माझ्या भावुराया ..!!

एक बहिण म्हणुन आता
मला एवढंच सांगायचं आहे
रक्षण करणाऱ्या माझा भावाला
थोडसं बोलायचं आहे

करायचं असेल रक्षण माझ
तर मला वचन हवं आहे
प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा
समाज मला पाहायचा आहे

उदरातच मला मारणाऱ्या हातांना
थांबवणारा बाप मला हवा आहे
एक मुलगी म्हणून या समाजात
सोबतीने चालणारा मित्र पाहिजे आहे

नजरेचे कित्येक घाव माझ्यावर
रोजच मी सोसते आहे
त्याच नजरेत रे भावूराया मला
स्त्रीचा सन्मान केलेला पाहायचा आहे

आई , बहिण अशा कित्येक नात्यात
तु मला रोजच पाहतो आहे
कधीतरी एक स्त्री म्हणून माझ्याकडे
तु एकदा पाहायची गरज आहे

एवढीच एक छोटी मागणी
तुझ्याकडे मी करते आहे
एक बहिण म्हणून मी आता
एवढंच मागते आहे !!!

✍योगेश

भारतीय

  15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीतील मुक्त झाला. कित्येक आंदोलने झाली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले याचा आनंद होताच पण  भारताची फाळणी झाली याच दुःखही होत. स्वतंत्र भारतात कित्येक जुनी सस्थाने होती त्यांना एकत्र करणे तितकेच महत्त्वाचे होते. भाषावार प्रांतरचना करून भारत एक देश म्हणून जगासमोर आला.

स्वतंत्र भारता समोर त्यावेळी कित्येक प्रश्न होते. फाळणीचे कित्येक घाव सोसून भारत आता नव्या वाटा पाहू लागला होता. अशाच या भारतचे पुढे सविंधान लिहिले, २६ जानेवारी १९५१ ला या देशाचे प्रजास्तक देश म्हणू नव्याने ओळख झाली.

1962 ला भारत चीन युद्ध सुरू झाले त्यानंतर पुढे 1965 लही भारत पाक उद्धाला सुरुवात झाली. स्वतंत्र भारत त्यावेळी परकीय सत्तेविरूद्ध लढत होता. नंतर 1971 ला भारत पाक पुन्हा युद्ध झाले आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली त्यावेळी पाकिस्तान पुन्हा विभाजित झाला. आणि त्या लढाईत भारत विजयी झाला.

पुढे भारताने काही दिवसात अणुबॉम्ब चाचणी करण्यास सुरुवात केली आणि साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले. 1975 77 च्या काळात भारतात आणीबाणी लागू केली गेली.

पुढे जसजशी वर्ष जाऊ लागली तशी भारताची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या जगात सुधारू लागली. भारतचे पहिले satellite "आर्यभट्ट"  आकाशात झेपावले. पुढे slv 3 हे संपूर्ण भारतीय बनावटीचे satellite तयार केले गेले. 1998 मधे भारताने यशस्वी रित्या अणुबॉम्ब चाचणी पोकरान येथे केली आणि भारत एक मजबूत देश झाला.

जागतिक दृष्टया भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या नंबर आहे , लोकसंख्येच्या दृष्टीने 2 र्या आणि भारताचे सैन्य ताकद जागतिक दृष्ट्या चौथ्या नंबर वर आहे . आर्थिक दृष्ट्या आज भारताची gdp 7.7 % आहे.

आज भारत technology मध्ये कित्येक पावले पुढे , अंतराळ संशोधन मध्ये भारताची एक वेगळीच छाप आहे , इस्त्रो ही संस्था कित्येक वर्ष यासाठी कार्यरत आहे , भारत आज जगातील व्यापारात पुढे आहे , भारताला एक तृतीयांश भाग समुद्र पट्टी लाभली आहे. ज्याचं जास्त वापर व्यापारी दृष्ट्या केला जातो.

