मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ मार्च || Dinvishesh 22 March ||


जन्म

१. रॉबर्ट ए. मिलिकण, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१८६८)
२. मधुसूदन कालेलकर, नाटककार (१९२४)
३. एमिलियो अगिनाल्डो, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
४. संदीप पंपल्ली, चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७९)
५. पॉल फुस्सेल, अमेरिकन इतिहासकार (१९२४)
६. अबोल्हासन बनिसदे, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९३३)
७. कॉर्णेलीस टी एलाउत, डच अर्थमंत्री (१७६७)
८. आल्फ्रेड प्लोट्स, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६०)
९. सूर्या सेन, स्वातंत्र्यसेनानी (१८९४)
१०. आदित्य सील, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)

मृत्यु

१. कांता राव, भारतीय चित्रपट अभिनेते (२००९)
२. इतींने बोबिल्लायर, फ्रेंच गणितज्ञ (१८४०)
३. प्रभाकर पाध्ये, पत्रकार (१९८४)
४. ए के गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेते (१९७७)
५. उपपालौरी गोपाला कृष्णमूर्ती , भारतीय तत्ववेत्ता (२००७)
६. ग्लोरिया होल्डन, अभिनेत्री (१९९१)
७. सी के चंद्रप्पान, भारतीय राजकीय नेते (२०१२)
८. निसार बाझमी, संगीत दिग्दर्शक (२००७)
९. डेव्हिड स्ट्रिकलॅड , अमेरिकन अभिनेता (१९९९)
१०. जेम्स डब्ल्यू ब्लॅक, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर (२०१०)

घटना

१. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला. (१९९९)
२. भारताने शालिवाहन शके कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१९५७)
३. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९७७)
४. इंटेलने पेन्टियम प्रोसेसर 64 बिट्स लॉन्च केले. (१९९३)
५. Covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वत्र लॉकडावून करण्याचा निर्णय घेतला. (२०२०)

महत्त्व

१. जागतिक पेय जल दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...