आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||


भाग ११

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,
"कोण ??"
"नमस्कार काका , मी सदाशिव , समीर दादा आहेत का ?? मी गाडी घेऊन आलोय!!"
"हो आहेत या !! पुण्याला जाण्यासाठीच एवढी तयारी चालू आहे !! बसा ईथे !! एक तासाभरात निघुयात आपण !! "
"ठीक आहे काक !! " सदाशिव शेजारीच ठेवलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला.

घरातली सगळी आवरा आवर झाल्यानंतर समीर काही राहील तर नाहीना पाहायला खोलीत आला, शीतल तिथे आधीच आवरत होती. समीरला पाहून ती थोडी गोंधळली, अचानक आपल्या जागेवर बसून राहिली. ती काहीतरी लपवते आहे हे कळायला समीरला वेळ लागला नाही.
"शीतल !! झालं ना तुझं आवरून??"
"हो !! झालंच आहे !! " शीतल स्वतःला सावरत म्हणाली.
"काय ग ?? बरी आहेस ना ??"
समीर असे म्हणताच शीतलने समीरला मिठी मारली. 
"ये शीतल !! काय झालंय सांग तरी ??"
"मला तुझ्याशिवाय नाही मन लागणार तिथे !! मी दाखवत नाही पण मी नाही राहू शकत समीर तुझ्याशिवाय !! "
"होका !! मग नको जाऊस !!"
"हो नाही जात मी !! सांगून टाकते बाबांना नको मला काही !! मला फक्त तू हवा आहेस !! तुझ्या सोबत माझं सगळं कुटुंब मला हवं आहे !!" 
शीतल खोलीतून बाहेर जाण्यासाठी निघते समीर तिला आपल्या जवळ करत बोलू लागतो.
" शीतल !! अस भावनिक नको बोलुस !! हे बघ आयुष्यात प्रत्येक रंग हे खूप महत्त्वाचे असतात, कधी प्रेम , कधी दुरावा, कधी एकांत तर कधी गर्दी.सगळं काही हवं असतं आपल्याला. म्हणूनच तर आयुष्य जगण्याची वेगळीच मजा येते. आज भलेही आपण एकमेकांपासून दूर असू , पण यामुळेच आपल्याला आपल्या बद्दलच प्रेम कळलं, नाही का ?? उद्या पुन्हा आपण एकत्र येऊ. आणि असही मी आणि तू शरीराने दूर असू पणं आपलं मन ,ते आहेच की अगदी एकमेकांत गुंतलेलं, आहे ना ??" समीर थोड हसत म्हणाला.
शीतल गालातल्या गालात हसत समीरकडे पाहत राहिली. थोड्या वेळाने बाबांनी बाहेरून समीरला हाक मारली. समीर पटकन बाहेर गेला. समोर सदाशिवला पाहून म्हणाला,

"सदा !! अरे कधी आलास तू ?? "
"आत्ताचं आलो दादा !! "
"बरं !! चला सगळं सामान ठेवूयात गाडीत आणि निघुयात!!"

सगळं सामान गाडीत ठेवल्यानंतर समीर ,शीतल ,आई बाबा आणि त्रिशा पुण्याला निघाले. गाडी सुसाट वेगाने पुण्याकडे निघाली. गाडीत बसलेली शीतल खिडकीतून पाहता पाहता नकळत आपल्या विचारात गुंग झाली,

" सगळं कसं क्षणात नीट झालं ना ?? बाबांच्या एका निर्णयाने माझ्यातला आणि समीर मधला दुरावा , कडवटपणा क्षणात नाहीसा झाला. यापूर्वीच मी हा विषय बाबांना बोलले असते तर आजपर्यंत हे सगळं घडलच नसतं. पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते तसच काहीस झालंय माझं. पहिल्यांदा उगाच आई न होण्याचा निर्णय , पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि मी आई झाले. पुन्हा त्रिशाला एकटं सोडून यायचा निर्णय.  सगळं नकळत घडतं गेल. पण असो, जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं म्हणायचं . नाहीतर मला कस कळलं असतं की हे सगळे माझ्यावर किती प्रेम करतात ते. पण आता यापुढे अजिबात अस करणार नाही मी !! आई बाबा , समीर यांना विश्वासात घेऊनच आता कोणताही निर्णय घेणार आहे. " 
शीतल त्रिशाच्या आवाजाने भाणावर आली. समोर पाहते तर बाबा आणि त्रिशा खेळण्यात दंग झाले होते, बाबा जणू लहान मुलासारखे तिच्यासोबत खेळत होते. 

