पौर्णिमेचा चंद्र || कोजागिरी पौर्णिमा कविता || मराठी कविता || Poems ||



शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता,  हळुच तो हसला !!

लपंडाव तो खेळूनी, ढगांसवे त्या धावुनी !!
पौर्णिमेचा चंद्र तो, दुधामध्ये त्या दिसला !!

वारा बेधुंद वाहुनी, क्षणास क्षणभर थांबुनी!!
नजरेत त्या साठवता, मनात तो उरला !!

गारवा तो स्पर्शूनी, शब्दाविना जणू बोलूनी !!
गोडवा त्या ओठांवरी, आज तो राहिला !!

सोबतीस सारे येऊनी, सोबत त्यास देऊनी !!
सुर असे छेडता, चंद्र गाऊ लागला !!

रात्र पुढे जाऊनी, जागेच त्यासवे राहुनी !!
आपुल्यांस त्या क्षणी, प्रेम देऊ लागला !!

गंध सारे पसरूनी, दाही दिशा व्यापूनी !!
पौर्णिमेचा चंद्र तो, लख्ख प्रकाशत राहिला !!

© योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...