रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||


रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !!
क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !!
दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !!
पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !!

चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !!
चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !!
गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !!
कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !!

स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !!
सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !!
धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !!
सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !!

शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !!
झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !!
कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !!
कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !!

कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !!
कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !!
कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !!
कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...