प्यार

कुछ भी नही था ये दरमियाँ
कैसे ये प्यार तुझसे हो गया

अब तो रात भी तेरी
ये दिन भी तेरा हो गया

सोचता कुछ दुसरा तो
दिल बुरा सा मान गया

तेरे एक दीदार को
ये दिल जालिम सा तरस गया

आँखे जो बंद की
चेहरा दिल में दिख गया

ऑंखें जो खोल दी तो
चेहरे को धुंडता रह गया

कुछ तो बता तु
कैसे ये सब हो गया

कुछ भी नही था दरमियाँ
कैसे ये प्यार तुझसे हो गया

- योगेश खजानदार

एकदा तु सांग ना

धुंद हे सांज वारे
छळते तुला का सांग ना?
का असे की कोण दिसे
एकदा तु सांग ना

डोळ्यात हे भाव जणु
विरह हा तो कोणता
भावनेस शब्द दे
एकदा तु सांग ना

मावळतीस सुर्य तो
अंधार मनी का दाटला
का घुसमट ही मनाची
एकदा तु सांग ना

बोलते हे सांज वारे
दुरच्या आपुल्या कुणा
ओढ ती का अनावर
एकदा तु सांग ना
- योगेश खजानदार

सुख

चुकलेले मत
हताश बळ
लाचार जीवन
पुन्हा ती वाट नाही

शब्दाची कटुता
तिरस्कार असता
मनातील भावना
प्रेम दिसत नाही

नजरेने बघत
आपलेच लोक
वाईट चिंतन
प्रगती होत नाही

माझेच सर्व
माझेच मीपण
गर्व हा कसला
मीपण सुटत नाही

सांगने हेच एवढे
हे सर्व असता
जीवन हे चालता
सुख मिळत नाही
- योगेश खजानदार

जीवन प्रवास

जीवन एक प्रवास
जणु फुल गुलाबाचे
काट्यात उमलुन
टवटवीत राहायचे

हळुवार उमलुन
क्षणीक जगायचे
तोच आनंद खरा
मनी मानायचे

काट्यावर उभारुन
दुःख विसरायचे
दुसर्‍याच्या सुखासाठी
स्वतः तुटायचे

तुटुनही सर्वत्र
सुगंध पसरवायचे
जाता जाता एकदा
मनसोक्त जगायचे
- योगेश खजानदार

अबोल प्रेम

वहीचं मागच पान
तुझ्या नावानेच भरलं
कधी ह्रदय कधी क्षण
कुठे कुठे कोरलं

मन मात्र हरवुन
सांगायलाच विसरलं
डोळ्यातलं ते प्रेम
तुलाच नाही कळलं

कधी साद ह्दयाची
सांग हे सगळं
ओठांवरचे शब्द जे
मनातच विरलं

हे अबोल प्रेम अखेर
वहीतच राहिलं
नावाने भरलं तुझ्या
पण अधुरचं राहिलं
- योगेश खजानदार

दुर्गा

जब जहा दुनिया बेबस
ताकद बनकर तु खडी
दुर्गा तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी

माता तु जननी है तु
प्यार की मुरत खडी
प्रेम का सागर है तु
दुनिया में ना दुजा कोई

दुनिया अधुरी जहाँ
संपुर्ण बनके तु वही
प्यार तु जहाँ भी तु
दुनिया की ताकद तुही

दुर्गा है तु
तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी
- योगेश खजानदार

नात

कधी मनात एकदा
डोकावून पहावे
नात्या मधले धागे
जुळवून बघावे
असतील रुसवे फुगवे
बोलुन तरी पहावे
घुसमटून गेलंय मन
मोकळे करु बघावे
वाईट आठवणींना
पुसुन एकदा पहावे
तानल्याने तुटते नाते
सैल सोडून बघावे
नको तो गैरसमज
एकदा समजून बघावे
वाईट नसतं कोणी
आपलंस करुन पहावे
नात्या मधले धागे
जुळवून बघावे
कधी मनात एकदा
डोकावून पहावे

- योगेश खजानदार

आठवणी

खरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात
वाळुवरच्या रेषां सारख्या
सहज पुसता येतात

विसरुन जाव म्हटलं
तरी लाटां सारख्या येतात
दुर्लक्ष करावे म्हटलं
तरी मन ओले करतात

सतत सोबत यांची
गर्दीत ही असतात
एकांतात साथ असते
खुप सुंदर वाटतात

कधी हळुच लहर येते
मन सुखावून जातात
कधी तडाखा लाटेचा
अश्रू देवुन जातात

मनाच्या या समुद्रात
आठवणीच असतात
भरती आणि ओहोटी
सतत चालू असतात

कधी वारे सुखाचे
मनसोक्त आनंद लुटतात
दुःखाच्या या वादळात
कित्येक जहाज बुडतात
- योगेश खजानदार

