मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ एप्रिल || Dinvishesh 1 April ||


जन्म

१. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक,  संस्थापक(१८८९)
२. सोफी जर्मैन, फ्रेंच गणितज्ञ (१७७६)
३. तरुण गोगोई, आसामचे मुख्यमंत्री (१९३६)
४. गुरू तेग बहादूर , शिखांचे नववे गुरू (१६२१)
५. मोहम्मद हमीद अन्सारी, भारताचे उपराष्ट्रपती (१९३७)
६. जस्विंदर सिंघ (जॅझी बी ), भारतीय गायक (१९७५)
७. भागीरथी नेपाक, भारतीय लेखक (१९३१)
८. गास्टन इयेकेंस, बेल्जियमचे पंतप्रधान (१९०५)
९. अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४१)
१०. अजित पाल सिंघ, भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन (१९४७)
११. शिवकुमार स्वामी, समाजसेवक (१९०७)
१२. रोहिणी खाडिलकर, भारतीय बुद्धिबळपटू (१९६३)

मृत्यु

१. राजा मंगळवेढेकर, साहित्यिक (२००६)
२. लेव डी लांदाऊ , नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९६८)
३. आल्फ्रेडो नोब्रे कॉस्ट, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९९६)
४. संजीवनी मराठे, कवयत्री (२०००)
५. श्रीधर महादेव जोशी , समाजसेवक (१९८९)
६. असफ आली, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , वकील (१९५३)
७. किल्डारे डॉबस, कनाडियन लेखक (२०१३)
८. जॉन फॉर्सिथे, अमेरिकेन अभिनेता (२०१०)
९. पाउलो मुवांगा, उगांडचे पंतप्रधान , राष्ट्राध्यक्ष (१९९१)
१०. एन के पी साळवे, भारतीय राजकीय नेते (२०१२)

घटना

१. भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली. (१८९५)
२. जर्मनीने संशोधित संविधान स्वीकारले. (१८७१)
३. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९३५)
४. ओरिसा राज्याची स्थापना करण्यात आली. (१९३६)
५. अमेरीका एअर फोर्स अकादमीची स्थापना झाली. (१९५४)
६. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
७. जपानने सोने खरेदी वरील बंदी उठवली. (१९७३)
८. भारतामध्ये दशमान पद्धतीस सुरुवात झाली. (१९५७)
९. कॅमोडियन पंतप्रधान लोन नोल यांनी झालेल्या सत्तांतर बदलामुळे देशातून पलायन केले. (१९७५)
१०. ऍपल कंपनीची स्थापना स्टिव्ह वोजनिक आणि स्टिव्ह जॉब्स  यांनी एका छोट्या गॅरेज मध्ये कपरटिनो कॅलिफोर्निया येथे केली. (१९७६)
११. Gmail ही मेल सर्व्हिस गूगलने सुरू केली. (२००४)
१२. नेदरलँड हे पहिले राष्ट्र बनले जिथे समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. (२००१)
१३.इराक येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात दहा पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)


महत्त्व

१. भारतीय हवाई दल दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...