दिनविशेष १ एप्रिल || Dinvishesh 1 April ||


जन्म

१. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक,  संस्थापक(१८८९)
२. सोफी जर्मैन, फ्रेंच गणितज्ञ (१७७६)
३. तरुण गोगोई, आसामचे मुख्यमंत्री (१९३६)
४. गुरू तेग बहादूर , शिखांचे नववे गुरू (१६२१)
५. मोहम्मद हमीद अन्सारी, भारताचे उपराष्ट्रपती (१९३७)
६. जस्विंदर सिंघ (जॅझी बी ), भारतीय गायक (१९७५)
७. भागीरथी नेपाक, भारतीय लेखक (१९३१)
८. गास्टन इयेकेंस, बेल्जियमचे पंतप्रधान (१९०५)
९. अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४१)
१०. अजित पाल सिंघ, भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन (१९४७)
११. शिवकुमार स्वामी, समाजसेवक (१९०७)
१२. रोहिणी खाडिलकर, भारतीय बुद्धिबळपटू (१९६३)

मृत्यु

१. राजा मंगळवेढेकर, साहित्यिक (२००६)
२. लेव डी लांदाऊ , नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९६८)
३. आल्फ्रेडो नोब्रे कॉस्ट, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९९६)
४. संजीवनी मराठे, कवयत्री (२०००)
५. श्रीधर महादेव जोशी , समाजसेवक (१९८९)
६. असफ आली, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , वकील (१९५३)
७. किल्डारे डॉबस, कनाडियन लेखक (२०१३)
८. जॉन फॉर्सिथे, अमेरिकेन अभिनेता (२०१०)
९. पाउलो मुवांगा, उगांडचे पंतप्रधान , राष्ट्राध्यक्ष (१९९१)
१०. एन के पी साळवे, भारतीय राजकीय नेते (२०१२)

घटना

१. भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली. (१८९५)
२. जर्मनीने संशोधित संविधान स्वीकारले. (१८७१)
३. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९३५)
४. ओरिसा राज्याची स्थापना करण्यात आली. (१९३६)
५. अमेरीका एअर फोर्स अकादमीची स्थापना झाली. (१९५४)
६. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
७. जपानने सोने खरेदी वरील बंदी उठवली. (१९७३)
८. भारतामध्ये दशमान पद्धतीस सुरुवात झाली. (१९५७)
९. कॅमोडियन पंतप्रधान लोन नोल यांनी झालेल्या सत्तांतर बदलामुळे देशातून पलायन केले. (१९७५)
१०. ऍपल कंपनीची स्थापना स्टिव्ह वोजनिक आणि स्टिव्ह जॉब्स  यांनी एका छोट्या गॅरेज मध्ये कपरटिनो कॅलिफोर्निया येथे केली. (१९७६)
११. Gmail ही मेल सर्व्हिस गूगलने सुरू केली. (२००४)
१२. नेदरलँड हे पहिले राष्ट्र बनले जिथे समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. (२००१)
१३.इराक येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात दहा पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)


महत्त्व

१. भारतीय हवाई दल दिवस

दिनविशेष ३१ मार्च || Dinvishesh 31 March ||


जन्म

१. आनंदी गोपाळ जोशी, भारतातील पहिल्या महीला डॉक्टर (१८६५)
२. मीरा कुमार , भारतीय राजकीय नेत्या (१९४५)
३. शीला दीक्षित, दिल्लीच्या पुर्व मुख्यमंत्री (१९३८)
४. गंगाधर बाळकृष्ण देशपांडे, स्वातंत्र्यसैनिक (१८७१)
५. विल्यम्स लॉरेन्स ब्राघ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९०)
६. झविअड गमसाखुर्डिया, जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३९)
७. अमेय दाते, पार्श्वगायक (१९७९)
८. अण्णासाहेब किर्लोस्कर, नाटककार (१८४३)
९. गुरू अंगद देव, शिखांचे दुसरे गुरू (१५०४)
१०. ऑर्थर ग्रिफिथ, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१८७१)

मृत्यु

१. मीनाकुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
२. दत्तात्रय पारसनीस, इतिहास संशोधक (१९२६)
३. आयझॅक न्यूटन, प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१७२७)
४.; हांस फिसचेर, नोबेल पारितोषिक विजेते जर्मन संशोधक (१९४५)
५. गणपतराव वडणगेकर, सुप्रसिद्ध चित्रकार (२००४)
६. जोस मारिया लेमुस, एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष (१९९३)
७. रॉल अल्फोंसिन, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (२००९)
८. इम्रे करटेस्झ , नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१६)
९. डॉ हरदेव बहारी, लेखक (२०००)
१०. क्लिफॉर्ड शुल्ल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००१)

घटना

१. डॉ आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. (१८६७)
२. हिन्दी स्वातंत्र्य संघाची स्थापना करण्यात आली. (१९४२)
३. मेक्सिकन एअरलाइन्स बोईंग ७२७ हे विमान दुर्घटनग्रास्त झाले यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८६)
४. डॉ जयंत नारळीकर यांना युनेस्को तर्फे कलिंग पुरस्कार देण्यात आला. (१९९७)
५. रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ल्यूना १० अवकाशात सोडला. (१९६६)

दिनविशेष ३० मार्च || Dinvishesh 30 March ||


जन्म

१. वसंत आबाजी डहाके, कवी लेखक (१९४२)
२. राजीव प्रताप रुडी, भारतीय राजकीय नेते (१९६२)
३. हेनरी रुबेन्स, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६५)
४. हज अली राझमारा, इराणचे पंतप्रधान (१९०१)
५. शरदेंदू बंदोपाध्याय, बंगाली लेखक (१८९९)
६. भीमराव पांचाळे, मराठी गझल गायक (१९५१)
७. सेन्सू ताबोने, माल्टाचे पंतप्रधान (१९१३)
८. देविका राणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९०८)
९. नोराह जोन्स, अमेरिकेन गायिका (१९७९)
१०. अभिषेक चोब्बे, पटकथालेखक (१९७७)

