*

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||




नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !!
क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !!
कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !!
हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !!

गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !!
कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !!
अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!!
कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !!

जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !!
कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !!
कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !!
पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !!

जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !!
कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !!
प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !!
ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !!

नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !!
उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ??
फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !!
हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !!

✍️© योगेश

*All Rights Reserved*

दिवा || मराठी कविता || Marathi Kavita ||



मंद मंद प्रकाश चहूकडे !! असाच पसरत जावा!!
एक दिवा तो वाती सवे !! अखंड तेवत रहावा !!

कधी देव्हाऱ्यात असताना !! स्वतःस विसरून जावा !!
कधी तुळशी समोर बसताना!! अंगणात त्या शोभावा !!

निरांजन घेता सांभाळून सारे !! तेलासवे जळावा !!
रात्र असावी जागीच मग !! अजून खुलून दिसावा !! 

सुखदुःखाच्या क्षणात कधी  !! सोबत तो असावा !!
अंधार दिसता कुठे मग !! मार्ग तिथे शोधावा !!

उगाच धडपड वाऱ्यासवे !! अविरत तो लढावा !!
शांत दिसता भासावे मग !! योगी ध्यानस्थ बसावा !!

निःस्वार्थ या जळण्याचे !! जणू महत्व तो सांगावा !!
आपण राख व्हावे !! परी आनंद तो वाटावा !!

एक दिवा तो वाती सवे !! अखंड तेवत रहावा !!

✍️© योगेश 

*All Rights Reserved*

चालण्यास तू सज्ज हो || Marathi Motivational Poem ||




शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो!!
नकोच किंतू आणि परंतु !! लढण्यास तू सज्ज हो !!

बोलेल वाट परतून जाण्या !! ढाल हाती सज्ज हो !!
होतील वार कित्येक तुझ्यावर !! निडर होण्या सज्ज हो !!

बरसतील त्या सरी अनावर !! भिजुनी जाण्या सज्ज हो !!
प्रखर त्या सुर्यासवे मग !! तळपण्यास तू सज्ज हो!!

कधी सत्य ते कधी मृगळजळ !! ओळखण्यास सज्ज हो !!
कधी मान तो कधी अपमान !! सोसण्यास सज्ज हो !!

आकाश सारे कवेत घेण्या !! पंख पसरून सज्ज हो !!
आव्हान देण्या येईल तो वारा !! उडण्यास तू सज्ज हो !!

प्रत्येक पायरी पुढे तू जाता !! नव्याने तू सज्ज  हो !!
जेव्हा वाटेल अशक्य सारे !! पुन्हा उभारण्या सज्ज हो !!

शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो !!

✍️© योगेश खजानदार

*All Rights Reserved*

असेच सोडून जाऊ नकोस || marathi Virah Kavita ||



मी म्हणालो थांब जरा !! असेच नाते तोडू नकोस !!
प्रेमाच्या या बंधनाला !! असेच सोडून जाऊ नकोस !!

कुठे भरकटली वाट आपली !! त्या वाटेस आपले करू नकोस !!
मिळून बांधलेल्या घराला या !! असेच सोडून जाऊ नकोस !!

वाईट कदाचित ही वेळ असेल !! उगाच सोबत घेऊ नकोस !!
सुखी क्षणांच्या आठवांना तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!

बरंच काही आहे मनात !! मनात त्या साठवू नकोस !! 
भरल्या डोळ्यांनी आज तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!

मी दोन पावले पुढे येईल !! तूही तिथे थांबू नकोस !!
जड त्या पावलांन सवे तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!

उरले फक्त माझ्यात तुझेपण !! तुझ्यातला मी विसरू नकोस !!
रित्या या जगात तुझ्याविण !! असेच सोडून जाऊ नकोस !!

साद जणू आहे ही भेटीची !! विरह तो तू देऊ नकोस !!
प्रेमाच्या या बंधणाला !! असेच सोडून जाऊ नकोस !! 

✍️© योगेश खजानदार

*All Rights Reserved*

दिनविशेष १० डिसेंबर || Dinvishesh 10 December ||




जन्म

१. रती अग्निहोत्री, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६०)
२. सी. राजगोपालाचारी, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, लेखक (१८७८)
३. ऍडा लोवेलेस, इंग्लिश गणितज्ञ (१८१५)
४. एस. निजलिंगप्पा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९०२)
५. व्हिक्टर मॅकलग्लेन, इंग्लिश अभिनेता (१८८६)
६. व्यंकटेश बळवंत पेंढारकर, भारतीय रंगभूमी अभिनेते ,गायक (१८९२)
७. हेमचंद्र बारूआ ,भारतीय लेखक (१८३६)
८. मनोज कुमार, भारतीय बॉक्सर (१९८६)
९. नेली साछस, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका, साहित्यिक (१८९१)
१०. डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर, भारतीय प्राच्यविद्यातज्ञ ,संस्कृत अभ्यासक (१८८०)
११. मोहम्मद अली जौहर, भारतीय मुस्लिम धर्मगुरू, लेखक ,कवी (१८७८)
१२. स्टँको तोडोरोव, बल्गेरियाचे पंतप्रधान (१९२०)
१३. के. सी. त्यागी, भारतीय राजकीय नेते (१९५०)
१४. हॉवर्ड मार्टिन, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९३४)