भारत तसा तर संस्कृतींचा देश , इथे कित्येक संस्कृती पाहायला मिळतात, विभिन्न सासंकृती त्याच्या भाषा तसेच त्याचे वेगेल्पण लगेच पाहायला मिळते , हिंदू ,शीख, मुस्लिम तसेच अनेक धर्माच्या संकसृती इथे पाहायला मिळतात. तसेच विभिन्न भाषा मराठी हिंदी , संस्कृत , तमिळ ,गुजराती अशा कित्येक भाषा बोलल्या जातात.

अश्या विविधतेने नटलेल्या देशाबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे . आजच्या काळात भारत जागतिक पातळीवर स्वतःची. एकवेगळी प्रतिमा निर्माण करतो आहे.

सोसले कित्येक घाव फाळणीचे
आजही ती सल मनात आहे
पाहिला सूर्योदय स्वातंत्र्याचा
त्यास नमन करतो आहे

मुक्त श्वास होता मुक्त पावले होती
पण एक होऊन राहायचे आहे
या भारत देशास सरवसावे आज
गीत गायचे आहे

अभिमान , मान , शान देश आपला
त्यास प्रगती पथावर न्यायचे आहे
या जगात भारत देश आपुला
सर्वात पुढे पाहिजे

मिळवले स्वातंत्र्य त्यांनी
आपणास घडवायचे आहे
हा भारत देश प्रिय आपुला
त्यासाठी खूप काही करायचे आहे ...


हे भारत देशा ..!!

देश , भारत देश .. विविधतेने नटलेला आपला भारत देश ..

अनेक जाती ..
अनेक धर्म..
अनेक भाषा ..
तरही एक , आप ला भारत देश ..

आपल्याच या देशाचं गुणगान तरी किती गावं
मनातल्या शब्दांना तेव्हा कवितेत मांडावं..

हे भारत देशा..!!

किती वरणु सौंदर्य तुझे
किती सांगू साहस
किती बोलू भाव तुझे
किती शब्द ही निरागस

कणाकणात बसल्या इथे
थोर पुरुषांच्या गाथा
किती आठवू ते विरपुरूष
ज्यांनी अर्पिले सारे जीवन

हिमालयात पांघरूण शाल पांढरी
नटलास माझ्या भारत देशा
पायथ्याशी तुझ्या तेव्हा
क्षणाक्षणाला जलाभिषेक आहे

किती लिहिले तुझ्याचसाठी
कितीही बोलले राष्ट्रप्रेम
मनात तुझ्याचसाठी क्षणाक्षणाला
अभिमान वाढतोच आहे

अनेक भाषा बोलतात इथे
अनेक धर्म सुखात आहेत
या सर्वांस कवेत घेऊन
हे भारत देशा ,
तू विविधतेने नटलेला आहे..!!

✍योगेश

अधुरे स्वप्न !!!