संध्याकाळी गाडी पुण्याला पोहचली. सगळे सामान फ्लॅटवर ठेवून आवरा आवर करुन सगळे दमले. बाबा आणि समीर उद्या गावी परत जायचं ठरलं. शीतल ऑफिसला निघाली की ते निघणार होते. रात्री सगळे केव्हा झोपी गेले कळलही नाही.

सकाळची सुरुवात त्या एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये त्रिशाच्या दंगामस्तीने झाली. आई सगळ्या फ्लॅट मध्ये फिरून पाहणी करत होती.  शेजारी कोण आहेत त्यांच्याशी बोलत होती.  शीतलला आज त्या फ्लॅट मध्ये राहावंसं वाटतं होत. शीतल त्या गडबडीतही ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. बाबा समीरही परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी तयार होत होते. आई सर्वांसाठी नाष्टा तयार करत होती. तिला या सगळ्या नवीन गोष्टींना क्षणात जुळवून घ्यायचं होत. 

"समीर !! " शीतल सगळं आवरून बाहेर येत हाक मारू लागली.
"हा शीतल ?? बोल !!"
"अरे काही नाही !! मी निघते आता !! तुम्ही रहा ना आजुन दोन तीन दिवस , आईनाही तेवढीच सोबत होईल !! अगदीच अचानक सगळा बदल मग त्यांना करमणार नाही इथे !!"
"शीतल !! तू नको काळजी करुस !! माझी नात आहेना सोबत माझ्या !! मग मला काही वाटणार नाही !!" आई मध्येच हसत म्हणाली.
"आणि शीतल माझी आजचीच रजा आहे !! मलाही उद्या ऑफिस जॉईन करायचं आहे !!" समीर त्रिशाला कडेवर घेत म्हणाला.
"आता मला रहा नको बर म्हणुस !! नाहीतर माझा पाय नाही निघणार इथून !!" बाबा शीतलला हसत म्हणाले.
"मग नकाना जाऊ बाबा !!"
"समीर सोबत जाव लागेल शीतल !! " बाबा आपले अश्रू लपवत म्हणाले.
"ठीक आहे बाबा !! मी येऊ आता !! तुम्ही निवांत निघा गावी !!"
"हो शीतल !!" 

शीतल ऑफीसला जायला निघाली. दारात क्षणभर अडखळली. मागून नकळत तिला एक आवाज आला,
"आई !!"
समीर ,आई , बाबा सगळे आश्चर्याने पाहू लागले.
"आऽ ... ई !!! " त्रिशा अडखळत , बोबड बोलत शीतलकडे पाहून बोलत होती. जणू तिला बोलवत होती. 
"आऽ.... ई !!!" त्रिशा पुन्हा पुन्हा अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होती.
 
शीतल क्षणभर जागेवर तशीच उभा राहिली. तिला काय बोलावं काहीच कळलं नाही. क्षणात ती धावत त्रिशाकडे आली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जणू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिने तिला आपल्या जवळ घेतलं. तिचे कित्येक मुके घेतले. समीर , बाबा ,आई सगळ्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. सगळे आनंदाने त्या दोघींना पाहू लागले.
"म्हण !! पुन्हा म्हण त्रिशा !! माझे कान या शब्दासाठी आसुसले आहेत !! "
त्रिशा पुन्हा पुन्हा शीतलकडे पाहून आई म्हणत होती. जणू ती तिला सोडायलाच तयार नव्हती. 
"समीर तू ऐकलस ना !! आपली त्रिशा मला आई म्हणाली !! आई तुम्ही पणं ऐकलंय ना !! "
"हो शीतल !! हो !!"  आईनी शीतलला जोरात मिठी मारली. 

सगळे या प्रसंगाने आनंदून गेले. शीतल आनंदाने आपल्या ऑफिसला निघाली. बाबा आणि समीर आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. पुन्हा परत एकत्र येण्यासाठी. 

* समाप्त *

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...