मृत्यू

१. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भारतीय लेखक ,कवी (२००९)
२. कुमुदलाल गांगुली तथा अशोक कुमार , भारतीय चित्रपट अभिनेते (२००१)
३. थॉमस सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८३१)
४. आल्फ्रेड नोबेल, नोबेल पारितोषिकचे निर्माता, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ (१८९६)
५. देवी मुखर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४७)
६. श्रीकांत ठाकरे, भारतीय संगीतकार (२००३)
७. मॅकेंझी बॉवेल, कॅनडाचे पंतप्रधान (१९१७)
८. शंकर गणेश दाते, ग्रंथसुचीकार (१९६४)
९. होरॅस डॉज, डॉज मोटर कंपनीचे सहसंस्थापक (१९२०)
१०. जोजेफ थिओ, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१९७१)
११. फ्रांजो तुडमन, क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९९)
१२. जॉन बेंनेत्त फेंन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१०)
१३. लाजुद्दिन अहमद, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (२०१२)


घटना

१. संगीत स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. (१९१६)
२. फ्रांसने ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात केली. (१५८२)
३. भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई यांना संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२०१४)
४. नोबेल पारितोषिक पहिल्यांदाच वितरण करण्यात आले. (१९०१)
५. पहिले नोबेल शांतता पुरस्कार हेन्री डूनंत आणि फ्रेडरिक पॅसी यांना देण्यात आले. (१९०१)
६. अर्थशास्त्रामध्ये प्रा. अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. (१९९८)
७. विल्हेल्म रोंटजेन यांना भौतिकशास्त्रात पहिले नोबेल पुरस्कार देण्यात आले. (१९०१)
८. मेरी क्युरी आणि पियरे क्युरी यांना भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक देण्यात आले. (१९०३)
९. भारतीय बंगाली लेखक ,कवी रविंद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रात त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९१३)
१०. वूड्रो विल्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. (१९१९)
११. मानुएल आझन हे स्पेनचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३१)
१२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. (२००९)


महत्व

१. Nobel Prize Day
२. International Animal Rights Day
३. Human Rights Day
४. Dewey Decimal System Day

दिनविशेष ९ डिसेंबर || Dinvishesh 9 December ||



जन्म
१. शत्रुघ्न सिन्हा, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९४५)
२. अण्णासाहेब लठ्ठे, शिक्षणमंत्री, कोल्हापूर संस्थानचे दिवाण (१८७८)
३. जॉन मिल्टन, इंग्लिश कवी ,लेखक (१६०८)
४. सोनिया गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा (१९४६)
५. फ्रित्झ हेबर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८६८)
६. दिनो मोरिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५)
७. दिया मिर्झा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
८. मार्गारेट हॅमिल्टन, अमेरिकन अभिनेत्री (१९०२)
९. इ. के. नायनार, केरळचे मुख्यमंत्री (१९१९)
१०. जेम्स रेंनवॉटर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१७)
११. कार्लो सियांपी, इटलीचे पंतप्रधान (१९२०)
१२. भक्तीस्वरूपा दामोदर स्वामी, भारतीय धर्मगुरू ,लेखक ,कवी (१९३७)
१३. हेन्री केंडल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)
१४. बॉब हॉवके, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९२९)
१५. प्रणिती शिंदे, भारतीय राजकीय नेत्या (१९८१)
१६. केदार पांडे, बिहारचे मुख्यमंत्री, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२०)
१७. पूनम महाजन, भारतीय राजकीय नेत्या (१९८०)

मृत्यू

१. सेहप्रभा प्रधान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९३)
२. रोकेया सखावत हॉसैन, भारतीय लेखिका, राजकीय नेत्या (१८८०)
३. गुस्ताफ डॅलेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३७)
४. के. शिवराम कारंथ, पद्मभूषण , ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक (१९९७)
५. आघोरे नाथ गुप्ता, भारतीय तत्ववेत्ता, लेखक (१८८१)
६. सर फेरोज खान नून, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९७०)
७. नॉर्मन जोसेफ वोंडलॅड, बारकोडचे सहनिर्माते (२०१२)
८. राल्फ बंचे, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१९७१)
९. रिकार्डो गिॲक्कॉनी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१८)
१०. हर्मांन वेल, जर्मन गणितज्ञ (१९५५)