आरजु

दुआयें मांगी थी
मिन्नतें मांगी थी
भगवान के दर पे
सब बातें कही थी

फिर भी न कोई आवाज
ना कोई मदत मिली थी
पत्थर दिल है भगवान
सच्ची आरजू न सुनी थी

न सोना ना चांदी
ऐसी मिन्नतें नहीं थी
अपने बस मिल जाये
एक ख्वाहिश यही थी

फिर क्यों मिल गये
अधुरी जिनकी साथ थी
अपने न मिल पाए कही
दुआयें मेरी बेअसर थी

एक शिकायत तुझसे यही
मन से जो कही थी
तु तो ना बन पत्थर दिल
एक आरजु यह थी
- योगेश खजानदार

शायरी

कुछ बातें ऐसी
जो दिल में रह गई
भगवान से कही पर
पत्थरों से टकरा गई
दुआयें मेरी बेअसर
मन से तो कहीं थी
पत्थर को पाने के लिए
पत्थरो को बताई गई
#Yks

प्रेम किती मझ

मी भान हरपून
ऐकतच राही
तुझ्या शब्दातील
गोड भावना

हे रिक्त मन
पाहुन चौफेर
नजर शोधता
स्थिर राहीना

सुगंध दरवळत
जाईची फुले
ओढ तुझी मझ
का आवरेना

प्रेम किती मझ
चांदणे मोजता
हिशोब मझ तो
का लागेना
- योगेश खजानदार

बाबा

बाबा मनातल थोडं
आज सांगायचं आहे
बस जरा थोडा वेळ
तुझ्याशी बोलायच आहे

किती कष्ट करशील
हा संसार चालवशील
माझ्या सुखासाठी का
दिनरात राबशील

दोन घटका स्वतःसाठी
कधी न राहशील
माझ्या स्वप्नांना
तुझ्या डोळ्यांत पाहशील

काटकसर करून
मला भरपूर देशील
स्वतः साठी मात्र
काही न घेशील

रात्री उशिरा घरी
सकाळी लवकर जाशील
आपली भेट न होताच
दिवस असेच जातील

बाबा तुझ्या कष्टाचे
स्वप्न पुर्ण होतील
मी जे घडलो
घडविणारा तु होशील

बस जरा बाबा
थोड बोलायचं आहे
- योगेश खजानदार

जीवन

माहितेय मला जीवना
अंती सर्व इथेच राही
मोकळा हात अखेर
मोकळाच राही
जीवन तुझे नाव ते
संपूर्ण होऊनी
अखेर शुन्य राही
जीवन आता बोलते
हळुच ओठात हसते
पुन्हा काय बोलते
ऐक तु मानवा
अंत फक्त तुझाच होई
विचार मात्र तुझेच राही
कमाव असे विचार जे
अंती फक्त तुझेच राही
- योगेश खजानदार

हे धुंद सांज वारे

हे धुंद सांज वारे
बेधुंद आज वाहे
सखे सोबतीस
मनी हुरहुर कारे

मी बोलता अबोल
शब्द तेही व्यर्थ
समजुन हे इशारे
लगबग तुझ ती कारे

मावळतीस सुर्य
लालबुंद जरा तांबुस
वाट पाहतो कुणी
त्याला ही घाई कारे

नको मझ विरह
तुझं ओढ परतीस
वचन हे इथेच
पुन्हा भेटशील कारे
- योगेश खजानदार

नकळत तेव्हा कधी

नकळत तेव्हा कधी
चुक ती झाली होती
प्रेम झाल अचानक
जेव्हा ती लाजली होती

ठरवल होत तेव्हाच
आपल्याला हीच पाहिजे होती
कस विचारू तिला
जेव्हा ती अनोळखी होती

मैत्री पासुन सुरूवात
पुन्हा खास जमली होती
विचारुन टाकतो तिला
जेव्हा ती जवळ होती

मन बोललं थाब जरा
वेळ चुकीची होती
सोबत तिच्या कोणीतरी
जेव्हा ती येत होती

खुप काही विचारलं
माझ्याशी ती बोलत होती
मी मात्र हरवुन गेलो
जेव्हा ती समोर होती

मन तुटल प्रेम मनातच
आठवणीत ती राहत होती
आपल्या विश्वात रममाण
जेव्हा ती चालली होती

