सांजभेट


तुला आठवतात ते दिवस जेव्हा आपण खुप बोलायचो. पण त्यावेळी नेमकं बोलण्याच साधन कमी पडायचं. मोबाईलला बॅलेन्स नाही, रोजचे मेसेज संपले अशा कित्येक कारणांनी आपलं बोलन अर्धवटच राहायचं. तेव्हा आपण दुसर्‍या दिवसाची आतुरतेने वाट पहायचो. सकाळच्या मेसेजेस ने सुरुवात करताना बोलन सुरु व्हायचं ते थेट रात्री गुड नाईट म्हणे पर्यंत. हे असे कित्येक क्षणांच्या आठवणी तो तिला सांगत होता.
पण बघ ना काळ बदलला आणि सगळच बदलुन गेल. आता पुर्वी पेक्षा जास्त साधन आले आहेत बोलायला. कित्येक अॅप्स, मेसेंजर .. जीवन अगदी स्मार्ट झालं ना यामुळे? पण सगळंच बदलय  .. तु ही मी पण ..!!  आता बोलायला वेळच नाही आपल्याला.  बॅलेन्स भरपुर आहे पण काय बोलायचं आणि का? हा प्रश्नच आहे. आपण एकमेकां पासुन खुप दुरावलो आहोत अस वाटतंय मला. निखळ हास्य विनोद करणारा मी आणि त्यावर तुझी अगदी मनसोक्त दिलेली हास्याची लकेर आता कुठेतरी हरवलीये गं!! बघ ना विनोद हा विनोद होतंच नाही ना आता त्यांच भांडणात रुपांतर व्हावं. हा कोणता दोष आहे ते तरी बघावं ना!! मनात कुठेतरी माझं जुन रुप तु दडवुन ठेवलं असशीलच ? ते एकदा नीट आठवुन बघ , तासनतास बोलणारे आपण, त्या बागे जवळ भेटण्याची ओढ, आणि त्या भेटी मध्ये मी दिलेल एक चाॅकलेट. त्या चाॅकलेटची गोडी आजही मनात तशीच आहे ना ? की बदलुन गेलंय सगळं आज?
  त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ती आपल्या पासुन दुरावतेय याच दुख त्याला वाटतं होतं. तिलाही ते कळतं होतं. तेव्हा ती त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली . हे सगळं तुलाही आठवतं याचच मला समाधान आहे.  काळा सोबत प्रेमाची ओहोटी होणारी जोडपी कित्येक पाहिली पण तु तस कधी होऊच दिलं नाहीस. मला आठवतात ते दिवस. काळ बदलला पण प्रेम तसेच आहे. कुठेतरी मनात काहीतरी सलतय तुझ्याही आणि माझ्याही. मला हेच पाहिजे होतं. कधीतरी हे सगळं मोकळ करन खुप गरजेचं होतं रे!! चुक माझी ही असेन तुझी ही असेन आपण मिळुन त्या समजुन घ्याव्यात अस मला ही वाटतं. तिच्या या बोलण्याने तो कित्येक वेळ फक्त तिच्याकडे पहातच होता. तिने अगदी मनाचे दरवाजे त्याच्यासाठी मोकळे केले.
  दोघे कित्येक वेळ त्या समुद्र किनारी बसुन मनातील सल सांगत होते. दोघां मधील ते अंतर केव्हाच कमी झालं होतं. ती त्याला मनमोकळेपणाने सगळं सांगतं होती. त्या रुसलेल्या नात्याला कुठेतरी पुन्हा भरती आला होती. समुद्राची प्रत्येक लाट त्याच बोलण ऐकण्यास पायां जवळ येत होती. पण त्या दोघांना आता कोणाची चिंता नव्हती. होती फक्त ती आणि तो यांची एक सुंदर सांजभेट ..
मज वाट एक अधुरी दिसते
तुझी साथ हवी होती
त्या वळणावरती एकदा
तुज पहायची ओढ होती

मनात तुझ्या एक सल
तुला बोलायची होती
माझ्या मनाची बैचेनी
तुला सांगायची होती

ती आठवण पुन्हा
तुला करुन द्यायची होती
नात्याची गोडी आपल्या
पुन्हा अनुभवयाची होती

तुझ्या ओठांवरच्या शब्दांना
पुन्हा साथ द्यायची होती
तुझ्या सवे समुद्र किनारी
एक भेट व्हायची होती

