आठवणीतील तु ..!!

मी विसरावे ते क्षण
की पुन्हा समोर आज यावे
सहज आठवणीने तेव्हा
जुने ते पान उलटावे

का सोबतीस तु
मला येऊन भेटावे
जुन्या त्या वाटेवरती
साथ देत आज जावे

कधी ओल्या पापण्या त्या
अंधुक नजरेस व्हावे
तुझ्या विरहाचे ते
सारे दुख आज वाहुन जावे

एक सोबत हवी तुझी
नी हात हातात घ्यावे
प्रेम माझ्या मनातले तेव्हा
तुझ्या ह्रदयास आज सांगावे

कळेल ना तुला ते माझे मन
की पुन्हा पुन्हा ते सांगावे
तुझ्या विरहात आज मी
कीती तुला लिहावे

हे प्रेम नी मन असे की
तुझेच शब्द का व्हावे
नी सहज आठवणीने तेव्हा
जुने ते पान उलटावे ..!!
-योगेश खजानदार

अस्तित्व. .


आज कविता थोडी वेगळी .. प्रत्येक स्त्रीची .. तिच्या अस्तित्वाची  

स्त्रीला दातृत्व आहे
स्त्रीला मातृत्व आहे
स्त्रीत क्षमता आहे
स्त्रीत ताकद आहे
तरीही ती लढतेय आपली अस्तित्वाची लढाई .. आपल स्त्रीत्व
विसरुन जगतेय ती आपल्या स्वतःचीच लढाई ..  एक कविता ...

'अस्तित्व ...!!'

स्वतःच अस्तित्व शोधताना
मी कुठेतरी हरवुन जाते
समाज, रुढी, परंपरा यात आता
पुरती मी बुडून जाते

कोणाला मी हवीये
तर कोणासाठी बोज होऊन जाते
एक स्त्री म्हणून जगताना
आज खरंच मी स्वतःस पहाते

माझेच मीपण सोडुन मी
तुझे पुरुषत्व जपत राहते
कधी खंत मनाची तर
कधी स्वतःस सावरून जाते

कधी घोटला गळा माझा
पोटातच मला मारले जाते
कधी समाज लाजेचे रोज
कितीतरी बलात्कार होत राहते

तरीही धडपड माझी आज
तुझ्यासवे मी चालत जाते
स्त्री म्हणुन जगताना मी
नेहमीच तुझी साथ देत राहते

स्वतःच अस्तित्व शोधताना
खरंच मी हरवुन जाते..!!
-योगेश खजानदार

मनातली सखी.. !!

"कधी कधी मनातली सखी
खुपच भाव खाते
पाहुनही मला न पहाता
माझ्या नजरेत ती रहाते
चांदण्याशी बोलताना मात्र
खुप काही सांगते
माझ्याशी अबोल राहुन मात्र
फक्त मला छळते

कधी कधी मनातली सखी
अनोळखी त्या चंद्रास बोलते
समोर असणाऱ्या माझ्याकडे
फक्त बघत असते
मधेच चार शब्द रागाचे
उगाच मला बोलते
मन मात्र वेडे माझे
तिचे शब्द ऐकत असते

कधी कधी मनातली सखी
कवितेत मला सापडते
शब्दांसवे लिहिताना तिला
उगाच रुसत रहाते
कागदावरचे शब्दही तेव्हा
तिलाच शोधत बसते
शोधुन सापडल्यावर तिला
आपलंस करत असते
आणि मनातली सखी मात्र
तेव्हा उगाच भाव खात असते. !!!"
-योगेश खजानदार






विरहं..!!

ठरवुन अस काही होतंच नाही
मनातलेच मन कधी ऐकत नाही
नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला
रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही

आसवांनाही कधी निटस विचारत नाही
कित्येक दुख डोळ्यातुन वाहत नाही
पापण्यांचा दोष हा सारा जणु की
अश्रुं मधुनही तिला जाऊ देत नाही

किती हा एकटा प्रवास की अंत नाही
सोबत नसावी तिची हे ह्रदय मानत नाही
वाट अशी चालताना आज मझ
स्वतःस हरवुन गेलेलेच माहित नाही

शोधूनही कधी ती सापडत का नाही
बदलले क्षण तरी ओढ का जात नाही
ह्रदयातल्या कोपर्‍यात तिच असताना
आज मला ती काहीच का बोलत नाही

सरले पान ते पलटलेच नाही
काय लिहिले ते नीट वाचलेच नाही
अखेरच्या ओळीतले शब्द असे की
पाहुनही ते मी पाहिलेच नाही
-योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...