कसे समजावे मनाला
ती जे बोलली होती
मन झाले आनंदी
जेव्हा ती खुश होती

नकळत तेव्हा कधी
चुक ती झाली होती
- योगेश खजानदार

वेड मन

रोज मन बोलत
आज तरी बोलशील
रुसलेल्या तिला
कशी आहेस विचारशील

भांडलो आपण
आता विसर म्हणशील
डोळ्यातील आसवांना
वाट करुन देशील

मन तस वेडसर
आठवणीत राहशील
का भांडलीस माझ्याशी
असा जाब विचारशील

सोड सगळं आता
घट्ट मिठी मारशील
पुन्हा नाही भांडणार
अस वचन देशील

रोज मन बोलत
आज तरी बोलशील
- योगेश खजानदार

साद

सुगंध मातीचा
पुन्हा दरवळु दे
पड रे पावसा
ही माती भिजु दे

शेत सुकली पिक करपली
शेतकरी हताश रे
नकोस करु थट्टा
जीव माझा तुझ्यात रे

वाट पाहुनी तुझी
माती ही रडतेय रे
तुझ्या विरहात
रोज ती मरतेय रे

आता येशील तिला भेटशील
पिकं ही सुखाव रे
ऐकणारे पावसा
आता तरी पड रे
- योगेश खजानदार

मैत्री

तुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी

तुझी आणि माझी मैत्री
ऊन्ह आणि सावली जणु
सतत सोबत असताना
साथ न सोडणारी

तुझी आणि माझी मैत्री
मन आणि भावना जणु
मी न बोलताही
सगळे समजुन घेणारी

तुझी आणि माझी मैत्री
गीत आणि सुर जणु
मधुर शब्दांच्या साथीने
जीवन सुंदर करणारी

- योगेश खजानदार

गुरु

असत्य से सत्य तक
पाप से पुण्य तक
राह जो दिखायें
वह गुरु कहलाये

स्वार्थ से निस्वार्थ तक
गर्व से नम्रता तक
शिष्य जो बनाये
वह गुरु कहलाये

गलत से सही तक
अधर्म से धर्म तक
बेहतर समाज बनाये
वह गुरु कहलाये
- योगेश खजानदार

आझादी

ये हवा चल मेरे साथ
मुझको खुद में मिला दे
तोडकर सरहदों को
सारी दुनिया घुमा दे

ये रंग जो बेरंग हो
मुझको वो रंग दे
बाट सके ना कोई
वेसे रंग में मिला दे

ये पंछी सुन ये बात
वो चैन मुझे दिला दे
उड जाऊ वो आसमां
वैसी आझादी दिला दे
- योगेश खजानदार

एकांत

हवी होती साथ
पण सोबती कोण
वाट पाहुनी
शेवटी एकांत

डोळ्यात अश्रु
का केला हट्ट
मनी प्रश्न
शेवटी एकांत

सोबती आज
आठवणींचे गीत
मन आज गाते
शेवटी एकांत
- योगेश खजानदार

पुन्हा प्रेम

भिती वाटते आज
पुन्हा प्रेम करायला
मोडलेले ह्रदय
परत जोडायला
नको येऊस पुन्हा
मझ सावरायला
न राहीले हे मन
आता प्रेम करायला
आहे मीच एकटा
स्वतः सावरायला
तुझी आठवण मझ
आहे साथ द्यायला

भिती वाटते आज
पुन्हा प्रेम करायला..
- योगेश खजानदार

राख

सांभाळला तो पैसा
न जपली ती नाती
स्वार्थ आणि अहंकार
ठणकावून बोलती
निकामी तो पैसा
शब्द हेच सोबती
आपुलेच सर्व
पैशावरी मोजती
ती शेवटची घटका
मझ आस न कोणती
राख या शरीराची
शेवट रिकामेच हाती
का केला हट्ट
जीवन हे खर्ची
राखेवरी आपुले
पैशासाठी भांडती
- योगेश खजानदार

तन्हाई

क्या गुनाह था
सजा इतनी पाईं
तु पास होके भी
कैसी ये तनहाई

थम गई सासें
बंद है ये ऑंखें
नाम लेते लफ्ज
खामोशी क्यु है छाई

यांदे तेरी सताएगी
अकेले मे रुलायेगी
प्यार की ऐ आग
जितेजी जलायें गी
- योगेश खजानदार