तु सोबत असावी मज
आस एक मनाची होती
ती वाट अधुरी दिसते
तुझी साथ मला हवी होती
- योगेश खजानदार

किल्ला

किल्ला ..एक आठवण .. एक लेख

  दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड,  विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे आणि सुरु व्हायची किल्ले बांधणीची सुरुवात. मधुनच आईची एक हाक ऐकु यायची 'जास्त मातीत खेळु नका रे !!' आणि त्याला आम्ही 'हो आई नाही खेळत!!' म्हणुन उत्तर द्यायची. मग सकाळी जे सुरुवात करायची किल्ला बांधण्याची ती थेट 2 3 दिवस चालायची.
  सुरुवात व्हायची ती माती घेऊन येण्या पासुन. घरातील एक जुनाट पोत घ्यायच, आई नको म्हणत असताना ही आणायचं. 'ही माती चांगली आहे.. घ्या रे .! 'भैया ने सांगायच कारण आमचा मुखीया तोच असायचा. मग शेजारच्या मित्रानी आणि मी भराभर माती घ्यायची आणि घरा जवळ आणायची. पुन्हा सुरुवात ती मोठा दगड हुडकून आणायची. तो कुठे भेटलाच की कसा आणायचा ही एक मज्जाच असायची. कित्येक वेळा बोट सापडन, कापण , खरचटन असले प्रकार सर्रास व्हायचे.
  सगळ्या आवश्यक गोष्टी एकत्र केल्या नंतर भैया मातीत पाणी ओतुन त्याचा व्यवस्थित चिखल करुन किल्ला बांधणीचं उदघाटन करायचा. सर्वाच्या मताने किल्ला कसा झाला पाहिजे याची चर्चा सुरू व्हायची. एमताने नंतर शेवटचं ठरायच आणि मग सगळेच किल्ला बांधण्यात व्यस्त होऊन जायचे. एकदा सुरुवात झाली की किल्ला बांधनीसाठी अजुन आमचे मित्र कधी जमायचे कळायचंही नाही दोनाचे पाच व्हायचे. शेवटचा हात मार योग्या त्या बुरुजाच्या बाजुने!!  अस भैया म्हटला की अखेर किल्ला बांधणीच काम पुर्ण झालं अस समजायचं.
  आता राहता राहिला प्रश्न सजावटीचा तर मग किराणा दुकानातुन लाल कलर त्याला काव म्हणायचे तो आणायचा आणि चुना. मग तटबंदीला मस्त लाल कलर लावुन चुण्याची सजावट म्हणुन उपयोग व्हायचा. किल्ला सुंदर आणि आकर्षक दिसावा म्हणुन आळीव आणि काही धान्य टाकायचं. दोन तीन दिवसात ते उगवुन यायचं. मग रोज त्याला वेळेवर पाणी घालायचं काम माझ्याकडे असायचं.
   किल्ला पुर्ण झाला की स्वच्छ हात पाय धुवुन थेट स्वयंपाक घरात जायचं. दिवसभर केलेल्या मेहनती मुळे प्रचंड भुक लागायची. आई तयारच असायची प्लेट भरुन फराळ देण्यासाठी.  मी , भैया आणि आमचे मित्रमंडळी मस्त ताव मारायचो त्यावर. करंजी , चिवडा , चकल्या किती पहावं तेवढे फराळाचे प्रकार खाऊन पुन्हा किल्ल्या  जवळ सगळे यायचो. आता किल्लावर शिवाजी महाराजांची मुर्ती आणि मावळे ठेवले जायचे. संध्याकाळी किल्लावर दिवे लावुन त्यासमोर आई रांगोळी काढायची. अशी एकूण सजावट झाली की किल्लाकडे नुसत पाहातच राहवस वाटायचं. त्या दिव्याच्या प्रकाशात किल्ला आणि शिवरायांची मुर्ती अगदी जिवंत वाटायची. साक्षात शिवरायच आपल्या घरी आले आहेत अस वाटायचं.
  अशी सगळी धमाल दिवाळीत व्हायची किल्ला , फटाके आणि फराळ यांनी नुसती भरुन जायची. तो आनंद तो उत्साह वेगळाच होता. लहानपण परतुन यावं म्हणतात ते यासाठीच अस मला वाटतं. इथे ना कोणत्या गोष्टींची चिंता होती ना ओढ. होतं ते फक्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंदाच जगणं.. अगदी क्षणाक्षणात.. प्रत्येक मनातं... आज जुने फोटो पहाताना ते मनात पुन्हा जगल्या सारखं वाटलं.. :)