  "कुठेतरी ती सांज तुझी आणि माझी वाट पहात असेलच ना !! तो खळखळ आवाज करणारा समुद्र !! त्याच्या त्या लाटा आजही तुझ्या आणि माझ्या येण्याची वाट पाहत असतीलच ना !! तो मावळतीकडे जाणारा सूर्य कदाचित उद्या मला एकटा पाहून कित्येक प्रश्न विचारेल !! त्याला मी काय उत्तर द्यावं!! हे तरी सांगून जा !! ज्या वळणावरती आपण रोज भेटायचो तिथे मी एकटाच कित्येक दिवस तुझी वाट पाहत बसलो तर त्या वाटेवरचे ते पारिजातक माझ्यावरच रुसून बसेल ना!! मग आयुष्यभर साथ देण्याच वचनं दिलेली तू मला एकांताच्या या काळया रात्रीत का सोडून जावीस !! सांग ना ??" त्या अबोल सायलीकडे पाहून कित्येक वेळ सोहम एकटाच बोलत होता. आपल्या मनातलं सारं काही तिला सांगत होता.
सायली एकटक फक्त त्याच्याकडेच पाहतच होती. कित्येक वेळ शांत होती. सोहम फक्त तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतं होता.
"सायली हा तुझा अबोला मला खरंच खूप त्रास देतोय !! बोल काहीतरी !! शेवटचं एकदा मनातलं सगळं सांगून टाक मला !! कदाचित तुझ्या या बोलण्याने माझ हे हृदय तू नसताना रडणार तरी नाही!! "
"मला खरंच कळतं नाहीये रे सोहम मी काय बोलावं !! तुझ्या असण्याने मला पूर्णत्व आहे !! माझ्या कित्येक भावना तुझ्याशीच बोलतात रे !! पण माझ्या सोबत कदाचित तुझ्याही आयुष्याला काही अर्थ नसेल !! तुला अजुन खूप काही करायचं आहे !! मला त्यात गुंतवू नकोस एवढंच सांगेन मी तुला !! " सायली डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.
"पण का ?? कालपर्यंत आयुष्यभर सोबत राहायचं वचन देणारे आपण आज काय झालं की वेगळं व्हावं ??" सोहम कित्येक मनातले भाव शब्दात आणत होता.
" मी नाही सांगू शकत तुला सोहम !! पण कदाचित आपण वेगळं होण चांगलं !! कदाचित मलाही !! आणि तुलाही !! माझ्या या आयुष्याची कथाच वेगळी आहे !! नियती कदाचित माझ्याशी कित्येक डाव मांडून बसली आहे !! मी यात गुरफटून गेले !! आणि कदाचित यातून कधी बाहेर पडेल असे वाटत नाही !! " सायली सोहमचा हात हातात घेत म्हणाली.
"मला हेच कळतं नाही!! प्रत्येक गोष्ट आपण एकमेकांना सांगणारे आज अस काय झालं की तू काहीतरी माझ्यापासून लपवते आहेस !!" सोहम.
"काही गोष्टी आपल्या सोबतच गेल्या तर बरं असतं सोहम !! त्याने समोरच्या व्यक्तीला त्रास कमी होतो !!" सायली सोहमच्या डोळ्यात पहात म्हणाली.
"पण तू सोडून जाते आहेस यापेक्षा मोठा त्रास कोणता असेल मला !!!सायली आयुष्यभर हे मन मला खात राहील !!" सोहम डोळ्यातले अश्रू पुसुत म्हणाला.
"मला विसरून जा सोहम !! एवढंच म्हणेल मी !! माझ्या नसण्याने या हृदयाला तू उगाच त्रास नकोस करून घेऊ !! "
"इतकं सोपं असतं ते ??"
"कदाचित इतकं अवघडही नसेल सोहम !!"
"तू विसरून जाशील मला ??"
"हो !!"  सायली सोहमच्या नजरेस चुकवून म्हणाली.
"आपण ज्याला सर्वस्व मानलं !! ज्याला आपण आपलं हृदय दिलं !! त्याला इतकं सोप असतं विसरण ??" सोहम स्वत:ला सावरत म्हणाला.
"मनाला समजवाव लागतं !! ते कदाचित हट्ट करत पण त्याला शांत करावं लागतं !! या मनाचं तरी किती ऐकावं आपण !! " सायली सोहम पासून लांब जात म्हणाली.
"कदाचित सायली तुझा निर्णय झालाय !! तू फक्त सांगायला आलीस ना??"
"हो !! मला यापुढे कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नकोस !! कारण मी तुला सापडणार नाही !! शोधायचं असेल तर त्या चांदण्यात शोध मी तिथेच असेल तुझ्यावर प्रेम करतं !! " सायली आकाशाकडे पाहत म्हणाली.
"हे बघ तू काय म्हणतेय मला काही कळत नाही !! पण मला वाटतं तू जावू नयेस !! " सोहम तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.
"सोहम मला जावच लागेल रे ! माझ्याकडे वेळ नाहीये !! " सायली आपला हात सोडवत म्हणाली.
"म्हणजे काय ??"  सोहम जाणाऱ्या सायलीकडे फक्त बघत राहिला.
कित्येक वेळ फक्त पाहत राहिला. त्या एकांतातल्या काळोखास बोलत.
"वेळ नाही म्हणजे !!! नक्की म्हणायचं तरी काय आहे सायली तुला ?? माझ्यासाठी वेळ नाही की!!! प्रेमाच्या या वाटेवर तू मला अस का सोडून गेलीस ते तरी सांगायचं होतस!! हक्काने प्रेम केलं होतस मग एवढाही हक्क ठेवला नाहीस तू मला, की मी तुला पुन्हा बोलावून घ्यावं. सायली हे प्रेम असेच असते का ग??? आपल्याला  वाटेल तेव्हा आपण एखाद्यावर करायचं आणि वाटेल तेव्हा त्याला एकटं टाकून निघून जायचं !! पण बघ ना सायली !! तुझ्यावर रागावू की तू गेल्याच दुःख मनात ठेवू!! तू का गेलीस सोडून हेच मला कळलं नाही !! तुझ्याकडे वेळ नाहीये !! पण तो माझ्यासाठी का अजुन काही?? ते तरी सांगायचं !! पण नाही. या एकट्या काळोखात मला अखेर तू एकटं सोडून गेलीसच!! " सोहम कित्येक वेळ शांत बसून होता.
जणू कित्येक वेळ गालावरचे अश्रू त्याला बोलत होते..