काजळ

आठवणींचा दिवा
मनात पेटता जणु
प्रेमाच्या या घरात
प्रकाश चहूकडे

भिंतीवरी सावली
चित्र जणु चालती
पाहता मी एकटी
डोळे ओलावले

झुळूक ती मंद
घर माझे अंधारुन
दिवा हा विझवून
काजळ जणु साचले
-योगेश खजानदार

सावली

आठवणींची सावली
प्रेम जणु मावळती
दूरवर पसरावी
चित्र अंधुक

लांबता ही सोबती
दुर का ही चालती
का मझ तु सोडती
विरह नकळत

सावली ही बोलती
थांबना तु मझ सखी
एकरुप मी तुझीच
अंधारल्या मिठीत
-योगेश खजानदार

फक्त तुझेच आहे

#Yks
"आजही हे मन
फक्त तुझच आहे
साथ न तुझी मझ
क्षण तुझेच आहे

मी न राहिलो मझ
श्वास जणु साद ही
ह्रदय हे माझे नी
नाव तुझेच आहे

क्षण सरले जणु
झुळुक ही वार्‍याची
आठवणीच्या भिंतींवर
चित्र तुझेच आहे

आजही हे मन
फक्त तुझचं आहे"
-योगेश खजानदार

संघर्ष

संघर्ष से ही जिंदगी
परास्त यु होती नही
राह मे पत्थर कई
डरके यु बैठी नहीं

छोड अपनों के साथ
जिंदगी ठहरी नही
बैठकर उस जगह
राह ये बढती नही

मंजिले जो मिल गयी
पुछती क्या है तुझे
क्या है खोया क्या तु पाया
जिंदगी चलती रही

संघर्ष से ही जिंदगी
परास्त यु होती नहीं ।
-योगेश खजानदार

मन माझं

मन माझ आजही
तुलाच का बोलत
तुटलेल्या नात्याला
जोड का म्हणत
नको विरह तुझा
सोबत तुझी मागत
नको ही आठवण
क्षण का जपत
कस समजावु याला
माझ न ऐकतो
नातं सपल तरी
प्रेम तुझ मागत
आठवणीच्या गर्दीत
तुलाच का शोधत
तुटलेल्या नात्याला
जोड का म्हणत
मन माझ आजही
तुलाच का बोलत

शेवटचं एकदा बोलायचं होतं

शेवटचं एकदा मला
बोलायचं होत
प्रेम माझ तुला
सांगायच होत

सोडुन जाताना मला
एकदा पहायच होत
डोळ्यातली आसवांना
बोलायचं होत

का कसे कोण जाणे
नात हे तुटत होत
चुक तुझी की माझी
मन हे रडत होत

शेवटचं एकदा मला
बोलायचं होत...
-योगेश खजानदार

मझ विश्वची अनुरूप

शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप

मझ घडविले तु
हे संसार दाखविले
तुझ सम जगात
दुसरे न प्रतिरूप

निस्वार्थ तुझे प्रेम
आई देवाची प्रतिमा
तुझ चरणी मस्तक
मझ विश्वची अनुरुप

शब्द व्हावे बोलके

ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे
तु आहेस जवळ पण,
शब्द व्हावे बोलके

हे प्रेम नी भावना
नकळत जे घडते
अबोल त्या बंधनात
शब्द व्हावे बोलके

होकार तुझा मझ
नजरेतूनी दिसते
इशारे हे आपुले
शब्दा विना बोलके

ओठांवरच्या शब्दांना
मार्ग हवे मोकळे

प्रेम

दिवस माझे नी तुझे
गोड त्या स्वप्नातले
चांदण्या रात्रीचे क्षण
परतुन आज यावे

सखे सोबत तुझी
अंधारल्या त्या रात्री
लागी मनाला ओढ
आज मिठीत यावे

हे प्रेम की वेदना
मना काही समजेना
तुझ्या त्या ओढीने
वाट कीती पहावे

लगबग ही मनाची
वाट त्या येण्याची
दुरून हा इशारा
प्रेम करूनी पहावे. ..

ध्येय

शुभप्रभात मित्रांनो .. ध्येयवादी माझ्या मित्रांसाठी थोडसं. ...

#Yks

तु चाहे जितनी जिद कर
कुछ पाने की कोशिश कर
मिलता नसीब में लिखकर
ज्यादा मिला उसे बांटकर
कम मिला खुश होकर
जिना सीख कर्म कर
ना हताश होकर
गर्व कभी ना कर
असत्य को दुर कर
ध्येय को सोच कर
यह याद कर
तु चाहे जितनी जींद कर ...

