मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ मार्च || Dinvishesh 18 March ||


जन्म

१. रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे नेते (१९५५)
२. रत्ना पाठक, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६३)
३. पृथ्वीराज चव्हाण, इंडियन नॅशनल काँग्रेसचे नेते (१९४६)
४. ख्रिस्तिएन गोल्डबाच, जर्मन गणितज्ञ (१६९०)
५. नेविले चंबरलेन, ब्रिटीश पंतप्रधान (१८६९)
६. शहाजीराजे भोसले (१५९४)
७. तात्यासाहेब विरकर, शब्दकोशकार (१९०१)
८. वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यसैनिक (१८८१)
९. स्नेहल प्रधान , भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८६)
१०. नवीन निश्चोल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४६)
११. मालती बेडेकर , लेखिका (१९०५)
१२. शशी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता (१९३८)
१३. इंद्रजित गुप्ता, भारतीय राजकीय नेते (१९१९)
१४. एफ डब्लू दे क्लर्क, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९३२)
१५. एन के पी साळवे , भारतीय राजकीय नेते (१९२१)

मृत्यु

१. विश्वनाथ नागेशकर , प्रसिध्द चित्रकार (२००१)
२. रॉबर्ट वॉल्पोले, पहिले ब्रिटीश पंतप्रधान (१७४५)
३. एलेफथेरिओस वेनिझीओल्स, ग्रीसचे पंतप्रधान (१९३६)
४. पेगी वूड, अभिनेत्री (१९७८)
५. विल्मा बँकी , अभिनेत्री (१९९१)
६. अँड्र्यु ब्रित्तोन, अभिनेते (२००८)
७. ऍडम ओसबोर्न , ओसबॉर्न कंपनीचे संस्थापक (२००३)
८. सर जॉन इलियट , हवामानशास्त्रज्ञ (१९०८)
९. लॉरेन्स स्टर्णे, लेखक (१७६८)
१०. लुईस ब्रोंफिल्ड, लेखक (१९५६)

घटना

१. आझाद हिंद सेनेने भारताच्या ईशान्य सिमेचा भाग ब्रिटीश सत्तेचा पराभव करून स्वतंत्र केला. (१९४४)
२. जगातील पहिली सार्वजनिक बस सेवा पॅरिस येथे सुरू करण्यात आली. (१६६२)
३. ग्रीसने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१९२०)
४. असहकार आंदोलन केल्याबद्दल महात्मा गांधी यांना सहा वर्षे तुरुंगवास झाला. (१९२२)
५. नाझी जर्मनीने हंगेरी काबिज केले. (१९४४)
६. अलेक्सेय लिओनिव हे पहिले अंतराळात आपल्या अंतराळ यानातून voskhod 2 मधून बाहेर अंतराळात जाणारे व्यक्ती झाले. (१९६५)
७. पुर्व पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. (१९७८)
८. Messenger अंतराळयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. (२०११)
९. वलादिमिर पुतीन हे रशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१८)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...