मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लव्ह पोएम्स मराठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कातरवेळी || kataraveli || कविता || प्रेम ||

सहज लिहावं, नी कविता व्हावी !! कातरवेळी , जणू ती दिसावी !! क्षणात माझ्या, मिठीत यावी !! चारोळी ती, जणू पूर्ण व्हावी !! सहज पहावं, नी प्रेमात पाडावी !! सखी नजरेतून, मज का बोलावी !! माझ्यातील मला, जणू ती मिळावी !! उगाच का मग, कुठे ती शोधावी ?? हळूवार फुंकर, आठवांची द्यावी !! जीर्ण पानांची , पानगळती व्हावी !! कुठे हुरहूर, का उगाच लागावी ?? उरल्या क्षणात, भेट तिची व्हावी !! सहज हसू ते , ओठांवरती आणावी !! गालावरच्या खळीने , अजून ती खुलावी! पाहता एकदा , पुन्हा ती पाहावी !! सखी नजरेतून , कूठे आज न जावी !! रातराणी जणू , मज ती भासावी !! कातरवेळी अलगद, जणू ती बहरावी !! कळी ती झाडावरची , जणू ती असावी !! गंध तो पसरावा , तशी ती पसरावी !! सहज लिहावं, नी कविता व्हावी !! कातरवेळी , जणू ती दिसावी !! ✍️ योगेश खजानदार

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला || Beautiful Marathi Poem ||

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !! रोजच्या आठवणींत!!  गिरवायच होत तुला !! हळूच अलगद गुलाबी थंडीत, बोलायचं होतं तुला !! तुझ्या नकारातही अलगद तेव्हा, हसू बघायचं होतं मला !! ऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !! पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !! कधी नकळत तेव्हा , माझ्यात शोधायचं होत तुला !! वळवणावरती वळताना,  अश्रू लपवायचे होते मला !! ऐक ना !! पुन्हा भांडायच होत तुला !! कळत नकळत रुसल्यावर, मनवायच होत तुला !! गालावरच्या रंगास तेव्हा , आरशात दाखवायचं होत तुला !! सारं काही विसरून तेंव्हा , मिठीत घ्यायच होत मला !! ऐक ना !! पुन्हा नव्याने पहायचं होतं तुला !! नकळत त्या नजरेत, कैद करायच होत तुला ! पापण्यात त्या , जपायच होत तुला !! चोरुन त्या नजरेस, बोलायचं होत मला !! ऐक ना !! पुन्हा वचन द्यायचं होत तुला !! प्रत्येक श्वास तेंव्हा, बोलत असेल जेव्हा तुला !!  आयुष्याचे क्षण जेवढे, सारे देऊन टाकायचे होते तुला !! आणि मिठीत येताना तू, अशीच सोबत हवी होती मला !!! ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !!! पुन्हा रोजच्याच आठवणींत, गिरवायच होत तुला !! ✍️ योगेश खजानदार