मृत्यु

१. ग वा बेहेरे, सोबत साप्ताहिकाचे संपादक (१९८९)
२. कार्ल मे, जर्मन लेखक (१९१२)
३. आल्फ्रेड कोविल्ले, फ्रेंच इतिहासकार (१९४२)
४. लेओन ब्लुम, फ्रान्सचे पंतप्रधान (१९५०)
५. रघुवीर मुळगावकर, सुप्रसिद्ध चित्रकार (१९६)
६. वासुदेव गोविंद मायदेव, कवी (१९६९)
७. जिन टूमर, अमेरिकेन लेखक (१९६७)
८. आनंद बक्षी, संगीत दिग्दर्शक, गीतकार (२००२)
९. नूतन प्रसाद, टाॅलीवूड चित्रपट अभिनेते (२०११)
१०. दत्ताराम हिंडलेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४९)

घटना

१. सोव्हिएत युनियनने ऑस्ट्रियावर हल्ला केला. (१९४५)
२. इंग्लंड आणि भारता दरम्यान हवाई टपाल सेवा सुरू करण्यात आली. (१९२९)
३. दलाई लामा यांनी चाईनामधून पलायन केले आणि भारतात शरण घेतली. (१९५९)
४. जनरल लुडविक स्वोबोडा हे झेकोस्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८)
५. पी जे पॅटरसन यांनी जमैकाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९९२)
६. वीर मुरारजी हे पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना धारातीर्थी पडले. (१६६५)

महत्त्व

१. जागतिक डॉक्टर दिवस

दिनविशेष २९ मार्च || Dinvishesh 29 March ||


जन्म

१. सैय्यद इशतिक अहमद जाफरी, जगदीप, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३९)
२. बाळ गाडगीळ, लेखक , अर्थशास्त्रज्ञ (१९२६)
३. जॉन टेलर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७९०)
४. अनिरुद्ध जगन्नाथ, मोरिशसचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान (१९३०)
५. एडवर्ड स्मिथ स्टॅन्ली, ब्रिटीश पंतप्रधान (१७९९)
६. जॉन मकेवेन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९००)
७. गुंदीबलसुंदरम, भारतीय क्रिकेटपटू (१९३०)
८. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (१९४८)
९. हनुमंत सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९३९)
१०. जॉन मेजर , ब्रिटीश पंतप्रधान (१९४३)
११. उत्पाल दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२९)
१२. केशरबाई क्षीरसागर, भारतीय राजकीय नेत्या (१९३०)

मृत्यु

१. जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
२. करमचंद थापर, भारतीय उद्योगपती (१९६२)
३. एरिक विल्यम्स, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
४. एडी रायडर, अमेरिकन अभिनेता (१९९७)
५. कार्लो उर्बाणी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (२००३)
६. अलेक्सेई अब्रिकोसोव, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१७)
७. आदूर भासी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
८. लक्ष्मण नायक, ओडिशाचे सामाजिक कार्यकर्ते (१९४३)
९. पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्त्या (१९९७)
१०. अनिता श्रेवे, अमेरिकेन लेखिका (२०१८)

घटना

१. तेलगू देसम पक्षाची स्थापना एन टी रामराव यांनी केली. (१९८२)
२. स्वित्झर्लंड एक प्रजासत्ताक देश झाला. (१७९८)
३. ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब ताब्यात घेतले. (१८४९)
४. ग्रेट ब्रिटनने लोनियन आयस्लॅड ग्रीसला परत केले. (१८६४)
५. जपानने सोन्याचे चलन स्वीकारले( Gold Standard). (१८९७)
६. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी येथे करण्यात आली. (१९६८)
७. ख्रिस्तोस सार्ट्जटेकीस हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८५)
८. पाकिस्तानमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास समोर झालेल्या बॉम्ब स्फोटात दहाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. अंद्रेज किस्का हे स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)

दिनविशेष २८ मार्च || Dinvishesh 28 March ||




जन्म

१. राजा गोसावी, मराठी चित्रपट अभिनेते (१९२५)
२. अक्षय खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५)
३. रंगास्वामी एल कश्यप, भारतीय वैज्ञानिक (१९३८)
४. बर्नांडीनो मचाडो, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१८५१)
५. अरिस्टाईड ब्रांयन्ड, फ्रान्सचे पंतप्रधान (१८६२)
६. मारिओ वर्गास ल्लोसा, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३६)
७. कुशल टंडन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
८. अलेजांड्रो टोलेंडो, पेरूचे राष्ट्राध्यक्ष (१९४६)
९. मायकल डब्ल्यू युंग, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९४९)
१०. मेलचियर नदाद्ये, बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष (१९५३)
११. जोसे मारिया नेवेस , केप व्हेर्डचे पंतप्रधान (१९६०)

मृत्यु

१. गुरू अंगद देव , शिखांचे दुसरे गुरू (१५५२)
२. ड्वाईट डी. ऐसेन्हीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
३. शांताराम द्वारकानाथ जयकर , सामाजिक कार्यकर्त्या (१९९७)
४. बंसी लाल, स्वातंत्र्यसेनानी, राजकिय नेते (२००६)
५. एस सत्यमुर्ती,  स्वातंत्र्यसेनानी, राजकिय नेते (१९४३)
६. आचार्य आनंद ऋषीजी , जैन धर्मगुरु (१९९२)
७. कोवासजी जमशेदजी पेटिगरा, डेप्युटी कमीशनर मुंबई पोलिस (१९४१)
८. श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता (१९९७)
९. वेंडेल मायेस, लेखक (१९९२)
१०. वर्गिनिया वुल्फ, ब्रिटिश लेखिका (१९४१)