विसरून जाशील मला तू
की विसरून जावू तुला मी
भाव या मनीचे बोलताना
खरंच न कळले शब्द ही

वाट ती रुसली माझ्यावरी
की वाट ती अबोल तुलाही
वळणावरती ते पारिजातक
सुकून गेले ते फुलंही

ती सांजवेळ शोधते तुला
की त्या सांजवेळेस सोबती मी
समुद्राच्या कित्येक ओढीस
बोलते ती लाटही

न तुला पाहिले मी
की मला शोधले तू
काळया रात्रीस या मग
बोलतो तो एकांतही

आठवणीत शोधतो मी
की आठवणीत राहतेस तू
अबोल या नात्याचे आपुल्या
अधुरेच राहिले स्वप्नही..!!

✍योगेश खजानदार

मैत्री✍

हक्काने भांडावं असं
कोणीतरी हवं असतं
हक्काने बोलावं असं
कोणीतरी जवळ लागतं

कोणीतरी अलगद आपल्या
जीवनात तेव्हा येत असतं
मित्र असे त्या नात्यास
नाव ते मग देत असतं

दुःखात आपले अश्रू पुसायला
कायम ते सोबत असत
सुखात मात्र आनंदाने नाचायला
सर्वांच्याही पुढे असतं

एक नात मैत्रीचं हे
आयुष्य सार व्यापून टाकत असतं
कधी पावसात सोबती तर
कधी उन्हात सावली होत असतं

न राहवून आठवणीत
खूप काही बोलत असतं
लांब राहूनही हे नात
सतत साथ तेव्हा देत असतं

✍योगेश खजानदार

चारोळी

तुझ्या नसण्याची ती सल मनी
उगाच मला सतावते आहे
राहते एकांती हरवून तुझ्यात
स्वप्नात तुला बोलते आहे..!!

