तु आणि मी

तुझ्या मनातील मी
तुझ्या ह्रदयात पाहताना
अबोल राहुन शब्दातुनी
अश्रुतही राहताना

सांग सखे प्रेम तुझे
एकांतात गातांना
बोल सखे भाव तुझे
माझ्या डोळ्यात पाहतांना

नको हा दुरावा मझ
जवळ तु असताना
नको ती रात्र सोबत
आठवणीत राहताना

का येऊन स्वप्नातही
मला तु छळताना
सांग सखे एकदा तरी
माझी तु होताना

मी नसेन मी तेव्हा
तुझा मी असताना
प्रेम हे शोधते तुला
तुझ्या ह्रदयात पाहताना



एक वाट ती

शोधुनही सापडेना एक वाट ती
हरवली सांज हरवली रात्र ती
नभी एक चांदणी पाहते कुणा ती
मझ सांगते पहा सोबतीस एक ती
समीप अंधार हा दुर चांदणी ती
तरी सोबतीस का सवे चालते ती
मी हसताच का हसते ती
मी थांबताच का थांबते ती
एक चांदणी नभातील मनात ती
चुकलेल्या वाटेवर गोड स्वप्न ती
सोबती येण्या सवे करते हट्ट ती
मी चालता पुढे मागे येतेच ती
काही न मागता हवी साथ ती
अंधारल्या रात्रीतील मैत्रीण ती

शोधुनही सापडेना एक वाट ती..!!

भेट

भेट...

#Yks

  ती शेवटची संध्याकाळ तिच्या सवेत घालवायची मला संधी मिळत होती. ती होती , मी होतो , आणि समोर खळखळ करणारा तो समुद्र. खुप काही मला बोलायचं होतं, आणि खुप काही तिला मला सांगायच होतं. शब्दांची सुरूवात कुठुन करावी तेच कळेना. इतर वेळी अविरत बोलणारी ती आज शांत होती. तुझ्या सवे सर्व आयुष्य मला जगायचंय अस म्हणारी ती आज मधुनच सगळं सोडुन चालली होती. कित्येक आठवणी माझ्या मनात कोरुन ती आज शांत होती. शेवटी मीच बोललो, 'माझी आठवण येईल ना तुला ? '  तेव्हा ती एकटक माझ्या डोळ्यात पहात होती. डोळ्यातुन अश्रुंचा थेंब ओघळुन माझ्या ह्दयात तिचा ओलावा करत होती. '
  माझं लग्न दुसर्‍या कोणाशी व्हावं अस मला कधीच वाटतं नव्हतं, तुझ्या आयुष्यात माझं सुख आणि दुखः होतं. पण परिस्थिती आज वेगळी आहे. मी माझ्या आई बाबांना नाही दुखावु शकत.!'  ती अगदी शांत सगळं बोलुन गेली. सगळ्याच्या सुखासाठी तिनं आपल्या प्रेमाचा बळी द्यावा. याचंच मला राहुन राहुन आश्चर्य वाटतं होतं. आई बाबांचा एवढा विचार करणारी ती आज मला शेवटची भेटायला आली होती. पण, माझ्या मनाचं काय? तु माझा विचार का करत नाहीस ? माझ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती मला हे माहित होतं. कोणत्याच बोलण्याने माझं समाधान होणारं नाही हेही तिला माहीत होतं. पण या निर्णयाने ती कोलमडून गेली होती. माझा हात हातात घेऊन ती मला सगळ विसरुन जा म्हणतं होती. मी तिच्याकडे फक्त बघत होतो.
  अखेर सुर्यास्त व्हायची वेळ जवळ आली होती. तिची नेहमीची लगबग आजही तशीच दिसत होती. घरी आई वाट बघत असेल अस म्हणुन ती निघणार होती. मी आता तिला पुन्हा कधी भेटशील अस विचारणार तेवढ्यात तीच म्हणाली' आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात,  आपल हे प्रेम स्वप्नच होतं अस समज!!! जाते मी !! काळजी घे!!!'
   ती जायला निघाली,  आपल्या प्रेमाला खळखळ करणार्‍या समुद्राचा ऊरात बुडवून ती चालली होती. पाठमोरी तिला जाताना कित्येक वेळ मी पहात होतो. ती संध्याकाळ त्या दिवशी दोन सुर्यास्त पहात होती.  एक सुर्य पुन्हा नवीन सकाळ घेऊन येणार होता, पण मनाचा सुर्यास्त कायमचाच झाला होता. पुन्हा नव्याने सुरूवात करायला तु हवी होतीस अस मला तिला सांगायचं होतं. पाठमोरी जाणार्‍या तिला थांब म्हणायचं होतं. पण, तिला अजुन यामुळे त्रास होणार होता... ती भेट अखेर खुप काही हिसकावून घेऊन चालली होती .. मी मात्र .. खळखळ करणार्‍या लाटांचा आवाज ऐकत अगदी एकटाच बसलो होतो.. त्या लाटांच्या आवाजात तिचा आवाज शोधत....
@योगेश खजानदार