घटना

१. इंडियन इंडिपेन्डस लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे केली. (१९४२)
२. जे आर डी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९२)
३. टोमास मासाऱ्यक हे झेकोस्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)
४. तुर्कीच्या काॅस्टॅटीनोपाल आणि अंगोरा या शहरांची नावे बदलून इस्तानबूल आणि अंकरा अशी ठेवण्यात आली. (१९३०)
५. सीरिया मध्ये झालेल्या सत्तांतर बदलामुळे राष्ट्राध्यक्ष नझीम अल कुडसी यांनी पलायन केले. (१९६२)
६. मोरारजी देसाई यांनी सत्ता स्थापन केली. (१९७७)

दिनविशेष २७ मार्च || Dinvishesh 27 March ||


जन्म

१. रेणुका शहाणे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. विल्हेल्म रोंटगेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८४५)
३. सटो ऐसाकु, नोबेल पारितोषिक विजेते जापनीज पंतप्रधान (१९०१)
४. जेम्स कॉलाघान, ब्रिटीश पंतप्रधान (१९१२)
५. चार्ल्स हेन्री प्लुंब, युरोपियन पार्लमेंटचे अध्यक्ष (१९२५)
६. इवन गस्पर्विकिक, स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
७. राम चरण, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८५)
८. कार्ल बार्क्स, डोनाल्ड डक कार्टूनचे चित्रकार (१९०१)
९. अखिल कुमार, भारतीय बॉक्सर खेळाडू (१९८१)
१०. टेलर अटलेजन, अमेरिकेन अभिनेत्री (१९९५)

मृत्यु

१. प्रिया राजवंश, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०००)
२. प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, साहित्यिक (१९९२)
३. जेम्स देवार, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९२३)
४. मॅकेल जोसेफ सेवेग, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९४०)
५. पॉल लॉटरबुर, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (२००७)
६. भार्गवराम आचरेकर, गायक (१९९७)
७. सर सय्यद अहमद खान, भारतीय समाजसुधारक (१८९८)
८. पॉल झिंडेल, अमेरिकेन लेखक (२००३)
९. अल्बर्ट ड्राच, लेखक (१९९५)
१०. काईचिरो टोयोटा, टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (१९५२)

घटना

१. अब्राहम गेंसेर यांनी रॉकेलचे पेटंट केले. (१८५५)
२. अँड्र्यू रँकिंग यांनी लघवीच्या भांड्याचे पेटंट केले. (१८५६)
३. मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार पंडीत भीमसेन जोशी यांना देण्यात आला. (१९९२)
४. सुहरतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८)
५. भारताने यशस्वीरित्या लो ऑर्बिटल Satellite ला ballistic missile टेस्ट मध्ये ध्वस्त केले आणि भारत "स्पेस पॉवर" म्हणुन ओळखला जाऊ लागला. (२०१९)
६. अमेरिकन नौदलाची स्थापना करण्यात आली. (१७९४)

महत्त्व

१. जागतिक रंगमंच दिवस

दिनविशेष २६ मार्च || Dinvishesh 26 March ||


जन्म

१. अर्चना पुरण सिंघ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६२)
२. अडॉल्फ हुर्विता, जर्मन गणितज्ञ (१८५९)
३. मधू शाह, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६९)
४. महादेवी वर्मा, कवयत्री लेखिका (१९०७)
५. सिंगमन ऱ्ही, साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१८७५)
६. धिरेंद्र नाथ गांगुली, भारतीय चित्रपट अभिनेते (१८९३)
७. गुचिओ गुच्ची , गुच्चीफॅशन कंपनीचे संस्थापक (१८८१)
८. सेनोफोन झोलोटास, ग्रीसचे पंतप्रधान (१९०४)
९. लॅरी पेज, गूगलचे सहसंस्थापक (१९७३)
१०. केयरा नाईटले, हॉलिवूड अभिनेत्री (१९८५)

मृत्यु

१. सुकुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)
२. बाबुराव बागुल, दलित साहित्यिक (२००८)
३. के के हब्बर , सुप्रसिद्ध चित्रकार (१९९६)
४. ग्रेटे गुब्रान्सन, ऑस्ट्रियन लेखक (१९३४)
५. डेव्हिड जॉर्गे, ब्रिटीश पंतप्रधान (१९४५)
६. अहमद सेकाऊ टुरे, गिनीचे राष्ट्राध्यक्ष (१९८४)
७. जेम्स कॉलघान, ब्रिटीश पंतप्रधान (२००५)
८. अनिल बिस्वास , भारतीय राजकीय नेते (२००६)
९. नवलमल फिरोदिया, स्वातंत्र्यसैनिक (१९९७)
१०. हरेन पांड्या , गुजरातचे मंत्री (२००३)

घटना

१. ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन बॉम्बेवर कब्जा केला. (१६६८)
२. त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०१३)
३. ब्रिटीश कालखंडात भारताची राजधानी कलकत्त्या वरून दिल्ली करण्यात आली. (१९३१)
४. बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा स्वतंत्र देश झाला. (१९७१)
५. पहिल्या संस्कृत परिषदेस नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे सुरुवात झाली. (१९७२)
६. गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू झाले. (१५५२)

दिनविशेष २५ मार्च || Dinvishesh 25 March ||


जन्म

१. फारूख शेख, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४८)
२. वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी लेखक, साहित्यिक, कादंबरीकार (१९३२)
३. जेम्स ए लोवेल ज्युनिअर, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९२८)
४. वसंतराव गोवरीकर, भारतीय अंतराळ संशोधक (१९३३)
५. योग्राज सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९५८)
६. मेरी वेब्ब, लेखिका (१८८१)
७. मुकुल शिवपुत्र, गायक (१९५६)
८. शिबू मित्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४८)
९. अंटणास माँकुस, गणितज्ञ (१९५२)
१०. टॉम मोनाघन, डॉमिनोजचे निर्माता (१९३७)