माझ्या सर्व मित्रांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! !!

नातं माझं...

   खरंच माझ काही चुकलं असेल तर मला माफ कर. .!!  अस म्हणणारी व्यक्ती आज शोधुनही सापडत नाही. नातं टिकवायला या गोष्टी खरंच खुप पुरेश्या आहेत अस मला वाटतं. कित्येक भांडणात त्या व्यक्तीचा  अहंकार आणि मीपणा किती आडवा येतो हे वेगळं सांगायची गरजच नाही. मुळात काय चुकलंय हे जाणुन न घेता फक्त माझंच बरोबर अस म्हणणारी व्यक्ती आयुष्यात खरंच खुप कमी नाती टिकवु शकतात. त्यामुळे अशा व्यक्ती सहसा आपली चुक मान्यच करत नाही आणि त्याचा त्रास त्याचा जवळच्या लोकांना झाल्या शिवाय राहत नाही.
   मनाचे धागे कुठेतरी अशा लोकांशी जोडलेले असतात त्यामुळे इतर व्यक्ती ते सहनही करतीन. पण त्यालाही काही मर्यादा नक्कीच असतात. ते म्हणतातच ना की नातं ताणुन धरल्याने ते कधीतरी तुटतं आणि त्याचा त्रास दोघांनाही नक्कीच होतो. पण हे नातं ताणुनच का द्यायच हा ही एक प्रश्न आहे.  मुळात ऐकाने नातं ताणलं तर दुसर्‍याने सैल सोडावं अस म्हणतात. पण जो सैल सोडतो त्याला त्या व्यक्तीच्या बेबंद वागण्याचा त्रास नक्कीच होतो नाही का?
  मग नक्की करायच तरी काय हा ही प्रश्न पडतो. नातं दोघांनीही ताणायच नाही हे ही मान्य आणि नातं सैल ही सोडायचं नाही हे ही मान्य.  पण मग होणारा त्रास कुठेतरी कमी व्हायलाच हवा. मग राहतो एकच मार्ग नातं तोडुन टाकायचं. पण त्याने आठवणींना भरती येते नक्कीच.  म्हणुन नातं हवंच असतं पण त्यामध्ये कधी त्याने माफी मागावी कधी आपण स्वतः माफी मागावी. कधी आपण चुक केली तर मोठ्या मनाने माफी मागावी हाही एक नातं टिकवायचा मार्ग नक्कीच आहे. आणि माफी मागण्यांने जर कोणाला कमीपणा वाटतं असेण तर अशी व्यक्ती कोणतंच नातं टिकवु शकत नाही हेही खरं.
  मग राहता राहिला प्रश्न त्रास होण्याचा. अशावेळी भांडणाचं मुळ कारण दोघांनीही लक्षात घ्यायला हवं. एखाद्या गोष्टीचा आपल्याला भयंकर राग आला तर आपण आपल्या नात्यातील गोडवा जुन्या सुंदर आठवणी आठवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं राग कुठच्या कुठे निघुन जाईल. शेवटी लक्षात हेच ठेवायच की प्रत्येक नातं हे अनमोल असतं मग ते मैत्रीच असो किंवा इतर कोणतही ते समोर येताच आठवणींचा बाजार भरला पाहिजे. दुःखाचा डोंगर नकोच .. शेवटी मला असंच वाटतं नातं हे कसं होतं ..
"नातं एक असच होतं
कधी दुख कधी सुख होतं
सुखाच तिथे घर होतं
आणि मनात माझं प्रेम होतं

कधी माफी कधी रुसन होतं
क्षणात सारं जग होतं
दुख कुठे पसार होतं
आनंदाने नातं राहतं होतं

कधी माझ कधी तुझ होतं
आपुलकीची लाट होतं
समुद्रासारख अथांग होतं
आकाशा इतक मोठं होतं

नातं एक असच होत
कधी दुख कधी सुख होतं..!!"
-योगेश खजानदार

प्रेम माझं असलं ...

