मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० मार्च || Dinvishesh 20 March ||


जन्म

१. अल्का याग्निक, पार्श्वगायिका (१९६६)
२. रेन कॉटी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८८२)
३. अल्फान्सो गार्सिया रोबल्स, नोबेल पारितोषिक विजेते मॅक्सिकन राजकिय नेते (१९११)
४. रुडॉल्फ किर्चचलेजर, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१५)
५. गायत्री जोशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७७)
६. सर्गेई पेट्रोविच नोविकोव, रशियन गणितज्ञ (१९३८)
७. ब्रायन मुलरोने, कॅनडाचे पंतप्रधान (१९३९)
८. मदन लाल , भारतीय क्रिकेटपटू (१९५१)
९. आनंद अर्मित्रज, भारतीय टेनिसपटू (१९५२)
१०. वसंत कानेटकर, नाटककार (१९२०)

मृत्यु

१. बाळ सीताराम मर्ढेकर, कवी लेखक (१९५६)
२. मोहम्मद बिन तुघलक , दिल्लीचा सुलतान (१३५१)
३.  खुशवंत सिंग, भारतीय पत्रकार (२०१४)
४. ज्युलियस रॉबर्ट विन मयेर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८७८)
५. लजोस कोस्सुठ, हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष (१८९४)
६. वेनस्शनो कॅरांझा, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९२०)
७. ईवन विनोग्राडव, रशियन गणितज्ञ (१९८३)
८. सोबन बाबू, भारतीय चित्रपट अभिनेते (२००८)
९. अँकर जोर्जन्सन, डेन्मार्कचे पंतप्रधान (२०१६)
१०. मल्कम फ्रासेर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (२०१५)

घटना

१. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. (१९२७)
२. अलेस्सांद्रो वॉल्ट यांनी इलेक्ट्रिक बॅटरीचा शोध लंडनच्या राष्ट्राध्यक्षना पत्राद्वारे सांगितला. (१८००)
३. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. (१६०२)
४. ESRO (European space Research organization) ची स्थापना झाली. (१९६४)
५. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. (२०२०)
६. रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकेची स्थापना करण्यात आली. (१८५४)

महत्त्व

१. जागतीक चिमणी दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...