मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||




जन्म

१. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
२. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५)
३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०)
४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०)
५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००)
६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७)
७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६)
८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९)
९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४)
१०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३)
११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२)


मृत्यू

१. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९)
२. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२)
३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३)
४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३)
५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११)
६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७)
७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२)
८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९८७)
९. नॉर्मन कॅन्टोर, कॅनडाचे इतिहासकार (२००४)
१०. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९९५)


घटना

१. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. (१९२७)
२. भारतीय चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. (२००२)
३. नेदरलँड्स देशात स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला. (१९१९)
४. चीली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८१०)
५. बर्मा मध्ये संविधान बरखास्त करण्यात आले. (१९८८)
६. महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१९९७)
७. भारतीय सरकारने ई- सिगारेटवर बंदी घातली. (२०१९)
८. भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील उरी या गावाजवळ भारतीय सैन्य तळावर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हल्ला केला, यामध्ये भारताचे १७ सैन्य शहीद झाले तर १००हून अधिक जखमी झाले. (२०१६)
९. जमैका , रवांडा, त्रिनिदाद, बुरुंडी आणि टोबॅगो या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६२)

महत्व

१. International Read An EBook Day
२. World Water Monitoring Day
३. World Bamboo Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...