मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० मार्च || Dinvishesh 30 March ||


जन्म

१. वसंत आबाजी डहाके, कवी लेखक (१९४२)
२. राजीव प्रताप रुडी, भारतीय राजकीय नेते (१९६२)
३. हेनरी रुबेन्स, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६५)
४. हज अली राझमारा, इराणचे पंतप्रधान (१९०१)
५. शरदेंदू बंदोपाध्याय, बंगाली लेखक (१८९९)
६. भीमराव पांचाळे, मराठी गझल गायक (१९५१)
७. सेन्सू ताबोने, माल्टाचे पंतप्रधान (१९१३)
८. देविका राणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९०८)
९. नोराह जोन्स, अमेरिकेन गायिका (१९७९)
१०. अभिषेक चोब्बे, पटकथालेखक (१९७७)

मृत्यु

१. ग वा बेहेरे, सोबत साप्ताहिकाचे संपादक (१९८९)
२. कार्ल मे, जर्मन लेखक (१९१२)
३. आल्फ्रेड कोविल्ले, फ्रेंच इतिहासकार (१९४२)
४. लेओन ब्लुम, फ्रान्सचे पंतप्रधान (१९५०)
५. रघुवीर मुळगावकर, सुप्रसिद्ध चित्रकार (१९६)
६. वासुदेव गोविंद मायदेव, कवी (१९६९)
७. जिन टूमर, अमेरिकेन लेखक (१९६७)
८. आनंद बक्षी, संगीत दिग्दर्शक, गीतकार (२००२)
९. नूतन प्रसाद, टाॅलीवूड चित्रपट अभिनेते (२०११)
१०. दत्ताराम हिंडलेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४९)

घटना

१. सोव्हिएत युनियनने ऑस्ट्रियावर हल्ला केला. (१९४५)
२. इंग्लंड आणि भारता दरम्यान हवाई टपाल सेवा सुरू करण्यात आली. (१९२९)
३. दलाई लामा यांनी चाईनामधून पलायन केले आणि भारतात शरण घेतली. (१९५९)
४. जनरल लुडविक स्वोबोडा हे झेकोस्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८)
५. पी जे पॅटरसन यांनी जमैकाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९९२)
६. वीर मुरारजी हे पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना धारातीर्थी पडले. (१६६५)

महत्त्व

१. जागतिक डॉक्टर दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...