मास्तर ..✍

" रोजच्याच धावपळीत आजूबाजूलाही पाहायला वेळ नसलेल्या आपल्या लोकांना आयुष्य काय असतं हे कधी कळलंच नाही. 'तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून रोज पहावं!!' असं म्हणणाऱ्या आमच्या मास्तरांची शिकवणं काही वेगळी असायची. आपण अगदी चाळिशीत गेलो डोक्यावरचे छप्पर उडाले पण डोक्यातले संस्कार मात्र मास्तरांनी अगदी गाय दावनीला बांधावी तसे आयुष्यभर आपल्या मनाला बांधून ठेवावेत इतके ते घट्ट आहेत. आयुष्यात पुढे गेल्यानंतर अचानक आपले मास्तर आपल्या समोर दिसावे आणि जुन्या गोष्टी पुन्हा आठवाव्या अस काहीस मला झालं. कडक शिस्त , शिकवणं आणि कित्येक गोष्टी यामुळे शाळेतले मास्तर आपल्या नेहमीच लक्षात राहतात. आज अचानक समोर दिसल्यावर हातात एक काठी, भिंगाचा मोठा चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या ,पण एक मास्तर म्हणून असलेलं तेज तसचं पहाताना जवळ जावून त्यांच्याशी भेटण्याचा मोह झाल्यावाचून राहत नाही." समोरच उभ्या मास्तरांना पाहून मंदारच्या मनात कित्येक विचार आले.
"गुरुजी!" मास्तरांच्या जवळ जावून मंदारने हाक मारली.
गुरुजी किंचित मागे वळले. आपल्या भिंगाचा चष्म्यातून पाहत बोलले.
"कोण ??"
मंदार एक क्षण थांबून.
"गुरुजी !! मी मंदार!! मंदार सुभेदार !! तुमचा विद्यार्थी !!" मंदार त्याच्या समोर येत म्हणाला.
"मंदार सुभेदार !! म्हणजे इयत्ता सातवी ते दहावी !! " इतक्या वर्षा नंतरही मास्तरांनी मंदार किती इयत्ता त्याच्या वर्गात होता हे अगदी अचूक सांगितलं.
"हो !! तोच मी !!" मंदार मास्तरांना म्हणाला.
"किती वर्षांनी भेटलास मंदार !!शाळा संपली आणि महाविद्यालयात गेलास तेव्हा तरी भेटी व्हायच्या !!पण पुढे भेटीही विरळच झाल्या !!" मास्तर मंदारला निरखत म्हणाले.
"मध्यंतरी गावाला येऊन गेलो होतो !! तेव्हा भेटायचं म्हटलं होतं !! पण तुम्ही निवृत्त झाल्याचं कळाल!!" मास्तर आणि मंदार शेजारीच असलेल्या बाकड्यावर बसले.
"अरे !! निवृत्त झाल्यावर गावाकडे मनच लागेना !! म्हणून इकडे आलो!!
"होका !!" मंदार.
"बाकी कुठं असतोस हल्ली ??"  मास्तर काठी शेजारी ठेवतं बोलले.
"ठाण्याला कलेक्टर ऑफिसात कामाला आहे !!" मंदार.
"छान!! लग्न केलस की आजही आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा टिकवून आहेस !! "  मास्तर किंचित मंदारकडे पाहून हसत म्हणाले.
"हो झालं ना लग्न !! दोन मुलंही आहेत !!"
"छान !! सुधाकरराव काय म्हणतायत??" मंदारच्या वडलां बद्दल मास्तरांनी विचारले.
"आई आणि बाबा दोघेही माझ्याकडेच असतात ठाण्याला !! " मंदार मास्तरांच्या काठीकडे पाहत म्हणाला.
"गेल्यावर मी आठवण काढली होती म्हणून सांग नक्की !! "
"नक्की सांगेन !! "
मास्तर कित्येक वेळ मंदारला बोलत राहिले. आपल्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी त्यांना चांगलेच भिऊन असायचे. पण शाळेच्या बाहेर कित्येक वर्षांनी भेटल्यावर त्याच्यातील एका वेगळ्याच मास्तरांची ओळख मंदारला झाली. त्यात कित्येक आपुलकी होती.
