कथा भाग ६ || सत्य || श्रीधर एकटाच त्यानंतर हॉलमध्ये शांत बसून होता. त्याच्या मनात कित्येक विचाराचं काहूर माजलं होत. "आजपर्यंत सर्वांशी चांगलं वागुनही शेवटी ती माया मला वाईट का म्हणाली असेल !! तिलाही माझ्यात ती वासनेची नजर दिसली असेल तर यात माझी काय चूक !! मी आजपर्यंत कधीही माझ्या प्रिया शिवाय कोणत्याच स्त्रीकडे नजर वरही करून पाहिलं नाही !! पण ती काही म्हणो !! आता प्रश्न आहे माझ्या पत्नीचा !! जिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तो त्या नीच देशमुखला धडा शिकवायला हवा !! त्याला धडा शिकवायला हवाच !! माझ्या तावडी सापडला तर सोडणार नाही मी त्याला !! पण मी एक गोष्ट विसरतो आहे !! माया !!" अचानक श्रीधर भानावर आला तो थेट किचन मध्ये गेला. तिथे नंदा आणि प्रिया बोलतं बसल्या होत्या. "नंदा !! ही माया कोण आहे ??" अचानक श्रीधरने प्रश्न केल्याने नंदा गोंधळून गेली. तेवढ्यात मागून श्याम आला. "साहेब ! मी सांगतो माया कोण ते !!" श्रीधर मागे वळून पाहू लागला. "तू !! " "होय साहेब मी !! कारण मी तेव्हा इथेच बंगल्यात असायचो !!" "इथेच ?? काय घडलं होत श्...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!