प्रेम म्हणतं मी
ते व्यक्त करायला जावं
हातात गुलाबाचं फुल देताना
नेमकं तिच्या बाबांनी पहावं
बाबा हाच आला होता
तिने अस का म्हणावं
आणि पुढचे काही दिवस मग
एका डोळ्यानेच पहावं

प्रेम हे मी कधी
भावनांन मध्ये जपावं
तिला व्यक्त करताना
तिने येड्या सारखं हसावं
चार पानी लिहुन ते
तिला हळुच नेऊन द्यावं
आणि तिने ते वाचताना
चुकां सुधारून द्यावं

प्रेम हे लांबुन मी
चोरुन चोरुन बघावं
आपली काय दिसते
मनातंच का म्हणावं
तिला बघताना नेमकं
तिच्या भावाने पहावं
आणि पावशेर पोराने ही
उगाच भाव खाऊन जावं

प्रेम हे मी कधी
मनापासून करावं
नेमकं त्यावेळी साला
नशीबात न जमावं
करायला जावं एक
नेमकं मांजर आडव यावं
आणि तिच्या आईने तेव्हा
लग्नाची पत्रिका देऊन जावं
- योगेश खजानदार

तुझे रुसणे

न कळावे मनाला काही
तुझे हे भाव सखे
तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे

कसे समजावे डोळ्यांना ही
ते पाहतात ती तुच असे
रागावलेल्या कडां मध्ये ही
माझे चित्र का अंधुक दिसे

कुठुन येतो तो अबोला
तु मजला का बोलत नसे
शब्दांविना सर्व काही
आज तुला ते कळते कसे

कोणता हा राग सारा
कारण कोणते न दिसे
न कळावे भाव तुझे तरी
मन शोधते त्यास कसे

का असे हे रागावने तुझे
मनास का काही कळत नसे
आणि तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे
-योगेश खजानदार

बरंच काही बोलताना ... !!

बरंच काही बोलताना
ती स्वतःत नव्हती
हरवलेल्या आठवणीत
खोलं क्षणात होती
विखुरलेल्या मनात
कुठे दिसत नव्हती
माझ्या सावलीस शोधताना
स्वतः अंधारात होती

बरंच काही बोलताना
ती अश्रु मध्ये होती
भारावलेले मन घेऊन
डोळ्यात पाहात होती
माझ्या जवळ येऊन
माझ्या मनात होती
हात हातात घेऊन
मला आपलंस करत होती

बरंच काही बोलताना
ती वचन मागत होती
विरहाच्या क्षणात
मला शोधत होती
आयुष्यभराची साथ
मला मागत होती
ह्रदयात ती माझ्या
पुन्हा साद देत होती
- योगेश खजानदार

खंत .. !!

तो दरवाजा उघडला होता
तीच्या डोळ्यात पाणी होते
आईची खंत काय आहे
ते मन आज बोलतं होते

नकोस सोडुन जावु मजला
मी काय तुला मागितले होते
एक तु , तुझे प्रेम
बाकी काय हवे होते

आयुष्य तुझे घडवताना
मी माझे क्षण वेचले होते
रडणार्‍या तुला मी
कुशीत माझ्या ठेवले होते

आज अश्रु माझे आहेत
ते ही मी लपवले होते
अनाथ म्हणुन मला सोडताना
ते दार तु उघडले होते

शाळेत तु जाताना
येण्याची वाट मी पाहत होते
आज मला तु सोडताना
परतुन यावेस हेच मला वाटत होते

आई आई म्हणारे माझे बाळ
आज कुठे हरवले होते
पळत येऊन मिठी मारणारे
अनाथ मला करुन गेले होते

माझा हात धरुन चालणारे बाळ
तो दरवाजा आज उघडत होते
आणि आईची खंत काय आहे
ते मन स्वतःलाच आज बोलतं होते
- योगेश खजानदार


रात... !!!