घटना

१. युनायटेड अरब अमिरातीचा संयुक्तं राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९७१)
२. थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह संपन्न झाला. (१७५३)
३. गब्रीएल नारुटोविक्ज हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२२)
४. नेदरलँड आणि हंगेरी मध्ये व्यापारी करार झाला. (१९२४)
५. दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक घेण्यात आली. (१९४६)
६. बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६६)
७. टांझानिया देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६१)
८. मिचेल हाईनिश्च हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२४)
९. स्पेन हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९३१)
१०. निकोलाई सेऊसेस्कु हे रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६७)


महत्व

१. World Techno Day
२. International Day Of Commemoration And Dignity Of The Victims Of The Crime Of Genocide And The Prevention Of This Crime
३. International Anti-Corruption Day
४. International Day Of Veterinary Medicine

दिनविशेष ८ डिसेंबर || Dinvishesh 8 December ||




जन्म

१. धर्मेंद्र सिंघ देओल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३५)
२. बालाजी बाजीराव, नानासाहेब पेशवे , मराठा साम्राज्याचे पेशवा (१७२०)
३. प्रकाश सिंघ बादल, पंजाबचे मुख्यमंत्री (१९२७)
४. शर्मिला टागोर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४६)
५. पंडित बाळकृष्ण शर्मा, भारतीय हिंदी कवी (१८९७)
६. मनीष तिवारी, भारतीय राजकीय नेते (१९६५)
७. उदय शंकर, भारतीय नृत्यदिग्दर्शक (१९००)
८. हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४४)
९. रामदुलारी सिन्हा, केरळच्या राज्यपाल (१९२२)
१०. जीम मॉरिसन, अमेरिकन गायक, संगीतकार, गीतकार (१९४३)
११. निकी मिनाज, अमेरिकन गायिका , रॅपर (१९८२)
१२. अरींदंमा चौधरी, भारतीय अर्थशास्त्रज्ञ (१९७१)
१३. सुखलाल संघवी, भारतीय जैन धर्म तत्ववेत्ते (१८८०)


मृत्यू

१. भाई परमानंद, हिंदू महासभेचे नेते (१९४७)
२. जॉन कॉर्नफॉर्थ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१३)
३. हर्बर्ट स्पेंसर, ब्रिटिश तत्ववेत्ता (१९०३)
४. आर्थर डाऊनिंग, ब्रिटिश गणितज्ञ (१९१७)
५. सारीत धनारजता, थायलंडचे पंतप्रधान (१९६३)
६. गोल्डा मेईर, इस्राएलच्या पंतप्रधान (१९७८)
७. सी. एस. राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००४)
८. जॉन लेनिन, ब्रिटिश संगीतकार, पॉपस्टार (१९८०)
९. केईथ होल्योके, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९८३)
१०. जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर (२०१६)


घटना

१. सार्क परिषदेची स्थापना करण्यात आली. (१९८५)
२. भारतात पहिली दुमजली बस मुंबईत धावली. (१९३७)
३. ऑलिव्हर हेविसाईड यांनी कॉस्किल केबलचे पेटंट केले. (१९३१)
४. युरोप परिषदेने युरोपचा ध्वज स्वीकारला. (१९५५)
५. इसाक बेन ज्वी हे इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५२)
६. इराक मध्ये बगदाद येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ४००हून अधिक लोक जखमी झाले. (२००९)
७. भारत पाकिस्तान युद्धात भारतीय आरमाराने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला. (१९७१)
८. रविंद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पारितोषिक पदकाची स्वीडन सरकारने भेट दिली. (२००४)

महत्व

१. Bodhi Day
२. सार्क दिवस 

दिनविशेष ७ डिसेंबर || Dinvishesh 7 December ||



जन्म

१. प्रमुख स्वामी महाराज, स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू (१९२१)
२. लुइगी क्रेमोना, इटालियन गणितज्ञ (१८३०)
३. जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८६०)
४. अली असगर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७०)
५. नेहा जोशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
६. जनार्दन नवले, भारतीय क्रिकेटपटू (१९०२)
७. मारिओ सौरेस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९२४)
८. मिलिंद गाबा, भारतीय गायक (१९९०)
९. पी. व्ही. मनोरंजन राव, भारतीय खगोलशास्त्रज्ञ , लेखक (१९३६)
१०. गीता अय्यंगार, भारतीय योग शिक्षिका (१९४४)


