भाग ८ शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती. "समीर !!" आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला. "आई ??" "हो !! मीच बोलते आहे !! कुठे आहेस तू ? अरे लवकर घरी ये !!" " काय झाल आई ?? आणि एवढी घाबरल्या सारखी बोलतेस तू !! काय झालंय ??" "अरे त्रिशा !!" " काय झालं त्रिशाला आई !!" " अरे ती बेशुद्ध पडली आहे !! खेळता खेळता अचानक जागेवर पडली !! मी आणि बाबा शेजारच्या दवाखान्यात जातोय तू तिकडेच ये पटकन !!" "काय ?? कस काय पडली ती बेशुद्ध !!! काय झालंय आई ??" " हे बघ जास्त विचारत बसू नकोस तू ये पटकन !!" आई घाबरल्या स्वरात समीरला बोलत होती. आईचा फोन ठेवताच समीर लगेच आपल्या जागेवरून उठला . त्याला काहीच सुचत नव्हतं. समोर कोणी आहे याचं भानही त्याला राहील नाही. " अरे समीर !! व्हॉट हॅपन ?? " समीरचा बॉस अचानक धावत निघालेल्या समीरला विचारतो. "सॉरी बॉस !! मुलगी आजारी आहे !! आय हॅव टू ...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!