"आयुष्याच्या खऱ्या वाटेला सुरुवात झाली तेव्हा कित्येक गोष्टी कळल्या. एक मास्तर म्हणून आपलं कर्तव्य करताना गुरुजी तितकेच कणखर भूमिका मांडायचे. पिकलेल्या त्यांच्या केसांकडे पाहून वर्गात असताना त्यांची कित्येक वेळा थट्टा करायचो पण आज आपलेही केस का पांढरे झाले हे कळल्या शिवाय राहिले नाही. वर्गातला तो मंदार आठवला की आज खरंच गम्मत वाटते." मंदार मनातच कित्येक गोष्टी बोलू लागला.
"हल्ली कुठे असता तुम्ही??" मंदार म्हणाला.
"वृद्धाश्रम आहे इथे जवळ !! तिथेच असतो !! " मंदारला हे एकूण काय बोलावं तेच कळेना.
मास्तर बोलत राहिले. मंदार ऐकत राहिला.
"मुलगा विलायतेत नोकरी करतो !! वर्षभरापूर्वी सौ गेल्या !! घर खूपच खायला उठलं !! म्हणून मग इकडेच राहायला आलो !! तेवढाच विरंगुळा !! " मास्तर एकटक शेजारच्या फुलांच्या रोपट्यांकडे पाहत राहिले. कित्येक भाव आपल्या चष्म्या आढ लपवत राहिले.
"बरं चल निघतो मी आता !!एक दिवस निवांत भेटायला येईन ठाण्याला !! तुझा पत्ता तेवढा देऊन ठेवं !! आमच्या घरात आज एक नवीन मित्र येणार आहे ना !! त्यांना भेटायचं आहे !!" मंदारकडे पाहत मास्तर उठू लागले.
"मी सोडू तुम्हाला !!" मंदार शांत म्हणाला.
"नाही नको !! जाईन मी !!" मास्तर मंदारला कित्येक क्षण पाहत राहिले.
  ती काही क्षणांची भेट मंदारला खूप काही सांगून गेली. शाळेच्या प्रांगणात एक गुरुजी म्हणून कित्येक विद्यार्थी घडवणारे ते आणि वर्गाच्या बाहेर भेटलेले तेच गुरुजी यात फरक तो किती होता. पण आयुष्याचे नियम मात्र तेच कडक शिस्त , आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी नेहमीच सुंदर.
"मला घडवणाऱ्या माझ्या मास्तरांना मला म्हणावेसे वाटले की तुम्ही माझ्या सोबत चला !! पण कितीही केलं तरी तुम्ही येणार नाहीत हे माहितेय मला..!! शेवटी या मनावर तुम्हीच संस्कार केले आहेत !! " पाठमोऱ्या जाणाऱ्या मास्तरांकडे पाहून मंदार मनातल्या कित्येक विचारांशी बोलत राहिला.
  पुन्हा कित्येक वेळा मंदार मास्तरांना आवर्जून भेटायला गेला. ठाण्याला गेल्यावर मास्तर मंदारकडे आवर्जून मुक्काम करू लागले. मंदारचा गच्चीत ठेवलेल्या गुलाबांच्या फुलांकडे आवर्जून पाहून स्वतः ची शिकवण आठवू लागले.  "तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून पहाव!! " अगदी न चुकता.

✍योगेश खजानदार

उठावं ..!✍

उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या
कैक मुडदे आजही निपचित आहेत

उगाच ऐकले आवाज ते सत्याचे
आजही ते दगड निर्जीव पडून आहेत

नाही भ्रांत त्यास कशाची आता
आभास त्यास कशाचे होत आहेत

कसली ही आग पेटली त्या मनात
कित्येक स्मशान आज जळत आहेत

हो , उठाव केला आहे मनाने मनाचा
कैक वादळे शांत झाली आहेत

उद्ध्वस्त घरात आजही कोणी का
आपुल्यास पाहून आवाज देत आहेत

कित्येक अपमान सहन केले त्याने
तरीही निर्लज्ज होऊन हसत आहेत

छाताडावर पाय ठेवून बोलता ते
कैक अहंकार जाळून टाकत आहेत

सुटका करण्यास आता उगाच धडपड
पण कालचे ते सुखात नांदत आहेत

कोणता हा बंड केला निरर्थक मनाने
कालचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत

✍योगेश

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...