मृत्यू

१. विनय आपटे, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (२०१३)
२. गोवर्धनदास पारेख, भारतीय विचारवंत, शिक्षणतज्ञ (१९७६)
३. एली डकॉमुन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते पत्रकार, लेखक (१९०६)
४. धर्मवारापू सुब्रह्मणम, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१३)
५. निकोलस बटलर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते, तत्ववेत्ता (१९४७)
६. रुब गोल्ड्बर्ग, अमेरिकन व्यंगचित्रकार (१९७०)
७. सुब्रता मित्रा, भारतीय सिनेमाटोग्राफर (२००१)
८. भास्कर रामचंद्र तांबे, भारतीय मराठी कवी, लेखक, साहित्यिक (१९४१)
९. जय व्हॅन एंडले, ॲमवेचे सहसंस्थापक (२००४)
१०. बाबुराव विजापुरे, भारतीय संगीत शिक्षक (१९८२)
११. स्वामी शांतानंद सरस्वती, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (१९९७)


घटना

१. इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला. (१९७५)
२. पहिल्या महायुद्धात अमेरिकेने ऑस्ट्रिया ,हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१७)
३. जेम्स मॅडिसन हे अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८०८)
४. संशोधक लिओ बॅकलं यांनी थर्मो सेटिंग प्लॅस्टिकचे पेटंट केले. (१९०९)
५. एच. एच. अस्क्विथ यांनी ब्रिटिश पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९१६)
६. स्पेन हा देश NATO चा सदस्य झाला. (१९८१)
७. कन्नड साहित्यिक लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९४)
८. पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय विमान दुर्घटनाग्रस्त झाले यामध्ये ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१६)
९. ७२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड करण्यात आली. (१९९८)

महत्व

१. International Civil Aviation Day

दिनविशेष ६ डिसेंबर || Dinvishesh 6 December ||



जन्म

१. रविंद्र जडेजा, भारतीय क्रिकेटपटू (१९८८)
२. शेखर कपूर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४५)
३. वसंत सबनीस, भारतीय लेखक, पटकथाकार (१९२३)
४. वॉरेन हस्टिंग्ज, ब्रिटिश सत्तेतील भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (१७३२)
५. R. पी. सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
६. मायकेल जोसेफ सेवेज, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१८७२)
७. हरीप्रसाद शास्त्री, भारतीय संस्कृत अभ्यासक, इतिहासकार (१८५३)
८. गुंनार मुर्डल, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१८९८)
९. अनुराधा भट्टाचार्य, भारतीय कवयत्री, लेखिका (१९७५)
१०. योशिहिदे सुगा, जपानचे पंतप्रधान (१९४८)
११. जसप्रीत बुम्राह, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)
१२. सुचेता bhide- चापेकर, भारतीय भरतनाट्यम नृत्यांगना (१९४८)
१३. करून नायर, भारतीय क्रिकेटपटू (१९९१)
१४. श्रेयस अय्यर, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)


मृत्यू

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार (१९५६)
२. वर्नर वाॅन सिमेन्स, जर्मन संशोधक, उद्योगपती (१८९२)
३. बिना राय, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
४. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे खासदार, पत्री सरकारचे संस्थापक (१९७६)
५. जोआओ गौलार्ट, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९७६)
६. वीरेंद्र सिंह, भारतीय चित्रपट अभिनेते , दिग्दर्शक (१९८८)
७. तूंकु अब्दुल रहमान, मलेशियाचे पहिले पंतप्रधान (१९९०)
८. वोल्फगांग पॉल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९३)
९. कमलाकांत वामन केळकर, भारतीय भूविज्ञान वैज्ञानिक (१९७१)
१०. देवाण नायर, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
११. तिरुमलाई श्रीनिवासन, भारतीय क्रिकेटपटू (२०१०)
१२. रजनी बाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१०)

घटना

१. फिनलॅड या देशाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९१७)
२.  अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली, यामुळे उसळलेल्या दंगलीत १५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
३. स्पेनने नवीन संविधान स्वीकारले. (१९७८)
४. द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. (१८७७)
५. तुर्कीने सार्वत्रिक निवडणुकीत महिलांच्या मतदानास मान्यता दिली. (१९२९)
६. भारताने बांगलादेश या देशास मान्यता दिल्या कारणाने पाकिस्तानने भारता सोबत राजनैतिक संबंध तोडले. (१९७१)
७. अँटोनीओ सेगणी यांनी इटलीच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९६४)
८. हुगो चावेझ हे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९८)


महत्व

१. महापरिनिर्वाण दिन
२. Saint Nicholas Day

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...