मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २६ मार्च || Dinvishesh 26 March ||


जन्म

१. अर्चना पुरण सिंघ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६२)
२. अडॉल्फ हुर्विता, जर्मन गणितज्ञ (१८५९)
३. मधू शाह, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६९)
४. महादेवी वर्मा, कवयत्री लेखिका (१९०७)
५. सिंगमन ऱ्ही, साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१८७५)
६. धिरेंद्र नाथ गांगुली, भारतीय चित्रपट अभिनेते (१८९३)
७. गुचिओ गुच्ची , गुच्चीफॅशन कंपनीचे संस्थापक (१८८१)
८. सेनोफोन झोलोटास, ग्रीसचे पंतप्रधान (१९०४)
९. लॅरी पेज, गूगलचे सहसंस्थापक (१९७३)
१०. केयरा नाईटले, हॉलिवूड अभिनेत्री (१९८५)

मृत्यु

१. सुकुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)
२. बाबुराव बागुल, दलित साहित्यिक (२००८)
३. के के हब्बर , सुप्रसिद्ध चित्रकार (१९९६)
४. ग्रेटे गुब्रान्सन, ऑस्ट्रियन लेखक (१९३४)
५. डेव्हिड जॉर्गे, ब्रिटीश पंतप्रधान (१९४५)
६. अहमद सेकाऊ टुरे, गिनीचे राष्ट्राध्यक्ष (१९८४)
७. जेम्स कॉलघान, ब्रिटीश पंतप्रधान (२००५)
८. अनिल बिस्वास , भारतीय राजकीय नेते (२००६)
९. नवलमल फिरोदिया, स्वातंत्र्यसैनिक (१९९७)
१०. हरेन पांड्या , गुजरातचे मंत्री (२००३)

घटना

१. ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन बॉम्बेवर कब्जा केला. (१६६८)
२. त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०१३)
३. ब्रिटीश कालखंडात भारताची राजधानी कलकत्त्या वरून दिल्ली करण्यात आली. (१९३१)
४. बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हा स्वतंत्र देश झाला. (१९७१)
५. पहिल्या संस्कृत परिषदेस नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे सुरुवात झाली. (१९७२)
६. गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू झाले. (१५५२)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...