मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ मार्च || Dinvishesh 29 March ||


जन्म

१. सैय्यद इशतिक अहमद जाफरी, जगदीप, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३९)
२. बाळ गाडगीळ, लेखक , अर्थशास्त्रज्ञ (१९२६)
३. जॉन टेलर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७९०)
४. अनिरुद्ध जगन्नाथ, मोरिशसचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान (१९३०)
५. एडवर्ड स्मिथ स्टॅन्ली, ब्रिटीश पंतप्रधान (१७९९)
६. जॉन मकेवेन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९००)
७. गुंदीबलसुंदरम, भारतीय क्रिकेटपटू (१९३०)
८. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (१९४८)
९. हनुमंत सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९३९)
१०. जॉन मेजर , ब्रिटीश पंतप्रधान (१९४३)
११. उत्पाल दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२९)
१२. केशरबाई क्षीरसागर, भारतीय राजकीय नेत्या (१९३०)

मृत्यु

१. जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
२. करमचंद थापर, भारतीय उद्योगपती (१९६२)
३. एरिक विल्यम्स, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
४. एडी रायडर, अमेरिकन अभिनेता (१९९७)
५. कार्लो उर्बाणी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (२००३)
६. अलेक्सेई अब्रिकोसोव, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१७)
७. आदूर भासी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
८. लक्ष्मण नायक, ओडिशाचे सामाजिक कार्यकर्ते (१९४३)
९. पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्त्या (१९९७)
१०. अनिता श्रेवे, अमेरिकेन लेखिका (२०१८)

घटना

१. तेलगू देसम पक्षाची स्थापना एन टी रामराव यांनी केली. (१९८२)
२. स्वित्झर्लंड एक प्रजासत्ताक देश झाला. (१७९८)
३. ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब ताब्यात घेतले. (१८४९)
४. ग्रेट ब्रिटनने लोनियन आयस्लॅड ग्रीसला परत केले. (१८६४)
५. जपानने सोन्याचे चलन स्वीकारले( Gold Standard). (१८९७)
६. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी येथे करण्यात आली. (१९६८)
७. ख्रिस्तोस सार्ट्जटेकीस हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८५)
८. पाकिस्तानमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास समोर झालेल्या बॉम्ब स्फोटात दहाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. अंद्रेज किस्का हे स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...