मृत्यु

१. मधुकर केचे , साहित्यिक विचारवंत (१९९३)
२. फ्रेडरिक मिस्त्राल, फ्रेंच नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१४)
३. फैसल, सौदी अरेबियाचा राजा ,(१९७५)
४. भाई कोतवाल, हुतात्मा, क्रांतिकारक (१९४३)
५. सफदर हश्मी, लेखक (१९८९)
६. अरस्तू यार जंग, फिजिशियन (१९४०)
७. अल्लाउद्दीन खिलजी (१३१६)
८. अंड्रानिक मर्गर्यान, अर्मेनीयाचे पंतप्रधान (२००७)
९. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, समाजसुधारक (१९४४)
१०. मार्क ब्लम, अमेरिकेन अभिनेता (२०२०)

घटना

१. नेदरलँड्स बँकेची स्थापना झाली. (१८१४)
२. ग्रीकला स्वातंत्र्य मिळाले, ग्रीक स्वातंत्र्य दिन. (१९२०)
३. मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०१३)
४. काळ हे शिवरामपंत परांजपे यांचे साप्ताहिक सुरू झाले. (१८९८)
५. मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०१३)

दिनविशेष २४ मार्च || Dinvishesh 24 March ||


जन्म

१. इम्रान हाश्मी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९)
२. बिरेंद्रकुमार भट्टाचार्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक (१९२४)
३. कृणाल पांड्या, भारतीय क्रिकेटपटू ( १९९१)
४. जोसेफ स्टेफन, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (१८३५)
५. लुइगी ऐनौदी , इटलीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८७४)
६. वोजीसलाव कोस्तूनिका, सर्बियन पंतप्रधान (१९४४)
७. थॉमस रुझवेल्ट, कागदी चलनाचे जनक (१७९३)
८. प्रहलाद कक्कर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५०)
९. मुथुस्वामी दिक्षीतार , कवी लेखक (१७७५)
१०. अराई हकुसेकी, जपानी लेखक (१६५७)

मृत्यु

१. श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी लेखक , कादंबरीकार (२००७)
२. जोस प्रकाश , भारतीय चित्रपट अभिनेते गायक (२०१२)
३. मॅथ्यू स्टॅन्ली रॉबिन्सन , कार्डिनल अध्यक्ष (१९११)
४. होसोकोवा हारुमोटो, जापनीज सैन्य अधिकारी (१५६३)
५. वसेवोलोड गर्शिन, रशियन लेखक (१८८८)
६. एच डब्ल्यू लोंगफेलो, अमेरिकन नाटककार (१८८२)
७. पहिली एलिझाबेथ , इंग्लंडची राणी (१६०३)
८. इक्बाल साहू, पाकिस्तानी सुफी गायक (२०१२)
९. एडविन अरनॉल्ड, लेखक (१९०४)
१०. ज्युल्स व्हर्ने, फ्रेंच लेखक (१९०५)

घटना

१. मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९७७)
२. कॅनडाने त्याच्या कृष्णवर्णीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला. (१८३७)
३. रॉबर्ट कोच जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांनी tuberculosis ला कारणीभूत ठरणाऱ्या tubercle bacillus या बॅक्टेरियाचा शोध लावला. (१८८२)
४. भूतान या देशात प्रथमच निवडणुका पार पडल्या. भूतान एक लोकशाही राष्ट्र बनले. (२००८)
५. ग्रीस हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९२३)
६. बगदाद पॅक्ट मधून इराणने माघार घेतली. ही ऑर्गनायझेशन तुर्की इराक ग्रेट ब्रिटन ,पाकिस्तान आणि इराण मध्ये पॉलिटिकल मिलिटरी आर्थिक ध्येय ठरवण्यासाठी केली होती. 
७. कलकत्ता आणि आग्र्या दरम्यान  तारसेवा सुरू झाली. (१८५५)
८. एझेर वेजमान हे इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९३)
९. पश्चिम बंगाल येथे झालेल्या वादळात २५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले तर ३ हजाराहून अधिक लोक जखमी झाले. (१९९८)
१०. Covid 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात २१ दिवसांचे संपूर्ण लॉकडाऊन केल्याचे जाहीर करण्यात आले. (२०२०)
११. जपानने covid 19 मूळे टोकियो २०२० ऑलिम्पिक आणि पॅराआॅलिम्पिक रद्द केले. (२०२०)

महत्त्व

१. जागतिक क्षय दिन

शर्यत || कथा भाग ८ || Sundar Marathi Katha ||




कथा भाग ८

पाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला. 
"बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय !! आज संध्याकाळी शर्यत जिंकून आलो की तुला पहिले मोठ्या शहरातल्या वैद्याकडे घेऊन जाईन !! तोपर्यंत जरा कळ काढ !! "
शांता स्वतःला सावरत बसून राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ दिसत होती. सखाला ती जाणवली. तो लगेच म्हणाला,
"माहितेय मला!! तुला एकटीला सोडून जाणं मला खूप अवघड आहे !! पण नाईलाजाने मला हे करावं लागेल शांता !! आपल्यासाठी !!"
"तुम्ही निर्धास्त जा !! मला काही होणार नाही !! तुमची सगळी ताकद त्या शर्यतीत खर्ची करा !! तुम्ही जिंकणार हे माहितेय मला !!"

सखा तिला नीट बसवून तेथून उठला. सगळं काही आवरू लागला. शांताला जेवायला देऊन तो घरातलं सगळं काम करू लागला, तेवढ्यात बाहेरून हाक ऐकू आली,
" सख्या !! ये सख्या !! चल जायचंय ना शर्यतीला !! " घरात येत आप्पा म्हणाले.
"चला आप्पा !! झालंय माझं आवरून !!" सखा जागेवरून उठत म्हणाला. 

