शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो!!
नकोच किंतू आणि परंतु !! लढण्यास तू सज्ज हो !!
बोलेल वाट परतून जाण्या !! ढाल हाती सज्ज हो !!
होतील वार कित्येक तुझ्यावर !! निडर होण्या सज्ज हो !!
बरसतील त्या सरी अनावर !! भिजुनी जाण्या सज्ज हो !!
प्रखर त्या सुर्यासवे मग !! तळपण्यास तू सज्ज हो!!
कधी सत्य ते कधी मृगळजळ !! ओळखण्यास सज्ज हो !!
कधी मान तो कधी अपमान !! सोसण्यास सज्ज हो !!
आकाश सारे कवेत घेण्या !! पंख पसरून सज्ज हो !!
आव्हान देण्या येईल तो वारा !! उडण्यास तू सज्ज हो !!
प्रत्येक पायरी पुढे तू जाता !! नव्याने तू सज्ज हो !!
जेव्हा वाटेल अशक्य सारे !! पुन्हा उभारण्या सज्ज हो !!
शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो !!
✍️© योगेश खजानदार
*All Rights Reserved*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply