तुझे रुसणे

न कळावे मनाला काही
तुझे हे भाव सखे
तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे

कसे समजावे डोळ्यांना ही
ते पाहतात ती तुच असे
रागावलेल्या कडां मध्ये ही
माझे चित्र का अंधुक दिसे

कुठुन येतो तो अबोला
तु मजला का बोलत नसे
शब्दांविना सर्व काही
आज तुला ते कळते कसे

कोणता हा राग सारा
कारण कोणते न दिसे
न कळावे भाव तुझे तरी
मन शोधते त्यास कसे

का असे हे रागावने तुझे
मनास का काही कळत नसे
आणि तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे
-योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...