सखा आणि आप्पा घरातून बाहेर चालले. क्षणभर सख्याचे पाय अडखळले. त्याने एक नजर शांताकडे पाहिलं. तिच्या ओठावर हसू होते आणि डोळ्यात अश्रू. सखा तसाच जड पावलाने निघाला. आप्पा आणि सखा चालत चालत महादेवाच्या मंदिराजवळ आले. तिथे येताच सगळीकडे नुसती गर्दी गोंधळ त्यांना दिसू लागला. जो तो आपापल्या गावच्या शर्यतीच्या गप्पा करू लागला. पुसट सखा ते ऐकू लागला. मध्येच आप्पा त्याला बोलत होते,

"सख्या गावाच्या मानासाठी तुला जिंकावच लागेल !! लक्षात ठेव हा मान आपल्या गावाला कधीच मिळाला नाही !! ही शर्यत सुरू आपल्याच गावात होते पण नेहमी तो मान दुसऱ्याच गावचे लोक जिंकून घेऊन जातात. तुला तो मान या गावाला द्यावा लागेल !!" आप्पांच्या डोळ्यात सखाला वेगळीच चमक दिसू लागली.
"होय आप्पा !! नक्की मी माझी सगळी ताकद या शर्यतीसाठी लावेल !! " सखा आप्पाकडे हसत बघत म्हणाला.
"ठीक आहे !! सखा आता तू पलीकडे त्या सगळ्या स्पर्धकांत जाऊन उभा राहा !! हे घे आपल्या गावाची निशाणी !! ही दाखवली की तुला ते स्पर्धेच्या मैदानावर सोडतील!! सखा आता आपली भेट स्पर्धा संपल्यावरच !! "
"ठीक आहे आप्पा !! " सखा आप्पांच्या हातातली ती निशाणी घेत म्हणाला.

चालत चालत तो स्पर्धकांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. त्याला हे सगळं काही नवीन होत. तो कुतूहलाने सगळीकडे पाहू लागला. त्याच्या मनात कित्येक विचारांच काहूर माजलं.
"शर्यत !! आयुष्याची शर्यत !! जणू खूप काही सांगणारी ही शर्यत !! मला माझ्यात पुन्हा पाहायला लावणारी ही शर्यत !! कधी विचारही केला नव्हता या क्षणांचा !! या वयात तरण्या पोरां सारखं धावाव लागेल ते !!पण एवढा अट्टाहास कशासाठी !! माझ्या शांतेला चांगल्या वैद्याकडे घेऊन जाण्यासाठी !! या वयात तिला चांगल्या घरात राहायला मिळावं यासाठी!! तिला रोज कष्ट पडू नये यासाठी!! ही शर्यत फक्त आमच्यासाठी !! हो ना !! मग यामध्ये !! साहेब !! आप्पा!! गावची शान !! मान !! आणि महसूल, ही नकळत जोडले जावे ते कशासाठी ?? कारण स्वार्थी दुनियेत कवडीही मिळत नाही फुकट !! इथेतर सार आयुष्य पणाला लागल आहे !! " सखा स्वतःच्या तंद्रीत होता. 

"ओ भाऊ !! चला पुढं !! " स्पर्धेच्या मैदानात सोडणारा माणूस सख्याला म्हणाला.
सखा आपल्या विचारांतून बाहेर आला. पुढे येत त्याने त्याला हातातील निशाणी दिली. त्याने ती हातातून घेत आपल्या वहीत सूतारवाडी लिहिलं आणि सख्याला आत जायचा इशारा केला.

सखा शर्यतीच्या मैदानात आला. सगळ्या स्पर्धकांसाठी आखून दिलेले रखाने पाहू लागला. पंचाने त्याला समोरच्या रखाण्यात उभारण्याची आज्ञा दिली. सखा तिथे जाऊन उभा राहिला. क्षणभर इकडे तिकडे तो पाहत होता. समोरच त्याला साहेब दिसले. मानाच्या खुर्चीवर ते आरामात बसले होते. दुरूनच त्यांनी सख्याला इशारा केला. स्पर्धा जिंकण्याची जिद्द दिली. सखा आता त्या रखाण्यात उभा राहून स्पर्धा सुरू व्हायची वाट पाहत होता. अजून काही स्पर्धक आत येत होते. सखा येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांकडे पाहत होता. अचानक त्याला शिरपा आत येताना दिसला. सखा क्षणभर त्याला पाहतच राहिला. शिरपा आत येताच त्याची नजर सखावर गेली. तो चालत चालत सखा जवळ आला. त्याच्याकडे हसून पाहू लागला. तेवढ्यात त्याला पंचाने सखाच्या शेजारच्याच रखाण्यात उभारायल सांगितलं. सखा त्याच्याकडे पाहून न पहिल्या सारखं करू लागला. बाहेर उभारलेल्या आप्पा आणि साहेबांनही ही गोष्ट लक्षात आली. त्यांना कळून चुकल की शिरपा फक्त साहेबांच्या विरूद्ध मुद्दाम शर्यतीत उतरला आहे. कुरलेवाडीच्या पाटलांनी त्याला यावर्षी शर्यतीत उतरवल होत. सगळे तरुण तडफदार स्पर्धक सखाकडे पाहून हसत होते हा काय पळणार असं मनातल्या मनात म्हणत होते.

सखा आता फक्त शर्यतीत धावण्याचा विचार करू लागला. त्याच्या समोर राहून राहून शांताचा तो इकडे येतानाच चेहरा दिसत होता. सखा आता हरवून गेला होता. त्याला चिंता लागून राहिली होती ती शांताच्या तब्येतीची. इकडे येण्या आधी तिची तब्येत त्याला खूप अस्वस्थ करत होती. तिला क्षणभरही एकटं सोडू नये असं त्याला वाटलं होत पण शर्यतीचा पर्याय तिला चांगल्या वैद्याकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग होता. सखा अचानक भानावर आला. पंच आता शर्यत सुरू होण्याची शिट्टी देऊ लागला.