घर

घर म्हणजे सर्वस्व. नातं , प्रेम , आपुलकी , आदर सर्व काही म्हणजे घरचं.  नात्यांना जोडते ते प्रेम पण स्वार्थसाठी केलेल नातं कधीच टिकत नाही. ..
Yk's

एक होत छान घर
चार भिंती चार माणस
अंगणातल्या ओट्यावर
प्रेम आणि आपली माणसं
दुरवर पाहीला स्वार्थ
हसत आला घरात
प्रत्येकाच्या मनात
अंगणातल्या ओट्यावर
दिसत नाहीत आता
प्रेम आणि आपली माणसं
घर आता बोलु लागले
आपली माणसे शोधु लागले
नात्यांना ही सांगु लागले
घर आता घर न राहिले
उरल्या फक्त चार भिंती...
- योगेश खजानदार

जिथं स्वार्थ येतो तिथं नातं टिकत नाही . त्यामुळे जीवनात प्रेम आणि स्वार्थ एकत्र कधी येऊ द्यायचा नाही. ... ������������

मैत्री

������������

मित्रांची साथ मला खुप आहे. मित्रांन शिवाय जगन म्हणजे शुन्य वाटत.. खास माझ्या मित्रांसाठी ...

Yk's
एकट वाटेन ज्यावेळी
साथ नसेल कोणाची
साद घाल भावा
साथ मिळेल मित्रांची

मैत्री तुझी नी माझी
साथ कशाला कोणाची
आठवणींत आपल्या
साथ होती मैत्रीची

नातीं नाहीत रक्ताची
साथ तरी जन्माची
साद दे भावा फक्त
साथ तुला मित्रांची
- योगेश खजानदार

मैत्री कधीही साथ न सोडनार एक अतुट नातं... :) :)

#Love_you_my_all_friends
��������������

खुशियाँ

खुशीयां मिलीं थी परसो
सबका हाल पुछ रही थी
दरवाजे पें हसते
परेशानी को देख रही थी

दिया था सबकुछ
फिर क्या कमी थी
आज अपनोके संग
मेरी भी कमी थी

छोड मेरा साथ
मंजिले भी मिली थी
परेशानी थी वहा
अहंकार से खडी थी

खुशियां मिली थी परसो
सबका हाल पुछ रही थी।।।।
- योगेश खजानदार

स्त्री

    आज जागतिक महिला दिन. स्त्री म्हणजे देवाची सुंदर रचना. प्रेम , ताकद , कर्तव्य,  आई , पत्नी अशी कितीतरी गोष्टी ज्या म्हटलं की स्त्री आठवते.. खरंच स्त्री तुझ्या ताकदीस सलाम .. जगातील प्रत्येक स्त्रीला माझी ही कविता ...

जब जहा दुनिया बेबस
ताकद बनकर तु खडी
स्त्री तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी

माता तु जननी है तु
प्यार की मुरत खडी
प्रेम का सागर है तु
दुनिया में ना दुजा कोई

दुनिया अधुरी जहाँ
संपुर्ण बनके तु वही
प्यार तु नफरत भी तु
दुनिया की ताकद तुही

स्त्री तेरी शक्ती अपार
संहार करने तु खडी
- योगेश खजानदार
        

        माझ्या आयुष्यात माझा आदर्श म्हणजे माझी आई. खास आज महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या या चार ओळी खास तुझ्यासाठी आई ...

आईबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  अस म्हणतात देवाचं दुसरं रुप म्हणजे आई ... आई फक्त तुझ्याचसाठी ....

"आई, खरचं तुझी मला आठवण येते

तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.

तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते.

तुच घडवले मला
तुझेच हे संस्कार
यशाच्या शिखरावरही
आई, खरचं तुझी आठवण येते.

तुझी माया खरंच कळत नाही
तुझे रागावणे आणि प्रेम
यातला फरकंच कळत नाही
तुझ्या आठवणीने
क्षणोक्षणी येते भरुन मन
तुझ्या मायेचे
कधीच उपकार फेडु शकत नाही.

म्हणुनच आई, खरचं तुझी मला आठवण येते.
- योगेश खजानदार
            
           स्त्री म्हणजे देवाची सर्वात सुंदर रचना तिने सतत फुलले पाहिजे ....


जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खुप खुप शुभेच्छा !


भलाई

सब जहा बिका मौत ना बिक पाई
क्यु तु खामखा दुनिया करे लढाई
आज तु है कल कोई और होगा
जितेजी तु दुनिया से कर भलाई
मिट जाये तेरा वजुद नाम रेह जायेगा
दो बुंद ऑसू के फिर दुनिया से मिट जायेगा
ये कल ना तेरा था आज ना तेरा है
फिर किस लिये चले तेरी ये लढाई
चल थाम इन्सानियत का हाथ
बाटले खुशियां अपने दोनो हाथ
इसमें ही है तेरी भलाई
-योगेश खजानदार

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...