मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दिवा || मराठी कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिवा || मराठी कविता || Marathi Kavita ||

मंद मंद प्रकाश चहूकडे !! असाच पसरत जावा!! एक दिवा तो वाती सवे !! अखंड तेवत रहावा !! कधी देव्हाऱ्यात असताना !! स्वतःस विसरून जावा !! कधी तुळशी समोर बसताना!! अंगणात त्या शोभावा !! निरांजन घेता सांभाळून सारे !! तेलासवे जळावा !! रात्र असावी जागीच मग !! अजून खुलून दिसावा !!  सुखदुःखाच्या क्षणात कधी  !! सोबत तो असावा !! अंधार दिसता कुठे मग !! मार्ग तिथे शोधावा !! उगाच धडपड वाऱ्यासवे !! अविरत तो लढावा !! शांत दिसता भासावे मग !! योगी ध्यानस्थ बसावा !! निःस्वार्थ या जळण्याचे !! जणू महत्व तो सांगावा !! आपण राख व्हावे !! परी आनंद तो वाटावा !! एक दिवा तो वाती सवे !! अखंड तेवत रहावा !! ✍️© योगेश  *All Rights Reserved*