आणि अखेर पंचाने शर्यत सुरू झाल्याचा इशारा केला. सखा जीव तोडून पळत सुटला. समोर आता फक्त त्याला सावंतवाडीच महादेवाचं मंदिर दिसत होत. थोड पुढं जाताच त्याला मागून कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतंय अस जाणवलं तो शिरपा होता. सखाच्या मांडीवर जोरात लाथ मारत त्याने सखाला खाली पाडल. सखा जमिनीवर लोळत गेला. शिरपा हसत पुढे निघून गेला. सखा कसाबसा जागेवरून उठला. पुन्हा धावत सुटला. समोर पाहत फक्त धावत होता. पाहता पाहता तो सगळ्यांच्या पुढे जाऊ लागला. पुन्हा त्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करू लागले. सखा कित्येक वेळ असेच मार चुकवत राहिला. धडपड करत धावत राहिला. पण अचानक जोरात त्याच्या डोक्यात कोणीतरी घाव केला. तो शिरपा होता. शिरपा हात धुवून सखाच्या मागे लागला होता. त्याला त्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. सखा जागेवरून उठला आजूबाजूला कोणीच नव्हतं!! बाकीचे स्पर्धक अजून खूप मागे राहिले होते. 
"हे बघ शिरपा !! माझं तुझ्याशी काही वैर नाहीये !! मला जाऊ दे !! "
"होय तर !! तुझ्यामुळे तर आज मला दुसऱ्या गावाकडून पळाव लागतंय !! तुझ्यामुळ मला साहेबांनी मारलं !!"
"माझ्यामुळ नाही !! तुझ्या बेइमानीमूळ !! " सखा जागेवर उठत म्हणाला.
"गप रे भाडकाव !! " अस म्हणत पुन्हा त्याने शिरपाला जोरात डोक्यात मारलं .
सखा पुन्हा जमिनीवर पडला. त्याला अचानक आप्पाच वाक्य आठवलं " आपण जर प्रतिकार नाही केला तर हे लोक आपल्याला मारून टाकतील!!" सखा शेजारचा दगड हातात घेत उठला. मागे फिरत शिरपाला जाऊ देण्याची विनवणी करू लागला. पण त्याला कळून चुकलं हा असा ऐकणार नाही. हातातला दगड त्याने जोरात शिरपाच्या डोक्यात घातला. शिरपा क्षणात जमिनीवर कोसळला. सखा त्याच्याकडे क्षणभर पाहू लागला. तेवढ्यात बाकीचे स्पर्धक मागून धावत येताना त्याला दिसले. तो पुढे पळत सुटला. अगदी जोरात धावत सुटला. पाहता पाहता त्याने सावंतवाडीच्या महादेवाचे मंदिर गाठले. पुन्हा तो परतीच्या वाटेवर लागला. शर्यत जिंकण्याच्या अगदी क्षणभर तो जवळ आला होता. 

अगदी शर्यतीच्या शेवटच्या टप्पयात आता सखा आला होता. जीव तोडून आता तो पळत होता. तरुण तडफदार स्पर्धक आता जवळ जवळ सखाच्याच बरोबर पळत होते. सख्याला कळून चुकलं ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नाही. इकडे आप्पा, साहेब सख्याला पाहण्यासाठी आतुर झाले होते. त्यांची नजर त्या वाटेवर लागली होती. आणि तेवढ्यात आप्पा जोरात म्हणाले.
"धाव सखा !! धाव !! जोरात धाव !! " सख्याला सगळ्यात पुढे पाहून आप्पांच्या अंगात जणू विजच संचारली होती. 
सखा धावत सुटला. ती स्पर्धा जिंकण्याची रेष त्याला खुणावत होती. पायात काटे टोचले होते. डोक्यातून रक्त येत होत. सखा त्या रेषेच्या पलीकडे गेला होता. आप्पा आणि साहेब धावतच सख्याकडे आले. साहेबांनी सख्याला मिठीच माराली. सख्या जोरजोरात श्वास घेत होता. त्याच्या समोर सार काही येऊन थांबलं होत. कित्येकांनी त्याला हार् तुरे घातले होते. मानाचा फेटा बांधून त्याला सगळीकडे मिरवत होते. सखा शर्यत जिंकला होता. 

व्हा व्हा सखा !! मानलं तुला !! आज तू मला तो मान मिळवून दिलास ज्याच्यासाठी मी कित्येक वर्षे वाट पाहत होतो !! " साहेब सख्याला मिठी मारत म्हणाले. 
"सख्या गावाचं नाव काढलास बघ!! " आप्पा हातातला हार सख्याला घालत म्हणाले.

सखा अचानक भानावर आला.त्याला आता शांताची ओढ लागली. त्यानं सार काही तिथंच सोडलं. साहेबांना नमस्कार करून आप्पांना सोबत घेऊन तो घराकडे निघाला. वाटेत त्याने आप्पांना सगळं सांगितलं,

"सख्या अधीतरी सांगायच ना रे !! तुझ्या बायकोची तब्येत बिघडली ते !!"
" शर्यतीच्या राड्यात सांगणं जमलच नाही आप्पा !! "
"बरं चल आता पटकन !! असही तुझं काम संपलय आता !! साहेब पाहून घेतील पुढचं !! "

