नाती

नाती येतात आयुष्यात
सहज निघुनही जातात
मनातल्या भावना अखेर
मनातच राहतात

कोणी दुखावले जातात
कोणी आनंदाने जातात
नात्याची गाठ अखेर
सहज सोडुन जातात

निस्वार्थ नाती खुप आठवतात
स्वार्थी नाती उगाच सलत राहतात
जीवनाचा हिशोब मात्र
ही नातीच चुकवून जातात

काही नाती क्षणभर राहतात
काही नाती आयुष्यभर असतात
सोबत म्हणुन कोणीतरी
ही नातीच हवी असतात

मी म्हणुन नाती नसतात
प्रेम म्हणुन नाती राहतात
एकांतात बसुनही मनात
नातीच गोंधळ घालत असतात

काही नाती बोलुन जातात
काही नाती अबोल असतात
मनातल्या भावना अखेर
मनातच राहतात

हरवलेले पत्र

हरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का
खुप काही लिहलंय मनातल
आता कोणी वाचेन का

काळाच्या धुळीत मिसळुन
सगळं काही संपलय का
शोधुनही सापडेना काही
वाट मी चुकतोय का

जड आहे भावनिक ओझे
कोणी हलके करतेय का
अश्रूंचा ही एक थेंब मला
आज पुन्हा रडवतोय का

पुसट झाली शब्द सारी
आठवण आज तशीच का
जीर्ण झाले पत्र सारे
वाट कोणी पाहतेय का

हरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का

मनातल प्रेम

मला काही ऐकायचंय
तुला काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंय

लाटां सोबत दुर जाताना
डोंगराशी भेटायचंय
आठवणींच्या नदीला
समुद्राशी बोलायचंय

थोडंसं सुरांना घेऊन
थोडंस कवितेत गायचंय
प्रेमाच्या या संगिताला
पुन्हा पुन्हा ऐकायचंय

कधी शांत वाटेवर
कधी उन्हात जायचंय
जीवनाच्या प्रवासात
तुझ्या सोबत चालायचंय

अबोल या डोळ्यांना
खुप काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंय

माझ्यातील ती

मी पाहिलय तुला
माझ्या डोळ्या मध्ये
समोर तु नसताना
माझ्या आसवांना मध्ये
झुरताना मनातुन
माझ्या कविते मध्ये
शब्दाविना गुणगुणत
माझ्या गाण्या मध्ये

हो सखे, मी पाहिलय तुला
खळखळ वाहणार्‍या नदीमध्ये
सळसळत जाणार्‍या
वार्‍या मध्ये
रात्रीच्या आकाशातील
चांदण्या मध्ये
आणि ग्रीष्मात पडणार्‍या
पावसा मध्ये

हो सखे, मी पाहिलय तुला
मी नसताना माझ्या मध्ये
आठवणीतल्या  गावामध्ये
ह्रदयात रहाणार्‍या श्वासा मध्ये
अबोल राहुन माझ्या प्रेमा मध्ये

हो सखे,  मी पाहिलय तुला

एक बात

एक बात छुपी है दिल में
दर्द की चादर ओढे
कुछ शिकायतें हैं उसे
कोई तो आ के कहे
ये सन्नाटे की रात
हर तरह से बढे
गहरे अंधेरो में मुझे
कोई यु ही ना छोडे
वो लफ्ज है ठहरे
रोशनी की राह देखे
केह दो उने की
दर्द से नाता जोडे
सुबह का इंतजार किसे
जो अपना ही भूले
वो प्यार ही गुमशुदा
जिसमें अपना ही न मिले
फिर क्यूँ है ये दर्द
हर आसुओं में दिखे
कैसे सहे ये जख्म
कोई तो आ के कहे

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...