मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३ मार्च || Dinvishesh 3 March ||


जन्म

१. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, अमेरीकन संशोधक, शास्त्रज्ञ (१८४७)
२. जॉर्ज कँटर, जर्मन गणितज्ञ (१८४५)
३. शंकर महादेवन, संगीत दिग्दर्शक, गायक (१९६७)
४. केंटन कीलमर, अमेरीकन लेखक (१९०९)
५. सॅन यू, बर्माचे राष्ट्राध्यक्ष (१९१८)
६. जसपाल भट्टी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५५)
७. डॉ हापकीन, संशोधक , शास्त्रज्ञ (१८६०)
८. श्रद्धा कपूर , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
९. कॅमिला कॅबेलो, अमेरीकन गायिका, गीतकार (१९९७)
१०. जमशेदजी टाटा, टाटा उद्योग समूहाचे संस्थापक (१८३९)
११. रवी शंकर शर्मा , संगीतकार (१९२६)
१२. पुरुषोत्तम पाटील, लेखक कवी (१९२८)
१३. वीरेंदर सिंघ चौहान, भारतीय वैज्ञानिक (१९५०)

मृत्यु

१. रंजना देशमुख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री (२०००)
२. औरंगजेब, मुघल बादशहा (१७०७)
३. मिखाईल अर्तयबाशेव, रशियन लेखक (१९२७)
४. जॉर्जस पेरेक, फ्रेंच लेखक (१९८२)
५. स. गो. बर्वे, अर्थमंत्री (१९६७)
६. गोगा कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (२०११)
७. विल्यम आर. पोग्ज, अमेरीकन खगोलशास्त्रज्ञ (२०१४)
८. पंडीत निखिल घोष, तबलावादक (१९९५)
९. नारायण हरी आपटे, लेखक , साहित्यिक (१९१९)
१०. फिराक गोरखपुरी, उर्दू कवी लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते (१९८२)
११. वेंकटरमण राधाकृष्णन, भारतीय वैज्ञानिक (२०११)

घटना

१. फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७वे राज्य बनले. (१८४५)
२. शालिवाहन शकास प्रारंभ. ( (७८)
३. अमेरीकन टेलिफोन आणि टेलिग्राफची स्थापना करण्यात आली. (१८८५)
४. अमेरिका स्टील कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९००)
५. ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. (१९७३)
६. मेक्सिको आणि अमेरिकेने राजकिय संबंधांस नव्याने सुरुवात केली. (१९१७)
७. डॉक्टर धनंजय गाडगीळ हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. (१९६६)
८. सेनेगलने आपल्या संविधानात संशोधन केले. (१९६३)
९. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पहिले मराठी साहित्य संमेलन घेतले. (१९९१)
१०. मोजांबीक्यूने आपल्या सीमा रहोडेसियासाठी बंद केल्या. (१९७६)
११. रिपब्लिक ऑफ बॉस्निया आणि हर्झेगोविना यांची स्थापना झाली. (१९९२)
१२. श्रीलंकेच्या क्रिकेट टिमवर पाकिस्तानमध्ये गद्दाफी स्टेडियमकडे जाताना आतंकवादी हल्ला झाला. (२००९)
१३. कराची येथे बॉम्ब स्फोटात पन्नासहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...