सखा आणि आप्पा धावतच घराकडे येतात. धावतच सखा घरात जातो. आप्पा घरात येत म्हणतात,
"लगेच शेचारच्या मोठ्या वैद्याकडे घेऊन जाऊ सखा ! क्षणभर ही वाट पाहू नकोस !! " 
"जी आप्पा !!"
सखा आत आला समोर भिंतीला टेकून बसलेल्या शांताकडे पाहत म्हणाला.
"मी शर्यत जिंकलो शांता !! बघ !! हा हार् बघ !! ही पैश्यांची माळ बघ ! ये शांता !! हे बघ !! तुला गावच्या मोठ्या वैद्यांकडे घेऊन जायला कोण आलंय !! आप्पा आलेत !!" 
शांता शांत बसून होती.
" ये शांता !! उठ ना !! तुला आनंद नाही का झाला ??! हे बघ आता आपण मोठ्या घरात राहायला जायचंय तुला नीट बरं व्हायचंय !! हे बघ !! सार काही नीट होणार आता !! तू आणि मी सुखात राहणार !! शांता " सखा शांताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
क्षणार्धात शांता बसल्या जागी खाली पडली. आप्पांना कळून चुकलं. क्षणात आप्पा पुढे आले. त्यांनी शांताची नाडी पाहिली. आणि म्हणाले,
"गेलीय ती सखा !!!"
"काय ??" 
"स्वतःला सावर सखा गेलीय ती !! "
"अशी कशी गेली !! मला वचन दिलं होत तिने की मी आल्यावर ती माझ्यासोबत आपल्या नव्या घरात राहायला जाणार म्हणून , अशी कशी गेली?"
"भानावर ये सख्या !! " सख्याच्या गालावर हात फिरवून आप्पा म्हणाले. 
सखा क्षणभर शांत राहिला. जणू तो भानावर आला. शांताला एकटक पाहू लागला. त्याच्या डोळ्यात आता अश्रूंचा पूर आला होता. सखा एखाद्या लहान मुलासारख रडू लागला होता. त्याला आप्पा सावरत होते. 

"ये शांता !!! ऐक ना !! उठ ना !! चल आपल्याला जायचंय त्या वैद्याकडे असं नकोना करू !! उठ ना !! " 
" सावर स्वतःला सख्या !! " आप्पा त्याच्या जवळ जात म्हणाले. 

कित्येक वेळ सखा शांताला आपल्या कुशीत घेऊन रडत राहिला. आप्पा बाजूला बसून त्याला धीर देत होते. जणू सखा शांताच्या आठवणीत हरवून गेला.

"आयुष्याची दुसरी बाजू सुरू झाली तेव्हा शांता तू मला किती सांभाळलं होतस !! प्रत्येक क्षणी तू माझी मैत्रीण माझी अर्धांगिनी बनून माझ्या सोबत राहिलीस !! आजही या शर्यतीसाठी तू मला किती प्रोत्साहन देत राहिलीस !! नेहमी म्हणालीस की मी शर्यत नक्की जिंकणार !! तो आत्मविश्वास मला त्या शर्यतीत नेहमी सोबत देत राहिला. पण तुझं हे असं अचानक जाण मला नाही मान्य शांता !! नाही मान्य !! मी ती शर्यत नक्की जिंकलो पण ही शर्यत, ही श्र्वासांची शर्यत हरलो शांता !! मी हरलो !! "

*समाप्त*

दिनविशेष २३ मार्च || Dinvishesh 23 March ||




जन्म

१. स्म्रिती इराणी, केंद्रीय मंत्री (१९७२)
२. राम मनोहर लोहिया, भारतीय राजकीय नेते (१९१०)
३. कंगना राणावत, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
४. इमी नोर्थर, जर्मन गणितज्ञ (१८८२)
५. नलिनीबाला देवी , कवयत्री लेखिका (१८९८)
६. अतुल वासन, भारतीय क्रिकेटपटू (१९६८)
७. मंजेश्वर गोविंद पै, राष्ट्रकवी ,भाषा संशोधक (१८८३)
८. करण साव्हणे, भारतीय फुटबॉलपटू (१९९२)
९. जेम्स ब्राडले, खगोलशास्त्रज्ञ (१६९३)
१०. लुडविग फड्डीव्, रशियन गणितज्ञ (१९३४)

मृत्यु

१. भगतसिंग , भारतीय क्रांतिकारक (१९३१)
२. शिवराम हरी राजगुरू , भारतीय क्रांतिकारक (१९३१)
३. सुखदेव थापर , भारतीय क्रांतिकारक (१९३१)
४. मार्सलो टाॅर्क्यूटो दे अल्वेर, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
५. ऑर्थर डा सिल्वा बर्णार्ड्स, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९५५)
६. गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते (२००८)
७. अब्दुल्लाही युसुफ अहमद, सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१२)
८. अडोल्फो सुरेझ, स्पेनचे पंतप्रधान (२०१४)
९. हांस वर्नर रीच्टर, जर्मन लेखक (१९९३)
१०. रेने एनरीक्विझ, अमेरिकेन अभिनेता (१९९०)

घटना

१. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारतीय क्रांतिकारकांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली. (१९३१)
२. लिथूनियाने अधिकृतरित्या आपले स्वातंत्र्य जाहीर केले. (१९१८)
३. जपानी सैन्याने अंदमान निकोबार बेट काबिज केले. (१९४२)
४. सुडानला स्वातंत्र्य मिळाले. (१९५६)
५. वाढत्या covid 19 च्या प्रादुर्भावामुळे साऊथ आफ्रिका तसेच अमेरिकेने संपूर्ण लॉकडाऊन घोषीत केले. (२०२०)
६. पाकिस्तान जगातील पहिले इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९५६)

महत्त्व

१. शहीद स्मृतिदिन 
२. जागतीक हवामान दीन

दिनविशेष २२ मार्च || Dinvishesh 22 March ||


जन्म

१. रॉबर्ट ए. मिलिकण, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१८६८)
२. मधुसूदन कालेलकर, नाटककार (१९२४)
३. एमिलियो अगिनाल्डो, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
४. संदीप पंपल्ली, चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७९)
५. पॉल फुस्सेल, अमेरिकन इतिहासकार (१९२४)
६. अबोल्हासन बनिसदे, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९३३)
७. कॉर्णेलीस टी एलाउत, डच अर्थमंत्री (१७६७)
८. आल्फ्रेड प्लोट्स, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६०)
९. सूर्या सेन, स्वातंत्र्यसेनानी (१८९४)
१०. आदित्य सील, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)

