मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||

  आयुष्याच्या एकातरी पायरीवर आपण नकळत अडकून जातो, ना पुढे जाण्याचा मार्ग सापडतो ना मागे येण्याचा मार्ग. मागे जाण्याचा मार्ग तर पूर्णपणे बंद होतो. अशावेळी आपण हतबल होऊन बसतो अगदी निवांत , त्यावेळी काय करावं याचा विचार करत , तो क्षण असा असतो की लोकांनी दिलेला छोटासा सल्लाही आपल्याला आपला अपमान वाटायला लागतो. आपण ठरवलेले मार्ग ,आपले ध्येय याच्यामध्ये आलेल्या त्या संघर्षात आपण शांत होऊन जातो.  यामध्ये मग येते वेळ ती इतरांच्या मार्गांची, त्यांच्या सल्ल्याची. कधीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की आपल्या आयुष्याचे निर्णय ज्यावेळी इतर लोक घेऊ लागतात तेव्हा आपण आपल्यावर विचार करण्याची वेळ आलेली असते. पण फक्त विचार करणं पुरेस नाही त्यावर काहीतरी मार्ग काढण्याची वेळ आलेली असते. शेवटीं आपण जिथे हतबल होऊन थांबतो, तेव्हा विचार करावा की, आपण दुसऱ्याच्या विचारांवर चालण्यासाठी हा अट्टाहास केला होता का?नाही ना?? पण याचा अर्थ असा नाही की कोणाचंच ऐकायचं नाही!! योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं. कारण असे कित्येक लोक असतात जे योग्य सल्ला देतात, त्याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण रस्त्याव...