ये चांद कुछ कहता है
गहरी इस रात को
कही तु उसे सुन ना लेना

कही है दर्द की वजह
तो कहीं है प्यार की बातें
कही तु उसे पढ ना लेना

ये सन्नाटों की आवाज
समंदर की बैचेनी
कही तु उसे महसूस ना करना

सब है खाली सडके
कुछ रास्तों पर है अपने
कही तु उसे खो ना देना

दिल कहता है तुझसे
कुछ बात तो है उसमें
कही तु कह न देना

ये कैसी गुफ्तगू है
चांद से जो रात सजी हैं
कही तु प्यार न कर जाना
- योगेश खजानदार








राखं ... !!!

ती शांतता वेगळीच होती
रडण्याची जाणीवही होती
लाकडास पेट घेताना
आकाशात झेप घ्यायची होती

आपलंस म्हणारी कोण होती
अश्रु ती ढाळत होती
मन ओल करताना
मला आगीत पहात होती

माझी झोप शांत होती
डोळे मिटली जातं होती
नात्यास त्या पाहताना
राखेस आज मिळाली होती

खुप काही सांगत होती
आठवणीत ती राहीली होती
स्मशानात मला शोधताना
राखेस का बोलत होती

परतुन ती जातं होती
मला मनात साठवतं होती
वेड्या मनाला समजावताना
राखेत मला शोधत होती
- योगेश खजानदार

मी पणा .. !!

माझं माझं करताना
आयुष्य हे असचं जातं
पैसा कमावत शेवटी
नातं ही विसरुन जातं

राहतं काय अखेर
राख ही वाहुन जातं
स्मशानात गर्व ही
आगीत जळून जातं

मी आणि माझं
हे नाव ही विसरुन जातं
कमावलेलं सगळं काही
नात्यान मध्ये वाटुन जातं

सुख माझं असताना
दुख परक करुन जातं
मी पणा करताना
नातं कायमचं तुटुन जातं

शेवट अखेर शुन्य
माझं माझं न राहतं
आयुष्यभर सांभाळलेल
शरीर ही सोडुन जातं
- योगेश खजानदार

कुठे शोधुन सापडेल!!!!

कुठे शोधुन सापडेल
मनातील भाव सखे
न बोलता न ऐकता
तुला कळणारे
डोळ्यात माझ्या दिसताच
मनास तुझ्या बोलणारे
आणि ओठांवर न येताच
तुला ऐकु येणारे

कुठे शोधुन सापडेल
हरवलेले क्षण प्रिये
आठवणींच्या घरात
पुन्हा गर्दी करणारे
वळणावरती आज
पुन्हा जाऊन थांबणारे
आणि वहीच्या पानांमध्ये
तुला फक्त पाहणारे

कुठे शोधुन सापडेल
लपलेले ते प्रेम सखे
तुझे नाव घेताच
खुप काही बोलणारे
मनातील भावनेला
कवितेत लिहिणारे
हरवलेल्या क्षणांना
ओठांवर गुणगुणारे
आणि लपलेल्या प्रेमाला
सुरांत शोधणारे

कुठे शोधुन सापडेल
मनातील भाव सखे!!!
- योगेश खजानदार

तुझे हास्य

खळखळून वाहणाऱ्या नदीत
तुझ हास्य वाहुन जातं
माझ्या मनातल्या समुद्रात
अलगद ते मिळुन जातं

ओलावतात तो किनारा ही
नावं तुझ कोरुन जातं
लाटांच्या या खेळात
कित्येक वेळा पुसुन जातं

पुन्हा पुन्हा लिहिताना
ह्रदयात ते कायम राहतं
वाळु वरच्या क्षणांना
सतत ओलं करत राहतं

एकट्या सांज वेळी
सुर्यासही सोबत राहतं
डोळ्यात तुझ्या आठवणींना
लाटां मध्ये शोधत राहतं

कुठे तु दिसताच
स्वतःस ते हसतं राहतं
आणि मनातल्या समुद्रात
अलगद ते मिळुन जातं
-योगेश खजानदार





Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...