मृत्यु

१. कांता राव, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
२. इतींने बोबिल्लायर, फ्रेंच गणितज्ञ (१८४०)
३. प्रभाकर पाध्ये, पत्रकार (१९८४)
४. ए के गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेते (१९७७)
५. उपपालौरी गोपाला कृष्णमूर्ती , भारतीय तत्ववेत्ता (२००७)
६. ग्लोरिया होल्डन, अभिनेत्री (१९९१)
७. सी के चंद्रप्पान, भारतीय राजकीय नेते (२०१२)
८. निसार बाझमी, संगीत दिग्दर्शक (२००७)
९. डेव्हिड स्ट्रिकलॅड , अमेरिकन अभिनेता (१९९९)
१०. जेम्स डब्ल्यू ब्लॅक, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर (२०१०)

घटना

१. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला. (१९९९)
२. भारताने शालिवाहन शके कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१९५७)
३. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९७७)
४. इंटेलने पेन्टियम प्रोसेसर 64 बिट्स लॉन्च केले. (१९९३)
५. Covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वत्र लॉकडावून करण्याचा निर्णय घेतला. (२०२०)

महत्त्व

१. जागतिक पेय जल दिवस

दिनविशेष २१ मार्च || Dinvishesh 21 March ||


जन्म

१. राणी मुखर्जी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७८)
२. जॉर्ज डी बिरखोफ, अमेरिकन गणितज्ञ (१८८४)
३. बिस्मिल्ला खान, भारतरत्न शहनाई वादक (१९१६)
४. अली अब्दुल्ला सलेह, येमनचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
५. जैर बोल्सनारो, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९५५)
६. मानवेंद्रनाथ रॉय, क्रांतिकारक (१८८७)
७. सचिन अहिर, भारतीय राजकीय नेते (१९७२)
८. बुटा सिंघ, भारतीय राजकीय नेते (१९३४)
९. रोनाल्डोने गाऊचो, ब्राझिलियन फुटबॉलपटू (१९८०)
१०. बाळाजी प्रभाकर मोडक, कालजंत्रीकार (१८४७)

मृत्यु

१. दिनकर पाटील, चित्रपट दिग्दर्शक लेखक (२००५)
२. यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार (१९७३)
३. जिबेन बोस , भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५)
४. घडालपे विक्टरिया, मेक्सिकोचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८४३)
५. उमर विरांदिकुसुमह, इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती (२००३)
६. पिटर स्तोनेर, अमेरिकेन गणितज्ञ (१९८०)
७. शिवानी, भारतीय लेखिका (२००३)
८. शंकर घाणेकर , नाटककार (१९७३)
९. बाळ गाडगीळ , लेखक (२०१०)
१०. अँथोनी स्टील, ब्रिटीश अभिनेते (२००१)
११. डॉक रंबो , अमेरिकेन अभिनेता (१९९४)

घटना

१. इराणने खोर्शिदी सोलर हिजरी कॅलेंडर स्वीकारले. (१९२५)
२. जळगाव महानगरपालिकेची स्थापना झाली. (२००३)
३. पर्सियाचे नाव इराण करण्यात आले. (१९३५)
४. पेशावर येथे झालेल्या कार बॉम्बमध्ये दहाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर तीसहून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)
५. भारतात लावलेली आणीबाणी संपली. (१९७७)
६. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात अफगाणिस्तान येथे तीसहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१८)


महत्त्व

१. जागतीक मतिमंदत्व दिवस 
२. विषववृत्त दीन
३. विश्व वंशभेद निर्मूलन दिवस
४. जागतीक वन्य दीन
५. आंतरराष्ट्रीय रंग दीन
६. जागतिक कविता दिवस

दिनविशेष २० मार्च || Dinvishesh 20 March ||


जन्म

१. अल्का याग्निक, पार्श्वगायिका (१९६६)
२. रेन कॉटी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८८२)
३. अल्फान्सो गार्सिया रोबल्स, नोबेल पारितोषिक विजेते मॅक्सिकन राजकिय नेते (१९११)
४. रुडॉल्फ किर्चचलेजर, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१५)
५. गायत्री जोशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७७)
६. सर्गेई पेट्रोविच नोविकोव, रशियन गणितज्ञ (१९३८)
७. ब्रायन मुलरोने, कॅनडाचे पंतप्रधान (१९३९)
८. मदन लाल , भारतीय क्रिकेटपटू (१९५१)
९. आनंद अर्मित्रज, भारतीय टेनिसपटू (१९५२)
१०. वसंत कानेटकर, नाटककार (१९२०)

मृत्यु

१. बाळ सीताराम मर्ढेकर, कवी लेखक (१९५६)
२. मोहम्मद बिन तुघलक , दिल्लीचा सुलतान (१३५१)
३.  खुशवंत सिंग, भारतीय पत्रकार (२०१४)
४. ज्युलियस रॉबर्ट विन मयेर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८७८)
५. लजोस कोस्सुठ, हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष (१८९४)
६. वेनस्शनो कॅरांझा, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९२०)
७. ईवन विनोग्राडव, रशियन गणितज्ञ (१९८३)
८. सोबन बाबू, भारतीय चित्रपट अभिनेते (२००८)
९. अँकर जोर्जन्सन, डेन्मार्कचे पंतप्रधान (२०१६)
१०. मल्कम फ्रासेर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (२०१५)

घटना

१. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. (१९२७)
२. अलेस्सांद्रो वॉल्ट यांनी इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध लंडनच्या राष्ट्राध्यक्षना पत्राद्वारे सांगितला. (१८००)
३. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. (१६०२)
४. ESRO (European space Research organization) ची स्थापना झाली. (१९६४)
५. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. (२०२०)
६. रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकेची स्थापना करण्यात आली. (१८५४)

महत्त्व

१. जागतीक चिमणी दिवस

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...