#योगेश_खजानदार

#मी_आणि_माझी_कविता

Yogeshkhajandar.blogspot.com

Yogeshkhajandar.wordpress.com

मनातलं प्रेम


"मनातलं प्रेम"

   तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त्याने रिप्लाय केला 'मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही! ' .. आणि दोघांच संभाषण सुरु झालं. हळुहळु दोघांच बोलणं वाढलं.. सहज बोलन रोजच झालं. सकाळी गुड मॉर्निंग पासुन ते रात्री गुड नाईट पर्यंत बोलन चालु लागलं. दोघांच्या आवडी निवडी एकमेकांना कळु लागल्या. प्रत्येक चांगली वाईट गोष्ट तिला कधी सांगतोय अस त्याला वाटु लागलं .. आज दिवसभर काय घडल हे त्याला सांगावंस तिला वाटु लागलं. मेसेज नंतर फोनवर रोज बोलणं होऊ लागलं.. दोघांच एक छोटस जग तयार झालं,  सहजच बोलणं त्याला प्रेम वाटु लागलं. पण तिला कस व्यक्त करावं हे मनातल सगळं म्हणुन तो रोज 'तुला काहीतरी सांगायचंय मला!' अस म्हणुन पुन्हा 'काही नाही, जाऊ दे!' अस म्हणुन टाळु लागला. तिलाही ते कळत होतं सहजच बोलणं आता सहजं राहिलं नव्हतं. त्यात प्रेमाची चाहुल लागली होती.
   पण एक दिवस त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलताच कोणी एक बोलु लागला. मनाच्या पटलांवर जोरदार घात झाला. तिच्या प्रियकराने त्याला खुप काही सुनावलं होतं. तो ही सगळ निमुटपणे ऐकत होता. बोलायला काहीच राहिल नव्हतं. उरले होते ते फक्त मनातल्या प्रेमावर घात होऊन विस्कटलेले आठवणींचे तुकडे. ती सहज म्हणुन आली होती की सहजच बोलली होती. प्रेम आणि मैत्री यात गल्लत करुन तो कुठे चुकला होता का? .. की मला तुला काहीतरी सांगायचंय! ते काय हे तिला कळुनही तिने ते अंतर जाणलंच नाही कधी.
   तिचा प्रियकर होता ती निघुन गेली. नंतर 2 4 साॅरीचे मेसेजेस त्याला करुन ती विसरुनही गेली. मैत्री आणि प्रेम यातलं अंतर तरी काय असतं हे न सांगताच गेली. मग चुक ती कोणाची होती. सहजच म्हणुन सुरू झालेल हे तितकेस सहज नाही राहील हे तिला कळत होतंच ना. की फक्त बोलावंस वाटतं म्हणुन झालेला संवाद होता तो?. पण संवाद कुठेतरी थांबतो .. पण जिथे संवाद थांबतच नाही ते प्रेम असतं
  कित्येक गोड गोष्टींच गाठोडं घेऊन तो शांत होता. ती निघुन गेली तरी तिच्यावर न रागावत तिच्या साठी जगतं होता. मनातल्या प्रेमाला शब्दात लिहितं होता .. आणि कवितेत तिला आपलंस करत होता .. ते प्रेम होतं की मैत्री याची गल्लत करत होता .. चुक तिची होती की माझी हे विसरूनही आजही तो तिच्यावरच प्रेम करत होता .. अगदी मनातुन. .
@योगेश खजानदार

#योगेश_खजानदार

#मी_आणि_माझी_कविता

Yogeshkhajandar.blogspot.com

Yogeshkhajandar.wordpress.com

सांज

एक तु आणि एक मी
सोबतीस एक सांज ती
विखुरली ती सावली
कवेत घ्यायला रात्र ही

अबोल तु निशब्द मी
बोलते एक वाट ती
सोबतीस आज ही
मागते एक साथ ती

जाण तु अजाण मी
झुळुक एक स्पर्श ती
सांगते का आज ही
मनातली एक गोष्ट ती

प्रेम तु एक भाव मी
सुंदर एक क्षण ही
मन बोलते आज ही
चांदण्यातील एक ती

समीप तु की विरह मी
भेटण्याची आस ती
विखुरली का सावली
कवेत घ्यायला रात्र ही
- yogiii

आजही तु तशीच आहेस

काळाने खुप पानं बदलली
पण आजही तु तशीच आहेस
खरंच सांगु तुला एक
तु आजही आठवणीत आहेस

एकांतात चहा पिताना
तु माझ्या ओठांवर आहेस
कधी ह्दयात कधी मनात
माझ्या क्षणात आहेस

विसरुन गेलीस तुलाच तु
स्वतःस तु शोधत आहेस
माझ्यात तु शोध तुला
श्वासात मी जपलं आहे

डोळ्यांतुनी पाहताना
ओढ तुझी दिसत आहे
काळाची ही सर्व पाने
तुझ विन व्यर्थच आहेत

शब्दाविना खुप सांगतात
हे अश्रूं मझ बोलत आहेत
काळाने खुप पानं बदलली
पण आजही तु तशीच आहे

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...